दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 41
" थांब थांब मला अजित बद्दल काहीतरी सांगायचे आहे म्हणून मी इथे तुला भेटायला आलो. पण तू दिसली नाहीस म्हणून मग तुझी वाट पाहत ड्रिंक करत बसलो. " तेजस तिला म्हणाला.
" अच्छा इतकीच अर्जंट गोष्ट आहे. मग फोन करायचा. " पिहू त्याला बोलली.
" मॅडम, स्वतःचा मोबाईल जरा पहा व्यवस्थित. तुम्ही मला ब्लॉक करून टाकले आहे." तेजस वैतागला. पिहूने तिची जीभ चावली. ती गोष्ट तिथेच सोडून तिने त्याला विचारलं,
" बोल काय झालं अजितला? "
"अजितने काही महिन्यांपूर्वी एका कंपनीचे शेयर विकत घेतले. ती कंपनी बँक क्रप्ट झाली आहे." तेजस उत्तरला.
" तुला हे सर्व कसं माहित? " पिहूने परत प्रश्न केला.
" मॅडम तुम्ही विसरलात मी एक वकील आहे आणि त्यासोबतच एका फायनान्स कंपनीच्या मालकाचा मोठा भाऊ आहे. " तेजसने तिला टोमणा मारला, " म्हणा आता हम आपके है कौन मग लक्षात तरी राहणार कसं? "
"पुरे, पुढे काय मग? आणि यात इतकं गंभीर काय आहे?" पिऊन ये त्याला विचारलं.
"गंभीर हे आहे की तो, त्याने गर्भपाताच्या गोळ्या विकत घेतल्या." तेजस उत्तरला तसे पिहूने त्याच्याकडे शंकाकुल नजरेने बघितले.
" आता मला माहित आहे तुझ्या मनात आले असेल मी तुझ्या मित्रांचा पाठलाग करतो आहे. जे मुळीच खरं नाही ."
" मग कशाला गेला होतास त्याच्या मागे मागे? " पिहूने त्याला प्रश्न केला.
" घरचे नांदा लावत होते म्हणून आजोबाला भेटायला जाणार होतो. जाताना त्यांची मला काळजी आहे हे दाखवण्यासाठी आईने त्यांच्या काही औषधीही घेऊन यायला सांगितले होते. तेच खरेदी करायला मेडिकल मध्ये गेलो असताना तिथेच अजितनेही काही औषधं घेतली. मला पाहताच तो हडबडला. जरा घाई आहे असं म्हणून त्यांनी तिथून काढता पाय घेतला. मात्र घाई घाईत तो माझ्या आजोबांचे औषधं घेऊन गेला आणि त्याने खरेदी केलेली औषधं तिथेच ठेवली. बरं झालं मी त्याच्यासारख्याच घाई गडबडीत औषधं पाहता माझ्या घरी ती घेऊन गेलो नाही. नाहीतर कोणाचा गर्भपात करायच्या फिराकीत आहे म्हणून माझं कोर्ट मार्शल झालं असतं. तसंच मला त्या घरात पाय ठेवायचा म्हटलं की बर्डन येतं. म्हणून मी तिकडे जाताना दहा वेळा स्वतःकडे पाहतो. आपण चुकीची औषध उचलली आहेत हे लक्षात येताच अजित धावपळ करत फार्मसीत परतला व जास्त काही न बोलता सॉरी सॉरी करत त्याची औषधं घेऊन निघून गेला. मला काही ते ठीक वाटलं नाही म्हणून मी फार्मसी वाल्याला विचारताच त्यांनी ती औषधं गर्भपाताची असल्याचे सांगितले. तुझ्या या मित्राचे बाहेर कुठे काही लफडे तर नाही ना? " शेवटच्या ओळीवर भर देत पिहुला विचारले.
" त्याचे लफडे नाही आहे तेजस. त्याची बायको दुसऱ्यांदा गरोदर आहे आणि त्याला येणाऱ्या बाळाची जबाबदारी घ्यायची नाही आहे." पिहू डोक्याला हात लाऊन उत्तरली, "पण म्हणून का असं गोळ्या देऊन गर्भपात करावा? सरळ बोलावं बायकोसोबत आणि दवाखान्यात नेऊन व्यवस्थित करावं काय करायचं ते." पिहू संतापली.
" तुम्ही बायका इतक्या सरळपणे ऐकून घेता का? " तेजसने तिला टोमणा मारला.
" तुझे काम झाले. खूप खूप धन्यवाद तुझे माहिती दिल्याबद्दल. चल जा आता. " पिहु त्याला त्याचा हात पकडून उठवत म्हणाली.
" आज रात्री इथेच राहू दे ना. कार चालवून कसा जाणार मी सांग. " तेजस केविलवाण्या आवाजात तिला म्हणाला.
" उबेर करून देते. " पिहूने तिच्या मोबाईल मध्ये त्याच्यासाठी उबेर बुक केली.
" आपण एकमेकांसाठी योग्य आहोत पिहू. एक चान्स दे मी परत कधीच तुझ्यावर कसल्या प्रकारचा दबाव आणायचा प्रयत्न करणार नाही. " तेजस जाता जाता तिला म्हणाला.
"पाहू ते नंतर आपण. सध्या स्वतःला अल्कोहोल पासून दूर ठेव." पिहू दार लावत त्याला म्हणाली. एक ग्लासभर थंड पाणी पिऊन तिने आणि त्याला फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतला. मोबाईलवर काय बोलणार? तिच्या घरी जाऊन प्रत्यक्षच बोलायला हवे. देवा सद्बुद्धी दे त्या अजितला. अनिताचा हसमुख चेहरा वारंवार तिच्या नजरेसमोर येऊ लागला. आता मलाच काहीतरी करायला हवे. असा मनोमन विचार करून ती शूज घालून पुन्हा अनिताच्या घराच्या रस्त्याला लागली.
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा