स्वप्नवेडी!चाप्टर -४

अंतर्मुख मुलीची जीवनव्यथा.
स्वप्नवेडी चाप्टर -४


अखिलेश नावाचा मुलगा दहावीत असताना तिच्या वर्गात नवीन आलेला. आणि पहिल्याच दिवशी सगळे त्याच्याशी ओळख करून घेत असताना स्वप्नाली मात्र असून नसल्यासारखी वागत होती. यामुळे त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. आणि हे तिला कळूनही ती दुर्लक्ष करत होती. त्याला तिच्याबद्दल यक्षप्रश्न पडलेला...

शाळा सुटली आणि घरी जात असताना ते दोघे समोरासमोर आले. तेव्हाही स्वप्नाली घाबरून खाली मान घालून गेली. हे कदाचित त्याला खटकलेलं... तो घरी येऊन बॅग बेडवर टाकत याच गोष्टीचा विचार करत बसलेला. सगळे जण त्याच्या अटेन्शनसाठी धडपडतात. पण त्या मुलीला मी स्वता अटेन्शन देत होतो तरी ती साधं hi न बोलताही निघून गेली. यामुळे त्याचा इगो हर्ट झालेला.. तिने का इग्नोर केलं असेल याचा तिला जाब विचारू का? किंवा मग माझ्या पद्धतीने मी रिवेंज घेऊ का? त्याच्यातला attitude त्याला भ्रमात पाडत होता. पण ती मुलगी साधी आणि गरीब वाटत होती. म्हणजे तिला हे आवडलं नसेल असंही होऊ शकतं. त्याने असा विचार करत अखेर त्याच्या हर्ट झालेल्या इगोला वेसन घातलं. अखिलेशचे वडिल क्लास २ अधिकारी होते. आणि त्याची आईही सुशिक्षित होती. पण त्याच्या वडिलांच्या इकडून तिकडे होणार्या बदलीमुळे त्याच्या आईचा जॉब टिकत नव्हता. म्हणून त्यांनी गृहिणी होणं पसंद केलेलं. अखिलेश हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे अर्थातच तो अतिलाडाने जरा वेडावलेला... त्याला अभ्यासात जास्त रूची नव्हती. त्याला मैदानी खेळ मात्र आवडायचे. त्यासाठी तो फिटनेससाठी रोज जीमही करायचा.

दुसरीकडे घरी आल्यावर स्वप्नालीच्या मनात मात्र एकदमच अंगावर डोंगर कोसळावा असं झालेलं. तो एकटक तिच्याकडे पाहतोय हे तिला कळालेलं. पण तिच्याहुन सुंदर मुली असताना तो तिच्याचकडे का पाहत होता हे तिला उमगलं नव्हतं. ती स्वता:लाच याबाबत बोलत होती. येताना तो समोर आला तेव्हा मी त्याला बोलायला हवं होतं का.. पण मी काय बोलणार. छे.. फक्त बघून हसायचं तरी होतं. म्हणजे त्याला वाटलं असतं की मी रिस्पेक्ट देतेय त्याला. नाही, असं पण नको. नाहीतर त्याला वाटेल इतरांप्रमाणे मीही त्याच्या मागे मागे करतेय. पण खरंच तो खूप छान आहे दिसायला... बाकी काही माहित नाही कारण आज पहिलाच दिवस होता ना... जाऊदे पण ना पण मला त्याचं असं बघणं आवडलं. हा पण मी असं दाखवू शकत नाही. कसं वाटेल ना ते, आणि बाकीचे काय म्हणतील उगाच... त्यापेक्षा बरंय मी आणि माझा अभ्यास.. आणि माझं कल्पनाविश्व.

तिचं कल्पनाविश्व हे फक्त तिचं होतं. त्यात इतर कुणालाही प्रवेश नव्हता. रात्री ती झोपली पण तिच्या डोळ्यासमोरून अखिलेशचा तिच्याकडे एकटक बघणारा चेहरा जातच नव्हता. तिला माहित होतं हे प्रेम नाही. पण तरीही तिचं मन त्याच्याकडे आकर्षित होत होतं. आणि जे ती तिच्या प्रत्यक्ष जीवनात जसं मोकळं दिलखुलासपणे वागू शकत नव्हती. तसं ती तिच्या या कल्पनाविश्वात मनसोक्तपणे वावरायची. ती कल्पना करत होती की अखिलेश आणि ती ते दोघे एका रोमांटिक डेटवर गेलेत. तेव्हा तो प्रेमाने तिला जवळ घेतो. तिच्या कपाळावर गालावर किस करतो. आणि जेव्हा तो तिच्या ओठांजवळ येतो तेव्हा ती लाजून मान फिरवते. मग तो पाठमोरा जात तिच्या मानेवर गळ्यावर किस करायला लागतो.

ती हे सगळं उभ्या आयुष्यात कधीच करू शकणार नव्हती. अगदी कितीही इच्छा झाली तरी...कोण काय म्हणेल याचीच तिला जास्त धास्ती असायची. आणि त्यात तिला चुकूनही कुणी तिच्या मनाप्रमाणे मोकळीक देणं तर लांबच, पण मानही उचलायची किंवा घरात इकडची वस्तू तिकडे ठेवायची अनुमती देत नव्हते. मग हे सगळं तर लांबच... तिच्या भावाच्या मृत्यूनंतर सर्वांनी वेळोवेळी तिला नाकारून कमी दर्जाची वागणूक दिलेली. तरी तिला मात्र कुणावर राग धरायचा अधिकार नव्हता. आणि तिचा मृदू स्वभाव पाहता ती ते करूही शकायची नाही. म्हणून तिच्या सगळ्या भावना न्यूनगंड आणि भीतीच्या सावटाखाली कायमच्या दडपत आलेल्या... तिला समजून घेणारं, तिच्याशी मजा मस्ती करत तिला नेहमी बोलणारं असं कुणीच नव्हतं. एखादी जीवाभावाची मैत्रिणही ती कमवू शकली नव्हती. सतत तुसडेपणाची वागणूक आणि नाकारलेपण तिच्या भाळी नियतीने इतक्या लहान वयात लिहिलेलं. आणि तिची काही चुक नसतानाही ती ही जीवघेणी शिक्षा विनातक्रार भोगत होती.

क्रमशः


🎭 Series Post

View all