दुरावा
भाग - 1
“मृणाल , नको ना त्रास करून घेऊस. मग श्वास फुलतो तुझा .." मृणालला राखी बघून हुंदका आवरता आला नाही.. हातांच्या मुठीमध्ये राखी घट्ट पकडून मृणाल मिहिरच्या आठवणीने व्याकुळ होऊन रडत होती आणि मृणालचा नवरा शिरिष तिची समजूत काढत होता.
“मृणाल , नको ना त्रास करून घेऊस. मग श्वास फुलतो तुझा .." मृणालला राखी बघून हुंदका आवरता आला नाही.. हातांच्या मुठीमध्ये राखी घट्ट पकडून मृणाल मिहिरच्या आठवणीने व्याकुळ होऊन रडत होती आणि मृणालचा नवरा शिरिष तिची समजूत काढत होता.
"इतक वाटतं तर मग जाऊन ये ना काय फरक पडतोय.. " तिने नकारार्थी मान हलवली. हातात असलेल्या राखीवर हलका हात फिरवून ती एका व्यवस्थित एका बॉक्समध्ये तिने ठेऊन दिली..
तीन वर्ष झाली मृणाल मिहिरला राखी बांधायला गेली नव्हती. मृणाल आणि मिहिरचा एकमेकांवर फार जीव होता. मिहिर मृणालसाठी अगदी काही ही करायला तयार होता. मृणाल मिहिर आणि आई बाबा सुखी कुटूंब… . एका सदन परिवारात मृणालचे लग्न शिरिषशी झाले…मिहिरने आयुष्यात पुढे जावं नावं कमवावं अशी रोज ती देवाला प्रार्थना करत होती. हसमुख आणि मृणाल च्या खोड्या काढणार मिहिर तिला तिच्या लहान बाळाप्रमाणे भासत होता. मृणालच्या बाळाचं नाव ही मिहिर ने ठेवण्याचा हट्ट केला होता..
चार वर्षापूर्वी त्याचे लग्न प्रिया सोबत झाले.. मृणालला तर नवीन सुनेचे खूप कौतुक कुठे ठेऊ आणि कुठे नाही असे झाले होते.. “हे बघ प्रिया तुला कसलाही प्रॉब्लेम आला ना तर आधी मला सांग आणि आई काही जुन्या विचारांची नाहीये तसा प्रॉब्लेम नाही. सर्व सुरळीत चालू होतं..
एके दिवशी गाडीचा अपघात होऊन मिहिर मृणालचे आईबाबा देवाघरी गेले.. दोघांना ही आईबाबांच्या अचानक जाण्याचा धक्का बसला होता.. दोघेही एकमेकांसाठी होते…मृणाल अधूनमधून मिहिरकडे जात होती..शिरिषला व्यवसायात नुकसान झाल्याने मृणालची परिस्थिती बदलली होती. मृणाल प्रती प्रियाच वागणं बोलणं ही बदललं होतं… प्रियाने घर विकण्याचा सल्ला दिला आणि यात मृणालचा विरोध होता.. यानंतर मृणाल आणि प्रिया दोघांमध्ये छोट छोटे वाद होत होते..आणि प्रिया मृणालचा दुस्वास करायला लागली पण याची वाच्यता मृणाल मिहिरजवळ करत नव्हती. प्रियाला तिच्या संसारात मृणालची अडचण होऊ लागली. तिची काळजी रोख टोक टोचायला लागली आणि काही दिवसांनी त्यांच्या पश्चात त्यांची संपत्तीमध्ये मृणालनेही तिची वाटणी मागितली.. हे बघून मिहिरला धक्काच बसला.
“हे बघा हे आहे यांच खरं रूप. मी म्हणत होते तुम्हाला तुम्हीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही.”
क्रमश ..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा