दुर्गा 27
भाग 27
आधीच्या भागात : दुर्गा ऑफिसर बनून घरी परत येते. दुर्गाची आई आणि आर्या तिचे सुंदर पद्धतीने स्वागत करतात . जेवण वगैरे आटोपल्यावर दुर्गाची आई परत आपल्या गावी जायचं म्हणते , त्यावर दुरा तिच्या लग्नाचा विषय काढते आणि तिच्या आणि आर्याच्या लग्नासाठी आईकडून परवानगी मिळवते . आणि हीच आनंदाची बातमी द्यायला ती वरती आर्याच्या रूम मध्ये जाते .
आता पुढे :
" बरं , मी मालकाला सांगून येते , माय आपल्या लग्नास तयार हाये म्हणून , आणि मग आपण तिकडे आजीकडे जाऊ !", दुर्गा बोलतच वरती आर्याच्या रूम कडे पळाली.
" ही तर माझी माय गाय होती, लग्नासाठी कशीही पटलीच असती , ते तिकडे इंग्लिश गाय बसली आहे , त्यांचं काय करू !", दुर्गा स्वतःशीच बोलत आर्याच्या रूम मध्ये दार उघडून जाणार तोच बोलायचा आवाज ऐकून ती तिथेच थबकली.
" दुर्गा ,bad maaners ! असे रूम मध्ये एकदम घुसने बरे नाही , तर काय झालं आता ही रूम तुझीच होणार आहे ! तुला माहिती आता आर्या ऑफिसर आहे ते , काही महत्वाचं , ऑफिशियल बोलत असतील . आता प्रायव्हसी चे माप दंड तुला पाळायला हवे . तू स्वतः आता पोलीस आहेस , तुला सुद्धा आता जबाबदारीने वागायला हवे !" , दुर्गा स्वत:शीच विचार दाराजवळ थांबली आणि दाराला नॉक केले. आर्या खिडकी जवळ उभा फोनवर बोलत होता . त्याचे लक्ष दुर्गाकडे गेले .
" नंतर बोलतो ", म्हणून त्याने फोन कट केला आणि दुर्गाला आतमध्ये ये म्हणून इशारा केला. दुर्गा पळतच जात त्याचा कुशीत शिरली,ती थोडी भाऊक झाली होती .
" बापरे किती वेळ लावला यायला , आता बरं वाटते आहे , माझी दुर्गा माझ्या जवळ ,माझ्या मिठीत !", आर्या
" मघाशी खाली आल्या आल्या आलीच होती की कुशीत !" , दुर्गा
" किती भार वाटत होता तेव्हा !", आर्या तिची मस्करी करत बोलला.
" म्हणजे काय …? हा काय …? काय म्हणायचं आहे तुम्हाला ? मी आता तुम्हाला जाडी वाटते , भारी वाटते काय हा ?", दुर्गा त्याला मारत बोलली.
तिला चिडतांना बघून आर्याला आणखी हसू येत होते .
" Baby , I said भार not भारी !", आर्या
" अच्छा जी , तर आता तुम्ही मला मराठी शब्दांचे अर्थ शिकवणार तर !", दुर्गा
" No darling , माझी काय हिम्मत बाबा तुझ्यापुढे काही समजवायची !", आर्या
" शब्द नका फिरवू आता , ते एकूण एकच होते ! दुर्गा म्हणत्यात मला , दुर्गाचा नाद नाय करायचा ! " , दुर्गा
" ते मला माहिती आहे , पण राणी सरकार , तुमचा नाद नाही करायचा तर मग कोणाचा करायचा? नाही म्हणजे ऑप्शन्स असतील तर सांगा , मला चालेल …. नाही नाही धावेल !", आर्या परत तिला चिडवू लागला.
" तुमच्या ना अंगात फारच मस्ती आली आहे !" दुर्गा चिडत , रुसल्यासारखं नाटक करत तिने पलीकडे मान फिरवली.
" भार म्हणजे , मघाशी तू युनिफॉर्म मध्ये होती , माझी कुठे , देशाची होती , त्यात एवढी दणकट , भारदस्त दिसत होती , आम्हा सामान्य लोकांना भीती वाटणारच ना? आता कशी तू माझी दुर्गा आहेस , फक्त माझी गोड गोड दुर्गा , आता कसं हलकं वाटतेय !", आर्या तिला परत आपल्या मिठीत ओढत तिच्या डोक्यावर किस करत म्हणाला.
" इश्श !", दुर्गाने लाजतच स्वतःचा चेहरा त्याच्या शर्टात लपवून घेतला.
" काय …. काय ….काय म्हणाली ? इश्श ? चक्क दुर्गा राणी लाजल्या ! हे रूप तर कधीच बघितले नव्हते ! असं वाटतेय आता इथेच सरेंडर व्हावं ! ", आर्या
" असं वगैरे काही नाही , ते तिकडे फ्रेंड्स होत्या , त्यातील कोणाची लग्न झाली होती , तर कोणाचे बॉयफ्रेंड होते . त्यांच्यासोबत त्या फोनवर चक्क लाजत बोलायच्या , त्यांचे हावभाव बघून मला खूपच मजा वाटायची . म्हटलं आपण आपलं थोडं ट्राय मारून बघावं . बाकी आपल्याला काय ते छुईमुई काय जमत नाही !", दुर्गा
" हा हा हा हा ! जे जमतं ते कर , मला तुझं सगळंच आवडते!", आर्या
दुर्गा खरंच गोड दिसत होती . तिने सिंपल लाईट कलरचा पटीयाला घातला होता , मोकळे केस , स्वच्छ पाण्याने धुतलेला चेहरा एकदम फ्रेश दिसत होता .
" पण हे काय , तुम्ही नेहमी मस्तीच करत असता ? मला सतावत असता .", दुर्गा
" आपण खूप भाग्यशाली आहोत की आपल्याला हा क्षण , आजचा दिवस जगायला मिळतो आहे , तर तो असा हसतच घालवायला हवा ना ? किसे पता कल हो ना हो ! जेव्हा मिळालं तेव्हा मनसोक्त जगून घ्यावं , हसून घ्यावं. आणि तसे पण मला रडत बसणं अजिबात आवडत नाही . ", आर्या
" काही काय बोलत आहात ? कल हो ना हो म्हणे !" , दुर्गा
" Baby , आपलं प्रोफेशनच तसे आहे , कुठल्या क्षणाला काय होईल काहीच सांगता येत नाही . हे तर ॲक्सेप्ट करणार ना ?", आर्या
" यार आर्या , तुम्ही फार बोर करत आहात !" , दुर्गा
" दुर्लक्ष केले म्हणजे रिॲलिटी चेंज नाही होत दुर्गा . सत्याचा स्वीकार केला की त्रास होत नाही आणि पुढे निर्णय घेणे सुद्धा कठीण होत नाही !", आर्या
" माझे संत आत्मा परमात्मा , महा ज्ञानी बाबा , तुम्हाला साष्टांग दंडवत प्रणाम !", दुर्गा त्याच्या पुढे अगदी लोटांगण घालत बोलली. ते बघून आर्याला खूप हसू येत होते. त्याचे दोन्ही हात त्याचा कंबरेवर होते आणि तो अक्षरशः लहान मुलासारखा हसत होता . दुर्गा सुद्धा त्याचा हसरा चेहरा आपल्या डोळ्यात सामावुन घेत होती, कारण तो जे आता बोलला होता , ते खरंच तर होते , आपली पोलीस यंत्रणा, आपले सिपाही , प्रत्येक क्षण जीव मुठीत घेऊन निर्धास्तपणे आपल्या शत्रुंसोबत लढत असतो.
" काय बघते आहे ?", आर्या तिला स्वतःकडे एकटक बघतांना बघून बोलला.
" माझा सुद्धा गोड गोड आर्या बघतेय !", दुर्गा
" Ohh really , चला मग गोड काहीतरी होऊन जाऊ द्या !", आर्या तिच्या जवळ जवळ येत बोलत होता.
" आई आणि मी आजी कडे जातोय !', दुर्गा
" No , you are not going anywhere !", आर्या
" घरी जातेय!", दुर्गा
" हे तुझंच घर आहे !", आर्या
" लग्न झाल्यावर !", दुर्गा
" तू घरावर नाव वाचले नाही बहुतेक , it's ' दुर्गा ' , सो आता हे घर फक्त तुझं आहे ", आर्या
दुर्गाने येतानाच घरावर कोरलेले नाव वाचले होते , आणि तसे नसते तरी तिला माहिती होते हे घर तिचेच आहे.
" आता काहीच फरक पडत नाही लग्न झाले आहे की नाही , आपण ऑलरेडी एक आहोत ! मी तुला कुठेही जाऊ देणार नाही !', आर्या
" मला पण काही फरक पडत नाही आर्या लग्न झाले आहे की नाही , कारण मी सुद्धा फक्त तुमची आहे . पण आपला समाज, आपली फॅमिलीला तर आहे ना लग्नाचे महत्व , समाजापुढे चुकीचे उदाहरण नको ठेवायला ! तर लग्न होऊ द्या , या घराचाच काय तुमचा पण पूर्ण ताबा घेते की नाही बघा ", दुर्गा
" माझा ताबा तू आता सुद्धा घेऊ शकतेस , माझ्यासाठी तर तू , दुर्गा आर्यविर आहेस , ओर मला vice versa आर्यविर दुर्गा पण चालेल !", म्हणतच आर्या तिच्या खूप जवळ गेला .
" बदमाशी नाही हा !", दुर्गाने त्याचा छातीवर जोर देत त्याला मागे ढकलले आणि तिथून पळ काढला.
" This is not fare yar ! ", आर्या
" Everything is fare in love and war !", दुर्गा
" अबे ओ मॅडम , भलतीच लाईन भलतीकडे मारता आहात ! ", आर्या हसत म्हणाला.
" का love नाही आहे ?", दुर्गा
" आहे !", आर्या
" आणि आताच तुम्ही म्हणालात , जिंदगी हर कदम जंग हैं !", दुर्गा
" मेरी किस्मत ! आता कधी होणार लग्न ! ", आर्याने तिचं बोलणं ऐकून डोक्यावर हात मारला. त्याचा चेहरा अगदी लहानसा झाला होता.
" अरे हो !", म्हणतच दुर्गा परत त्याचा जवळ आली.
" माझ्या मायने आपल्या लग्नासाठी होकार दिला आहे. तिला जावाईबापू खूप आवडले !", म्हणतच तिने त्याला कळायच्या आत त्याच्या एका गालावर छोटासा किस केला आणि तिथून पळाली.
" आम्ही आजीकडे जातोय !", दुर्गा
" Wait ! मी पण येतोय !" ,आर्या तिच्या मागे मागे गेला.
आर्यांच्या गाडीतून आर्या, दुर्गा आणि दुर्गाची आई आजीकडे चाळीत यायला निघाले.
******
गाडी चाळीच्या मुख्य दाराच्या आलिकडेच येऊन थांबली. दुर्गा तर समोरचे दृश्य बघून अचंभित झाली होती. चाळ अगदी नव्या नवरी प्रमाणे नटली होती. कोणाच्या लग्नात , किंवा कोणत्या सणावरांना सुद्धा चाळ इतकी सजली नव्हती जेवढी आज दिसत होती. . आजी आणि चाळीतील इतर बायका नटून थटून , अगदी जरीच्या त्यांच्या जवळ असलेल्या सगळ्यात महागीच्या साड्या नेसल्या होत्या , दागिने , केसांना गजरे , आणि चेहऱ्यावर भली मोठी स्मायील , हातात आरतीचे ताट घेऊन उभ्या होत्या. त्यांना बघून खूप मोठा समारंभ आहे असे भासत होते . लहान मुलांनी आजूबाजूला मोठा गलका केला होता. पुरुष मंडळी सुद्धा अगदी अदबीने उभी होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर तिच्या बद्दल अभिमान दिसत होता , ती आपली आहे याचा गर्व दिसत होता. ते दृश्य दुर्गाच्या डोळ्यात पाणी देऊन गेले. सगळ्यांचं भरभरून प्रेम तिला मिळाले होते. थोड्या वेळासाठी का होईना तिला तिच्याच भाग्याचा हेवा वाटला.
ती आजी पुढे येऊन उभी राहिली. तिच्या पाठीमागे तिची आई आणि आर्या सुद्धा येऊन उभे राहिलेत . आजीने मायेने दुर्गाच्या चेहाऱ्यावरून हात फिरवला ( आजीच्या सख्ख्या पोराने साथ सोडली होती , पण ही परकी कधी सख्खी होऊन गेली ते कळले सुद्धा नाही . न विसरता ती आपल्या घरी आली होती , ये बघूनच आजीचे डोळे सुद्धा पाणावले होते ) , सगळ्या बायकांनी कुंकू अक्षद लावून ताट ओवाळले . दुर्गाने सगळ्यांना वाकून नमस्कार केला. लहान मुलं , आणि बाकी उपस्थिती सगळ्यांनी त्यांना जमेल तसा तोडका मोडला सल्यूट मारला. तिथल्या बुढ्या बायका तर तिचे गालगुच्चे घेत होत्या, तिला सोडत नव्हत्या. लहान मुलं, तरुण मुलं मुली ताई ताई करत तिच्या भोवती गोंगाट घालत होते. चाळीत सगळ्यांसाठी तिने एक आदर्श निर्माण केला होता , सगळ्यांसाठी प्रेरणास्थान बनली होती. हे सगळं कौतुक बघून दुर्गाच्या आईचे तर डोळे दिपून गेले होते. आणि मनोमन देवाचे आभार मानत होती.
सगळ्यांनी दुर्गा भोवती इतका मोठा घोळका केला की त्या घोळक्यातच ती चाळी च्या आतमध्ये कधी आली तिचेच तिला कळले नाही. आतमध्ये तिच्या नेहमीच्या मुलांचा बँड दिसला , ती मुलं आपली ढोल , पुंगी वगैरे घेऊन उभी होती , दुर्गाला बघून ती मुलं वाजवायला लागली, आणि सगळे नाचायला लागले. दुर्गा त्यांच्यात सामील होणार तेवढयात आर्याने तिला नको म्हणून सांगितले. ते बघून वाजणारा बँड बंद झाला , आणि सगळं शांत झाले.
" आता तू टपोरी नाही आहेस , एक जिम्मेदार पोलीस ऑफिसर आहेस . प्रत्येक पाऊल जबाबदारीने उचलावे लागेल.", आर्या
" स्वतः खुश राहू , तेव्हा तर दुसऱ्याला खुश ठेऊ शकू , काळजी घेऊ शकू ! माझं पर्सनल पण आयुष्य असणार आहे मिस्टर आर्या ! आणि यांचा उत्साह मी कमी नाही करू शकत ! मी तर म्हणते तुम्ही सुद्धा जॉईन व्हा ", दुर्गा
" ये वाजवा रे !", दुर्गा ओरडली.
" रात दस के अंदर , and right now I am not on duty ! ये बजाओ रे बजाओ , नागीण डान्स भी करेंगे !", दुर्गा ओरडली
" वैसे तो पोलीस को हर वक्त चौकन्ना रहणा होता है , पण हम कोई रुल भी नहीं तोड रहे हैं ", आर्या च्या कानात येऊन ती बोलली आणि नाचत आपल्या चाळीतल्या लोकांमध्ये मिक्स झाली. चाळीच्या वरच्या घरातून फुलांचा वर्षाव होत होता , आणि त्या प्रेमाच्या वर्षावात ती धमाल नाचत होती .
" Oh God ! I love her !! तिच्या चेहऱ्यावरचा हा आनंद नेहमी असाच असू दे ! " , आर्या तिला बघत उभा होता .
*********
" Come fast , it's emergency !", आर्याला फोन आला.
" Coming !", आर्या फोन वर बोलत बोलतच त्याचा गाडीत जाऊन बसला आणि त्याने वेगाने गाडी पळविली.
*******
क्रमशः