Login

डबलक्रॉस भाग -३

Doublecross
संस्थेचा परिसर पाहता पाहता जिमी आतमध्ये पोहोचला. डिंपल तिथे कुठेच नव्हती. फॉर्मलिटी म्हणून त्याने तिथल्या अधिकाऱ्यांना आपले डॉक्युमेंट्स दाखवले आणि बाजूला उभा राहून ते आश्रम आजुबाजूला वावरणारी लहान मुलं, त्यांची काळजी घेणाऱ्या बायका , माणसं यांना न्याहाळत बसला.
मनोमन त्याला वाटतं होतं चुकून ह्या लफड्यात पडलो. त्यापेक्षा दुसरीकडे कुठेतरी दिवसा कामं बघितलं असतं तर हातात पैसे मिळायची तरी खात्री होती पण इथेतर आहे तेच उडवावे लागत आहेत.

जरावेळाने डिंपल तिथे आली. जिमिला पाहून तिचा चेहरा खुलला .जिमीने ही मनात नसताना तिला स्माईल दिली त्यानंतर दोघे कामकाजाबद्दल बोलत बसले.
आणि अशाप्रकारे सहा महिने निघून गेले. सुरुवातीला कामानिमित्त त्यानंतर मुद्दामून डिंपल आणि जिमीची भेट होत राहिली. त्या भेटींमुळे डिंपल जिमीच्या प्रेमात पडली पण मनात काही वाटत नसतानादेखील जिमि तिला प्रतिसाद द्यायला लागला. शिवाय तिच्यासोबत फिरत असताना जिमिला एक वेगळंच दडपण जाणवायचं. त्याला वाटायचं सतत आपल्याला कोणीतरी पाहत आहे . प्रत्यक्ष दिसत नसलं तरी कोणाची तरी नजर आपला पाठलाग करत आहे . एकप्रकारे त्याला पश्चात्ताप होत होता. इतर वेळी नाही पण डिंपल सोबत असताना हमखास अस व्हायचं.

अधेमधे जिमीने रोझिला हा प्लॅन रद्द करण्याचे सुचवले होते कारण डिंपलला पाहताच जिमिला एक प्रकारे awkward वाटायचं. तिचं एका पायाने लंगडत चालणं तेही बेढब शरीराचा तोल सांभाळत, याची जिमिला किळस येत होती. शेवटी काही दिवसांनी जिमी आणि रोझी पुन्हा कॅफे मध्ये भेटले.

अभिनंदन Mr. जिमी. तुम्ही लवकरच उद्योगपती शर्मा यांचे एकुलते एक जावई आणि ms. डिंपल यांचे पती होणार आहात.
रोझी खो खो हसत सुटली.

तिचा टोमणा ऐकून जिमी ला प्रचंड राग आला. तो तिला काही बोलायला जाणार तोच
रोझीने उघड-उघड जिमिला धमकी दिली. ' जर असं होतं तर तू तेव्हाच नकार द्यायचा होतास . मी तुला त्या डिंपलच्या दिसण्याची कल्पना दिली होती. तेव्हाच तू माघार घ्यायची होतीस पण आता तुला असं करता नाही येणार . आज मी शुभेच्छा दिल्या तर तुला राग आला , उद्या हजारो लोकं तुला शुभेच्छा देणार आहेत तेव्हा काय करशील?

जिमी - ती माझी बायको असण्याची कल्पनाच सहन होत नाही. आणि तू मला अजून पुढचा प्लान तरी कुठे सांगितलास. तिला पटवलं आता काय करू ? तिने मला लग्नासाठी विचारलं आहे...काय उत्तर देऊ? तिच्याशी लग्न करून मला पैसा मिळेल पण तिच्या त्या घाणेरड्या शरीराची मला किळस येते. मी तिला १ वर्ष नाही सहन करू शकत .

रोझी..... पण तुला हे करावं लागेल कारण या शिवाय पर्याय नाही . आता पुढंच ऐक. लग्नानंतर कमीतकमी एक वर्ष तुला तिच्याशी चांगलं आणि प्रेमळ वागायचं आहे . तिचा आणि म्हाताऱ्याचा इतका विश्वास जिंकायचा की त्यांनी डोळे झाकून DS group's ची सूत्र हळूहळू तुझ्याकडे द्यायला हवीत. हे करत असताना तुला मीडिया पोर्टल, ऑफिस स्टाफ, group चे सर्व संचालक यांच्याशी संपर्कात राहायचं आहे जेणेकरून उद्या डिंपलला काही झालं तर कोणाला तुझ्या वागणुकीवर संशय नको यायला.

जिमी.... ठीक आहे . पण पुढे काय? तिला कोण कधी कुठे आणि कसं मारणार? की मीच ते करायचे आणि संशयित म्हणून जेलची हवा खात बसायची?

रोझी.....ते सर्व तुला पुढील भेटीत कळेल . पण तू मात्र सावध रहा. डिंपलला जरा पण तुझ्या वागण्याचा संशय येऊ देऊ नको आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्याशी सलगी करून मला धोका देऊ नकोस नाहीतर तुला बाजूला करायला मला वेळ लागणार नाही.

जिमी ... काहीश्या रागानेच... सतत काय मला धमकी देत आहेस .. तुझ्याशी लग्न करून सेटल व्हायचं स्वप्न बघतोय मी आणि ज्याप्रकारे तू माझ्याशी बोलत आहेस मला नाही वाटतं तुझा माझ्यावर विश्वास आहे .

रोझी.....बरोबर कारण हा प्लॅन फक्त माझाच नाही तर यात आपल्याला मदत करायला आणि स्पेशली तुझ्या हालचालींवर लक्ष ठेवायला बॉडीगार्ड आहेच. तो बघ तुझ्याच मागे टेबल वर.

जिमीने काहीशा आश्चर्याने पाठी वळून पाहिले तर त्या टेबलवरून मोहित उठला आणि जिमीजवळ येत त्याने शेक हॅण्ड केले.

मोहित....तर मिस्टर जिमी .. आणि आता तर होणारे साहेब.
खरंतर तुम्ही फक्त खेळाडू आहात. पण पुढे काय चाल टाकायची हे मीच ठरवणार.

खरंतर डिंपलची simpathy मिळवून तिच्याशी लग्न करून तिचा बंदोबस्त करणं मला कठीण नाही पण रोझिला देखील तिचा बदला घ्यायचा आहे म्हणून हे एडिशन.
शिवाय बॉडीगार्ड म्हणून तिने मला ज्याप्रकारे गुलाम बनवलं आहे माझा अपमान केला आहे मी कधीच विसरू शकत नाही.

जिमी...-
रोझी what नॉन्सेस? तुझा केला असेल अपमान तिने पण मग तुला नोकरी सोडता नाही आली का ? आणि तुला मीच सापडलो का यात अडकवायला? उद्या जर तिला समजलं हेसर्व तर ती मला जेल मधे सडायला टाकेल......जिमी.

रोझी..... तसं करायला तिने जिवंत तर असायला हवं ना ? तिच्या मर्डरच तू मोहित वर सोड. मला फक्त तिने माझ्याशी ईर्षा करून सतत अपमान केला आहे ना त्याचा तर बदला घ्यायचा आहेच शिवाय तुझ्या साहाय्याने आपल्याला पैसे देखील कमवता येतील. सो गुड बाय डिअर फॉर नाव. अँड एन्जॉय युअर मॅरिड लाईफ. अँड डोन्ट कॉन्टॅक्ट मी फॉर वन इयर अटलीस्ट.

जर तसंच काही असेल तर मोहित तुला मदत करेल पण डिंपल सोबत मिळून आमच्याशी हुशारी केलीस तर मग तुझाही बंदोबस्त करावा लागेल.

जिमीच्या उत्तराची वाटही न बघता रोझी आणि मोहित निघून गेले.

क्रमशः

पुढच्या भागात पाहुया रोझी आणि मोहित चा प्लॅन यशस्वी होईल की कथेला वेगळंच वळण येईल.
0

🎭 Series Post

View all