डॉ. आंबेडकरांची ग्रंथसंपदा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राजकारण या विषयावर अनेक ग्रंथ लिहिले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथरूप लेखन इंग्रजी भाषेतीलच आहे. त्यांनी एम. ए. पदवीकरिता लिहिलेल्या प्रबंधाचा विषय 'प्राचीन भारतातील व्यापार' असा होता. 'भारताच्या राष्ट्रीय 'नफ्याचा वाटा : एक ऐतिहासिक पृथकरनात्मक अध्ययन' या विषयावर त्यांचा प्रबंध पुढे इव्होल्युशन ऑफ प्रॉव्हिनशिअल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या नावाने प्रकाशित झाला ( 1924). प्रस्तुत प्रबंधात त्यांनी ब्रिटिश सरकारच्या आर्थिक धोरण ब्रिटनमधील उद्योगधंद्याच्या हिताच्या दृष्टीने आखले जाते, हे सिद्ध केले. कोणताही देश झाला तरी त्यात एखाद्या वर्गावर अन्याय होणे या विषयक सखोल लिखित माहिती तसेच त्यांचे या देशात राजकीय अधिकार नाकारता येत नाही. याकरता तर तर्कशुद्ध मीमासा प्रस्तुत ग्रंथात आढळतो. आंबेडकरांच्या अर्थशास्त्राविषयी दुसरा प्रबंध म्हणजे 'द प्रॉब्लेम ऑफ रुबी' हा होय. रुपयाचे पौंडाशी प्रमाण बसवून इंग्रजी राज्यकर्त्यांनी केवळ इंग्रजी व्यापाराचेच हीच साधून भारताचे कसे नुकसान केले यावर त्यांनी प्रस्तुत प्रबंध प्रकाश टाकला आहे. 'धर्म आणि जातीसंस्था' यासंबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार क्रांतिकारक होते. 1936 साली लाहोर येथील 'जातपात तोडक' मंडळाच्या वार्षिक संमेलनातील अध्यक्षीय भाषण 'ऑनायहिलेशन ऑफ कास्ट' या पुस्तकात त्यांनी प्रसिद्ध केले. जातिव्यवस्था ही श्रमिकांच्या अनैसर्गिक विभागणीस व हिंदू समाजाच्या ऐतिहासिक पराभवास, नैतिक अधोगतीस तसेच त्यांच्या दुबळेपणास कारणीभूत आहे. जाती व्यवस्था मुख्य आधार म्हणजे हिंदूंचा धर्मभोळेपणा असून तो नष्ट करून स्वातंत्र्य, समता व बंधुता यांच्या तात्विक अधिष्ठानावर हिंदू समाजाचे पुनर्घटना करावी अशी प्रेरक विचारसरणी आंबेडकरांनी या पुस्तकात मांडली आहे. 'व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचिबल्स (1945)'. या ग्रंथात त्यांनी काँग्रेसच्या अस्पृशयोद्वाराच्या कार्यक्रमाच्या मर्यादा आणि अपयश याची चर्चा केली आहे. आंबेडकरांच्या व्यासंगाचे व संशोधनकुशलतेचे प्रतीक असलेला ग्रंथ म्हणजे ' हू वेअर दि शुद्धाज '(1946) हा होय. 'द अनटचेबल्स ' या नावाने त्यांचे पुस्तकही या संदर्भात उल्लेखनीय आहे. 'बुद्ध अँड हीज धम्म ' हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रसिद्ध झाला. धर्माचा रूढ कल्पनाहून बौद्ध धर्माची कल्पना वेगळी असून ती समाजाच्या पुनर्रचनीशी अधिक निगडित आहे. त्यामुळे सामाजिक व नैतिक मूल्य हेच बौद्ध धर्माचे खरे अधिष्ठान आहे. लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्य प्रमाणे आंबेडकरांनी बौद्ध धर्माचे कालोचित रहस्य या भाष्य ग्रंथात विशद केले आहे. आंबेडकरांच्या राजकीय विषयावरील ग्रंथापैकी 'थॉट्स ऑन पाकिस्तान ' या पुस्तकात पाकिस्तान झाल्यावर हिंदूच्या उत्कर्षाचा मार्ग मोकळा होईल असा युक्तिवाद केला होता. याशिवाय 'रानडे, गांधी अँड जिना'(1943)', ' थॉट्स ऑन लिग्विस्टिक स्टेट्स', (1955)' यासारखी त्यांची पुस्तकेही विचार प्रेरक आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा पुढील प्रमाणे, प्राचीन भारताचा व्यापार (1915).भारतीय जातीसंस्था, तिची यंत्रणा, उत्पत्ती व विकास (1916). भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा: एक ऐतिहासिक पृथकरणात्मक परिशिलन(1916). ब्रिटिश भारतातील प्रतीक व अर्थशास्त्रीय उत्क्रांती(1924). भारतातील जाती( कास्टस इन इंडिया 1924 ). पाकिस्तानविषयी विचार (थॉट्स ऑन पाकिस्तान 1940). काँग्रेस व गांधी यांनी अस्पृश्य वर्गात कसे वागविले? (1945). शूद्र पूर्वी कोण होते? ( हू वेअर द शुद्धाज 1946). बुद्ध व त्यांचा धम्म (1957). गांधी व अस्पृश्यजनांचे बंधविमोचन. ऑनिहेलेशन ऑफ कास्ट (1943). रानडे, गांधी अँड जिना (1943). द अनटचेबल्स (1948). थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेटस (1955). रिडल्स इन हिंदूइझम (1957 ).डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मराठी लेखन अल्प असून ते मुख्यता त्यांनी काढलेल्या विविध वृत्तपत्रातून विखुरलेले आहे.
©® चैताली वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला
9834583685
मूर्तिजापूर, जि अकोला
9834583685
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा