Login

दुरावा भाग -3

मृणाल मिहिर
दुरावा
भाग - 3


हे कसं झालं दाजी?” 

“ अस्वस्थ होती दोन तीन दिवस .. स्वतःला त्रास करून घेत होती.. तुला फोन करूनही तू उचलला नाहीस.. तुला भेटण्याकरिता जा म्हणालो तर मी तिथे आता पाय ठेवणार नाही असं म्हणाली.. रात्री झोपली तर सकाळी उठलीच नाही. डॉक्टरांना बोलवलं त्यांनी सांगितलं तिला हार्ट ॲटक आला. “ शिरिष रडत म्हणाला .


“ हे घे पेपर्स ..” 

“ कसले पेपर आहेत हे?” 

“तुमच्या वडिलांच्या संपत्तीचे जे वाटणी केली होती त्याचे पेपर .. हे तर तिने तुझ्या भल्यासाठीच तिने तुझीच ठेव मी तुला आता सुपूर्द करतोय. ना तिला तेव्हा हाव होती नाही मला आहे.. हे घे ..” 

“ मग ताईने हिस्साच का मागितला होता..”

“ कारण तिला तुझं भविष्य अंधारात दिसत होतं. समोरच्यावर आंधळा विश्वास ठेवून तू जे पैशाची उलढाल करत होतास तिने तुला समजून सांगण्याचा प्रयत्न ही केला पण प्रियाच ऐकून तू आणि प्रिया तिला नाही नाही ते बोलले. तिच्याशी कायमचं नातं सपवलं. तू ज्या कंपनीत पैसे गुंतवणार होतास ती कंपनी फ्रॉड होती. तुझ्या संसारात लुडबूड नव्हती रे करत... तिला तिच्या भावाने त्याच्या पडत्या काळात कोणासमोर हात पसरू नये असं वाटत होतं.. याचा अनुभव घेतला होता तिने .. तेव्हा प्रियाची वागणूक ही बदलली होती.. आताच्या काळात पैशाशिवाय माणसाला काही किंमत उरत नाही. हे तितकचं खरं आहे.. पण तुझा अंहकार इतका मोठा होता की तू शेवटच्या क्षणी तिच्याशी बोलला नाही. तुझ्या खोट्या अंहकारामुळे तू तिला कायमचं गमावून बसलास मिहिर.” 

हे ऐकून मिहिर तिच्या पायावर डोकं ठेवून रडत तिची क्षमा मागत होता. 

“शेवटच्या क्षणी बहिणीशी बोलता आले नाही .. का मी असा वागलो .. मी फोन घ्यायला हवा होता. तायडे माफ करं मला ..” आता त्याचे डोळे उघडले होते पण तिचे डोळे कायमचे मिटल्या गेले होते. आता त्याला क्षमा करायला, रागवायला आणि सावरायला  ती येणार नव्हती.. अहंकारामुळे त्यांच नातं पणाला लागलं होतं.
 

  
आजच्या काळात संपत्ती मालमत्ता पैसा इतका महत्वाचा झाला आहे की नात्यांना काहीच महत्व उरले नाही… हे सुखद जीवन जगण्याच माध्यम जरी असलं तरी नात्याशिवाय माणूस अपूर्ण आहे. माणूस म्हटलं म्हणजे चुका होणारचं पण त्या वेळीच सुधाराव्यात .. नात्यांमध्ये अहंकार आणू नका आणि आलाच तर त्याला सर्व उद्धवस्त करण्याआधी मुळासकट उपटून बाहेर फेकून द्या .. अहंकारामुळे खूप नाती गमावली जातात. मिहिर सारखी पश्चाताप करण्याची वेळ कोणावर येऊ नये.