दुःखाच्या अंधारापलीकडे सुखाचा प्रकाश...३
सामाजिक कथा
इन्स्पेक्टर विक्रम सुरेखाला धीर देतात.
"हे बघा ताई, तुम्ही घाबरू नका. यावर काही तरी उपाय निघेलच. पण मला एक प्रश्न पडला आहे की तो असा का वागतो? "
सर त्या मागे पण मोठ्ठी कहाणी आहे.
पाहुया पुढे....
सुरेखा जरा अडखळत बोलू लागली.
"साहेब, माणसाला माणूस नको असतो का?... गणपतचा जन्म झाला तेही... अशा समाजात. जिथे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत अशा घरात.... शिक्षणाच्या अभावामुळे त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्याला जेव्हा पासून कळायला लागले ना तेव्हापासून ते आजतागायत त्याच्या मनात खोलवर जखम झाली आहे आणि ती आता जास्तच चिघळली आहे..... गरीबीचे चटके, माणुसकीचे नाते, रक्ताच्या माणसांची गरज , त्याच्या सोबत केला जाणारा भेदभाव, यामुळे त्याच्यात आत्मविश्वासाची कमतरता सतत जाणपवत असते आणि या सगळ्या गोष्टींचा त्याला सतत त्रास होत असतो. तो....त्या... धगधगत्या ज्वाळात अजूनही जळतो आहे आणि आता आम्ही सुद्धा जळत आहो. तिरस्कार त्याच्या नसानसात भिनला आहे. ...त्याचे आईवडील आजारपणामुळे बिना औषधी आणि योग्य उपचार न मिळाल्याने गेले...त्याची बहीण.... तिच्यावर सुध्दा... गावातल्या लोकांनी तिच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली होती.....तिने आत्महत्या करून स्वतः ला संपवले. त्यानंतर पहिली बायको त्याने केलेल्या मारहाणीत मरण पावली. माझ्याशी लग्न केले. पण माझं बाळ सुध्दा त्याच्या होणाऱ्या मारहाणीला बळी पडले. तेव्हापासून तो जास्तच बिथरला आहे.....म्हणून तो बेताल वागतो..... त्याचे मानसिक खच्चीकरण केले गेले. पण याला कोणीतरी समजून घेतले पाहिजे. त्याच्या भावनांचा अतिरेक झाला आहे. विश्वास, प्रेम , आदर, कदर, स्त्रियांविषयी असलेल्या, कदाचित त्याला माहिती नसलेल्या अनेक गोष्टींपासून तो खूप दूर गेला आहे. त्याच मन खूप दुखावले गेले आहे. या गोष्टीला कोणीतरी लगाम घातलाच पाहिजे. म्हणून मी आज त्याची.... तक्रार करत आहे. "

"हे बघा सुरेखा ताई. सांभाळा स्वतः ला. अचानक
झालेल्या अटकेनंतर तो अजूनच बेताल वागेल. काही ठोस पुराव्याशिवाय त्याला जास्ती दिवस आम्ही कोठडीत नाही ठेवू शकणार."
झालेल्या अटकेनंतर तो अजूनच बेताल वागेल. काही ठोस पुराव्याशिवाय त्याला जास्ती दिवस आम्ही कोठडीत नाही ठेवू शकणार."
"बालविवाह... हो तो माझ्या मुलीचे रत्नाचे लग्न.... लावायला निघाला आहे. तेव्हा बालविवाह रोखण्यासाठी काहीतरी कायदा असणारच ना. माझ्या सोबत जे घडले त्याची पुनरावृत्ती होता कामा नये. माझ्या आयुष्याची तर फरफट झालीच आहे. आता माझ्या मुलीची नको.
"हो हो... का नाही. आपण बालविवाह नक्की रोखू शकतो. हा गुन्हाच नाही तर मुलांच्या भविष्यावर अन्याय आहे. आपण नक्कीच प्रयत्न करू या. कधी आहे लग्न?"
"सर... येत्या रविवारीच...."
"अच्छा, म्हणजे फार वेळ नाही आपल्याजवळ."
"हो, गणपत त्या पाहुण्यांनाच भेटायला गेला आहे. उद्या सकाळी तो परत येणार आहे."
"ठीक आहे. हे सगळं ठरल्याप्रमाणेच होईल. सानप मॅडम, पाटील तयारी करा. वाटल्यास दोन हवालदार अजून सोबत घेऊन जाऊ. आता हे काम फत्ते झालेच पाहीजे. "
"यसं सर."
"सुरेखा ताई, तुम्ही आता घरी जा. निवांत रहा. फक्त वेट अँड वाॅच."
'धन्यवाद साहेब. पण साहेब , तुम्ही आमच्या वस्तीत येणार का? कारण आजपर्यंत चांगली लोक आमच्या वस्तीत येत नाही. तुम्ही तर पोलिस आहात? "
"हे बघा, आमच्या जवळ गरीब -श्रीमंत, खालची जात-वरची जात, असा कोणताही भेदभाव आम्ही करत नाही. मुळात आमच्या जवळ माणुसकी आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून जे काही प्रयत्न करता येतील ते मी नक्की करणार."
दुसऱ्या दिवशी गणपत गावावरून परत आला.
"ए सुरेखा, जरा नीट ऐक. दोन दिसानंतर रत्नाच लगीन हाय. ही धरा नवी साडी. तवा तिला नीट तयार कर. मला काय बी तक्रार नको हाय. तू तिला काय बी पट्टी पढवायची नाय. समजलं का ? तूमी बी गपगुमान ऱ्हावा. नायतर माह्याशी गाठ हाय."
"हं......"
गणपतचे बोलणे ऐकताच सुरेखाच्या काळजात धडधडायला लागले. त्यामुळे आपण जो काही निर्णय घेतला आहे. तो योग्यच आहे.
रत्नाच लग्न असल्याने घरात पाहुणे येणे सुरू झाले. रविवारी सकाळीच दारी छोटासा मांडव घातला गेला. गणपतची एक बहीण, आत्या आणि मामा-मामी एवढेच लोक त्याने बोलावले होते. फार काही तयारी करायची नव्हती. पण जसा रविवार उजाडला तसं तसे सुरेखाचे मन आता घाबरायला लागले होते. कोण नवरदेव? तो काय करतो? त्याच्या घरी कोण कोण आहे?याची कसलीही माहिती सुरेखाला नव्हती. आपल्या आयुष्याची राखरांगोळी तर झालीच आहे. पण रत्नाला ती या संकटातून बाहेर काढणार होती. रत्नाला वेळेपर्यंत माहिती नव्हते की आपले लग्न आहे म्हणून.
"आई, मला एवढं तयार का करते? शाळेत काही कार्यक्रम तर नाही. मला अभ्यास करायचा आहे. आज आम्ही मैत्रिणी अभ्यास करणार होतो. आता माझी परीक्षा जवळ आली आहे."
"रत्ना आता काहीच बोलू नकोस. नाही तर तुझा बाप आपल्या उरावरच बसेल."
सुरेखा तिला तयार करत होती. नवीन साडी नेसवून दिली. गंध-पावडर केले. बालवयातच तिच्यावर संसाराची जबाबदारी थोपवून गणपत मोकळा होणार होता. पण सुरेखा तिच्या पाठीशी बळकटपणे उभी होती. सुलेखाची घालमेल सुरू झाली. लग्नाच्या वेळेपर्यंत जर इन्स्पेक्टर विक्रम नाही पोहोचले तर... एक एक मिनिट पुढे सरकत होता. नवरदेवाकडची मंडळी आली. फक्त चार पाच लोकच होती.
पाहुया पुढे....
© अश्विनी मिश्रीकोटकर
अष्टपैलू लेखन स्पर्धा