Login

DINK भाग 42

पिहूची विचार सरणी शेवट पर्यंत तिची साथ देईल का?
दीर्घकथा लेखन स्पर्धा

DINK भाग 42

"मॅडम परत?" अनिताने तिला पाहताच चकरावून विचारलं, "माझ्या मुलाची सवय झाली ना तुला?"

"मुळीच नाही. तो तेजस सारखा माझ्या मागे फिरतोय म्हणून म्हटलं काही दिवस इथेच राहते. तुला काही हरकत नाही ना." पिहूने तिला विचारलं.

"मुळीच नाही." अनिता उत्तरली.

"धन्यवाद तसेही तुम्हाला अशात प्रायव्हसीची काय गरज?" पिहू स्वतःशीच बडबडली.

"बस तु, टीव्ही पाहा नाहीतर काम कर. मी आत निरवचा अभ्यास घेत आहे." अनिता तिला पाण्याची बॉटल देत म्हणाली.

"मी अजितचं डोकं खाणार." पिहू तोंड लॅपटॉपमध्ये खुपसवून बसलेल्या अजितकडे बघत कुटील हसली.

"चालेल, उलट बरं होईल. तुला पैसा गुंतवणूक करायच्या छान छान कल्पना मिळतील त्याच्याकडुन. खूप हुशार आहे माझा नवरा त्या बाबतीत." अनिता त्याच्यावरून हात ओवाळत त्याची नजर काढत तिच्या खोलीत निघून गेली.

"कसा आहेस तु?" पिहूने अजितला अगदी खेटून बसत विचारलं.

"हे हे काय करत आहेस तु?" अजितने विजेचा झटका बसवा असे तोंड करून दबक्या आवाजात पिहूला विचारलं, "अनिता तुझी मैत्रीण आहे आणि तु तिच्या नव....."

त्याचे वाक्य पूर्ण आधीच पिहू त्याची कॉलर पकडून त्याच्यावर नागिणी सारखी फुसफूसली ,"मी तिच्या प्रिय नवऱ्याला धमाकावत आहे की त्याने जर माझ्या प्रिय मैत्रिणीच्या भावनांशी खेळण्याचा जराही प्रयत्न केला तर मी त्याची ऐशी की तैशी करणार. " पिहू त्याला ढकलून बाजूला झाली.

"मी, मी काय केलं? मी तर उलट तुझी मैत्रीण आनंदी राहावी याच प्रयत्नात आहे. त्यासाठी दोन दोन जॉब करत आहे मी. फक्त 2-3 तास झोप घेत आहे रोज." अजित तिला म्हणाला.

"अच्छा, त्या गर्भपाताच्या गोळ्या कशाला खरेदी केल्या मग?" पिहूने त्याला विचारलं.

"म्हणजे तेजस व तु अजूनही भेटत आहात. तुमचे ब्रेकअप नाही झाले." तो चाचरतच बोलला.

"ते सोड तुझी हिम्मत कशी झाली अशा गोळ्या खरेदी करण्याची? तिला किती त्रास होईल कधी विचार केला आहेस तु? शारीरिक सोडच पण मानसिक रित्या तिची काय अवस्था होईल जेव्हा तिला कळणार की तिच्या प्रिय नवऱ्यात स्पष्ट बोलण्याची हिम्मत नव्हती म्हणून त्याने हा असा मार्ग निवडला." पिहूने त्याला चांगले सुनावले, "असा दुबळेपणा ठीक नाही यार. त्या गोळ्यांनी तिचे पोटच साफ होणार नाही तिचे सर्व हार्मोन्सचे संतुलन बिघडणार. पण तुम्हा स्वार्थी माणसांना काय करायचे त्याचे. आन दे त्या गोळ्या."

"पिहू तु समजते आहेस तितका स्वार्थी नाही गं मी. मी तिला बऱ्याचदा समजावण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्यासाठी एकच मूल खूप आहे. दुसरे नको. ती मात्र मी एकटी पडली तशी माझ्या मुलालाही एकटं पाडू का? आपल्या नंतर त्याला कोणीतरी हवं असा तिचाच रट्टा लावून आहे." अजितने स्पष्टीकरण दिले.

"अरे तिचा अनुभव तसा आहे. पण म्हणून तु तिला स्पष्ट कारण सांगायचे सोडून असले काम करतो आहे. हे ठीक आहे का?" पिहूने त्याला विचारलं.

"मम्मा तु पप्पा आणि मावशीच्या गोष्टी चोरून ऐकत आहेस?" छोट्या निरवचा आवाज त्यांच्या कानावर आला. त्यांनी त्या दिशेला बघितले. त्या दोघांसाठी गाजरचा हलवा घेऊन आलेल्या अनिताने त्यांचे बरेच संभाषण ऐकले होते. ती काहीच न बोलता निरवला घेऊन बेडरूममध्ये निघून गेली.

"जा आता बोल तिच्याशी. समजाव तिला की तिने बघितलं तसं काहीच नाही." अजित पिहूला म्हणाला.

"शांती ठेव. आधी असे कर्मच कशाला केले? आता तरी सांगशील कुठे ठेवल्या त्या गोळ्या?" पिहूने त्याला उलटं झापलं.

"मी इतका निर्दयी नाही गं. मनात आलं होतं माझ्या म्हणून मी खरेदी केल्या गोळ्या. पण घरी आल्यावर मी त्या गोळ्यांचा अभ्यास केला. त्या गोळ्या घेणाऱ्याला कोणत्या त्रासातून जावे लागते ते सर्व समजून घेतलं आणि तिला गोळ्या द्यायचा विचार मनातून काढून टाकला. तेव्हाची तु त्या गोळ्यांबद्दल विचारत आहेस. त्या डस्टबिनमध्ये कधीच टाकून दिल्या मी." अजित शांतपणे बोलला.

क्रमश :

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all