Login

डबलक्रॉस भाग ६

Doublecross
पुढचे १५ दिवस डिंपल आणि जिमी हनिमून साठी स्वित्झर्लंडला निघून गेले.

बेडवर जिमी डिंपलला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेला आजवर बऱ्याचदा त्याने रोझी ला बिछान्यात ओढले होते पण यावेळीचा अनुभव वेगळाच होता . शिवाय डिंपलही त्याला भरपूर प्रतिसाद देत होती. आजवर कोंडून ठेवलेले प्रेम ,मन , शरीर आणि भावना सर्वच तिने जिमीच्या हवाली केल्या होत्या. जिमीदेखील त्याचा पुरेपूर उपभोग घेत डिंपलला तृप्त करत होता.
इथे business क्षेत्रात डिंपलच्या या बदललेल्या रूपाची बातमी वाऱ्यासारखी पसरली . तिला नावं ठेवणारी लोकांनी स्पेशली मोहित आणि रोझी ने आश्चर्याने तोंडांत बोट घातली. डिंपल आता शरीराबरोबरच मनाने पूर्ण बदलली. प्रत्येक स्टाफ बरोबर प्रेमाने आदराने वागू लागली.

जिमी आता खरंच डिंपलच्या प्रेमात पडला होता.एक प्रेमळ आणि सुंदर बायको सोबत सत्ता , संपत्ती असताना आता तिला मारायची काय गरज? तिला मारल्यावर जे मिळणार आहे त्यात रोझी आणि मोहितचा देखील हिस्सा असणार आहे त्यापेक्षा आता आहे तेच बरं.
तसंही रोझीने गेले १० वर्ष लग्नाच्या नावाखाली टाईमपास केला आहे. त्यापेक्षा नकोच हे .
असा विचार करून गेले २ महिने तो रोझीचे फोन msg मेल टाळत होता. रोझी आणि मोहितला जिमिला एकटं गाठायचा काही चान्स मिळत नव्हता. त्याचं ऑफिस मधे येणं जाणं आता डिंपल सोबत एकाच गाडीतून होतं शिवाय ऑफिस आणि पॅलेस ला टाईट सिक्युरिटी + cctv असताना त्यांना जिमीला भेटणं शक्यच नव्हतं.

जिमी आणि डिंपल दिवसा ऑफीस अटेंड करत आणि संध्याकाळचा वेळ ते पब, क्लब , पार्ट्या यामध्ये घालवत .जिमीने रोझिला आता पूर्णपणे टाळायला सुरुवात केली.

शेवटी काही दिवसांनी जिमिला रोझीचा msg आला.

जिमी प्लीज माझ्या घरी ये . मी खूप अडचणीत आहे .

रोझी मूर्खपणा करू नकोस . मी नाही येणार आता . आता काय कधीच नाही. आणि कुठला प्लॅन बिन करण्याचा पण माझा विचार नाही. जे झालं ते विसर. तुला पैसा मी पुरवेल पण डिंपल ला नाही मारणार.
रोझी - ठीक आहे मग मी आणि मोहित पुढंच बघून घेऊ. आताच्या आता त्या डिंपल ला तुझी हिस्ट्री पाठवते बघं.

जिमी - थांब रोझी येतो मी .

मनोमन शिव्या देत जिमी रोझीच्या घरी पोचला.

दार हलकेच उघडून जिमी आत आला तेव्हा रोझी धावत येऊन त्याला बिलगली. रडून रडून तिचे डोळे सुकले होते आणि चेहरा खूप निस्तेजं दिसत होता.

हे पाहून जिमिला गहिवरून आले .

काय झालं रोझी ठीक आहे सर्व?

रोझी - इतके दिवस तू मला इग्नोर केलंस. म्हणून तुझ्या आठवणीत मी सतत पित होते त्यातून बिस्ट्रो कॅफे मध्ये माझी ओळख एका तरुणाशी म्हणजे राज शी झाली. त्यातून एकदा ड्रिंक्सच्या नशेत मी त्याला आपला प्लॅन सांगून बसले . आता तो मला ब्लॅकमेल करत आहे. त्याला २ कोटी हवेत नाही तर तो हे सर्व डिंपल ला सांगण्याची धमकी देत आहे.
आणि असं झालं तर डिंपल मला तर सोडणार नाहीच शिवाय तू पण रस्त्यावर येण्याऐवजी सरळ तुरुंगात खडी फोडायला जाशील.

प्लीज काहीतरी कर . आज त्याने मला बिस्ट्रो कॅफे मध्ये बोलावलं आहे पैसे घेऊन .

जिमीने रोझिला दूर ढकलले.
" रोझीss.... बेवडे sss तुला जर ताबा राहत नाही तर कशाला ढोसतेस एवढी ? आता कुठे माझं आयुष्य सुरू झालं होतं आता तुझ्या मूर्खपणाचा परिणाम मला भोगायला लागेल.

मोहित कुठे आहे बोलाव त्याला आणि तुझं तूच निस्तर. माझा काय संबंध नाही.

रोझी - जिमी प्लीज..आता सध्या पैशांची मदत तूच करू शकतोस. तसंही मोहित कामासाठी दिल्लीला गेला आहे . तो असता तर त्या राजला कधीच ढगात पाठवलं असतं.

जिमी - पैसा माझ्या बापाचा नाहीये. आणि सारखं सारखं त्या ब्लॅकमेलरला कुठून पुरवणार आहेस ? त्यापेक्षा त्याला भेटवं मीच पाठवतो त्याला ढगात.

रोझी - ठीक आहे जा भेट त्याला आज रात्री ८ वाजता .बिस्ट्रो कॅफे २nd फ्लोअर गेस्ट रूम.

चेहऱ्यावर तिरपी टोपी ओढून गळाभोवती फर चा मफलर आणि अंगात जाड लेदरचे जॅकेट ओढून जिमी बिस्ट्रो कॅफे चे जिने चढत होता.

लायकी नसली तरी डिंपलचा नवरा म्हणून जिमीची आता ओळख होती. म्हणून तोंड लपवत त्याला इथे यावं लागलं. मीडियाच्या किंवा कोणाच्या नजरेसमोर येणे धोक्याचे होते. तरी त्याने धोका पत्करला.
जिमीच्या दृष्टीने राज म्हणजे एखादा प्ले बॉय किंवा भूरटा तरुण होता जो मुलींना फसवून ब्लॅकमेल करत असावा. ३-४ झापडा दिल्या आणि जरा दम भरला तर येईल सरळ ठिकाण्यावर. जर तशीच जर गंभीर वेळ आली तर मोहितच्या मदतीने त्याचा काटा काढुया. विचार करत जिमी गेस्टरुम मध्ये शिरला.

आत पूर्ण काळोख होता. जिमी भिंतीला चाचपडत दिव्यांची बटणं शोधू लागला. पण कशाला तरी त्याचा पाय अडखळला. हाताने अंदाज घेत त्याने पायाजवळ पडलेली वस्तू उचलली तर ते लोखंडी रॉड प्रमाणे काहीतरी जड आणि ओलसर लागत होते.

तितक्यात गेस्टरूम चे लाइट्स लागले. समोरच्या बेडवर एक तरुण अस्ताव्यस्त पडलेला होता.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all