Login

डबलक्रॉस भाग १०

Doublecross
डिंपल ने LED मध्ये एक पेनड्राईव already जोडलेले होते.
त्यावर दिसणारे दृश्य पाहून जिमी घाबरला.

LED टीव्ही वर एका आलिशान बेडवर एक तरुण तरुणी नग्नावस्थेत एकमेकांच्या शरीराशी खेळत होतें .
ते दुसरे तिसरे कोणी नसून मी आणि रोझी आहे हे जिमिला कळायला वेळ लागला नाही.
५-६ मिनिटात त्यांचं काम आटोपलं तसं स्क्रीनवर जिमी आणि रोझी डिंपल ला मारण्याच्या फायनल प्लॅन बद्दल बोलू लागले.
जिमी अधिकच घाबरला. खुर्चीत बसल्या बसल्या फूल ऑन कुलिंग सेट असताना ही घामाने भिजला.

"कोणाचा प्लॅन ऐकतोस तू जिमी? त्या फालतू आणि भिकारड्या रोझीचा? इतकी वर्षे माझ्यासोबत काम करूनही ती मला ओळखू नाही शकली.
पूर्ण पॅलेस चा cctv तू तात्पुरता बंद केलास पण हे का नाही लक्षात आलं की बेडरूम मधेही कॅमेरा असू शकतो.

अर्थात तुला सापडला नसता तो भाग वेगळाच.
मी माझ्या बेडरूममध्ये पेन्सिलच्या आकाराप्रमाणे हा टोकदार cctv बसवला आहे. त्याचे टेप्स फक्त माझ्याकडे असतात.
ती प्रायव्हसी मी जपते म्हणून तू आतापर्यंत मोकळा होतास. पण परवा सहज विचार केला ,बघुतरी मी नसतांना कसे विरहात दिवस काढलेस तू? तर काय आश्चर्य..पहिल्याच दिवसात मला हे पहायला मिळालं.

ह्या टेप्स जर मी पोलिसात दिल्या तर खुनाच्या प्लॅनच्या आधारे तुम्हा तिघांना मी कायमची जेलमध्ये सडवायला टाकू शकते पण मला आता असं नाही करायचं.

खूप दुःख झालं मला जिमी. इतरांसारखाचा तू पण तसाच निघालास ज्याला माझ्या संपत्तीची हाव सुटली होती.

रोझी आणि इतर स्टाफ चा अपमान मी या साठी करत होते कारण माझा चेहरा वळताच त्यांचं एकमेकांना मला पाहून टॉन्ट मारणं, फिदीफिदी हसणं, मुद्दाम मला पाहून आपला चेहरा , मेकअप , केस व्यवस्थित करण , हा एकप्रकारे माझा अपमान होताच ना.
रोझी या लोकांना भडकावायचं काम करायची. तिला तर मी २ वेळा हाकलून लावलं होतं पण ती माझ्याकडे कामासाठी भीक मागत आली होती.
जिमी - डिंपलच्या गयावया करू लागला. हात पाय जोडू लागला.
डिंपलने त्याला लाथेने दूर ढकलले.
मला आता तुझ्याबद्दल काही वाटत नाही. तू काहीही केलस तरी मला काही फरक पडणार नाही.
जिमीने तिला राजचे प्रकरण नंतर त्याचा झालेला खून हे सर्व सांगितले . आणि केवळ यामुळेच मला असं करावं लागतय असं सांगितलं.
डिंपल - ह्या टेप्स पाहिल्यानंतर सर्वात आधी मी तुझी, रोझीची आणि मोहितची हिस्ट्री काढलीं. And I was shocked.
मला मारण्याचा प्लान साधारण २ वर्षापुर्वी केला होता. आजवर मला वाटतं होतं तेच खरं झालं . म्हणूनच मी कधी माझं रूप बदलण्याची रिस्क घेतली नव्हती.
जिमी आज जर तू ज्यूस मध्ये गोळ्या टाकल्या नसत्या तर कदाचित मी विश्वास ठेवला असता पण नाही .तू तेच केलंस जे तुला हवं होतं.

पण आता तुमच्या प्लान चा शेवट मी करणार.

माझ्याऐवजी रोझी आणि मोहित मरणार आणि या प्रकरणात मी तुला अडकवणार.

आणि चुकून जर मला काही झालंच तर डोन्ट वरी तुम्हा तिघांनाही जेल मधे टाकण्याची व्यवस्था मी केली आहे.

मी आधीच माझ्या लॉयरला ह्या टेप्स चा एक पेनड्राईव शिवाय मी स्वतः लिहिलेलं स्टेटमेंट पोहोचवल आहे . ज्यात असं लिहिलंय की आजपासून कधीही जर अचानक माझ्या मृत्यूची बातमी आली तर बिनधास्त तो माझा मर्डर असल्याचं जाहीर करावं . मग तो मृत्यू घातपात, खून, अपघात, आत्महत्या , असा काहीही प्रकार असो. हा इतकाच पुरावा तुम्हाला आयुष्यभर जेल मधे सडवायला पुरेसा आहे . अर्थात DS group's चं नाव तेवढं आहे.

आणि महत्वाची बातमी म्हणजे
माझ्या नावे असलेली संपत्ती मी आधीच एका चाईल्ड , handicapped , मुलांच्या वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून दान केलेली आहे . जेणेकरून माझ्या नंतर हे पैसे तुमच्यासारख्या चीप लोकांच्या हाती जाऊ नये.

आता जसा प्लॅन सुरू आहे त्याप्रमाणेच होईल. पण माझ्याऐवजी रोझी आणि मोहित मरणार. चुकून जर त्यांनी मला मारायचा प्रयत्न केला तर मला प्रोटेक्ट करायचं काम तुझं जिमी.
नाहीतर वकीकसाहेब आहेतच स्टेटमेंट आणि टेप्स जाहीर करायला.

चल आता सांगते तुला प्लॅन चा पुढचा भाग...

क्रमशः.
0

🎭 Series Post

View all