नातीचं लग्न झालं आणि सहा महिन्यांत आईंनी अंथरूण धरलं. "आता सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. मागे राहिल्या त्या सोडून दिलं म्हणजे झालं. पण तू तुझ्या इच्छा मागे ठेऊ नको. खूप त्रास होतो मग. त्या पूर्ण करण्यासाठी हक्काने बोल, भांडण कर. आता स्वतःसाठी लढ." सासुबाई संध्याला म्हणाल्या.
संध्याने आईंची खूप सेवा केली. त्यांना बरं वाटावं म्हणून देवाला साकडं घातलं. पण आई सर्वांना सोडून निघून गेल्या. ती खूप रडली. एकनाथराव पोरके झाले. उदास , खिन्न मनाने बसू लागले. त्यांचं मन कशातही रमेनासे झाले. एक दिवस संध्या म्हणाली, "आता दुःख बाजूला ठेऊन उभं राहायला हवं. नाहीतर आईंना काय वाटेल?"
संध्याने आईंची खूप सेवा केली. त्यांना बरं वाटावं म्हणून देवाला साकडं घातलं. पण आई सर्वांना सोडून निघून गेल्या. ती खूप रडली. एकनाथराव पोरके झाले. उदास , खिन्न मनाने बसू लागले. त्यांचं मन कशातही रमेनासे झाले. एक दिवस संध्या म्हणाली, "आता दुःख बाजूला ठेऊन उभं राहायला हवं. नाहीतर आईंना काय वाटेल?"
"ती तुझी आई नव्हती म्हणून तुला दुःख झालं नसेल. मी तिच्या पोटचा मुलगा आहे. दुःख तर होणारच."
"मला का दुःख होणार नाही? इतकी वर्षे आम्ही माय - लेकिसारख्या राहिलो. एकमेकींना समजून घेतलं. व्यक्त झालो. माझाही आधार गेलाय एकनाथ..तुम्ही इतक्या वर्षांत मला ओळखलं नाही! हेच तर दुःख आहे." संध्या गहिवरली.
तिने मुदतपूर्व निवृत्ती स्वीकारायची ठरवली. याला एकनाथ रावांनी विरोध केला. इतकी वर्षे सगळं केलं आता तरी मनासारखं जगू दे म्हणून संध्याने निवृत्ती घेतली. मिळणारा फंड, पेन्शन खटपट करून आपल्या नावे करून घेतला आणि गुंतवला. हे बघून एकनाथराव जास्तच चिडले.
"पगार, पेन्शन असूनही दर महिन्याला तुमच्याकडे पैसे मागावे लागणार असतील तर त्या नोकरीचा काय उपयोग?" संध्याने त्यांचं काही ऐकलं नाही. जाताना सासुबाई जे सांगून गेल्या ते तिने लक्षात ठेवलं.
"पगार, पेन्शन असूनही दर महिन्याला तुमच्याकडे पैसे मागावे लागणार असतील तर त्या नोकरीचा काय उपयोग?" संध्याने त्यांचं काही ऐकलं नाही. जाताना सासुबाई जे सांगून गेल्या ते तिने लक्षात ठेवलं.
मात्र एकनाथरावांनी यातून वेगळा अर्थ काढला. आई गेली, आता पुढं -मागं विचारायला कोण आहे! म्हणून संध्या मनाप्रमाणे वागते असं ते म्हणू लागले. हे बोलणं तिच्या मनाला लागलं नसलं तर नवलचं होतं! "आयुष्यभर स्वतः कमावलेले पैसे आपल्या नावे ठेवू नयेत इतकंही स्वातंत्र्य नसावं का स्त्रीला? तुमच्यासारखे नुसते पैसे गुंतवून काय करायचं? दर महिन्याचा खर्च यातून निघेल. औषध-पाणी बघता येईल. जरा इकडे -तिकडे जावं म्हटलं तरी हे पैसे उपयोगाला येतील की नाही?" संध्या म्हणाली.
एक दिवस एकनाथराव कामासाठी बँकेत गेले असता रस्त्यात पडण्याचं निमित्त झालं आणि पायावर प्लॅस्टर चढलं. वयानुसार दुखणं बरं होण्यास वेळ लागू शकतो असं डॉक्टर म्हणाले अन् झालंही तसंच. त्यांना उठवून बसवणं, प्रातर्विधी ला घेऊन जाणं, वेळच्यावेळी दवाखान्यात नेणं संध्याला नीटसं जमेना. शिवाय घराला पायऱ्या होत्या. त्या चढणं, उतरणं एकनाथरावांना कठीण जाऊ लागलं.
मोठया मुलीची डिलिव्हरीची तारीख जवळ येत होती त्यामुळे ती मदतीला येऊ शकत नव्हती. धाकटीच्या नवऱ्याची बदली नुकतीच दिल्लीला झाल्याने ते दोघीही येऊ शकत नव्हते आणि बाकी नातेवाईकांचा प्रश्नच नव्हता.
मोठया मुलीची डिलिव्हरीची तारीख जवळ येत होती त्यामुळे ती मदतीला येऊ शकत नव्हती. धाकटीच्या नवऱ्याची बदली नुकतीच दिल्लीला झाल्याने ते दोघीही येऊ शकत नव्हते आणि बाकी नातेवाईकांचा प्रश्नच नव्हता.
"आई, तुम्ही बाबांना घेऊन इकडे या. मी गाडी पाठवतो. इथे बेस्ट डॉक्टर बघू आणि त्यांचे उपचार घेऊ." धाकटा जावई म्हणाला.
पण मानी एकनाथरावांना जावयाकडे जाऊन राहणे कमीपणाचे वाटू लागले. आजवर कोणाचे उपकार घेतले नाहीत. मग जावयाकडे कसं जायचं? त्यांनी ठाम नकार दिला. पण संध्याला मात्र हा उपाय बरा वाटला. "तिथं मदतीला लेक असेल. अशावेळी कोणी पुरुष माणूस सोबतीला असला म्हणजे बरं असतं. मला एकटीला सगळं जमत नाही." ती एकनाथरावांना म्हणाली.
हे ऐकून एकनाथराव चिडले. आधीच साठवलेल्या पैशातले बरेचसे पैसे खर्च झाले होते. आता संध्यालाही आपल्याला सांभाळणं जमत नाही! मदतीला कोणी माणूस ठेवावा तर तोही अव्वाच्या -सव्वा पैसे घेईल. नेमकं काय करावं त्यांना कळेना.
हे ऐकून एकनाथराव चिडले. आधीच साठवलेल्या पैशातले बरेचसे पैसे खर्च झाले होते. आता संध्यालाही आपल्याला सांभाळणं जमत नाही! मदतीला कोणी माणूस ठेवावा तर तोही अव्वाच्या -सव्वा पैसे घेईल. नेमकं काय करावं त्यांना कळेना.
अखेर सासऱ्यांची अडचण ओळखून जावयाने गाडी पाठवली. वर निरोपही पाठवला, 'तुम्ही येणार नसाल तर मीही तिकडे पुन्हा येणार नाही.' दोघांना प्रवासात त्रास होऊ नये म्हणून त्याने ड्रायव्हरला ताकीद अन् सूचना देऊन ठेवल्या होत्या. तिकडच्या चांगल्या डॉक्टरांची चौकशी करून ठेवली होती.
आता लेक जावयाने इतकी सगळी तयारी केल्यानंतर एकनाथरावांना नाही म्हणणं फार जड जायला लागलं. शिवाय सगळ्या खर्चाची तयारी त्याने दाखवली होती. निमूटपणे ते गाडीत बसले. संध्याला फार आनंद झाला. एकतर पहिल्यांदाच इतक्या लांबचा प्रवास घडणार होता आणि एकनाथरावांसाठी चांगली मदतही मिळणार होती. म्हणतात ना, वाईटातून काहीतरी चांगलं घडतं ते असं!
तिने जायची सगळी तयारी केली असली तरी निघताना एकनाथरावांचे पाय जड झाले. आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या दूरचा प्रवास करणार आहोत, घरातले सगळे दिवे, नळ नीट बंद केले का? दरवाजाच्या कड्या, खिडक्या व्यवस्थित लावल्या आहेत का? उरलेलं सामान सोबत घेतलं की नाही? अशा शंभरशे साठ सूचना एकनाथरावांनी संध्याला केल्या असतील. वैतागून ती गाडीत बसली. संपूर्ण प्रवासात एकनाथरावांनी संध्याला खूप बोल लावले. जणू या सगळ्यासाठी तीच जबाबदार होती! कधी एकदा हा लांबलचक प्रवास संपतो, असे तिला झाले होते.
---------------------------------------------------------
---------------------------------------------------------
जावयाने सासू-सासऱ्यांचं जोरदार स्वागत केलं. आपली आई घर सोडून कधी नव्हे ते इतक्या दूरवर आली याचं लेकीला नवल वाटत होतं. पण बाबा यायला कसे काय तयार झाले? याचं आश्चर्यही तिच्या चेहऱ्यावर जमा झालं होतं. आल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी जावईबापूंनी सासऱ्यांना चांगल्या डॉक्टरकडे नेऊन आणलं. त्यांच्यावर उपचारही सुरू केले.
लेकीचं मोठं घर पाहून संध्याला आनंद झाला. केवळ आपल्या घराची सवय असलेल्या संध्या व एकनाथरावांना पहिले काही दिवस इथं रुळणं खूप कठीण गेलं. पण जावईबापूंचा स्वभाव, लेकीचं पाठीशी उभं राहणं, डॉक्टरांचे उपचार आणि शेजार - पाजाऱ्यांची होणारी मदत पाहून एकनाथराव लवकरच रुळले. उपचारांना प्रतिसाद देऊ लागले.
बापासाठी धावपळ करणारी लेक पाहून त्यांना आपल्या लेकीच्या स्वभावाचा नव्याने उलगडा झाला. ऑफिसमधून घरी आल्यावर जावईबापू हक्काने सासऱ्यांचं सगळं काही करायचे. त्यामुळे एकनाथरावांना अवघडल्यासारखा वाटायचं. "तुमच्या जागी माझे वडील असते तर मी कमी केलं असतं का?" या उत्तराने त्यांचा आग्रही, हट्टी स्वभाव थोडाफार बदलण्यास सुरुवात झाली.
कधी नव्हे ते संध्याला स्वतःसाठी मोकळा वेळ मिळू लागला. लेकीबरोबर ती कधी खरेदीसाठी बाहेर पडू लागली तर कधी शेजारच्या बायकांशी मनमोकळ्या गप्पा मारू लागली. आता दिवसाढवळ्या फिरायला जाण्याचं स्वप्न बघू लागली. पण ते इतक्यात शक्य होणार नव्हतं. नवऱ्याच्या मागे लागलेलं दुखणं बरं होतं नाही तोवर हा विषय काढायला नको, असं म्हणत तिने स्वतःच्या मनाची समजूत घातली. आहे त्या परिस्थितीत सुखी, समाधानी राहणं, त्या परिस्थितीशी मिळतं -जुळतं घेणं हा संध्याचा स्वभाव बनला होता.
आपली लेक आणि जावयाचं बहरणारं नातं पाहून एकनाथरावांना आपल्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण झाली. आम्हा दोघांत इतका मनमोकळेपणा कधी होता? याचा ते विचार करू लागले. घरासाठी एकत्र येऊन दिलेलं मत, लेकीने नवऱ्याची केलेली काळजी, दोघांनी एकमेकांचा राखलेला मान, शब्दांची राखलेली किंमत, जावई आपल्या लेकीला किती जपतात हे पाहून एकनाथरावांना संसार कसा असतो हे नव्यानं उमगलं. 'आपल्या लेकीची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी हा परका माणूस का इतका झटत असेल? केवळ प्रेम, माया, विश्वासाचं नातं आहे म्हणून!
संध्याची अनेक स्वप्नं होती. याबद्दल तात्यांनी आपल्याजवळ मन मोकळं केलं होतं. आईने सुद्धा सुचवलं होतं. बायकोची हौस पूर्ण केल्यावर नवऱ्याच्या पदरी पुण्य पडतं म्हणून. पण आपण काय केलं? या सगळ्याकडे साफ दुर्लक्ष केलं. बायकोने केवळ घरातच रहावं असा आपला हट्ट केला. तिला असं काय कमी आहे म्हणून घरचं सोडून बाहेरचं जग पाहण्याची इच्छा होते? या बायका एकदा का बाहेरच्या जगात रमल्या की घराकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. असा आपला गैरसमज होता.' एकनाथरावांना पहिल्यांदाच आपल्या वागण्याचं दुःख वाटलं.
संध्याचा खुलून येणारा स्वभाव पाहून त्यांना आपल्या वागण्याची कीव वाटायला लागली. संसार कसा असावा हे इतक्या उशिरा का ध्यानात यावं? आपल्या हट्टी स्वभावामुळे आई, संध्या आणि आपल्या मुलींना खूप काही सोसावं लागलं, याची त्यांना जाणीव झाली.
-------------------------------------------------------
संध्याचा खुलून येणारा स्वभाव पाहून त्यांना आपल्या वागण्याची कीव वाटायला लागली. संसार कसा असावा हे इतक्या उशिरा का ध्यानात यावं? आपल्या हट्टी स्वभावामुळे आई, संध्या आणि आपल्या मुलींना खूप काही सोसावं लागलं, याची त्यांना जाणीव झाली.
-------------------------------------------------------
पाय पूर्णपणे बरा झाला आणि एकनाथराव संध्याला म्हणाले, "तुला हवं तिथं मनसोक्त फिरून ये. उशिरा का होईना पण तुझी आवड पूर्ण कर. नातेवाईकांना भेटून ये. त्यांच्या कार्यक्रमात सहभागी हो. त्यांना आपल्या घरी बोलावं. ज्यांच्याशी अनेक वर्ष बोलली नाहीस त्यांची फोनवरून विचारपूस कर, चौकशी कर."
एकनाथराव काय बोलत आहेत हे संध्याला कळत नव्हतं. "हे सगळं माझ्याकडून आता व्हायचं नाही. ती वेळ केव्हाच मागे गेली. अहो, नातेवाईक काय म्हणतील? आता गरज भासली म्हणून पुन्हा सबंध जोडायला बघतात! इतकी वर्षे जमेल तशी नाती सांभाळली मी. आता ते काम तुम्ही करायचं. ज्या गोष्टीला तुम्ही इतकी वर्षे विरोध करत आलात आज तीच गोष्ट करायला मला का सांगता आहात? आज अचानक तुम्हाला काय झालंय?"
लेकही बाबांकडे आश्चर्याने पाहायला लागली.
"उपरती म्हण हवं तर." एकनाथराव खाली मान घालून म्हणाले. "मी चुकलो संध्या. तुला संसाराच्या दावणीला बांधून माझ्या सगळ्या इच्छा, हट्ट मी पूर्ण करून घेतले. पण कधी तुझा विचार केला नाही की तुला काय हवं आहे याकडे लक्ष दिलं नाही."
संध्याच्या डोळ्यांत पाणी आलं. "लेकीकडं चार दिवस राहिले, हेच माझ्याकरिता खूप आहे. तुमचा पायही आता बरा झालाय. दोन दिवसांत निघू आपण." ती डोळे पुसत म्हणाली.
"आई, बाबा म्हणतात तर आणखी थोडे दिवस रहा. आपण मस्तपैकी फिरून येऊ. तुमची ताजमहाल पाहायची इच्छा होती ना? ती मी पूर्ण करतो." जावईबापूंच्या या बोलण्यावर संध्याने आपल्याला लेकीकडे पाहिलं.
"आम्हा बायकांच्या इच्छा फक्त नवऱ्यावर का अवलंबून असाव्यात? आमच्या मतानुसार, इच्छेनुसार जगण्याचा मान आम्हाला कधी मिळणार नाही? काल नवरा म्हणाला म्हणून घराबाहेर पडले नाही अन् आज तो म्हणतो म्हणून आपली मागे राहिलेली स्वप्नं गोळा करून असं सहजपणे कसं बाहेर पडता येईल? स्त्रीला एकदा का आहे त्या परिस्थितीत राहण्याची सवय झाली की ती सवय मोडणं फार कठीण होतं."
"खरं आहे. पण राहिलेली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. तेव्हा मनात इच्छा असेल तर ती का मागे ठेवायची? आई, आपल्यासोबत ज्यांना यायचं त्यांनी यावं आणि ज्यांना यायचं नाही त्यामुळे आपल्याला फरक पडत नाही? मी दोन दिवस जास्तीची सुट्टी काढेन. आपण नक्की जाऊ. हवं तर असं समजा, देवाने माझ्या हातून तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी इतकी वर्षे वाया घालवली असतील. ते पुण्य मला मिळेल." जावई हसत म्हणाले.
संध्या एकनाथरावांचा अंदाज घेत होती. तिला वाटलं, मीही सोबत येतो असं म्हणतील. पण ते काहीच बोलले नाहीत.
"आई, मीही येणार." लेक उत्साहाने म्हणाली. "बाबा, तुम्हीही चला."
"आई, मीही येणार." लेक उत्साहाने म्हणाली. "बाबा, तुम्हीही चला."
"नको. नुकताच या दुखण्यातून बरा झालोय आणि मी सोबत आलो तर कदाचित संध्याचं लक्ष माझ्याकडे राहील. मला काय आवडेल? मी काय म्हणतो, काय प्रतिक्रिया देतो? यावरून ती तिची मतं बदलेल. नकळत मला जे हवं तेच करेल ती. आजवर हेच तर करत आली ती. म्हणजे मी तसं करायला भाग पाडलं तिला. तुम्ही जा. मी इथेच निवांत राहीन. तुम्हाला माझी अडचण नको व्हायला." एकनाथराव मनापासून म्हणाले. आता सगळं संध्याच्या मनासारखं होऊ दे म्हणून त्यांनी दोन पावलं मागेच राहायचं ठरवलं. अनेक वर्षांचा राग किंवा पाहिलेलं स्वप्न एकटीने पूर्ण करण्यासाठी असेल, पण संध्यानेही त्यांना सोबत येण्याचा आग्रह केला नाही.
अखेर सुट्टीच्या दिवशी लेक -जावई आणि संध्या सहलीला निघाले. ताजमहाल पाहण्याचं सासुचं पाहिलं स्वप्न आज जावई पूर्ण करणार होता. म्हटल्याप्रमाणे एकनाथराव घरीच राहिले.
आजवर फक्त वर्णन ऐकलं होतं. पण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायचं म्हणून संध्याचा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. आग्रा शहर कसं असेल? तिथलं वातावरण कसं असेल? देश-विदेशातले पर्यटक तिथे येत असतील, ते कसे दिसत असतील? यमुना नदीच्या काठी उभारलेली ही उत्कृष्ट कलाकृती, वास्तू कशी असेल? असे अनेक प्रश्न तिच्या मनात दाटून आले.
काही तासांच्या प्रवासानंतर तिथे पोहोचताच मोठ्या जावयाचा फोन आला. त्यांच्या लेकीला दवाखान्यात दाखल केलं होतं. लवकरच तिची डिलिव्हरी होणार होती. हे ऐकून संध्याला टेन्शन आलं. हाती आलेलं स्वप्न पूर्ण करायचं की लेकीच्या मदतीसाठी पुन्हा चार तासांचा प्रवास करून मागे जायचं?
पण हा प्रश्न एकनाथरावांनी सोडवला. "तुम्ही रात्री निघा, मी लेकीजवळ आहे." असा निरोप देऊन ते स्वतः गाडी ठरवून लेकीच्या पहिल्या बाळंतपणासाठी, तिच्या मदतीसाठी लागलीच निघाले. हे ऐकून संध्याला खूप बरं वाटलं. उशीरा का होईना, पण एकनाथरावांनी संसारातली एक महत्त्वाची जबाबदारी उचलली होती.
संध्याला लेकीची काळजी होतीच. पण तिच्या जवळ धीर देणाऱ्या सासुबाई होत्या. पुढच्या काही तासांत तिची भेट होणारच होती आणि एकनाथराव सगळं सांभाळून घेतील याची तिला खात्री पटली.
आजवरच्या अनुभवातून आलेलं धैर्य, शहाणपण या वयात खूप काही शिकवून जातं. संसारात जबाबदारी, कर्तव्य पार पाडणं जितकं आवश्यक, तसंच आपल्या कुटुंबाचा, स्वतःचा आनंद, सुख यांचा विचार करणं सुद्धा गरजेचं असतं. हे एकनाथरावांना खूप उशीरा कळालं. कोण म्हणतं, उतार वयात स्वभाव बदलत नसतो? स्वतःचा, परिस्थितीचा आणि बदलांचा स्वीकार केला की सगळं अगदी सहज जमतं.आता हळूहळू राहिलेली स्वप्नं पूर्ण करायची. मनातले विचार झटकून तिने आपल्या स्वप्नपूर्तीकडे अनेक वर्षांनी पहिलं पाऊल टाकलं, अगदी आनंदाने..
आजवरच्या अनुभवातून आलेलं धैर्य, शहाणपण या वयात खूप काही शिकवून जातं. संसारात जबाबदारी, कर्तव्य पार पाडणं जितकं आवश्यक, तसंच आपल्या कुटुंबाचा, स्वतःचा आनंद, सुख यांचा विचार करणं सुद्धा गरजेचं असतं. हे एकनाथरावांना खूप उशीरा कळालं. कोण म्हणतं, उतार वयात स्वभाव बदलत नसतो? स्वतःचा, परिस्थितीचा आणि बदलांचा स्वीकार केला की सगळं अगदी सहज जमतं.आता हळूहळू राहिलेली स्वप्नं पूर्ण करायची. मनातले विचार झटकून तिने आपल्या स्वप्नपूर्तीकडे अनेक वर्षांनी पहिलं पाऊल टाकलं, अगदी आनंदाने..
समाप्त
©️®️ सायली जोशी.
©️®️ सायली जोशी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा