दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 46
"एक बोलू, रागावू नकोस पण तु खूप कनिंग आहेस." ललित पिहूला म्हणाला.
"अशीच आहे मी. म्हणूनच कोणत्याही आधाराशिवाय या जगात टिकून आहे मी." पिहू त्याला मिश्किलपने बोलली.
"माझा भाऊ साधा आहे. त्याला का त्रास देत आहेस?" ललितने तिला विचारलं.
"वैयक्तिक विषय इथे काम करतांना नको." पिहू कागदपत्र वाचत उत्तरली.
"यार इतकी शांत कशी गं तु? तुला माहित आहे तो तिकडे लंडनमध्ये जाऊन बसला आहे एका फिमेल क्लाईंट सोबत. त्यांच्यात काही झाले तर?" ललितने तिला विचारलं.
"चांगलं होईल. त्याला त्याची सोबत देणारी, त्याला हवी तशी मुलगी शोधण्याचा पूर्ण अधिकार आहे. आता तु ही कागदपत्र वाचून सही कर. नाहीतर माहित पडलं तुझी इस्टेट मी माझ्या नावावर करून घेतली." पिहू त्याला म्हणाली.
"त्यात काय, तशीही अर्ध्या इस्टेटची मालकीण तूच आहेस." ललित स्वतःशीच बडबडला.
"काय म्हणालास तु?" पिहूने त्याला शंकाकुल नजरेने पाहत विचारलं.
"काही नाही, खूप हुशार आहेस म्हटलं. आधी अनिता व अजितला आर्थिक मदत करण्याच्या बहाण्याने तुझ्या या व्यवसायात त्यांना समाविष्ट केलं, जीजालाही आणखी प्रसिद्धी मिळवून देईल असं बोलून तिच्या युट्युब द्वारे जाहिरात केली. म्हणजे प्रत्येक नातं इनकॅश करत आहेस तु." ललित मुद्दाम तिच्या मनात काय सुरु आहे ते बाहेर काढण्यासाठी आढेवेढे देऊन बोलला.
"हो तर अनिता, अजित, जीजा यांना जे हवं ते मिळतच आहे ना. बघ इतर कोणाला नियुक्त करता करता मला तितकाच पैसा खर्च करावा लागला असता, त्यापेक्षा आपल्या मित्र मैत्रिणीलाच कामं सोपवून त्यांनाही आपल्या सोबत प्रगती पथावर नेण्यात मला काही चूक दिसत नाही." पिहू बोलली, "तेव्हा आता तुझा हा खेळ बंद कर आणि कामावर भर दे." पिहू खुर्चीतून उठली. तोच काहीतरी आठवून तिने ललितला विचारलं,
"तुझ्या गर्लफ्रेंडला तुझ्या बायकोची पदवी मिळवून देऊ का?"
"ते कसं?" ललितचा प्रश्न.
"कसं नाही, किती लागणार ते विचार." पिहू.
"बोल." ललित
"अर्ध कर्ज माफ करावं लागेल." पिहू
"पूर्णच करतो." ललित
"नको, जितकी मला गरज आहे तितकेच हवे." पिहू
"बरं बाई बोल काय काय आहे तुझी योजना." ललित.
"उद्या सकाळी तिला कर्वे नगरच्या शिव मंदिरात पाठव. "
"तुला कसं माहित माझी आई दर सोमवारी सकाळी शिव मंदिरात जाते?" ललितने पिहूला विचारलं. पिहूच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरले. तिने फक्त भोळ्या उडवल्या.
" म्हणजे तू आधीच योजना बनवली होती तर माझ्याकडून अर्ध कर्ज माफ करण्याची. " ललित तिला म्हणाला, " खरंच खूप चतुर आहेस तू."
" चतुरपणा करावाच लागतो. नाहीतर तुझे कर्ज फेडण्यातच म्हातारी होईल. मग ऐश कधी करणार आणि ऐश मला स्वतःने कमावलेल्या पैशांवरच करायची आहे. " पिहू बोलली.
"लगे रहो. मी घेऊन येतो मिशाला घेऊन." ललित म्हणाला.
" मुळीच नाही तू दूर दूर पर्यंत कुठेही दिसायला नको, तिला एकटीला पाठवशील." पिहूने त्याला सांगितले.
"बाई पाहा बरं सांभाळून. नाहीतर माहित पडलं गर्लफ्रेंड तर गेलीच गेली आईनेही चपलीने ठोकून काढलं." ललित म्हणाला.
"मला व्यवसाय करायला पैसा हवा आहे. तेव्हा तू निश्चिंत रहा." पिहू त्याला आश्वासत्मक आवाजात बोलून तिथून चालती झाली.
दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी ललितची आई पूजेचे ताट घेऊन आली. पूजा करून मंदिराच्या आवारात बसली. ठरल्याप्रमाणे मिशा बरोबर त्यांच्या बाजूलाच हात जोडून आत बसली. तिचे काळेकुट्ट हात पाहून त्यांना आधी किळस आली कारण त्यांच्या घरी लहानपणापासून रंगाला खूप महत्त्व दिल्याचे त्या बघत आल्या होत्या. काही मिनिटातच आरती सुरू होणार होती. पुजारी म्हणाले, " कोणाला आरती म्हणता येईल का? आमच्या पुजारींना खूप खोकला आहे. त्यांना गायला जमणार नाही. "
" मग मोबाईलवर लावा आरती. " पूजेला आलेली एक स्त्री म्हणाली.
" हो तो शेवटचा उपाय आहे. पण म्हटलं कोणी स्वतःच्या आवाजात म्हणणार असेल तर छानच होईल. " पुजारीजी बोलले.
"मी गाते आरती." मिशा पुढे होऊन म्हणाली.
सर्वांनी आश्चर्याने तिच्याकडे बघितले. ही एक काळी कुट्ट, निग्रो सारखी दिसणारी मुलगी. हिला आरतीही येते. पण त्यांना कुठे माहित होते ही सर्व पिहूची सेटिंग असल्याचे. पुजारीने मिशाला आरती गायला समोर बोलावले. तिने फक्त सुखकर्ता दुःखहर्ताच नाही, तिने 'लवथवती विक्रळा ब्रह्मांडी माळा' ही आरती सुद्धा अगदी त्याला सुरात गायली.
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा