दुरावा
भाग - 2
भाग - 2
“हे बघा हे आहे यांच खरं रूप. मी म्हणत होते तुम्हाला तुम्हीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही.” प्रिया मिहिरला मृणाल बद्दल भरवत होती..
“ हो हेच माझं खरं रूप आहे आणि माझ्या परवानगीनूसार तू हे घर विकू शकणार नाही कारण यामध्ये माझा हिस्सा आहे.”
“ किती हावरट आहे ही बाई.” प्रिया लगेच म्हणाली..
दोघांमध्ये वाटणी झाली. पण त्या दिवसापासून दोघांच्या नात्याल दरी निर्माण झाली होती आणि प्रिया दरी कमी करण्याचा प्रयत्न न करता त्यात काही ना काही आणखी भर घालत होती. दोघांची जोरदार भांडण झाली. मिहिर ने मृणालचा अपमान केला आणि तो तिच्या जिव्हारी लागला. आता मिहिर मृणालचे तोंड पाहायला तयार नव्हता..हे बघून स्वर्गवासी झालेले आईबाबांचा ही आत्मा दुःखी झाली असतील.. मृणालचे माहेर तर पूर्णपणे तुटले होते. याचा तिला खूप वाईट वाटतं होतं. सतत मनात ती टोचणी टोचत होती. राखीपोर्णिमा जवळ आली की तिला खूप त्रास होत होता.. अखेर अस्वस्थ होऊन तिने मिहिरला फोन लावला. मोबाइलमध्ये नंबर सेव होता पण त्याने तो उचलला नाही.. मृणालने पुन्हा फोन लावला. मिहिर ने त्याच्या इगो मुळे तिचे फोन घेतले नाही.
दुसऱ्यादिवशी ही तिने प्रयत्न करत फोन लावला पण त्याचा नो रिप्लाय .. वैतागून त्याने तिचा नंबरच ब्लॉक केला.. मिहिरशी बोलणं न झाल्याने तिला रडू आले..
“ इतका तिरस्कार करतो माझा की नंबरच ब्लॉक केला मिहिर.” ती रडत म्हणत होती..
राखीपोर्णिमेला सकाळी त्याचा अननोन नंबरवरून फोन आला.. त्याने उचलून कानाला लावला..
“मृणाल हे जग सोडून गेली.” शिरिष
“क्काय ताई ?”
“हो .. दोन दिवसांपासून तिला बोलायचं होत तुझ्याशी पण तुला वेळ नव्हता.. कदाचित तुझ्याशी शेवटचं बोलणार होती. तुला वेळ असेल तर अंत्यविधी साठी स्मशाननात ये.” शिरिष कोरडेपणाने म्हणाला आणि त्याने फोन ठेवला.. मिहिरसाठी हा दूसरा धक्काच होता.. मिहिर लगेच निघाला.. तिथे शिरिष आणि त्याचा मुलाचा प्रेमचा आकांत बघवत नव्हता. आई साठी मुलगा रडत होता. तिच पार्थिव देह ठेवला होता..
“हे कसं झालं दाजी?”
“ अस्वस्थ होती दोन तीन दिवस .. स्वतःला त्रास करून घेत होती.. तुला फोन करूनही तू उचलला नाहीस.. तुला भेटण्याकरिता जा म्हणालो तर मी तिथे आता पाय ठेवणार नाही असं म्हणाली.
क्रमश ...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा