ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
लघुकथा
लघुकथा
दुधाचे कर्ज
"ती नाही या जगात..."
जणू त्याच्या कानात कोणीतरी उकळतं तेल टाकतय असं वाटलं त्याला.
"काय....?"
जणू त्याच्या कानात कोणीतरी उकळतं तेल टाकतय असं वाटलं त्याला.
"काय....?"
" ती गेली कालच. "
"कशी...? कशी गेली...? कशी...? काल तर माझ्याशी फोनवर बोलली चांगली."
 "तुम्ही कळवण्याची तसदी पण घेतली नाहीत साधी...
आता मी आलो म्हणून सांगताय.
आता मी आलो म्हणून सांगताय.
 मला शेवटचे दर्शन तर घेऊ द्यायचे होते तिचे."
तो एका दमात सगळं बोलून गेला. तो भानावर नव्हताच. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती.
तो निशब्द .तिथेच तसाच उभा होता. तोही काही बोलला नाही आणि कोणीच काही बोलत नव्हते.
तो एका दमात सगळं बोलून गेला. तो भानावर नव्हताच. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती.
तो निशब्द .तिथेच तसाच उभा होता. तोही काही बोलला नाही आणि कोणीच काही बोलत नव्हते.
 का..? का सांगावं त्यांनी मला?
मी कोण होतो तिचा...?
म्हटलं तर कोणीच नाही... आणि...
म्हटलं तर.... सर्वकाही.
मी कोण होतो तिचा...?
म्हटलं तर कोणीच नाही... आणि...
म्हटलं तर.... सर्वकाही.
 त्याने कुणाचीच बोलण्याची वाट पाहिली नाही.तो तडक घरात गेला. तिथे समोरच हॉलमध्ये दर्शनी भागात तिचा हार घातलेला फोटो ठेवलेला होता टेबलवर.समोर दिवा जळत होता. काही फुल होती.
 त्याने त्यातलंच एक फुल उचललं आणि तिच्या तसबिरीसमोर ठेवलं. 
नकळत हात जुळले त्याचे. डोळ्यातून दोन अश्रूबिंदू टपकले नकळतपणे.
तो गेला तसाच तडक परत माघारी वळला.
नकळत हात जुळले त्याचे. डोळ्यातून दोन अश्रूबिंदू टपकले नकळतपणे.
तो गेला तसाच तडक परत माघारी वळला.
 बाहेर खुर्च्या टाकून सगळी मंडळी बसली होती. त्यात तिचा नवरा होता.मुलगापण  होता. तो त्यांच्याजवळ गेला आणि विचारलं,
"काय झालं?कसं झालं?
कालपर्यंत तर चांगली होती. माझ्याशी फोनवर बोलली सुद्धा."
कुणीच काही बोलत नव्हते.
दुसऱ्याच एका माणसाने सांगितले,
"काय झालं?कसं झालं?
कालपर्यंत तर चांगली होती. माझ्याशी फोनवर बोलली सुद्धा."
कुणीच काही बोलत नव्हते.
दुसऱ्याच एका माणसाने सांगितले,
" पोलीस तपास चालु आहे. "
हे शब्द ऐकून तो हादरलाच. असे काय घडले? प्रकरण पोलिसांपर्यंत जावे. विचारा विचारातच
तो तिथून निघून सरळ आपल्या रूमवर आला.
त्याच्या डोक्यात तेच शब्द घुमत होते 'पोलीस तपास चालू आहे'
असे काय घडले असेल?
तो तिथून निघून सरळ आपल्या रूमवर आला.
त्याच्या डोक्यात तेच शब्द घुमत होते 'पोलीस तपास चालू आहे'
असे काय घडले असेल?
............
कोण हा 'तो'
आणि
कोण ही 'ती'
एक दुजे के लिए बनलेले वासू सपना....
आणि
कोण ही 'ती'
एक दुजे के लिए बनलेले वासू सपना....
नाही.
मग 'तो' चा जीव एवढा का तळमळला तिच्यासाठी?
मग 'तो' चा जीव एवढा का तळमळला तिच्यासाठी?
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला 'तो'
पण दुर्दैवी. त्याचा जन्म झाला आणि आई गेली.
'तो' रात्र रात्र रडायचा भुकेने. वर दुधावर पोट भरायचे नाही.'ती' चे मातृ हृदय तडफडायचे.
ती बघायची सर्व.
पण दुर्दैवी. त्याचा जन्म झाला आणि आई गेली.
'तो' रात्र रात्र रडायचा भुकेने. वर दुधावर पोट भरायचे नाही.'ती' चे मातृ हृदय तडफडायचे.
ती बघायची सर्व.
'ती' ने शेवटी एक दिवस हिंमत करून 'तो' च्या वडिलांना म्हटले,
"मी एक कामवाली बाई पण हृदय आईचेच ना? तुमची हरकत नसेल तर मी माझ्या दुधावर त्याचे पोषण करायला तयार आहे."
'तो' च्या वडिलांनाही खूप हायसे वाटले कारण समोर तान्हं बाळ होतं.
त्यांनीही लगेच परवानगी दिली.
"मी एक कामवाली बाई पण हृदय आईचेच ना? तुमची हरकत नसेल तर मी माझ्या दुधावर त्याचे पोषण करायला तयार आहे."
'तो' च्या वडिलांनाही खूप हायसे वाटले कारण समोर तान्हं बाळ होतं.
त्यांनीही लगेच परवानगी दिली.
आणि...
'ती' ने आपल्या दुधावर त्याला मोठे केले.
ती त्यांच्याकडे घरकामे करायची परिस्थितीवशात् .
'ती' चा मुलगा आणि 'तो' बरोबरीचेच.
ती दोघांनाही सारखेच बघायची.
तिचा खूप वेळ 'तो' च्या घरीच जाऊ लागला.
'ती' ने आपल्या दुधावर त्याला मोठे केले.
ती त्यांच्याकडे घरकामे करायची परिस्थितीवशात् .
'ती' चा मुलगा आणि 'तो' बरोबरीचेच.
ती दोघांनाही सारखेच बघायची.
तिचा खूप वेळ 'तो' च्या घरीच जाऊ लागला.
'ती'च्या नवऱ्याने संशय घेतला तिच्यावर. तिथे घरात बाई नसताना तू एवढा वेळ कशी जाते? काय करते?  आणि काम सोडायला लावले. 
'तो' ला वडिलांनी सगळी जन्म कहाणी सांगितलेली.
'तो' ला वडिलांनी सगळी जन्म कहाणी सांगितलेली.
आज काळ बदलला.
'ती' च्या घरी सुबत्ता. तिने चार घरी मेहनत करून घर घेतले, मुलाला शिकवले.
आज मुलगा चांगल्या नोकरीवर.
आता वय परत्वे तिनेही कामं सोडलेली.
आणि आता गरजही नव्हती. सगळं स्थिरस्थावर होतं.
'तो' ही आपल्या जगात मस्त.प्रथितयश डॉक्टर.एका मोठ्या दवाखान्यात आपली सेवा द्यायचा. कालौघात डोक्यावरचे वडिलांचे छत्रही गेलेले. 
पण 'तो'तिचे उपकार विसरला नाही.
.............
पण 'तो'तिचे उपकार विसरला नाही.
.............
'ती' ला कर्करोगाने घेरले. ती त्याच दवाखान्यात ऍडमिट .घरी कोणी करणार ? म्हणून तिची व्यवस्था दवाखान्यात केलेली.
'तो' मात्र लक्ष ठेवून होता.जातीने तिची सेवा करायचा.ममतेने तिच्यासाठी फळं वगैरे आणायचा. स्वतः तिला पाहिले खाऊपिऊ घालायचा.त्याच्या अनुपस्थितीत त्याने नर्सला सांगून ठेवलेले.
तिची तो पूर्ण काळजी घेत होता.
तिची तो पूर्ण काळजी घेत होता.
एक दिवस अचानक तिच्या घरचे लोक तिला घेऊन गेले.
तिच्याकडे 'तो' चा फोन नंबर होता.
ती बोलायची त्याच्यासोबत.
तिने तिच्या नावावरील घर 'तो'च्या नावे केले आणि तसे मृत्युपत्र बनविले होते हे त्यालाही माहिती नव्हते.
तिच्याकडे 'तो' चा फोन नंबर होता.
ती बोलायची त्याच्यासोबत.
तिने तिच्या नावावरील घर 'तो'च्या नावे केले आणि तसे मृत्युपत्र बनविले होते हे त्यालाही माहिती नव्हते.
तिने मृत्युपत्रात सरळ लिहले होते, "ज्यांना मी जड झाली म्हणून त्यांनी मला दवाखान्यात ठेवले .
पण ज्याने तिथे माझी मनोभावे सेवा केली.आपले दुधाचे ऋण फेडले. मी हे घर त्याच्या नावे करते."
पण ज्याने तिथे माझी मनोभावे सेवा केली.आपले दुधाचे ऋण फेडले. मी हे घर त्याच्या नावे करते."
तिच्या नवऱ्याला व मुलाला हे समजतात ते क्षुब्ध झाले.
त्यांनी तिला घरी आणले खूप मारपीट करून ते मृत्युपत्र बदलायला लावले.त्यातच ती गेली.
त्यांनी तिला घरी आणले खूप मारपीट करून ते मृत्युपत्र बदलायला लावले.त्यातच ती गेली.
आता बाप बेट्याचा कांगावा असा की," ते मृत्युपत्र 'तो' नी तिच्या शारीरिक परिस्थितीचा फायदा घेत जबरदस्ती लिहून घेतले."
जेव्हा 'तो' ला नोटीस आली तेव्हा त्याला हे सगळे कळले. तेव्हा त्याला कळला 'पोलीस तपास सुरू आहे' चा अर्थ.
'तो' नी स्वतःच्या मनाला समजावले अजून माझे दुधाचे कर्ज बाकी असेल.
©®शरयू महाजन
©®शरयू महाजन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा