नटसम्राट मी ही
*****************
हसता हसता अश्रू आले
शुभ्र मोगऱ्या परि दरवळले
शुभ्र मोगऱ्या परि दरवळले
अथांग माझ्या हृदयाची खोली
अंतस्थ डहुळलेली
अंतस्थ डहुळलेली
अफाट म म स्मरणयात्रा
सुखदुःखे आनंदीता
सुखदुःखे आनंदीता
मी नांदीला आलो जेव्हा
घरकुल उजळले तेव्हा
घरकुल उजळले तेव्हा
मी सुद्धा एक नटसम्राट
जीवनवेदी वरचा भाट
जीवनवेदी वरचा भाट
शेक्सपियरची सारी दुःखे
रचतो स्वहस्ते नित्य ते
रचतो स्वहस्ते नित्य ते
मायबाप रसिकहो
स्वीकारा ही मानवंदना
भरत वाक्यासाठी घुटमळतो आहे
स्वीकारा ही मानवंदना
भरत वाक्यासाठी घुटमळतो आहे
........योगिता मिलिंद नाखरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा