समोरच्या बेडवर एक तरुण अस्ताव्यस्त पडलेला होता. त्याच्या डोक्यातून रक्ताचा पाट वाहत होता त्यामुळे बेडवरील सफेद गादी पूर्ण रक्तात माखलेली होती. जिमी बेडच्या अगदी समोर उभा होता. हातातल्या त्या लोखंडी सळई कडे त्याचे लक्ष गेले. त्याचे टोक रक्ताने पूर्ण भरलेले होते. सावकाश पुढे जात त्याने तरुणाचा चेहरा पाहिला. अनोळखी होता. कदाचित हाच राज असावा . पण हे काय? कोणी मारलं याला?
ह्या लोखंडी सळईनेच कोणीतरी याच्या डोक्यात घाव घातला हे कोणीही सांगू शकलं असतं.
कोणी यायच्या आत पटकन निघाव म्हणून जिमी वळला तर दारातच मोहित आणि रोझी हसत उभे होते.
ह्या लोखंडी सळईनेच कोणीतरी याच्या डोक्यात घाव घातला हे कोणीही सांगू शकलं असतं.
कोणी यायच्या आत पटकन निघाव म्हणून जिमी वळला तर दारातच मोहित आणि रोझी हसत उभे होते.
रोझी - हे काय जिमी तू त्याला समजवायचे सोडून सरळ मारून टाकलेस?
जिमी - मूर्ख....मी आलो तेव्हा रूमची लाईट बंद होती. तुम्ही आलात आणि लाईट लावलीत. तुमच्यासोबतच मी हे दृश्य बघत आहे . चल निघू पटकन . जो कोणी याला मारून गेला त्याने आपलं काम सोप्प केलं. कोणी यायच्या आत निघू पटकन.
रोझी आणि मोहित जोरजोरात हसत सुटले.
त्याला दारातून आत ढकलत रोझी म्हणाली,
"अरे जिमी आम्ही आलो तेव्हा पाहिलं की तुझ्या हातात सळई आहे आणि ती तू या राजच्या डोक्यात मारत होतास. बघं बरं तुझे हाताचे, बुटांचे ठसे या खोलीत , याच्या चेहऱ्यावर , या सळईवर आहेत, यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ही गेस्ट रूम पण तुमच्या दोघांच्या नावे महत्वाच्या मीटिंगसाठी बुक झाली आहे.

व्हॉट नॉनसेन्स रोझी? इथे मी तुझी मदत करायला आलोय आणि तू काय बडबडत आहेस. या मोहितच्या नादी लागून तुझं डोकं खराब झालंय का? आणि कोणती मीटिंग? मी कधी बुक केली गेस्टरूम?
रोझी - हा मोहित फार वाईट आहे बघ , त्यानेच माझ्या मनात भरवले की तू म्हणे डिंपलच्या प्रेमात पडला आहेस. आणि आम्हा दोघांना डच्चू देऊ शकतोस . तसेही तुमचे लग्न झाले आहे. मग आम्ही बिचारे काय करू शकणार होतो.
त्यामुळेच त्याने काल तुझ्या नावे ही रूम बुक केली. तुझ्या आधी येऊन या ब्लॅकमेलरचा बंदोबस्त केला. त्यामुळे आता एक तर खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात जा नाहीतर प्लॅन पूर्ण करायचं बघ.
जिमी... रोझीच्या अंगावर धावत गेला. कोण कुठला हा मोहित याच्या नादी लागून तु मला त्रास देतेस. त्यापेक्षा मी तुम्हा दोघांना पैसा पुरवेल पण प्लीज इथून निघून जा आणि तुमची तोंडं मला दाखवू नका.
रोझी... मोहित प्लीज जरा पोलिसांना कॉल करतोस का? त्यांना माहिती द्यायला हवी ना खुनाची. दोन दक्ष , जागरूक नागरिक रोझी आणि मोहित यांनी एका खुनाच्या आरोपीला रंगेहाथ पकडले आहे.
मोहित आणि रोझी जोरजोरात हसू लागले.
जिमी - ठीक आहे मला एक आठवडा द्या मी करतो प्लॅनची सुरुवात.
पण याचे काय? प्रेताकडे बोट दाखवत जिमीने विचारले.
पण याचे काय? प्रेताकडे बोट दाखवत जिमीने विचारले.
रोझी - तू त्याची काळजी करू नको. मोहित समर्थ आहे सर्व बघायला. तू फक्त प्लॅन कसा लवकर पूर्ण करता येईल याची काळजी कर.
जिमी लगेच तिथून बाहेर पडला. घरी आल्यावर व्हिस्कीचे ३-४ पेग घेऊनसुद्धा त्याला डिंपलला कसं वाचवता येईल, प्लॅन कसा उलटवता येईल याचा मार्ग सापडत नव्हता.
रोझी आणि मोहित ने जर उद्या डिंपल ला या राजच्या खुनाबद्दल किंवा माझ्या पूर्व आयुष्याबद्दल सांगितले तर डिंपल माझ्यावर विश्वास ठेवेल का? तिला तर आधीच खात्री आहे की जो तो तिच्या पैशावर प्रेम करतो.
आणि समजा डिंपल ने माझी साथ दिली तर रोझी आणि मोहित गप्प बसणार नाहीत. ब्लॅकमेल करणाऱ्याला जर मोहित असा निष्ठुर होऊन मारू शकतो तर माझे तर तुकडेचं करेल.
रोझिला दूर करणं जितक सोपं त्यापेक्षा कठीण या आडदांड मोहितला वर पाठवणं.
रोझिला दूर करणं जितक सोपं त्यापेक्षा कठीण या आडदांड मोहितला वर पाठवणं.
आठवडा संपत आला आणि जिमिला दुसरा काहीच पर्याय दिसत नव्हता .शेवटी खिन्न मनाने त्याने ठरवले , प्लॅननुसार डिंपलचा खून करू आणि मोहित रोझिला हिस्सा देऊन मोकळं करू. मग उरलेला पैसा आपलाच आहे.
डिंपल जेव्हा इटलीला गेली होती तेव्हा तिच्या अनुपस्थितीत जिमी ने बऱ्याचदा रोझिला बोलावून आपली शारीरिक भूक भागवली होती. तेव्हाच एकदा रोझीने आपला पेंडिंग प्लॅन जिमिला सांगितला होता.
जिमीने आपल्या डेस्कवरचे कॅलेंडर चेक केले. तारीख आणि वार ठरवला.
येत्या शुक्रवारी...
जिमीने आपल्या डेस्कवरचे कॅलेंडर चेक केले. तारीख आणि वार ठरवला.
येत्या शुक्रवारी...
सोमवार ते शुक्रवार सर्व ऑफिसीअल वर्क्स , मीटिंग्स वैगेरे आटोपून जिमी आणि डिंपल वीकेंड्स प्लॅन बनवत होतें . शनिवारी संध्याकाळी पुण्याला एक पार्टी होती ज्याचे डिंपल आणि जिमिला invitation होते.
हिच संधी साधता येईल .काहीतरी फालतू कारण देऊन डिंपलला ऐनवेळी महत्त्वाच काम आल्याचं सांगायचं आणि बोलता बोलता तिला ज्यूस किंवा शेक मधे झोपेच्या गोळ्या टाकून द्यायचे . आणि बाहेर जाऊन थोड्यावेळाने परत यायचे . तोपर्यंत तिला गाढ झोप लागलेली असेल. तिच्या मोबाईलवरून स्वतःला मी पुढे निघत आहे तू पण काम आटोपून डायरेक्ट पोहोच असा msg करायचा.
तसेच तिला उचलून गाडीच्या डिकीत टाकायचे आणि पुण्याच्या दिशेने पार्टी साठी निघायचे . पाठीमागे दुसऱ्या गाडीत एक विशिष्ट अंतर ठेवून मोहित आणि रोझी पाठलाग करतील.
गाडीने खोपोली पार केल्यानंतर खंडाळा घाटात लागणारा लोटस हिल गाठायचा आणि डिकीतल्या डिंपलला सीटबेल्ट लावून ड्रायव्हिंग सीट वर बसवायचे आणि गाडी घाटातून खाली दरीत ढकलून द्यायची.

त्यानंतर एकट्याने प्रायव्हेट कॅब करून पार्टीच्या ठिकाणी पोहोचायचे. डिंपल आधीच निघणार होती आणि माझं काम आल्यामुळे मला निघायला उशीर झाला असं तिथल्या लोकांना सांगायचे. मधे एकदा डिंपल ने कॉल करून गाडी खोपोली क्रॉस केल्याचा फोन केला होता तरी अजून कशी आली नाही याची काळजी करायची. फोन बंद आहे त्यामुळे अजून टेन्शनमध्ये आहे असं सर्वांना सांगायचं. मग नंतर जे होईल ते पोलिस बघतील.
एकंदर असा प्लॅन तयार झाला आणि जिमी दुःखी होऊन शनिवारची वाट पाहू लागला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा