दृष्टिकोन तिचा
आज रविवार, संध्याकाळी वसुधा ची घरगुती खानावळ बंद असायची. ,सकाळी मात्र ग्राहकांना स्पेशल जेवण - फीस्ट.
मटर पनीर, पुलाव, तरुण मुलांना आवडणाऱ्या ग्रेव्ही वाल्या भाज्या व आज तिची स्पेशालिटी मराठी पद्धतीची वालाची उसळ, आणि स्वीट डिश ।
बरेचसे जेवण करून गेले,
शेवटी बलबीर आला, “आईआज काय स्पेशल? “त्याने ताटात पाहिले,अरे व्वा कडवे वाल! तो खुशित बोलला.
आणि दोन घास खाताच त्याच्या चेहऱ्यावर आनंद पण डोळ्यात पाणी दिसले .

‘तिखट झालीये?’ वसुधा ने विचारले?
‘ नाही उसळ अगदी माझ्या बेबे सारखी झाली ये…’’
….
‘ तुम्ही पंजाबी ना?’
….
‘ तुम्ही पंजाबी ना?’
हो, पण माझी बेबे मराठी, मी तिला कधी कधी आई म्हणायचो
“अच्छा ,कुठे असते तुझी आई? वसुधाने विचारले!”
‘वर बोट करून तो म्हणाला- देवाकडे, मला नोकरी लागली म्हणून येत होती भेटायला, गाडीत बसताना पाय घसरला नी सरळ खालीच पडली डोकं आपटलं ,गेली.”असे सांगता सांगता त्याला रडूच फुटले .
‘अरे, असे पानावर रडू नये!’ तिने त्याला शांत करत प्रेमाने त्याच्या पाठीवर हात फिरवला, तशी तिच्या कुशीत शिरून तो पोटभर रडला, कितीतरी दिवसाचे साचलेले दुःख बाहेर पडले .
थोड्यावेळाने तो शांत झाला.
वसु नी मागे पाहिले दारात तिची मुलगी आकांक्षा उभी होती.

बलबीर हात धुऊन निघून गेला.
“अग आज तू आत्ता कशी! संध्याकाळी येणार होती ना?”
‘हो पण बरं झालं आले ,शोभतं काआई तुला हे?-
म्हणूनच बाबांनी सोडलं तुला.
”आज तू …’’अगदी दिवसा ढवळ्या? आकांक्षा रागारागाने बडबडत होती.

‘काय बोलतेस आकांक्षा ?अग तुझे बाबा, त्याला प्रत्येक घटनेत शंका, मी कोणाशी बोलते, कुठे जाते? त्याने कधीही माझ्यावर विश्वास नाही ठेवला पण तु ही? तू लहानपणा पासून मला पहाते माझी मुलगी असूनही!’मी ते घर सोडून आले..
‘ अगं कधीतरी स्त्री-पुरुष या नात्याकडे निर्मळ मनाने पाहयला शीक, त्याची आई गेली त्याला माझ्यात ती जाणवली ,आठवणीने रडू आले मी सांत्वन केले बस्स. पण तुला नाही समजणार या भावना, तुही त्याच चष्म्यातून पाहणार ,त्याचीच मुलगी ना !’म्हणत वसुधा ताट घेऊन आतगेली .

आजच्या घटनेनं तिच्या जखमे वरची खपली निघाली नी मनातले दुःख अश्रूंच्या रुपात वाहू लागले.
वसूधा च लग्न खरं तर अरेंज मॅरेज होत. वसू ला अजून शिकायचे होते आणि नौकरी करायची होती पण मामाने आणलेलं श्रीधर च्या स्थळाला आई ने पसंत केले त्यामुळे वसूधा ला नाही म्हणता आले नाही. खर तर श्री मधे नाही म्हणायला काहीच कमी नव्हती.
नौकरी, पगार छान, दिसायला ठिकठाक , अजून काय हवं?
पण स्वभाव?तो कसा आहे? लग्ना नंतर वसुधा ला जाणवल श्री फार आत्मकेंद्रित, स्वतः शिवाय दुसर्याच्या मनाचा जराही विचार न करता बोलणारा घमेंडखोर आहे .
जो पर्यंत त्याला हवं तसं, त्याच्या मनाप्रमाणे वसुधा वागत असे !तो खुश असायचा..

वसुधा मनमोकळी सर्वांशी मिळून मिसळून वागणारी तिचा बोलका स्वभाव सहजच कुणालाही आकर्षित करत असे.
आफिस मधे ही श्री च्या टिफीन वर त्यांचे मित्र तुटून पडत. “काय मस्त मस्त भाज्या असतात रे ,लकी आहे इतकी सुगरण बायको आहे तुझी!”
म्हणत ते श्री ला फारसे आवडत नसे.
मग तो दुसरे दिवशी टिफीन न घेताच जायचा. एकुण च त्याला वसुधा चे कोणी कौतुक केलेले आवडत नसे.

बरेचदा तो तिला मित्रांच्या घरी पार्टी ला ही नेत नसे…
वसुधा ला तो प्रसंग आठवला…
एका रविवारी ती बाजारात भाजी घेताना तिला देसाई कुटुंब भेटलं,
“आता कशी आहे तब्येत तुमची”? सौ देसाई नी विचारले!’

‘कुणाची तब्येत ? ‘
‘तुम्हाला बरं नव्हतं ताप येतो म्हणून तुम्ही आमच्या कडे पार्टीत नव्हता आला, श्री ने सांगितले!’
‘अं–हो आता बरं आहे’ वसु ने म्हणून प्रसंग निभावून नेला!
तिने घरी श्री ला विचारले? तशी तिरसटपणे प्रतेक ठिकाणी काय गरज तुझी? म्हणून तिला तोडून टाकले.
ती समजून चुकली उगाच वाद नको म्हणून चुप बसली
आता त्यांच्या लग्नाला दहा वर्षे झाली एक
मुलगी ही झाली आकांक्षा,अगदी श्री चीच काॅपी.
आपल घर बरं नी आपण येवढेच तिचं ही जग फार मित्र मैत्रिणी नव्हत्या.

आकांक्षा जशी जशी मोठी होत होती घरखर्च ही वाढत होते त्यावरून ही श्री तिच्याशी वाद घालीत ते सर्व पाहून वसुधा ने नौकरी करायचा विचार केला पण ते जमतं नव्हतं.
तिच्या बी सी च्या मैत्रिणी चा केटरिंग व्यवसाय होता त्यात ती भागिदार झाली.
मुळातच सुगरण,मेहनती व नवीन शिकण्याची हौस असल्याने वसुधा चे काम छान चाललं होतं आता ती पैसे ही कमवायला लागल्यावर ही आता आपल्या बरोबरीला आली हे जाणवलं तशी श्री चा तिरसटपणा वाढत गेला.

तिला कस्टमर चे फोन येत असत ती सर्वांशी हसुन बोलत असे ते पाहून तुला इतका भाव कां देतात ?असे तो तिला विचारत असे आणी सर्वांशी इतक बोलायची गरजच काय असे ही विचारी.
त्याच्या ह्या स्वभावाला वसुधा अगदी कंटाळून गेली तिच्या सहनशक्तीचा अगदी कडेलोट झाला जेव्हा त्याने तिच्या चरित्रावर शंका घ्यायला सुरुवात केली.

तिने मग वेगळ दोन खोल्यांच एक घर घेतल व ती एकटी तिथे राहू लागली.
आकांक्षा आता मोठी झाली होती पण काय चूक आणि काय बरोबर हे कळण्या चे ही वय नव्हते बाबां जे सांगायचे तेच खरं असं मानून वसुधा चा राग राग करायची. वसुधा ने तिची समजूत घालून पाहिली पण् तूहे सर्व सोडून घरी ये असाच तिचा हेका पाहून मग वसुधा ने तिचा नाद सोडला.
पहाता पहाता चार वर्ष झाली आकांक्षा ने शिक्षण पूर्ण होताच लग्न केले..
वसुधा ने आता स्वतः ची खानावळ सुरू केली, तिच्या हातच्या स्वादिष्ट जेवणाचा स्वादा मुळे बरेच जण रेग्युलर जेवत..

आज वसुधा नेआकांक्षा व जावया ला संध्याकाळीजेवायला बोलावले होते पण दुर्दैवाने हा प्रसंग घडला.
आकांक्षा अजुन हीतिथेच बसली होती तेवढ्यात बलबीर परत आला. हातात एक कार्ड होते .
क्या काम? आकांक्षांनी तिरसट पणे विचारले?
ये मेरी एंगेजमेंट कां कार्ड देना था आई को उनको आना है दीदी आप भी आईये.आई को कहना कि कल मे नही हूं खाने को!
तो …. बताने जैसा क्या है?
वो आई बोलती है ना खाना वेस्ट नाही होना चाहिये इसलिये ..
हे सर्व पाहताना आकांक्षाला तिचं काय चुकले आहे ह्याची जाणीव झाली.
आई, चुकले मी,तुझा मुलगा येऊन गेला ग.

वसुधा ऐकत होती , वाटले आता तरी आकांक्षा चा तिच्या बाबतीत ला दृष्टीकोण बदलेल.
—----------------------------------------------
लेखन सौ. प्रतिभा परांजपे
लेखन सौ. प्रतिभा परांजपे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा