दुधावरची साय
‘ ए आई- माझा टिफिन दे लवकर, मला लेट होतंय, स्कूल बस येईल.आर्या ओरडली .
“अगं हो हो बस दोन मिनिट , तोपर्यंत तू बूट घाल! आणि हे काय? नाश्ता का नाही केला ?टेबलवरच्या प्लेट कडे पाहत रश्मि म्हणाली.”
‘अगं किती किती गरम आहे !मी नाही खाऊ शकत आणि माझी बस येतच असेल म्हणत टिफिन बॅग मध्ये कोंबतआर्या गेटकडे धावली.
मागोमाग तिची आजी शोभाताई हातात प्लेट व दुधाचा ग्लास घेऊन तिच्या मागे गेल्या.
“ कुठे आली बस अजून? आहे वेळ. पोळीचा रोल आर्याच्या तोंडात भरत म्हणाल्या.”

अग आजी आज शाळेचा पहिला दिवस. काय ठाऊक बस लवकर येऊ शकते. तोंडातला घासगिळत आर्या बडबडली” पुरे आता नको मला,किती मागे लागतेस.”
बर-बर हे दूध तरी संपव मग! तुमचा लंच अकरा वाजता होतो तोपर्यंत काय भुकी राहणार?

रश्मी खिडकीतून आजी आणि नातीचा गोड संवाद ऐकत होती. मागून रोहित ने येत विचारले काय चाललं आहे बाहेर?
‘ काही नाही रे, नेहमीचच दोघींचं’.
शाळेतून दुपारी घरी आल्यावर आर्या भुणभुणली”आई तू आजीला बोल ना- किती मागे लागते खा खा करत, आता मी काय लहान आहे कां ?

‘बरोबरच करतात त्या!’ म्हणत रश्मी आत गेली..
रश्मीला ठाऊक होतं सासुबाईंना आर्या ची खूप काळजी आहे,आणि का नसणार?..
रश्मीला आठवले आर्याच्या वेळी तिला दिवस गेले तेव्हा तिला गरोदरपणाचा खूपच त्रास होता. सारख्या उलट्या व्हायच्या काही पचत नसे. कोरडं कोरडं खावंसं वाटे, सासूबाई खूप प्रेमाने तिला वेळोवेळी थोडं थोडं खाऊ घालायच्या. डॉ म्हणालेबाळ खूप अशक्त आहे तुम्हाला बेडरेस्ट घ्यावी लागेल. रश्मीला प्रश्न पडला माहेर इतक्या दूर कसे काय जाणार?
सासूबाईंनी तिला जवळ घेत समजावले व तिची काळजी अगदी आर्या होईपर्यंत घेतली. आर्या जन्मली ती कमी वजनाची,रश्मीची ही तब्येत अजून तेवढी सावरली नव्हती तिचीही आणि आर्याची दोघींची त्यांनी व्यवस्थित काळजी घेतली,अगदी तेल मालीश,सुट्टी पाजणे सर्व केलं. त्यामुळे त्या आर्याच्या बाबतीत जास्तच हळव्या आहे.
हे सगळं आठवून रश्मी म्हणाली “हे बघ आर्या आजी ला तुझ्याविषयी काळजी आहे म्हणून त्या अश्या करतात तेव्हा त्यांच्यावर अशी रागवत नको जाऊस ग.
‘बरं – आर्या म्हणाली .
दुसरे दिवशी आर्या शाळेत जायला निघाली तेवढ्यात आजी ओरडली “अगं देवा समोर प्रसाद ठेवलाय वाटीत, तो घेऊन घे, आर्या नी पाहिलं वाटीत काजू बदाम किसमिस. वाटीतला प्रसाद खात बाय मम्मा, आणि आजीच्या गालावर किस करत बाय आजी म्हणत आर्या बाहेर धावली.

रोहित आजी नातिच हे प्रेम पाहत म्हणाला “ “आई आम्ही पण आहोत थोड आमच्याकडेही लक्ष दे की.”
हो कां ?त्याशिवाय तू इतका मोठा झाला कां ?”शोभाताई कृतकोपाने म्हणाल्या.

रोहित कडे पाहत रश्मी हसत म्हणाली” अरे ती दुधावरची साय आहे जास्तच गोड, म्हणून तिची काळजी जास्त.
—------------------------------------------------
©®सौ प्रतिभा परांजपे

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा