Login

डबलक्रॉस भाग २

Doubleceoss
DS group's ची चकाकणारी बिल्डिंग शहराच्या मध्यवर्ती भागात होती. आज डिंपलचा २४ वा वाढदिवस म्हणून ऑफिसला स्पेशली तिच्या केबिनला डेकोरेट करण्यात आले. सकाळपासूनच डिंपल आपल्या ऑफीसमधल्या स्टाफच्या , इतर वेंडर तसेच पार्टनर ग्रूपच्या शुभेच्छा स्वीकारत होती. शुभेच्छा देणारे अनेक फोन, मेसेज, इमेल्स सुरू होते . डिंपल शांतपणे त्यांना reply देत होती. फर्स्ट हाफ मधील ऑफिस कामे आटोपली आणि सहकाऱ्यांनी केक कटिंग करून तिचा वाढदिवस साजरा केला.

इकडे घड्याळात ३ वाजून गेले तरी जिमीचा पत्ता नाही म्हणून रोझी वैतागली होती. २-३ वेळा फोन ट्राय केला तरी त्याचा फोन नॉट रिचेबल येत होता . सर्व स्टाफ आपआपल्या जागेवर परतला.

इन्टरकॉम वरून डिंपलने रोझीला कॉल करून आजचे काही schedule पेंडिंग आहे का अशी विचारणा केली .

रोझी - नो मॅम ऑलरेडी ओव्हर. बट वन अपॉइंटमेंट इस पेंडिंग अँड आय एम वेटींग फॉर that पर्सन. ही बिलोंग्स टू हॅण्डिकॅप चाईल्ड कॅम्पिंग. वॉन्ट टू मीट अँड डिस्कस रिलेटेड दीस.

डिंपल.. ओके देन मे बी ही वॉन्ट सम डोनेशन ऑर एनी हेल्प फॉर चाईल्ड . यू कॅन अटेंड दिस अँड पे अमाउंट टू हिम. आय एम लिव्हिंग नाऊ.

डिंपलने आपली पर्स आणि ब्रिफकेस ड्रायव्हर कडे सोपवली आणि केबिनचा दरवाजा उघडून बाहेर पडणार तोच बाहेरच्या बाजूने कोणीतरी दरवाजा आत ढकलला आणि अनपेक्षितपणे डिंपल समोरच्या व्यक्तीला धडकली.

सॉरी... सॉरी ..मॅडम इट वॉज जस्ट अक्सिडेंट. आय एम गोइंग टू नॉक डोअर बट यू हॅव ओपन फ्रॉम इनसाइड.....

स्वतःला सावरत त्या तरुणाला म्हणजेच जिमिला बघताच डिंपल मिनिटभर त्याला पहातच राहिली.
६ फूट उंच गोरापान, जिम करून कमावलेलं पिळदार शरीर , शांत आणि बोलके डोळे, आणि बोलण्यात असलेलं आर्जव . यात भरीस भर म्हणून परफ्यूमचा मंद आणि हवासा वाटणारा सुगंध .

हॅलो मॅम आर यू ओके. - जिमी.

येस please कम अँड सीट . अँड बी कंफर्टेबल. Actually आय एम सॉरी.
प्लीज टेल मी व्हू आर यू?

खरंतर जिमीने रात्रभर रोझीच्या प्लॅन चा विचार केला होता पण त्याला पटतं नव्हतं . एकतर पैसा नोकरी हातात नाही त्यात वरून हे प्रकरण कशाला ओढवून घ्या उगाच . पण रोझी म्हणतेय म्हणून ट्राय करायला काय हरकत आहे उद्या जर प्लॅन विस्कटला तर देऊया या रोझीवर ढकलून. तसंही तीच काही खरं वाटतं नाही १० वर्ष रिलेशन मध्ये आहे पण लग्नाच्या नावावर बरोबर पैसा अपुरा पडतो म्हणून कारण देत असते .शिवाय तिचेच नखरे कमी नाहीत मी कितीही कमावलं तरी माझा अर्ध्याच्यावर् पगार तिच्या नट्टापट्टा करण्यातच जाणार.
त्याला सकाळपासूनचा दिवस आठवला .
DS group's मध्ये येण्यासाठी त्याला घोटून घोटून दाढी करावी लागली. स्वस्तातले फॉर्मल शूज, फॉर्मल कपडे , घड्याळ, आणि परफ्यूम अशी विनाकारण खरेदी करावी लागली. टॅक्सीचे पैसे वाचवण्यासाठी तो पार स्टेशनपासून ऑफिस पर्यंत चालत आला होता.
हे प्रशस्त ऑफिस आणि चकचकीत इंटेरियर पाहून त्याने विचार केला ' या असल्या हायफाय business ची ऑनर माझ्या सारख्याला नवरा बनवणं तर दूर, साधी नोकरी देताना पण १० वेळा इंटरव्ह्यू घेईल. काय म्हणून ही माझ्याशी लग्न करेल? मुळातच मी तरी कसं लग्न करू या ओबडधोबड अवताराशी ? जस्ट इमॅजिन जिमी - द हँडसम रॉक म्युजीशियन आणि बाजूला हे ओबडधोबड ध्यान.
मनाशी साधलेल्या संवादामुळे जिमिला हसू आले. त्याही परिस्थितीत तो हसला पण तेवढ्यात त्यानं समोर रागीट कटाक्ष टाकणाऱ्या डिंपलला पाहिले.

"यू नॉनसेन्स प्लीज गेट आऊट फ्रॉम माय ऑफिस नाव . हू द हेल यू आर? सीन्स मिनिट आय एम अस्किंग समथींग टू यू अँड यू आर लाफिंग ऑन मी ?"
रागारागाने तिने इन्टरकॉम वरून कॉल केला मोहित प्लीज कम इन साईड क्विकली.

तिचे हे वागणे बघून जिमी गोंधळला. पण तेवढ्यात त्याच्या लक्षात आले आपण आत येताच हिच्यासमोर हसू लागलो म्हणजे ह्या ध्यानाला वाटलं की त्यालाच हसतोय.

जिमी...- सॉरी मॅम अगेन इट्स माय मिस्टेक. Actually त्या दरवाज्याच्या प्रसंगानंतर तुमच्या चेहऱ्यावर जे गोंधळलेले भाव होते ते आठवून मला हसू आले. मी तुम्हाला पाहून कसा काय हसणार जिथे माझ्या कामाचं स्वरूपचं अशा लोकांसाठी आहे.
तेवढ्यात एक धिप्पाड आडदांड पुरुष दार ढकलून आत शिरला आणि त्याने जिमीचे कॉलर पकडून डिंपल ला विचारले

मोहित - आर यू ओके मॅम? लेट मी हॅण्डल दिस फर्स्ट.

नो नो स्टॉप मोहित everything इस ओके. यू मे प्लीज गो नाव. - डिंपल

आपले कपडे व्यवस्थित करत जिमी म्हणाला इट्स ओके मॅम येतो मी आता खरंतर मला तुमच्याकडून एक मदतीची अपेक्षा होती पण माझं हे वागणं बघता मला नाही वाटतं तुम्ही काही मदत कराल .

डिंपल - सॉरी मिस्टर please बसा. खरंतर चूक तुमचीच आहे मी तुम्हाला तुमचं नावगावं विचारतेय आणि तुम्ही चक्क हसायला लागलात मग मी काय करणार होते?

जाऊदे हा विषय मी जिमी . एका अपंग निराधार आणि अनाथ मुलांच्या संस्थेचं काम करतो . खरंतर मी देखील अनाथ आहे त्यामुळे मला अशा मुलांबाबतीत खूप सहानुभूती आहे . तुमच्या अश्याच समजावसेवेबद्दल मी ऐकले आहे .म्हणून मला अशा मुलांच्या भवितव्यासाठी मदत हवी आहे पण पैशाची नाही हा .
माझ्या ओळखीत बरेच असे निराधार आणि अपंग मुलं आहेत त्यांना तुमच्या संस्थेत दाखल करायचं आहे कारण आता मी जिथे ज्या संस्थेसाठी कामं करतोय त्या संस्थेचे मूळ जे ट्रस्टी आहेत त्यांनी जागेचे काहीतरी व्यवहार करून गडबड केली आहे त्यामुळे जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांना तात्पुरता निवारा हवा आहे . जर आपण इच्छुक असाल तर तुमच्या संस्थेमार्फत मुलांची सोय करावी .

जिमीचा हा प्रस्ताव ऐकून डिंपल जरा विचारात पडली पण मग हसत हसत तिने प्रस्ताव मंजूर करून एक लेटर बनवून जिमिला दिले आणि रिसेप्शन वर जाऊन रोझीकडून पुढील प्रोसेस आणि त्यांचे अपडेट घेण्यास सांगितले.

जिमीने आभार मानायला आपला हात पुढे केला आणि म्हणाला thanks मॅडम. वाढदिवसानिमित तुम्हाला ही माझ्याकडून छोटीशी भेट. डेस्कवर एक Box ठेवून जिमी केबिन बाहेर पडला. आणि डिंपल बऱ्याच वेळ जीमिशी झालेली भेट त्याचं बोलणं यात हरवून गेलीं.

पहिल्यांदाच एका हँडसम मुलाने तिच्या रुपाकडे लक्ष न देता चेहऱ्यावरचे निरागस भाव बघितले . हात मिळवताना देखील आपलेपण जाणवले आणि महत्वाचे म्हणजे तो देखील दुसऱ्याचं दुःख जाणून होता जे डिंपलने स्वतः अनुभवलं होतं.

राजीव शर्मा या नावाजलेल्या बिझनेस मॅन ची डिंपल एकुलती एक मुलगी. तिचा जन्म झाला आणि अती रक्तस्त्रावाने तासाभरातच तिच्या आईचा मृत्यू झाला. आजी होती तोपर्यंत तिने डिंपल ला जीव लावला पण त्यानंतर आतापर्यंत ती आईच्या प्रेमाला मुकली. ४ वर्षाची असताना तिचा एक छोटासा अपघात झाला आणि पायाच्या घोट्याला मोठी जखम झाली तेव्हापासून आतापर्यंत तिचा एक पाय कधी सरळ पडलाच नाही. ५ वर्ष ती पायाचं दुखणं घेऊन एकाच जागी होती म्हणून तिच्या शरीरावर असर होऊ लागला आणि झपाट्याने वजन वाढू लागले. चेहऱ्याच रंग- रुप कुरूप झालं.
परदेशात सहज उपचार झाले असते पण तिला तेही नको होत.
तिच्या अशा परिस्थितीमुळेच अनाथ अपंग गरीब मुलांबद्दल जिव्हाळा होता. आणि आता तिच्याप्रमाणेच समविचारी आणि असणाऱ्या जिमिला पाहून ती आनंदली.

त्याने दिलेलं गिफ्ट ओपन केलं डिम्पलने.. त्यात एक चॉकलेट, नाजुकसे पेंडंट आणि लेटर लिहिलं होतं

"रूपापेक्षा आपली वागणूक आणि परोपकाराची भावना खूप सुंदर आहे तिला असच ठेवा कारण ती कधीच कमी होणार नाही उलटं तुमचं सौंदर्य अधिक खुलवेल. "

पहिल्यांदाच डिंपल ची एका पुरुषाने तारिफ केली होती. तिला त्याचा स्पर्श, परफ्यूम चा सुगंध त्याचे बोलणे राहून राहून आठवत होते.

एक आठवड्यानंतर....

जिमी... - रोझी अगं कसलं ध्यान होतं ग ते . बरं झालं तू मला आधीच सांगितलं नाहीतर ते ध्यान पाहून मला भीतीचं वाटली असती त्यात ती जेव्हा मला धडकली तेव्हा असा घाबरलो ना मी की अस वाटलं आता जीवचं जातोय माझा.

रोझी - हाsss हाsss हाssss

मला काय हे नवीन आहे का? अरे पहिल्यांदा तिला पाहणारा असाच जरा घाबरतो . ती पण शक्यतो पहिल्यांदा client येणार असतील तर भेटी टाळते. महत्वाचं असेल तर प्रतिनिधी म्हणून मला लीड करायला लावते. झूम कॉल व्हिडिओ मीटिंग्स साठी बॅकग्राऊंड वापरते.

त्यादिवशी ती घरीच निघाली होती तेवढ्यात नशीब तु वेळेवर पोहोचलास. तुला अटेंड करायला मला सांगून निघत होती.

ते जाऊदे तुला माहीत आहे का या आठवडाभरात ३-४ वेळा तुझ्याबद्दल विचारलं काही निरोप वैगेरे आलाय का तुझा? आता तू एक काम करायचं आहेस डिंपल आता तासाभरात पनवेलच्या तिच्या संस्थेत जाणार आहे तूही योगायोग म्हणून तिथेच तिला भेट मी तुला पत्ता msg करते.

जिमी - अगं पण आता लगेच? मला कॅफे मध्ये जायचं आहे . आधीच एकतर खर्च झाला आहे . पेंडंट पण अर्धे पैसे देऊन बाकी उधारीवर घेतलं आहे.

रोझी - हे बघ आता जरा adjust करशील तरच आपल्याला हे घबाड मिळेल नाहीतर आहेच हा प्रॉब्लेम आयुष्यभर. तू निघ लगेच हे ध्यानं पण मोहित सोबत निघत आहे.

जिमी - हा कोण मोहित? त्यादिवशी केबिन मध्ये घुसला तोच ना. ?
हो मोहित तिचा बॉडीगार्ड कम ड्रायव्हर आहे . आता खरंच निघ तू आणि तिला इंप्रेस कर .

तासाभरात बसने जिमी रोझीने दिलेल्या पत्त्यावर पोहोचला. वॉचमन ने ओळख विचारताच त्याने आपली I'd दाखवली आणि मुलांना इथे ट्रान्सफर करायचं आहे म्हणून जागेची पाहणी करायला आलोय असं सांगितलं. डिंपलच लेटर पाहून वॉचमन ने त्याला आत सोडले.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all