प्रिया माहेरी होती, तेव्हा नेहा कामात चालढकल करत होती. सासुदेखील जमेल त्या कामात मदत करायची,पण तरीही नाश्ता,जेवण उशिराच होत होते.
प्रिया आता स्वतःच्या बाळाकडे लक्ष देऊ लागली होती, ते तिला गरजेचं वाटत होतं.
प्रिया जेव्हा आली तेव्हा नेहाला वाटलं आता प्रिया आधीसारखी सरसकट कामं करेल; पण तसं न होता तिने नेहाला सांगितले
"ताई, आपण कामं वाटून घेऊया, म्हणजे तुम्हालाही कामाचा ताण होणार नाही आणि मलाही.
प्रिया जेव्हा आली तेव्हा नेहाला वाटलं आता प्रिया आधीसारखी सरसकट कामं करेल; पण तसं न होता तिने नेहाला सांगितले
"ताई, आपण कामं वाटून घेऊया, म्हणजे तुम्हालाही कामाचा ताण होणार नाही आणि मलाही.
नेहा तर चांगली स्वप्न सजवू लागली होती, प्रिया आली की, तिच्या जीवावर मस्त आराम करायचा. झालं भलतंच.
एक दिवस प्रिया बाळाला घेऊन डॉक्टरकडे गेली होती.
घरात कोणीही नव्हते.
सासरा देखील कामानिमित्त बाहेर गेला होता.
सासू होती.
सासरा देखील कामानिमित्त बाहेर गेला होता.
सासू होती.
नेहाने विषय काढला,"आई, तुम्हाला प्रियाचे वागणं पटतंय का?"
"कशा बद्दल बोलते आहेस?" सासू.
"बघितलं का? आल्यावर कशी कामाची विभागणी केली तिने? एक नंबरची आळशी आहे. मुलाचा बहाणा करून कामं टाळते आहे. आई तुम्ही तिला खडसावून बोला. जी पडेल ती कामं करायची. हे असं चालणार नाही. माझं लग्न झाल्यापासून सगळं मी करतेच आहे. तुम्ही असतांना हे काय नियम. आई तुम्ही तिच्याशी बोलाच. सासू आहात तुम्ही. ती सून आहे. ती काय मोठी लागून गेली का? तिची हिम्मत कशी झाली तुम्ही असतांना हा निर्णय घ्यायची. अंतिम निर्णय तुमचाच पाहिजे घरात."
सासूला भडकवण्याच्या उद्देशाने ती बोलत होती.
सासूला भडकवण्याच्या उद्देशाने ती बोलत होती.
सासू तिला पुरती ओळखून होती.
तिचा काय डाव होता, हे आधीच कळलं होतं.
शेजारच्या बायकांकडे नेहमी सासूची,प्रियाची बदनामी करत राहायची. हे तिच्या कानावर आलं होतं आणि आता साजूक बनत होती. नेहाला माहीत नव्हतं की, सासूने तिला पुरेपूर ओळखलं आहे. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे होते. प्रियाविषयी तिच्या मनात खूप मत्सर होता,तिच्या बोलण्यातून सहज दिसायचे. प्रिया सर्वच बाजूने सरस होती. स्वभावाला औषध नसतेच. नेहाचा स्वभाव बदलणार नव्हता.
"नेहा, मला माहित आहे तू आल्यापासून राबते आहेस. जी कामं आहेत मनापासून केली;पण तुलाही आरामाची गरज आहे. जाऊ दे कामं वाटून घ्या. सगळा बोजा तुझ्या एकटीवर नको. जे चाललंय ते चालू दे. तू एकटी किती कामं करणार? तुलाही आरामाची गरज आहेच. मुलीकडे लक्ष द्यावं लागतं. कामं वाटून घेतली, तर तुलाही वेळ मिळेल. "
नेहाच्या अपेक्षेवर पाणी फिरले होते.
तिला सासुचा प्रचंड राग आला. सासुशी बोलून काहीच उपयोग झाला नाही. वाटलं होतं सासू काहीतरी करेल; पण नाही.
'ह्यांना तर काहीच सांगून फायदा नाही. उलट तिचं म्हणणं बरोबर वाटतंय.'
आता डोक्यात दुसरा प्लान सुरू झाला; कारण
तिला काहीही करून जबाबदारी नकोच होती; पण स्वतःची इमेज देखील जपायची होती.
तिला काहीही करून जबाबदारी नकोच होती; पण स्वतःची इमेज देखील जपायची होती.
दोघींनीही कामं वाटून घेतली होती.
प्रिया स्वतःची कामं पटपट करून बाजूला होत होती. नेहाला मात्र ते भारी पडत होतं. आता काहीही झालं तरी पळवाट नव्हती.
प्रिया स्वतःची कामं पटपट करून बाजूला होत होती. नेहाला मात्र ते भारी पडत होतं. आता काहीही झालं तरी पळवाट नव्हती.
तिच्या मनात द्वेष वाढू लागला होता;पण बोलतांना मात्र हसून बोलायची.
प्रिया स्वतःचे मातृत्वाचे क्षण वेचत होती. ती खुश राहू लागली. स्वतःच्या विश्वात.
दिवसेंदिवस नेहाचा राग उफाळून येत होता. एक ना एक दिवस त्याचा स्फोट होणार हे प्रियाला चांगलंच माहीत होतं.
एक दिवस प्रिया सगळी कामं आवरून रुममध्ये चालली होती.
नेहाने तिला थांबवलं.
"प्रिया, ह्या पुढे असं कामाची विभागणी चालणार नाही. सगळी कामं झाल्याशिवाय तू रूममध्ये जायचं नाही."
"का पण? इतके दिवस आपण असंच करत आहोत ना?"
नेहाचा आवाज वाढला होता. ती चवताळली.
सासूदेखील तिथेच होती.
सासूदेखील तिथेच होती.
ती हे पाहत होती.
ती म्हणाली, "नेहा, जे चाललंय ते चालू दे."
आता नेहाचा पारा चढला.
"तुम्हाला काय होतंय हे बोलायला. मला कामाची सवय नाही. माझ्याने कामं होत नाही."
ती फार उद्धटपणे बोलत होती.
"नेहा, तोंड सांभाळून बोल. मी तुझी सासू आहे ह्याचे भान ठेव."
नेहाच्या मनातलं आज आहे तसेच बाहेर पडत होतं.
तितक्यात योगेश आणि प्रशांत आला. सासरा देखील रूममधून बाहेर आला.
घरातून कधी नव्हे ते भांडणाचा आवाज येत होता. ते दोघेही दारात उभे होऊन ऐकत होते.
घरातून कधी नव्हे ते भांडणाचा आवाज येत होता. ते दोघेही दारात उभे होऊन ऐकत होते.
"मी मोलकरीण नाही." नेहा त्वेषाने म्हणाली.
"मग प्रिया मोलकरीण होती का? जेव्हापासून ती आली आहे तू तिच्या जीवावर आराम करत बसली आणि तिने कामाची विभागणी केली तसा तुला त्रास झाला. तिचा काय जीव नाही का? तिचंही बाळ आहे, तिची जबाबदारी वाढली आहे. तिने एकटीनेच कुठंवर राबायचे? असंही मी देखील बसून राहत नाही, कामाला हातभार लावते."
प्रियाच्या डोळ्यात पाणी होते. सासू तिच्या मनातलं बोलत होती.
"आई, मला काही माहीत नाही. प्रिया जशी आधी कामं करत होती तिने करावी. मी राबत बसणार नाही. बस हे ठरलं आहे."
नेहाचं असं बोलणं योगेश आणि प्रशांतने पहिल्यांदा ऐकलं होतं. योगेशला तर विश्वासच बसत नव्हता की, नेहा अशी बोलते आहे.
प्रशांत घरात आला.
"नेहा, ही बोलायची पद्धत आहे का आईशी? काय लावलं आहेस तू?"
प्रशांत आणि योगेशला बघून ती एकदम दचकली. तिचा खरा चेहरा आज समोर आला होता.
प्रशांत आणि योगेशला बघून ती एकदम दचकली. तिचा खरा चेहरा आज समोर आला होता.
"मी काहीच चुकीचं बोलले नाही." हळू आवाजात ती म्हणाली.
"नेहा, सगळं ऐकलं आहे मी. आता तू एक शब्द बोलू नको."
"आई, नेहाच्या वतीने मी माफी मागतो." प्रशांत.
"आई- बाबा अशीही माझी ट्रान्सफर झाली आहे. हे मी संगणारच होतो. माझी खरंच ईच्छा नव्हती; पण हे सगळं पाहून असं वाटतंय दूर राहिलेलं चांगलं. असो पुढच्या महिन्यात मी दुसरीकडे शिफ्ट होतो आहे."
हे ऐकून नेहाचे डोळे चमकले.
सर्वांना वाईट वाटले.
"कुटूंबात होणारे कलह विकोपास जातात तेव्हा असे निर्णय घ्यावेच लागतात.
जवळ राहून अंतर येण्यापेक्षा,दूर राहून गोडी गुलाबीने राहीलेलं कधीही चांगलं." प्रशांत भावुक होऊन बोलत होता.
जवळ राहून अंतर येण्यापेक्षा,दूर राहून गोडी गुलाबीने राहीलेलं कधीही चांगलं." प्रशांत भावुक होऊन बोलत होता.
"बरोबर बोलतो आहेस प्रशांत." बाबा त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाले.
"नेहा, त्यादिवशी तू माझ्याशी येऊन बोलली होती, तेव्हाच मी बाजूला काम करणाऱ्या कमल मावशीसोबत बोलले होते. फरशी,भांडीसाठी मी त्यांना विचारले होते. त्या उद्यापासून येणार होत्या; पण तू आज जे वागली ते फार विचित्र वागली." सासू.
सासू, प्रशांतकडे पाहत म्हणाली, "प्रशांत, तू जो निर्णय घेतला तो योग्य आहे. आई- बाबा म्हणून मुलं वेगळी राहणार ह्याचा त्रास आम्हाला होणार; पण त्यापेक्षाही जास्त त्रास एकत्र राहून कुटूंबात सतत कलह वाद होतील ह्याचा होणार. तुम्ही जा सुखाने राहा." पदराने डोळे पुसत ती म्हणाली.
"नेहा, आता एकच माफक अपेक्षा आहे कमीत कमी तू स्वतःचा संसार व्यवस्थित कर. तुझी, प्रशांत आणि मुलीची काळजी घे." असं म्हणत ती रुममध्ये निघून गेली.
नेहा निशब्द झाली होती.
जेही वागली त्याचा तिला खूप पश्चाताप झाला होता. तिचे शब्द तिला परत घेता येणार नव्हते.
प्रिया देखील सासूपाठी रुममध्ये गेली.
"आई, तुम्ही मला समजून घेतलं, त्यासाठी धन्यवाद,पण प्लिज तुम्ही रडू नका." तिचे डोळे पुसत प्रिया म्हणाली.
"प्रिया, तुला समजून घेतलं, कारण एकेकाळी मी देखील तुझ्या ठिकाणी होते. मी जे भोगलं ते तुझ्या वाटेला नको होतं. तुझी फरफट मला दिसत होती."
योगेश देखील आला.
तो देखील आईचे सांत्वन करू लागला.
तो देखील आईचे सांत्वन करू लागला.
"प्रशांत, सॉरी मी असं वागले त्यासाठी. मला वेगळं राहायचे नाही." नेहा.
"नेहा, माझा निर्णय मी बदलणार नाही. दुरून डोंगर साजरे दिसते." प्रशांत त्याच्या निर्णयावर ठाम होता. रात्र झाली.
"प्रिया, तुला मी समजून घेण्यात चूक केली. आज माझे डोळे उघडले. खरंच सॉरी." त्याचा भ्रम आज खऱ्या अर्थाने दूर झाला होता.
प्रियाचे अश्रू त्याला माफ केल्याची ग्वाही देत होते.
*************समाप्त***************
कथा लेखन - अश्विनी ओगले.
कथेचा वापर यूट्यूब किंवा कुठेही आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल.
*************समाप्त***************
कथा लेखन - अश्विनी ओगले.
कथेचा वापर यूट्यूब किंवा कुठेही आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल.