आधुनिक भारताचे शिल्पकार
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर .. उर्फ बाबासाहेब ..
आमचे बाबा .. आम्ही बाबांची लेकरं .. भीमराव ... आमचा भीमा .. जयभीम.. अर्थात बाबासाहेबांचा विजय असो..
असे अनेक शब्दप्रयोग आपण नेहमी ऐकत आलो आहोत तुमच्या प्रमाणे मला सुद्धा प्रश्न पडायचा की एका व्यक्तीचा जन्मदिवस जग इतक्या उत्साहाने अगदी नवीन सणाप्रमाणे का साजरी करत असावे पण त्याचे उत्तर मी आज घेऊन आली आहे.
आधुनिक भारताचे शिल्पकार.. संविधानाचे जनक .. मजूरमंत्री.. कायदेमंत्री.. आणि अजून किती पदव्या या समाजाने त्यांना बहाल केल्या .
१४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेश राज्यातील महू या गावात पिताश्री रामजी सकपाळ आणि मातोश्री भीमादेवी यांचे १४ वे अपत्य म्हणून भीमराव आंबेडकर यांचा जन्म झाला परंतु त्यांचे उर्वरित आयुष्य महाराष्ट्र राज्यातील मंडणगढ या तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यात आंबडवे या गावात गेले. भीम .. भीमा .. भीमराव अशी अनेक नावे त्यांना संबोधली जात असे. लहानपणापासून आई कडून त्यांनी रामायण आणि महाभारतच्या कथा ऐकल्या होत्या परंतु त्यांचे मन वेधणारे आदर्श व्यक्ती गौतम बुद्ध होते.
भीमराव हे महार जातीमध्ये जन्म झालेले एक व्यक्तिमत्त्व होते आणि स्वातंत्र्यापूर्वी जातींमध्ये खूप विषमता होती त्यावेळी जे होत आहे ते सहन करणे सुद्धा शक्य होते आणि सोपेही होते अगदी इतर लोकांप्रमाणे परंतु समाजसुधारक होणे .. हे जणू विधिलिखित होते . शाळेत असताना भीमरावांना खूप वेगळी वागणूक मिळत असे . उदा. जेवताना वेगळे बसणे , शिकवणी घेताना खाली बसणे , आणि सर्वात विचित्र म्हणजे पाणी. पाणी प्यायचे असले तर शिपायांची वाट पाहावी लागत असे आणि जर शिपाई नाही आला तर मात्र पाण्याची तहान तहानच राहत असे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाण्याचा सत्याग्रह करणारे पहिले नागरिक म्हणून सुद्धा ओळखले जाते समाजाकडून मिळणारी ही वागणूक त्यांना खूप वाईट वाटली आणि म्हणून त्यांनी या जातिप्रथेस विरोध केला . त्याकाळी त्यांनी अस्पृश्यता बघितली आणि त्यास वाचा फोडली कदाचित त्यामुळेच आज अनुसूचित जाती /दलित वर्गाला समाजात एक स्थान आहे आणि म्हणूनच हा समाज त्यांना आजही बाबासाहेब म्हणून ओळखतो . बाबासाहेबाच्या घरून सुद्धा शिक्षणास महत्त्व होते आणि शाळेत असताना सर्व मुलांमध्ये नेहमीच बाबासाहेब पहिला नंबर आणत असे ... अशावेळी त्यांच्या शाळेत त्यांच्या वडिलांनी गावावरून त्यांचे नाव आंबडवेकर अशी नोंद केली होती परंतु त्यांच्या मराठीच्या ब्राह्मण शिक्षकांनी त्यांचे नाव आंबेडकर असे नोंदीत केले . आणि हेच ते शिक्षक सुद्धा होते ज्यांनी त्यांना शिक्षण घेण्यास नेहमी उत्तेजित केले . आंबेडकर जसे जसे मोठे होत गेले तसे तसे ते शिक्षणात सुद्धा पुढे जाऊ लागले म्हणूनच डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी ३२ डिग्री मध्ये ज्ञान संपादन केले आहे आणि ६४ विषयांमध्ये पदवीत्तर शिक्षण संपादित केले आहे तसेच ९ भाषांचे ते जाणकार सुद्धा होते याव्यतिरिक्त सर्व धर्मज्ञान सुद्धा त्यांना होते आणि एवढेच नाही तर कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये शिकत असताना ८ वर्षांचा अभ्यास त्यांनी २ वर्षे आणि ३ महिन्यात पूर्ण केला होता कदाचित म्हणूनच जगातील एकमेव आणि पहिली डॉ. ऑफ सायन्स हि पदवी सुद्धा त्यांनी पटकावली होती हि एकमेव अशी पदवी आहे जी फक्त बाबासाहेबांना मिळालेली आहे . सोबतच ते वकील सुद्धा होते आणि अर्थशास्त्रज्ञ सुद्धा होते . या सर्वांसोबतच आपण हे हि जाणतो कि बाबासाहेबांना आधुनिक भारताचे जनक संबोधले जाते कारण संविधान ज्यावर या देशाची प्रणाली चालते असे जगातील दुसरे सर्वात मोठे संविधान बनवण्यामध्ये त्यांनी खारीचा वाटा उचलला आहे. तसेच आपल्या ध्वजामध्ये अशोकचक्राची संकल्पना निर्मित करणारे सुद्दा बाबासाहेब आहे. म्हणूनच ते यशस्वी लेखक सुद्धा होते . त्यांनी २० पुस्तके प्रकाशित केलेली आहे ज्यापैकी त्यांच्या Thoughts On Pakistan या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांची पत्नी रमाबाई यांच्या विषयी नमूद केले आहे .. त्यांच्या भीम ते डॉ . बाबासाहेब आंबेडकर या प्रवासाचे श्रेय ते त्यांना देतात . बाबासाहेब दैवाऐवजी कर्मावर विश्वास ठेवणाऱ्यांमधले होते त्यांच्या शिकवणीनूसार शिक्षण हाच मूलभूत आधार आहे . आणि " मी असा धर्म स्वीकारतो जिथे समता, बंधुता आणि स्वातंत्र्यता आहे आणि ब्रह्मा ,विष्णू,महेश याव्यतिरिक्त ते चरित्र (शील),स्वाभिमान , आणि विद्या यास दैवत मानत . एवढ्या शिक्षित व्यकितमत्त्वाला समाजाकडून विशेष पदव्या सुद्धा भेटल्या होत्या .
आंबेडकरांनी बोधिसत्त्व,भारत रत्न,ग्रेटेस्ट इंडियन ऑफ ऑल टाइम .. पहिले भारतीय ज्यांनी पी. एच . डी ही पदवी कोलंबियामधून प्राप्त केली होती .. तसेच आंबेडकर हे एकमेव व्यक्तीमत्त्व आहे ज्यांचा पुतळा हा कार्ल मार्क्स मुएसियम ऑफ लंडन मध्ये आहे. याव्यतिरिक्त मुंबई मधील सर्वात मोठे ग्रंथालय राजगृह हे बाबासाहेबांना समर्पित आहे . मेकर्स ऑफ युनिव्हर्स याच्या मागील १० हजार वर्षांच्या यादीमध्ये आंबेडकरांचे नाव चवथ्या क्रमांकाला आहे. मुंबई मधील स्टॅचू ऑफ एक्वलिटी हे ३५० फूट उंचीचे स्मारक सुद्धा त्यांना समर्पित आहे तसेच १९५० मध्ये कोल्हापूर मध्ये त्यांचे पहिले स्मारक निर्मित करण्यात आले होते. परदेशामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ते चवथ्या क्रमांकावर होते.
यासर्वांमध्ये मी जगभरातील त्यांची ख्याती सांगितली पण आपल्या भारतात सुद्धा काही कमी नाही . आंबेडकर नेहमी संत कबीर, ज्योतिबा फुले आणि बुद्ध यांच्यापासून प्रेरित होते ते ही इतके कि त्यांनी त्यांचा धर्म परिवर्तन करून बुद्ध धर्म स्वीकारला होता . महावीरांची सर्व जगतभरात स्मारके आहेत परंतु सर्व स्मारके हि बंद डोळ्यांची आहे आंबेडकर हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी त्यांची उघड्या डोळ्यांची प्रतिकृती बनवली होती . तसेच मूकनायक.. जनता हे वृत्तपत्र सुद्धा सुरु केले होते . तसेच अनुसूचित फेडरेशन , समता सैनिक दल आणि इंडिपेन्डेन्स लेबर रेपब्लिकेशन ,बहिष्क्रीत हितकरिणी अशा अनेक योजना सुरु केल्या आणि स्त्रीशिक्षणास सुद्धा पाठिंबा दिला..तसेच महात्मा गांधी यांच्यासोबत त्यांनी पुणे करार सुद्धा केला होता .त्यावेळी महात्मा गांधींनी असे मत मांडले होते कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आकलनक्षमता हि ५०० ग्रॅजुएटस आणि १००० स्कॉलर्स इतकी आहे. गांधीजींनी त्याकाळी हरिजन या शब्दाचा प्रयोग केला होता ज्याचा अर्थ होतो ईश्वराची लेकरे परंतु ही पद्धत त्यांनी खालच्या जातीच्या लोकांना स्वीकारण्यास सांगितली कि जर स्वतःच्या जातीची लाज वाटतं असेल तर हरिजन संबोध करा पण त्यावेळी आंबेडकरांनी याचा प्रखर विरोध केला कि जर तुम्ही ईश्वराची लेकरे आहेत तर आम्ही काय दैत्याची आहोत ? तसेच आंबेडकरांनी पाण्याचा सत्याग्रह सुद्धा केलेला आहे. त्याचप्रमाणे आंबेडकर हे नेहमीच जातिव्यवस्थेला विरोध करत म्हणून त्यांनी मनुस्मृती ज्यामध्ये जातींविषयी माहिती दिलेली आहे ती पत्रिका त्यांनी जाळून टाकली होती तसेच नाशिकमधील काळाराम मंदिरात त्यांचा प्रवेश वर्जित होता आणि तो सुद्धा नियम आंबेडकरांनी मोडून काढला स्वातंत्र्य , बंधुता, आणि एकता हि तत्वे सुद्धा दिली . जगातील सर्वात जास्त पुस्तके आणि गाणी ही आंबेडकरांवर रचलेली आहे. आंबेडकरांनी एकदा समिती मध्ये ही शप्पथ घेतली होती कि मी हिंदू म्हणून जन्माला येणे माझ्या हाथात नव्हते परंतु हिंदू म्हणून मरण पावणे हे माझ्या हाथात आहे आणि म्हणूनच कदाचित धर्म परिवर्तन करून १९५६ मध्ये त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला . वयानुसार आणि काळाच्या ओघात त्यांची तब्येत खालावत गेली अशावेळी त्यांची ओळख डॉ. सविता
यांच्याशी झाली त्यावेळी दादासाहेब गायकवाड याच्या पत्रात ते सांगतात कि एखाद्या व्यक्तीला नर्स किंवा काळजीवाहू ठेवणे धोक्याचे असते म्हणून मी विवाह करत आहे . आणि यांच्या विषयीसुद्धा आंबेडकरांनी The Buddha And His Dhamma यामध्ये नमूद केलेलं आहे कि सविता मूळे मी ८-१० वर्ष जास्त जगलो आहे. अखेरीस ६ डिसेंबर १९५६ रोजी जगायचे असेल तर लढावे लागेल हा संदेश देत हा महामानव काळात विलीन झाला . आज त्यांना कोटी कोटी प्रणाम .... शेवटी एकच सांगते
Life should be great ranther than long ..

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा