“काय मग?? तुम्ही कधी देताय गुडन्यूज??”
काकूंनी उपहासानं विचारलं आणि यशदा कानकोंडी झाली.
“आमचं नशीबच फुटकं गं. पाच वर्षं होऊन गेली, बाकीच्यांना दोन दोन पोरं झाली पण आम्ही अजून कोरेच.”
हेमाताईंनी संधी साधली.
यशदा आणि मिलिंदचं पाच वर्षापूर्वी लग्न झालेलं. अगदी ठरवूनबिरवून. गुलाबी दिवस सरले आणि मग लोक आडून आडून विचारायला लागले. आता तर सरळ तोंडावरच वांझ म्हटलं जायचं तिला.
तिनं मिलिंदच्या मिनत्या केल्या डॉक्टरकडे जायला पण तो तयार नव्हता.
आज तिनं ठाम निर्धार केला.
संध्याकाळी तो घरी आल्यावर ती त्याला म्हणाली “मिलिंद, उद्या आपण डॉक्टरांकडे जाऊ. एकदा तपासून घेऊ. आता मलाही आई व्हावंसं वाटतंय रे.”
“उद्या नाही जमणार. मी दिल्लीला जाणार आहे. पुढच्या आठवड्यात आलो की बघू.” तो नेहमीसारखी उडवाउडवी करून डोक्यावर चादर ओढून घेत घोरायला लागला.

सकाळी मिलिंद गेला. रोजची कामं आवरून ती तिच्या मैत्रिणीकडे गेली. मीरा गायनॅक होती. तिच्याकडे मन मोकळं करून झालं आणि अचानक मीरा म्हणाली “ये, आपण तुझ्या टेस्ट्स करून घेऊ. मिलिंद आला की त्याच्या पण टेस्ट करू. तोवर तुझे रिपोर्ट येतील.”
दोन दिवसांनी मीराचा फोन आला. “अभिनंदन यशू. तुझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत.”
“मी उद्या येते रिपोर्ट्स न्यायला.”
तिला एकदम हलकं वाटलं. देवासमोर साखर ठेवून मनोभावे नमस्कार करत ती कामाला लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी मीराकडे निघालेली तेव्हा बाबांना पासबुक हवं होतं म्हणून मिलिंदचं कपाट उघडलं तिनं आणि ते शोधताना तिच्या हातात एक लिफाफा आला. कुठल्यातरी पॅथोलॉजी लॅब चा होता तो आणि त्यावर मिलिंदचं नाव होतं.
तिनं सहज म्हणून तो उघडून बघितलं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली.
तो पोटंसी रिपोर्ट होता. त्यात लिहिलं होतं की मिलिंद कधीही बाप होऊ शकत नाही आणि त्यावर सात वर्षापूर्वीची तारीख होती.
“यशदा, सापडलं का ते पासबुक??”
बाबांच्या हाकेने ती भानावर आली.
हो बाबा, आलेच. म्हणत ते पाकीट बॅगेत कोंबत पासबुक घेऊन ती खाली गेली.
मी जरा जाऊन येते म्हणत पायात चप्पल सरकवत ती बाहेर पडली.
तिनं मीराला ते रिपोर्ट्स दाखवले.
“ओह, म्हणून तो टाळाटाळ करतोय का डॉक्टरकडे जायला??”
यशू सुन्न झालेली. मीरानं तिला पाणी प्यायला दिलं. थोडी स्थिर झाल्यावर मीरानं तिच्या कानात काहीतरी सांगितलं.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा