Login

जसा देश तसा भेस भाग 2

आपली वेशभूषा किती महत्वाची आहे यावर भाष्य करणारी कथा

अशी तूझ्या बद्दल ऑफिसमध्ये चर्चा सुरू आहे." परीने आरतीला सांगितले.

" असू दे सोडून त्याला मी काय करणार? कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना. " आरती बेफिक्रेने बोलली.

" अरे पण मला जाणून घ्यायचे आहे कारण मला आवडतं तुझं काम तु माझी आयडियल आहेस. " बावीस वर्षाची परी चेहरा बनवून आरतीला म्हणाली.

"बरं, हे पाहा जिया दिल्लीची बिनधास्त वातावरणात वाढलेली चोवीस पंचवीस वर्षाची मुलगी आहे. एम बि ए झाल्या बरोबर गेट परिक्षेद्वारे तिला आपल्या गव्हर्मेंट कंपनीमध्ये शिकाउ अधिकारी म्हणून नोकरी मिळाली. एक वर्षात ती अधिकारी होणार होती. पोस्टींग इथे नागपूरला दिली गेली. बिनधास्त असणे वाईट नाही. इथपर्यंत ठीक आहे. पण आपल्या नागपूर व दिल्लीच्या वातावरणात खूप फरक आहे गं. मात्र शिक्षण झाल्याबरोबर ८०-९०  हजार पगार महिन्याला अशी सरकारी नोकरीची संधी जाऊ नये म्हणून ती नागपूरला आली.

ऑफिसमध्ये कसे राहायचे? कसे कपडे घालायचे? याचा तिच्या गाठीला अजिबात अनुभव नसलेली जिया तिला कम्फर्टेबल वाटत असलेलं टि शर्ट व जिन्स घालून ऑफिसला यायची. असो तेही चालवून घेतले मी. पण ती जरा का वाकली की मागून टि शर्ट वर जाउन कंबर उघडी पडायची आणि समोरून .............. आता बाकी समजून घे तू."

" मग तू समजावून सांगायचे होते ना तिला. तुला तर खूप छान जमते हे. " परी तिला म्हणाली.

" अगं हो , समजावून सांगायचा प्रयत्न केला मी तिला. एकदा सहज म्हणून मी तिला म्हणाली, रोज रोज टी शर्ट जिन्स बोर नाही होत का ग? कुर्ती छान दिसेल तुझ्या अंगावर. "

"मग?"

" मग काय मॅडम कुर्ती घालून येऊ लागल्या. ते ही ट्रान्सपरंट, स्लिप नसलेले किंवा लाइनिंग नसलेले. इनर स्पष्ट दिसायची. इतर कलीग पुरूषच नाही तर स्त्रीया सुद्धा कंमेंट्स करायच्या. पण कोणी तिला समजावून सांगायच्या भानगडीत पडत नसे. मी तिच्यासोबत राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीला, तिच्या समवयीन सर्व सहकाऱ्यांना जियावर कमेंट्स पास करू नका, हसु नका, झालंच तर बोला तिच्याशी, आपल्याकडे कसले कपडे चालतात ते सांगा तिला. तिच्यासोबत खरेदीला जा. असे बोलली तेव्हा सर्वांनी मलाच मुर्खात काढले. मला म्हणाले,  तु केला ना प्रयत्न. काय झालं? ती ट्रांसपरंट कुर्ती घालून आली. तेव्हा आम्ही कशाला आमचे मनोरंजन थांबवु? पण एक एचआर ऑफिसर या नात्याने मला ऑफिसमधील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घेणे व सर्वांच्या हिताकडे लक्ष देणे बाध्य होते आणि आहे. अशातच फाउंडेशन डे च्या संध्याकाळी मला आमच्या एका सहकारी ओमचा मॅसेज आला,

"ती जिया बघ काय वंगाळ घालून आली ते. BPL चा CEO तर तिला सोडायलाच तयार नाही बघ."

माझी चांगलीच सटकली होती. मी रागातच त्याला रिप्लाय पाठवला, "हो का. मग एंजाॅय करा ना तुम्ही सगळं. डोळे शेका. कशाला लोड घेताय. काहीही झाले तरी आपण आपले मनोरंजन थांबायचे नाही."

मात्र माझे डोळे मालालाच शोधत होते. तोच ओमचा फोन आला,

"अगं चिडू नको. तुच तिला तिथून हलवू शकतेस. जा तिला घरी पाठव. चेंज करून ये म्हणा."

" मी नाही म्हणणार मला बरीच काम आहेत. " मी उत्तरली.

"अरे नको ना. सॉरी सॉरी आमचे चुकले मॅडम. पण ती गेली नाही तर आपल्याच ऑफिसचा तमाशा होईल. ते पाहून उद्या आपले सीइओ सर आपल्या सर्वांची चांगली धुऊन वाळू घालतील. म्हणून तुला सांगतोय कळवळीने. कारण यावेळी तूच बोलू शकतेस तिच्याशी. इतकंच." ओम म्हणाला.

" ठीक आहे बघते मी काय करू शकते ते? " मी त्याला म्हणाली.