आपल्या फाउंडेशन डे च्या पार्टीत इतर सरकारी व गैरसरकारी कंपन्यांचे मोठ मोठे ऑफिसर, कॉन्ट्रॅक्टर, पोलीस अधिकारी असे बरीच मोठी मंडळी सुद्धा आमंत्रित होते. जिया सोडून सर्वच स्त्रिया साडी, पायघोळ वनपिस किंवा सलवार सुट घालून आल्या होत्या. तर जिया चक्क टोंगळ्याच्या वर असलेला स्लीव्हलेस शाॅर्ट वनपिस घालून आलेली. त्या दुसऱ्या कंपनीच्या सीइओची नजर खरंच जिया वरंच खिळलेली होती आणि आपले सीइओ सर खाऊ कि गिळू या नजरेने कधी माझ्याकडे कधी तिच्याकडे पाहत असलेले. मी तिच्या आईचा फोन येतोय असे खोटे बोलून तिला चक्क हात पकडून वाॅशरूमच्या आत घेउन गेली आणि आतापर्यंत तिच्या कपड्यांवरून झालेले महाभारत कथा तिला सांगितली. तर ती रडलीच. म्हणाली
'आधी बोललं असतं कुणी तर मीही लक्ष दिलं असतं आणि आमच्याकडे चालतात असे कपडे सर्रास म्हणून. पण खरंच तु जिन्स टि शर्ट बद्दल बोलली तेव्हाच तुझा इशारा समजायला हवा होता मला.' मी तिला समजावून घरी पाठवलं.
मात्र तिचे ओलावलेले डोळे पाहून सर्वांना वाटलं की मी तिला जास्तच रागावलं आणि माझ्याच नावाचा बोलबाला झाला."
"असे झाले तर. घ्या करायला गेले भले तरीही आपलेच हात रिते. बापरे तुझी असिस्टंट म्हणून रुजू झाली तेव्हा इतके कान भरले ना माझ्या सर्वांनी तुझ्याबद्दल. म्हणून मग तुझा थायलंडच्या ट्रिप वरील तो अवतार पाहून मला राहावले नाही." परी म्हणाली.
"अरे उलट बरे झाले तू मोकळेपणाने बोललीस माझ्यासोबत. नाहीतर इतरांसारखे तुझ्याही मनात माझ्याबद्दल तोच पूर्वग्रह घर करून बसला असता." आरती हसून परीला म्हणाली, "आता बोलायचे झाले माझ्या वनपीस घालण्याबद्दल तर झाले असे कि मुलांच्या सुट्ट्या होत्या. तेव्हा दहा दिवसांसाठी थायलँडला फॅमिलीटूरवर गेलो आम्ही. नवर्याने छानसा गुढग्यापर्यंत लांब वनपिस गीफ्ट केला. अर्थातच आम्ही अशा जागी होतो जिथे माझे सलवार सुट घालून फिरने बेगड वाटणार. कुठेतरी माझ्याही मनात इच्छा होतीच काही नवीन प्रकारचे कपडे घालायची. म्हणून ,'जैसा देस वैसा भेस' या उक्तीला मानून मिही मस्त वनपिस घालून वावरली. मला माझ्यातलाच हा बदल आवडला. मी तो एंजाॅय केला. तर यांत चूक काय?
माझेच काय मोठमोठ्या विचारवंतांचेही हेच म्हणणे आहे की काळ वेळ पाहून त्या अनुरूप स्वताला बदलणे ज्याला येतं तोच जीवनाची मजा लूटू शकतो. त्यामुळे मला तरी वाटतं , बदल हा महत्वाचाच आहे."
"हो ते तर आहेच. पण आपल्या कपड्यांना, आपल्या पेहरावाला खरंच इतकं महत्त्व द्यायला हवं का?" परीने तिला विचारले.
"परी, आपलं पहीलं इंम्प्रेशन पडतं ते आपल्या पेहरावा वरून. त्यामुळे आपण कुठे आहोत, तिथे कसले कपडे घालणं योग्य आहे याचं भान आपण ठेवायलाच हवं. मागे काही स्त्रिया विभित्स कपडे घालून दुर्गा पूजेला गेल्याचे युट्युब वर आले होते. आपण समजून घ्यायला हवे तिथे देवी बसली आहे. देवीची पूजा करायला आपण जात आहोत तिथल्या माणसांच्या नजरा आपल्यावर वळवून घेऊन त्यांच्या मनातील घाणेरड्या भावनांना उत्तेजना देण्यासाठी नाही." आरती म्हणाली.
"अच्छा आम्ही व्यवस्थित कपडे घालायचे त्या पुरुषांनी मात्र आपले मन अशुद्ध ठेवले तरीही चालेल." परीने प्रश्न केला.
"असा विचार केला तर मग अजूनही आधी आबादी ड्रेसिंग सेन्सला पकडून का आहे? परी तुझा बॉयफ्रेंड खूप हँडसम आहे ना?" आरतीने तिला विचारलं. परीने हॊकारार्थी मान हलवली.
"तो शर्ट काढून रस्त्यावर चालला तर आवडेल का तुला?"
"मुळीच नाही. ते फक्त गोव्याच्या बिचवर. इथे तर पोरी टापायचा त्याला." परी उत्तरली तशी आरती हसू लागली.
"आरती मॅम. कळले मला तुम्हाला काय म्हणायचे आहे ते. तुम्ही जिंकल्या मी हरली."
"गंम्मत घेतली तुझी. पाहा परी कोणी चुकत आहे तर त्याला समजून घेणं व समजावून सांगणंही आपल्याला जमायला हवं. कारण परिस्थिती नुसार बदल हा महत्वाचाच आणि त्याचा स्विकारही!" आरती तिला म्हणाली.
"हो हो नक्कीच देवी. म्हणूनच मी नेहमी व्यवस्थित कपडे घालून येते ऑफिसला बरोबर ना. की माझ्याही कपड्यांमध्ये काही उणीव आहे?" परीने गम्मतच तिला विचारले.
" तुला काय वाटतं मागील सहा महिन्यापासून मी अशीच झेलते आहे तुला. अगं बाई तुझा ड्रेसिंग सेन्स खूप छान आहे. जैसा देश वैसा भेस हे तुला चांगले समजते." आरती उत्तरली. परी मात्र एकटक तिच्याकडे पाहतच होती.
"एक मिनिट, एक मिनिट म्हणजे आतापर्यंत तू ही जे व्यवस्थित कपडे घालून ऑफिसला येत होती ते माझ्या भीतीमुळे?" आरतीने तिला विचारलं.
परीनेही होकारार्थी मान हलवली. आरतीने तिला उभा अंगठा दाखवून थम्बस अपचा इशारा केला व म्हणाली, "चला, भरपूर काम पडली आहेत करायला."
दोघीही आपाल्या केबिनच्या दिशेने निघून गेल्या.
मैत्रिणीनों मला माहित आहे कोणी काय व कशाप्रकारचे कपडे घालावे हा ज्याचा त्याचा प्रश्न. परंतु आपण कुठे जातोय याचे थोडेसे भान ठेवून आपली वेषभुषा केली तर बरेच गैर वर्तन आणि वादविवाद टाळता येतात.
धन्यवाद !
@अर्चना सोनाग्रे
@अर्चना सोनाग्रे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा