Login

DINK भाग 47

पिहूने तिचे स्वतःचा व्यवसाय प्रस्थापित करण्याचे स्वप्न अखेर पूर्ण केले पण त्याला यश येणार का?
दीर्घकथा लेखन स्पर्धा

DINK भाग 47

ललितची आई चांगलीच इम्प्रेस झाली. पण पिहुने सांगितल्या प्रमाणे मिशा त्यांच्याकडे न बघताच पुजारींच्या पाया पडुन, त्यांचा आशीर्वाद घेऊन आवारात असलेल्या एका बाकडावर जाऊन बसली. ललितची आई तिच्याकडे बघतच होती. त्यांना तिच्याशी बोलायची इच्छाही झाली पण त्या काळ्या रंगाच्या विटाळाने त्यांना थांबवले. मिशा ही जास्त वेळ तिथं न गमावता आपल्या पुढील कामासाठी निघून गेली. अशाप्रकारे दोन सोमवार गेले. तिसऱ्या सोमवारी ललिताच्या आईला राहवले नाही. त्यांनी मिशाची विचारपूस केली. ती कुठे राहते, काय करते सर्व विचारले. मिशाने याबद्दल सगळं खरं खरं सांगितलं. फक्त ललितचे नाव तेवढे घेतले नाही.

त्या दिवशी संध्याकाळी आईने मिशाला किती नोटीस केले हे माहीत करण्यासाठी ललित मुद्दामहून आईला भेटायला घरी गेला.

" अरे ललित तुला माहित आहे आज तुझी आई मंदिरातून एका काळया कुट्ट निग्रो मुलीला घरी घेऊन आली होती. " ललितच्या आजोबांनी ललितला सांगितले.

" बापरे हे कसे झाले आई? " ललितने आश्चर्याचा आव आणत आईला विचारले.

" कसे झाले म्हणजे तुला काय सांगू. खूपच चांगली मुलगी आहे ती. माहित आहे मागील पाच-सहा वर्षांपासून एका भारतीय, इथे पुण्यात राहणाऱ्याच मुलासोबत तिचे प्रेम प्रकरण सुरू आहे. तोही तिच्यावर खूप प्रेम करतो म्हणे पण ती काळी असल्यामुळे त्याला भीती आहे की त्याच्या घरचे तिला स्वीकारणार नाहीत व लवकरात लवकर त्याचे लग्न इतर कोणाशी लावून देतील." ललितच्या आईने निशा बद्दल त्याला सांगितले.

" जाऊदे ते सर्व तू असं अनोळखी लोकांना घरी घेऊन येत जाऊ नको. " ललितने त्याचा यात काही इंटरेस्ट नाही असं दाखवण्याचा प्रयत्न केला.

"हो रे. पण ती मुलगी कुठेतरी मला आपलीशी वाटली. म्हणजे तिने सांगितलेल्या मुलाची अवस्था मला जवळपास आपल्याच घरची कहानी वाटली." आई त्याला म्हणाली, " तू नाहीस ना तिचा तो बॉयफ्रेंड ज्याच्या आईला काळया रंगाचे लोकं आवडत नाहीत? " आईच्या तोंडून हे शब्द ऐकताच चहा पीत असलेल्या ललितला जोरात ठसका बसला. आईने उभे होऊन त्याच्या पाठीवरून हात फिरवला.

" असा कसा रे तू गबाळा. इतका मोठा झालास. फायनान्सचा चांगला बिझनेस करतोय. मोठमोठ्या क्लाइंट्सला हाताळतो आणि स्वतःच्या आईला एक छोटी गोष्ट पटवून देऊ नाही शकलास. त्यासाठी इतके मोठे नाटक रचावे लागले तुला?" ललितची आई त्याला म्हणाली.

" आई तू कशाबद्दल बोलत आहेस? " त्याने आश्चर्याने आईकडे बघितले.

" अच्छा अजूनही सांगणार नाहीस मला." आई खुर्चीत बसत म्हणाली, " ये बाई बाहेर ये, येतांना पाणी घेऊन ये ह्याच्यासाठी."

"आई कोणाला बोलवत आहेस तू?" ललित ने त्याच्या आईला विचारले.

" होणाऱ्या सुनबाईला माझ्या. " आई उतरली.

"पाणी." मिशाचा आवाज त्याच्या कानावर पडला. त्याची अवस्था चांगलीच हास्यास्पद झाली. त्याला त्याच्या कानांवर आणि डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. त्याच्या आईने निशाला सुनबाई म्हणून संबोधले तेही इतक्या लवकर कसे काय?

" आई सॉरी, यापुढे काहीच लपवणार नाही तुझ्याकडून. " ललित त्याच्या आईच्या पायाशी बसून म्हणाला, " मला खूप भीती वाटत होती गं. मला मिशा व तुझ्या मधून कोणा एकाची निवड करायची नव्हती. मला माझ्यासोबत दोघीही हव्या होत्या. मला माफ कर. "

" ठीक आहे बाळा. मी समजू शकते तुला. आपल्या घरात चालणाऱ्या गोष्टी लहानपणापासून तू बघितले आहेत. त्यामुळे तुझ्या मनात अशी भीती येणे साहजिकच आहे. पण ही भीती आपल्या पुढील पिढीकडे जाणार नाही याची काळजी आपल्यालाच घ्यायला हवी. तू मिशाच्या आई-बाबांना कळव. तुमचे लग्न लवकरात लवकर धुमधडाक्यात लावून देणार मी. "

" थँक्यू आई, खूप खूप थँक्यू. माझी गोडुली आई. सांग तुला काय हवं आहे माझ्याकडून?" ललितने आईला विचारले.

" जास्त काही नको लग्न झाल्यावर कमीत कमी पंधरा-वीस दिवस आमच्या सोबत इथे राहा." आई उत्तरली.

" फक्त पंधरा दिवस. मी पंधरा-वीस वर्ष इथेच राहायचा विचार करत आहे. " ललित मिश्किलपणे म्हणाला.

" नको बाळा कारण मला चांगलं माहित आहे तुझ्या बाबा व आजोबाला तू फक्त काहीच दिवस सहन करू शकतोस आणि दोन लेकरं पुरे आहेत मला सांभाळायला आणखी दोन नकोत. " इतकं बोलून त्याची आई खळखळ हसू लागली.

क्रमश :

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all