Login

डबलक्रॉस भाग - १

Double Cross
शहरातल्या दूर एका कोपऱ्यात कॅफे ऑन रॉक मंद दिव्यांनी उजळलं होतं. काही टेबल्सवर मित्र -मैत्रिणी घोळका करून ड्रिंक्स एन्जॉय करत होते तर कुठे जोडपी हातात हात घालून प्रेमाच्या गप्पा करत होते. आलेल्या कस्टमर्सना सुंदर तरुणी ड्रिंक्स सर्व्ह करत होत्या तर जवळच असलेल्या म्युझिकल स्टेज वर जिमी गिटार वाजवून वातावरण निर्मिती करत होता. अर्ध्या तासाने रोहन जॉईन झाला आणि जिमीने आपली शिफ्ट ओव्हर केली.

कोपऱ्यातल्या एका टेबलवर रोझी शांतपणे थंड बिअरचे घोट घेत काहीतरी विचार करत होती तेवढ्यात जिमीने तिला गालाला कीस करत भानावर आणले.

जिमी....काय हे रोझी ? गेले बरेच दिवस बघतोय सतत काही ना काही विचार करत असतेस . कधी स्पष्ट बोलतेस कधी हरवून जातेस . नक्की काय झालं आहे काही टेन्शन तर नाही ना? अर्थात पैश्यांव्यतिरिक्त असेल तर मला सांगू शकतेस हा. हसत हसत जिमी म्हणाला.

रोझी - पैशांच्याच प्रॉब्लेम दूर करणार आहे मी तुझा. त्यासाठीच गेले काही दिवस एक प्लॅन बनवत होते. तोच तुला आता सांगणार आहे पण मला एक सांग तू नक्की लग्न करणार आहेस ना माझ्याशी?

जिमी - अगं तुझ्याशिवाय मला आहे तरी कोण? आणि मी थांबलोय कारण तुलाही माहीत आहे मला अजून तरी नोकरी नाही ना राहण्याचा व्यवस्थित ठिकाणा. या कॅफेतल्या तुटपुंज्या पगारात कसे दिवस ढकलतोय ते माझं मलाच माहित.

रोझी... ठीक आहे तर मग ऐक.
थोडसं डोकं वापरून मला साथ देशील तर एक वर्षात तू करोडपती होशील पण त्यासाठी तुला फक्त लग्न करावं लागेल तेही वर्षभरासाठी. मिस डिंपल शर्मा बरोबर.

डिंपल शर्मा हे नाव ऐकून जिमी जवळ जवळ किंचाळला. ' तुला बिअर चढली आहे का रोझी. ' अगं शहरातल्या एका प्रसिद्ध उद्योगपती राजीव शर्मा ची मुलगी. माझ्यासारख्या गिटार वाजवणाऱ्याच्या गळ्यात का पडेल? इथे तूच मला अजून लग्नासाठी हो म्हणत नाहीस आणि त्या डिंपलशी माझं लग्न जमवायचा विचार करतेस?

रोझी - आधी माझं म्हणणं शांतपणे पूर्ण ऐकून घे मग तुझं तूच ठरव काय करायचं ते.

डिंपल शर्मा हे नाव तू फक्त ऐकून आहेस पण तिला कधी कुठे कोणत्या इंटरव्ह्यू मधे news मीडिया मधे तू पाहिलं आहेस का?
नाही अजूनतरी नाही.. पण माझ्या माहितीप्रमाणे तीचं कामावर प्रेम आहे तिला social media, interviews, वैगेरे असल्या गोष्टींची आवड नाही . प्रसिद्धी तिला आवडत नाही. तिच्या वडिलांनीच असं कुठेतरी एकदा स्टेटमेंट दिलं होतं.

जिमीच्या या उत्तरावर रोझी खो खो हसत सुटली . अरे वेड्या या फक्त कॅमेरासमोर बोलायच्या गोष्टी. माझं ऐक आता खरी गोष्ट काय आहे ते सांगते.

राजीव शर्मा ला डिंपल ही एकुलती एक मुलगी. शहरात DS group's चे जेवढे उद्योग आहेत ते या डिंपल च्या नावावर . नुकतेच दोन वर्षापूर्वी डिंपल ने वडिलांच्या सांगण्यावरून आपला business जॉइन केला.
डिंपल एक २३ वर्षाची तरुणी ae आहे पण ती माझ्यासारख्या सुंदर किंवा बाकी सामान्य मुलींच्या तुलनेत कुठेच बसत नाही. जन्मापासूनच तिचं वजन खूप जास्त आहे . त्यामुळे चेहरा एकदम थोराड दिसतो. खुण म्हणून की काय डागाळलेला भरपूर आहे. आणि त्यात भरीस भर म्हणून जन्मापासूनच तिच्या एका पायाला व्यंग आहे. वरून जरी नॉर्मल दिसत असला तरी चालताना तिचा एक पाय वाकडाचं पडतो. आणि या अशा मुलीची personal assistant म्हणून मी ६ महिन्यापूर्वी जॉईन झाले आहे. तिच्या अवतीभोवती वावरताना तिचं काम करताना मी एक गोष्ट नोटीस केली. माझ्यासारख्या सुंदर तरुणींना पाहून तिचा फार जळफळाट होतो आणि याचा बदला ती विनाकारण माझ्यासारख्या सुंदर तरुण लेडीज स्टाफ वर ओरडून काढते . Specially जेंट्स स्टाफ समोर तिला महिला आणि मुलींना ओरडायला फार आवडतं.
जाणीव करून देते की आम्ही सुंदर मुली तिच्यासारख्या बेढब मुलीची चाकरी करतो .

जिमी - जर हे असं असेल तर ती का म्हणून माझ्याशी लग्न करेल? माझ्यासारखा handsome young मुलगा फक्त पैशासाठी लग्न करतोय हे न कळण्याइतपत ती नक्कीच मूर्ख नाही . त्यामुळे तुझा जो काही प्लॅन असेल तो रद्द कर कारण इथेच प्लॅनची सुरुवात फसते.

हे डिंपलच काय कोणीही निर्बुद्ध माणूस ओळखू शकतो . पण याची एक दुसरी बाजू पण आहे आणि त्याच आधारे तुला डिंपलशी जवळीक करून तिच्या मनात जागा निर्माण करायची आहे. डिंपलला अनाथ अपंग मुलांचा खूप कळवळा आहे त्यांना मदत करायला त्यांच्या संस्थेला देणगी द्यायला ती कसलाच विचार करत नाही. तिचे एक अनाथाश्रम पण आहे बाकी बाहेर कुठेही जात नसली तर आठवड्यातून एक दिवस ती या मुलांना देते आणि तिच्या याच सवयीचा फायदा घेऊन तुला तिच्या जवळ जायचं आहे तिच्याशी प्रेमानं वागून विश्वासात घेऊन पुढचा डाव सुरू करायचा आहे. ...रोझी.

जिमी... समजा जर असं झालं तर एक वर्षात काय होईल? तिचा खून अपघात किंवा अगदी नैसर्गिक मृत्यू जरी झाला तरी जे पोलिस पहिलं मलाच आत टाकतील चौकशीला. आणि असं काही नाही झालं तरी तिचा म्हातारा बाप तो का म्हणून त्याच्या मुलीची इस्टेट माझ्या नावावर होऊ देईल. ? उलटं तोच माझ्यावर संशय घेऊन पोलिसांच्या ताब्यात देईल. शिवाय त्या डिंपलची लाइफ इन्शुरन्स पॉलिसी असणारच ना ? पॉलिसीसाठी मीच तिला मारलं असेल हाच पहिला विचार पोलिस नाहीतर तिच्या बापाच्या डोक्यात येईल. तिच्याशी लग्नाचं कारण हे पैसाच दिसणार कोणालाही.

जिमी या म्हाताऱ्याला आधीच हृदयरोगाचा त्रास आहे . मुलीचे हे रूप त्याला बघवत नाही. इतर बापांप्रमाणेच याची पण इच्छा आहे मरायच्या आधीच मुलीचा सुखी संसार त्याला बघायचा आहे. एकदा का या डिंपलचा बंदोबस्त केला तरी म्हाताऱ्याला दूर करणं अवघड नाही.

बोलता बोलता रोझीने आपल्या पर्समधून एक इन्व्हॉलॅप जिमिला दिलं.

रोझी....उद्यापासून काम सुरू व्हायला पाहिजे . ह्या इन्व्हॉलॅप मध्ये मी तुझे अनाथ - अपंग मुलांच्या संस्थेचे ID कॉर्ड आणि काही फेक डॉक्युमेंट्स बनवले आहेत. उद्या डिंपलचा वाढदिवस आहे त्यामुळे तिला भेट म्हणून तू हे संस्थेचं प्रपोजल घेऊन जाणार अर्थातच मी तिची असिस्टंट असल्यामुळे ही भेट मीच ठरवली आहे असं तिला सांगणार आहे त्यामुळे उद्या दुपारी ठीक ३ वाजता DS group's च्या 3Rd फ्लोअर वर पोहोच.

आणखी एक हा प्लॅन माझा आहे म्हणून यात तुला मी जे सांगेल तेच करावं लागेल उगाच काहीतरी करून स्वतःला आणि मला अडचणीत आणू नकोस. डिंपलला तर मुळीच सावध करू नकोस आणि तसं जर केलंस तर तुझ्यासकट मी पण अडचणीत येईल. आता ही आपली शेवटची भेट. पुढची भेट वेळ आल्यावर मीच सांगेल. तोपर्यंत गरज पडली तर फोनद्वारे संपर्कात रहा.

ग्लासमध्ये उरलेली बियर एका घोटात संपवून रोझी शांतपणे बिल पे करून निघून गेली आणि जिमी त्या दिशेने पाहत राहिला.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all