Login

दुर्गा ... भाग 25

दुर्गा

दुर्गा 25 

दुर्गा कथा आता पर्यंत थोडक्यात :

            ( दुर्गा , कैदी नंबर आठशे बारा , गेल्या तीन वर्षापासून जेल मध्ये बंद आहे ... तिने तिचा गुन्हा कबूल केला आहे .... ती एक मोठी केस होती ... तीन वर्षांपासून बऱ्याच वकिलांनी तिची केस ओपन करायचा प्रयत्न केला होता ... पण ती कोणासोबत एकही अक्षर बोलत नव्हती .. ॲड ईशान ...एक उमदा तरुण त्याने मात्र तिला बोलते केले... दुर्गा ने तिची कथा सांगण्याकरिता त्याच्या पुढे काही अटी ठेवल्या...त्याने त्या मान्य केल्या... आणि पुढे दुर्गा तिची कथा सांगू लागली. 

           दुर्गा एका छोटे खेडेगाव चींधिगाव येथील सतरा वर्षाची रांगडी पण मनमिळावू मुलगी ... मर्दानी खेळ , काठी चालवणे , व्यायाम करणे तिचा आवडत्या गोष्टी. तिला अन्याय अजिबात सहन होत नसे ,मग तो घरात असो वा बाहेर... ती नेहमीच अन्याय विरुद्ध आवाज उठवत. गावात आमदाराचे राज्य.... त्यामुळे गुंडागर्दी खूप . त्यांना सामोरे जायचे म्हणजे तिच्या एकटीने जमणार नव्हते .. तिचे लहानपणापासून चे स्वप्न होते पोलीस बनण्याचे...  

            एकदा गावात एक तरुण येतो... तिथल्या असलेल्या कारखाण्याचा चार्ज सांभाळतो....एकदा दुर्गा उशिरा रात्री सामसूम रस्त्यावर पळत असते, तिच्या मागे काही गुंडे लागले असतात.... तो तरुण तिला त्या गुंडांपासून वाचवतो... दुर्गाने आपला पूर्ण चेहरा ओढणीने बांधला असतो....त्याला फक्त तिचे डोळे दिसतात... आणि तो त्या डोळ्यांच्या प्रेमात पडला असतो... 

            दुर्गाच्या घरी आई , वडील आणि आजी असतात... वडील सतत आईचा छळ करणारे असतात.... दुर्गा त्यांना धमकावून सगळा बंदोबस्त करते... 

              फॅक्टरी मध्ये दुर्गाची ओळख त्या मुला सोबत होते .... ती त्याला मालक म्हणत असते... मालक आणि दुर्गाची छान मैत्री होते... मालक एका मिशन वर आला असतो... तो दुर्गाच्या साहाय्याने गावातील बरीच माहिती मिळवतो... पण दुर्गाला ते माहिती नसते... रोजच्या होणाऱ्या भेटी दरम्यान मालक दुर्गाकडे आकर्षित होत असतो... पण सतरा वर्षाची दुर्गा तिला हें काही कळत नसते....पण तिला मालकाचा सहवास आवडू लागतो... मालक आपले मिशन पूर्ण करून परत जातो...जातांना दुर्गाला तो आपला पत्ता देऊन जातो...आणि तिला घ्यायला येईल असे सांगून जातो... 

               दुर्गा सोबत असे काही घडते की तिला तिचे गाव सोडून पळावे लागते.... कुठे जायचं विचार करत असताना तिला मालकाने दिलेला त्यांचा पत्ता आठवतो ....आणि ती तिथे जाते ...पण मालक तिला तिथे भेटत नाही . जड मनाने ती मागे फिरते पण तिला गावाला परत सुद्धा जाता येणार नव्हते , रेल्वे स्टेशन वर राहते , तिथे सुद्धा काही वाईट नजरांची ती शिकार होते , पण न घाबरता ती त्यांना चांगला चोप देते. नोकरीच्या शोधात असताना देव कृपेने म्हणा अथवा तिच्या चांगल्या कर्माचे फळ , तिची गाठ एका आजी सोबत पडते, ती आजी तिला तिच्या कडे कामासाठी ठेऊन घेते आणि तिला स्वतःच्या खोलीत राहायला जागा देते. आजी आणि दुर्गा मध्ये आजी नातीचे, माणुसकीचे सुंदर नातं निर्माण होते. 

      दुर्गा आजीला दिवसभर कामात मदत करते , आणि रोज रात्री मालकाच्या घराकडे तो आला का म्हणून चेक करत असते. आणि शेवटी काही महिन्यांनी तिची त्याची वाट बघण्याची तपश्चर्या पूर्ण होते आणि तो परत येतो. दुर्गाला तिचा आर्या भेटतो. याच दरम्यान आर्या आणि दुर्गा मधले प्रेम सुद्धा फुलू लागले असते .

             आर्या खूप श्रीमंत घरचा मुलगा असतो. पण त्याला सावत्र वडील असल्यामुळे तो वेगळा राहतो. त्याचा पण एक सुंदरसा टुमदार बंगला असतो. आर्यांच्या आईला दुर्गा एक रानटी , भांडकुदळ मुलगी वाटते. तिला ती अजिबात आवडलेली नसते. आर्याची आई स्टेटस जपणारी बाई असते , त्यामुळे दुर्गा तिला आर्याची बायको , तिची सून म्हणून मान्य नसते. पण आर्या आणि दुर्गा सुद्धा आपल्या प्रेमावर अडून असतात. दुर्गा त्यांना प्रॉमिस करते की ती त्यांना त्यांच्या स्टेटस ची बनून दाखवेल. 

             आर्यांच्या मदतीने दुर्गा तिचे शिक्षण परत सुरू करते. तिचं स्वप्न पोलिस ऑफिसर बनण्याचे ती पूर्ण करते. ) 

पुढे : भाग 25

    

    दुर्गाने UPSC ची परीक्षा उत्तम रित्या पास केली होती . पुढील सगळ्या प्रोसीजर पुर्ण झाल्या आणि शेवटी दुर्गा आयपीएसचा ट्रेनिंगसाठी गेली . 

         फिजिकल ट्रेनिंग बरंच कठीण होते. दुर्गाचा दिवस सकाळी साडेचारला सुरू व्हायचा. चार पाच किलोमीटर रनिंग, घोडसवारी, शस्त्रांची ट्रेनिंग, स्विमिंग , ड्रायव्हिंग , ट्रेकिंग , जंगल ट्रेनिंग, त्यासाठी जंगलामध्ये कमीत कमी जीवनावश्यक वस्तू वापरून रहाणे, गड चढणे, चिखलातील ट्रेनिंग ….तिच्या अशा अनेक कठीण ट्रेनिंग सुरु होत्या. हे सगळं इतकं कठीण होते की काही काही लोक तर अर्ध्यातच तुटून गेले होते , पण दुर्गाला आधीपासून अशा बऱ्याच गोष्टी येत होत्या, तिला मनापासून या सगळ्या गोष्टींची आवड होती आणि आर्याने पण तिच्याकडून बरेच काही करून घेतले होते, त्यामुळे हार न मानता ती प्रत्येक ट्रेनिंगला सामोरे गेली होती. उत्कृष्ठरित्या तिने सगळा अभ्यास पार पाडला होता. ट्रेनिंग सेंटरला सुद्धा ती आवडती विद्यार्थिनी झाली होती . 

        जवळपास तीन वर्षाचे हे ट्रेनिंग होते , वेगवेगळे टप्प्यातून हे ट्रेनिंग होणार होते . दुर्गा तीन वर्षात दोन तीनदा इकडे घरी आली होती , पण नेमका आर्या तेव्हा त्याच्या कामा निमित्ताने बाहेर होता . या तीन वर्षात त्यांची एकदाही भेट झाली नव्हती . पण त्यांचे फोनवर मात्र बोलणं सुरू असायचे . 

           या तीन वर्षात तिचं शरीर तर पौलादी बनले होतेच , पण मन आणि तिची आत्मा सुद्धा पौलादी झाली होती. देशसेवा करणे आता तिच्या रक्तात भिनले होते . देशाबद्दल कोणी काही बोलले बोलले तिला अजिबात खपत नसे. कोणी चुकीचं चुकूनही बोललं तर तिचे रक्त खवळून उठत आणि तिथेच ती त्या व्यक्तीला जमिनीवर लोळून टाकायची. तिच्या सगळ्या सिनियर मध्ये तिची ख्याती वाढली होती. 

           आज तीन वर्षानंतर फायनली तो दिवस आला , तिने पोलीस बनायचे बघितलेले स्वप्न , ते पूर्ण झाले होते. दुर्गा आयपीएस ऑफिसर झाली होती. 

 --------

          एक व्हाइट स्कॉर्पिओ आणि त्यामगे पोलिसांची एक गाडी आर्याच्या बंगल्याच्या मेन गेट समोर येऊन उभ्या राहिल्या . दोन गार्डने मोठ्या अदबीने ते मोठं गेट उघडले. तश्या त्या दोन गाड्या गेट मधून आतमध्ये जाऊ लागल्या. गाड्या आतमध्ये येत होत्या, दुतर्फा काळया कपड्यातील धष्टपुष्ट गार्ड्स उभे होते. गाडी आतमध्ये येऊन अगदी त्याचा समोर येऊन थांबली . त्याची नजर समोर गाडीत असलेल्या व्यक्तीवर होती . तो अगदी साधाच क्याजुअल व्हाईट कॉटन शर्ट बाह्या वर पर्यंत फोल्ड केलेल्या , ट्राउजर , केस अगदी आर्मी कट, साईडने आणि मागून बारीक , आणि साईडने केलेला भांग पण थोडे मोठे केस , पायात शूज , दोन्ही हात पँटच्या खिशात घातले होते. तो घराच्या पोर्च च्या थोडा पुढे येऊन उभा होता. त्याचा चेहऱ्यावर तोच आत्मविश्वास, त्याच्या कांतीवान चेहऱ्यावरील तेज आणखीच वाढलेलं दिसत होते . 

  समोर थांबलेल्या गाडी मधून खाकी वर्दी मधली ऑफिसर बाहेर येऊन उभी राहिली. ऑलिव्ह ग्रीन शेड चा टी पोलीस युनिफॉर्म मधून व्यक्तिमत्वाची पडणारी ती छाप , भारदस्तपणा , डोक्यावरील कॅप मधून झळकणारा आत्मविश्वास , डोळ्यांवरील त्या काळ्या गॉगल मधून चिरत जाणारी ती धारदार नजर , ओठांवरील स्वाभिमानी स्मायल , अंगात सळसळणारे देशप्रेम , निशब्द करून जात होते . खऱ्या सौंदर्याची एक वेगळी आणि खरी परिभाषा सांगत होते. त्याची नजर तिचे सौंदर्य टिपण्यात मश्गूल झाली होती. त्याने तिच्यासाठी बघितलेले त्याचे स्वप्न आज पूर्ण झाले होते . 

त्याची वाघीण , त्याची दुर्गा त्याच्या डोळ्यांपुढे उभी होती. वाघिणी चे असे ते घाळ्याय करणारे सौंदर्य होते. तिला बघून त्याचा डोळ्यात एक तृप्ततेची चमक होती. 

       पूर्ण बंगला खूप सुंदर पद्धतीने, दुर्गाला आवडतो तसाच सजवण्यात आला होता ,पण त्या दुर्गाची नजर मात्र समोर उभ्या असलेल्या तरुणावर होती. हो तो तरुण म्हणजे आपला आर्याच . आणि त्याला बघून तिच्या ओठांवर गोड स्मायल आली आणि डोळ्यात आनंदाश्रू . ती एक एक पाऊल पुढे टाकत त्याच्या पुढ्यात येऊन उभी ठाकली. तो मात्र तिलाच बघत होता , अगदी कौतुकाने तिची टोपी, तिचा युनिफॉर्म , तिचा कंबरेवरचा बेल्ट , तिच्या पायातले शूज , सगळं सगळं निरखून बघत होता , तिची नजर मात्र त्याचावर अडकली होती . तिला सगळीकडून बघून झाले आणि त्याची नजर तिच्या डोळ्यांकडे गेली तर ती त्याच्याकडे बघतेय त्याचा लक्षात आले . आणि त्याने तिला एक कडक स्यालुट ठोकला. आतापर्यंत डोळ्यात अडवून ठेवललेले अश्रू त्याच्या अश्या वागण्याने तिच्या गालांवर ओघळू लागले. 

" काय झालं ?", आर्या ने डोळ्यांनीच खुणावत तिला विचारले . 

" काही नाही !", दुर्गाने नकारार्थी मान हलवत उत्तर दिले. 

     आर्याला आपल्या समोर, इतक्या जवळ बघून त्याचा मिठीत कधी जाते असे तिचे झाले होते . पण तिथे इतके गार्ड्स होते , त्यामुळे ती जागीच बांधली गेली होती , त्याला तिच्या भावना कळत होत्या . आणि त्याला सुद्धा तर त्याची दुर्गा , आपल्या मिठीत घ्यायची होती. त्याने एक इशारा केला तसे क्षणाचाही विलंब न करता सगळे गार्ड्स , तिथे उपस्थित सगळे लोकं मागे फिरले .  

  " कडक !", आर्याने तिला बघून हातानेच सुंदर दिसतेय खुणावले आणि एक डोळा मारला. आता पूर्णपणे खट्याळ भाव त्याच्या चेहऱ्यावर जमा झाले होते . आतापर्यंत त्याला बघून भाऊक झालेली ती , त्याच्या अशा वागण्याने तिला खुदकन हसू आले . डोळ्यात अश्रू आणि ओठांवर हसू अशी अवस्था झाली होती तिची . आर्याने आपले दोन्ही हात तिला मिठीत घेण्यासाठी तिच्या पुढे पसरले . दुर्गाने आजूबाजूला बघितले तर सगळ्यांची तोंड विरुद्ध दिशेने होते. आणि आनंदाने दुर्गा आर्याच्या मिठीत शिरली . तिने त्याला अगदी घट्ट पकडून घेतले होते. त्याचा मिठीत आता ती एक पोलिस ऑफिसर आहे हे सुद्धा विसरली होती , दोन तीन वर्षाचा विरह होता , आणि तिला त्याचा मिठीत रडू कोसळले. त्याने सुद्धा एखाद्या लहान बाळाला मिठीत घ्यावे तसे तिला घेतले होते आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत होता . दुर्गाचे तिच्या देशावर खूप प्रेम होते , पण आर्या तिचा जीव की प्राण होता , तिच्या आयुष्यात सर्वात पहिले आणि सगळ्यात मोठं स्थान आर्याच होता. आर्या साठी ती काहीपण करू शकत होती , तिचं पहिलं प्रेम आर्याच होता.   

" दुर्गी sss …!", घरातून एक आवाज आला . 

तो आवाज ऐकून दुर्गाने चमकून आर्याकडे बघितले.  

         आर्याने तिच्या कपाळावर छोटंसं किस करत, तिला दाराकडे बघ असा डोळ्यांनीच इशारा करत तो तिच्या दूर झाला.  

" माय !", दुर्गाने वळुन दारकडे बघितले तर दुर्गाची आई दारात आरतीचे ताट घेऊन हसत मुखाने दुर्गा कडे बघत उभी होती. आपल्या आईला बघून दुर्गाचा तर आनंद गगनात मावेना झाला होता . ती पळतच आईकडे गेली आणि घरात जाणार तोच आईने तिला अडवले. 

" अगं थांब थांब , एवढी मोठी पोलीस बनली , आधी नजर तर उतारू दे , आरती तर करू दे !", म्हणत आईने तिला दारातच थांबवले. आर्या पण दुर्गाच्यागे तिथे आला आणि तिच्या बाजूला येऊन उभा राहिला. 

" माय , लवकर कर काय करायचं ते , कधी तुझ्या कुशीत येते असं झालंय बघ !", दुर्गा जवळजवळ लहान मुलासारखी उड्या मारतच म्हणाली. 

" दुर्गे , सरळ उभी राय आधी , एवढी मोठी झाली तरी लहाण्या पोरावानी करत्ये हायीस ? आधी तर नौती करत अशी ? ", आई कधी दुर्गा कधी आर्या यांच्याकडे आळीपाळीने बघत बोलली. 

" बरोबर , मला यांनीच लाडावून ठेवले आहे !", दुर्गा आर्याकडे बघत एक डोळा मारत बोलली . आर्या तर शॉक झाला , दुर्गा तिच्या आईपुढे अशी काही वागेल , त्याला अपेक्षाच नव्हती. 

" डांबरट !सायाबंना असं बोलतात व्हय ? ", दुर्गाची आई तिच्या हातावर मारत तिला डटावत म्हणाली.  

" तुझ्या नंतर त्यांनीच तर माझं आयुष्य घडवले आहे . ", दुर्गा आपला हात चोळत बोलली. 

" दगडावानी झाले आहे अंग , तू काय चोळत हाइस , म्हायाच हाताला लागलं ", आई 

" बरोबर , माहिती नाही माझं कसं व्हायचं !", आर्या एकदम हळू आवाजात दुर्गा जवळ येत बोलला. त्याचे ते बोलणे ऐकून दुर्गा डोळे मोठे करत त्याचाकडे बघत होती. तो गालातच हसला आणि पलीकडे बघू लागला. 

" माय , आता सगळं इथेच बोलणार काय ? काय ते करायचं लवकर कर !", दुर्गा 

" व्हय व्हय ! ", आई , त्या दोघांची सुरू असलेलं लुटूपुटू बोलणं बघून आईने पटकन तिचे औक्षवान केले आणि दारातून बाजूला होत थोडी पलीकडे झाली. 

" वेलकम ऑफिसर "......आर्याने घरात जायला तिचे स्वागत करत तिला शेकह्यांड करायला हात पुढे केला. दुर्गाला काही आठवले आणि ती पुढे बोलली. 

" हॅलो , मिस्टर आर्यवीर चव्हाण , तिने त्याचा हातात हात दिला आणि जोरात दाबला. 

" तुम्हाला काय वाटते , मला कळणार नाही तुम्ही कोण आहात? खूप मोठी चूक केली तुम्ही मला या क्षेत्रात आणून , तुम्ही तुमच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली , आता मात्र मी तुम्हाला सोडणार नाही, तुमची पूर्ण जन्मकुंडली माझ्याकडे आहे . "......दुर्गा म्हणाली. 

       अचानक दुर्गा अशी का बोलते आहे ? गुप्तता तर पाळली होती , माझ्या बद्दल हिला काय माहिती झाले ? आर्या प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत होता. 

 " सल्यूट तर मी तुम्हाला करायला पाहिजे , ऑफिसर !", दुर्गा 

          परत तो तिच्याकडे तसच प्रश्नार्थक नजरेने बघत होता. 

" मला माहिती आहे तुम्ही एक बिजनेसमन नाही , तुम्ही आर्मी ऑफिसर आहात . " , दुर्गा 

" हुश !", त्याने सुटकेचा सुस्कारा सोडला. 

" Thank God , दुर्गा काही माहिती नाही !", तो तिच्याकडे बघत मनातच बोलला. 

" हा हा हा , घाबरले होते ना ?", दुर्गा हसायला लागली.

" मिसेस आर्या , गृहप्रवेश करताय ना ?", आर्या विषय बदलत बोलला. 

" मिसेस आर्या ? हे कधी झाले ?", दुर्गा 

" जेव्हा तुला पहिल्यांदा बघितले होते , तेव्हाच !", तो हळूच प्रेमाने म्हणाला. 

" पागल झालात तुम्ही !" , दुर्गा  

" Yess ! For you baby !", आर्या जरा रोमँटिक नजरेने बघत तिच्या जवळ येत बोलला. 

" मग आणखी पागल व्हायची तयारी करा , उद्या तुमच्यासाठी एक सरप्राइज आहे. ", दुर्गा त्याच्याच अंदाजात त्याचा कपळापासून गालावरून आपल्या हातचे एक बोट फिरवत म्हणाली. 

" निर्लज्ज !" , आर्या हसतच म्हणाला. 

" You know , निर्लज्जम सदा सुखी ! संगत का असर है ऑफिसर ", दुर्गा त्याचाकडे बघून किस करायची अक्टिंग करत म्हणाली. 

" इथे सगळे आहेत , आत ये , तुला बघतो !", आर्या 

" Yeah sure sweetheart ! ", दुर्गा 

तिचं तसे वागणे बघून त्याला खूप हसू येत होतं . 

" सरप्राइज काय आहे ?", आर्या 

" Baby , it's a surprise ! ते उद्याच कळेल ", दुर्गा जरा अकडूपणा दाखवत म्हणाली. 

" खडूस !", आर्या 

" I like it !", दुर्गा 

" आगाऊ !", आर्या

" Thank you ! " , दुर्गा 

" घरात येताय ना ?", आईने आवाज दिला. 

" आ हो ! या मिस्टर आर्या , आपल्या घरी आपलं स्वागत आहे !", दुर्गाने आर्याचा हात आपल्या हातात पकडला आणि त्याचा हात धरून घरात पाय ठेवला. आर्याला दुर्गाच्या आल्याने घरात घरपण, जिवंतपणा जाणवू लागला होता.