जसा देश तसा भेस भाग 1
चॅम्पियन्स ट्रॉफी2025
"आरती काय दिसतेस ग तु वनपिस मधे. अमेझिंग अमेझिंग. माझा तर विश्वासच बसत नव्हता की त्या फोटोतली मुलगी तूच आहेस. मस्त. किती तो बदल गं? मला तर वाटलंच नव्हतं की ऑफिसमध्ये नेहमी बेहेनजी टाईप कपड्यांमधे वावरणारी तु कधीतरी असे कपडेही घालशील!" थायलंडच्या ट्रीप वरून नुकत्याच भारतात परतलेल्या चाळीशीतील आरतीला ऑफिसमध्ये पाहताच तिची बावीस वर्षाची असिस्टंट परी भरभर बोलु लागली, "माझ्यावर विश्वास कर तु अगदी हाॅट दिसतेस तो गुडघ्यापर्यंत लांब वन पीस ड्रेस घातल्यावर. नक्की तुझे किती वय आहे हे कोणालाच कळणार नाही."
"अगं बदल हा महत्वाचाच असतो. आपल्यासाठीही आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांसाठीही. एकाच गोष्टीत अडकून पडले की कुजतो माणूस. ती कुजवट काढण्यासाठीच गेली होती मी थायलॅंडला." आरती परीला बोलली, "आणि थँक्यू छान वाटले तुम्हा नवीन जनरेशनच्या तोंडून आपले कौतुक ऐकून."
"हे हे आता कौतुकास्पद दिसशील तर आम्ही बोलणारच. चल चहा घेऊ कॅन्टीन मध्ये जाऊन." परी तिला म्हणाली.
" नक्कीच जाऊ पण त्याआधी मी आजपासून जाॅइन झाल्याचे मला सरांना सांगू दे." हातातील घड्याळात वेळ पाहत आरती हसून बोलली.
" बर बर मी कॅन्टीन मध्ये जाऊन चहा व काही खायला मागवून ठेवते. " परी आरतीला म्हणाली.
"चालेल." इतके बोलून आरती तिच्या रिपोर्टिंग ऑफिसर च्या केबिनकडे गेली व परी कॅन्टीनमध्ये.
आरती एका निमसरकारी कंपनीत एच आर ऑफिसर पदावर कार्यरत होती. ती ऑफिस मधील सर्वांवर त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून राहत असल्यामुळे तिला सर्वच घाबरून असायचे इतकेच नाही तर तिच्या मागे तिच्या वर बऱ्याच टीका टीपणीही व्हायच्या व बऱ्याच अफवा तिच्या बाबत पसरवल्या जायच्या. तरीही ती एक एच आर या नात्याने ऑफिसमध्ये कुठे काही गडबड किंवा गैर वर्तन तर होत नाही ना याकडे लक्ष देण्याची जबाबदारी पूर्ण करायची. अशी ही आरती सीईओ सरांना भेटून झाल्यावर तीही कॅन्टीनकडे वळली. परीने गरमागरम उपमा व चहा मागवून ठेवला होता. परी ही हसमुख कॉलेज संपवून नुकतीच आरतीच्या हाताखाली तिची असिस्टंट म्हणून कार्यरत असलेली. आरतीची असिस्टंट असल्याने जो तो तिला सुनवून जायचा, गैरसमजाचे बीज तिच्या मनात रुजवायचा प्रयत्न करायचा. मग ती आरती जवळ जाऊन सगळं ओकायची आणि आरती तिला समजावून सांगायची. आजही तिचा चेहरा पाहताच आरतीला समजून आले कि नक्कीच परीला काहीतरी बोलायचे आहे. तेव्हा हातातले काम करून मग निवांत हिच्या सोबत बसून बोलायचे तिने ठरवले होते.
" बोला परी मॅडम काय विचार सुरू आहे तुमच्या डोक्यात? " चहा नाश्ता घेऊन झाल्यावर आरतीने परीला विचारले.
" हे बघ राग येऊ देऊ नकोस. मला आढेवेढे न घेता सरळ सरळ बोलायला आवडतं. " परी आरतीला म्हणाली.
" मला का माहित नाही ते आणि म्हणूनच मागील सहा महिन्या पासून तू माझ्या असिस्टंट पदावर कायम आहेस. विचार तुला काय विचारायचे आहे ते?" आरती पेपर नॅपकिनने आपले ओठ टिपट तिला म्हणाली.
"ते आपल्या कंपनीच्या वर्धापन दिनाच्या दिवशी ती आपली ट्रेनी जिया वन पिस घालून आलेली असतांना तू तिला का बरं रागावले होते? जेव्हा कि स्वतः मार टोंगळ्या पर्यंत लांब वनपिस ड्रेस घालून थायलँडला फोटोशुट केलं." परीने तिला विचारलं.