महानगरपालिकेचे कार्यालय... नेहमीप्रमाणेच लोकांची गर्दी, फाईल्सचा ढिगारा आणि टायपिंगचा तो विशिष्ट आवाज....
दुर्वा म्हणजे आपल्या कथेची हिरोईन
आज थोडी लवकरच ऑफिसला आली होती.... तिने नुकतीच या ऑफिसमध्ये 'वरिष्ठ लिपिक' म्हणून जॉईन केली होत... पांढऱ्या रंगाचा साधा अनारकली ड्रेस,त्यावर तशीच प्लेन गुलाबी कथांची ओढणी....चेहऱ्यावर एक संभ्रममिश्रित आत्मविश्वास ...खांद्याला अडकवलेली पर्स सांभाळत ती तिच्या डेस्क वर येऊन बसते ....
दुर्वा मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी..... वडील निवृत्त शिक्षक आणि आई गृहिणी. .... धाकटा भाऊ अजून शिकत होता.... आयुष्यातल्या काही वाईट अनुभवांमुळे ती जास्त कोणाशी ओळख करून घेण्यात इंटरेस्ट घेत न्हवती...ऑफिसमधील काम उरकून घरी पाळण्याची तिची नेहमीची सवय......घराची ओढ आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी दुर्वाच्या वागण्यातून स्पष्ट जाणवत असत... तिने आपल्या टेबलावरची धूळ झटकली आणि कामाला सुरुवात केली...
"मॅडम, साहेबांनी बोलावलंय," तिला येऊन थोडाच वेळ झालेला की शिपायाने येऊन निरोप दिला....
दुर्वा थोडी सावरून उभी राहिली ..... तिने ऐकलं होतं की तिचे सीनियर खूप शिस्तप्रिय आहेत..... कामात थोडी जरी चूक झाली तरी ते सहन करत नाहीत ..... तिने मनाशीच देवाचं नाव घेतलं आणि त्यांच्या केबिनच्या दिशेने जाते ....
केबिनच्या दरवाजावर 'अभय देशपांडे - विभाग प्रमुख' अशी पाटी होती ... दुर्वा एक दीर्घ श्वास घेते आणि हलकीशी स्माइल करत विचारते ....
"मी आत येऊ शकते का सर...?"
आत एक तीस पस्तीस च्या आसपास वयाची व्यक्ती गंभीरपणे फाईल्स तपासत होती.... चष्म्याच्या मागून तीक्ष्ण नजरेने त्यांनी तिच्याकडे बघितलं तशी तिच्या चेहऱ्यावरची स्माइल कुठच्या कुठे गायब झाली..... त्यांनी खुणेनेच तिला आत येण्याची परवानगी दिली....
ती आत जाऊन शांत उभी होती.... पुढचे दोन मिनिटं त्यांनी काहीच संवाद साधला नाही, फक्त फाईलवर काहीतरी लिहीत होता .....
"दुर्वा कुलकर्णी, बरोबर?" अभयने शेवटी मान वर केली.... आताशी तिने त्याचा चेहरा नीट पाहिला...एक क्षण ती त्याला बघतच राहिली.... सिंपल ॲटायर मधे पण तो एवढा हँडसम दिसत होता....त्याने परत एकदा प्रश्न विचारला तेव्हा तिला तिची चूक लक्षात आली...
" हो....हो सर," दुर्वाचा आवाज थोडा थरथरला....
"हे बघा दुर्वा, हे सरकारी ऑफिस आहे, पण मला इथे खाजगी कंपनीसारखं प्रोफेशनलिझम हवंय.... लोकांची कामं वेळेत झाली पाहिजेत..... तुमच्याकडे या महिन्यातील प्रलंबित अर्जांची यादी दिली जाईल.... मला उद्या संध्याकाळपर्यंत त्याचा रिपोर्ट हवा आहे," अभयचा आवाज शांत पण बॉसी होता... तिला हे काम किती महत्त्वाचं आहे याची जाणीव करून देत होता...
" येस सर...." दुर्वा म्हणाली.....
दुर्वाने त्यांच्याकडे पाहिलं..... अभयच्या डोळ्यांत एक प्रकारची शांतता कोरडेपणा होता..... त्यांच्या टेबलावर एक छोटासा फोटो होता, जो तिच्या बाजूने उलटा होता....
"येऊ मी सर....,"
ती त्याची परवानगी घेऊन केबिनमधून बाहेर पडली...
" अह... दुर्वा .....काय होत हे.. मी अशी काही बघत राहिले त्यांच्याकडे....माझी तब्बेत तर ठीक आहे ना...." ती डोळे मिटून स्वतःशीच बोलत कपाळावर हात लावून तिला ताप तर नाही ना चेक करते....
पण तिला त्या एका भेटीतच जाणवलं की अभय सर जितके कठोर दिसतात, तितके ते नक्कीच नसतील.....त्यांच्या आवाजात एक प्रकारची आर्तता होती....
ऑफिस सुटता सुटता पाऊस सुरू झाला होता..... दुर्वा ऑफिस बाहेर उभी होती... रस्ता क्रॉस करून बस स्टॉप होता ... पाऊस रिपरिप करत वेडावून बरसत होता ...त्याला कशाचीच फिकीर न्हवती जणू.....लोक रस्ता क्रॉस करून बस स्टॉप पर्यंत निवाऱ्याला पोहोचेपर्यंत चिंब भिजत होते....
दुर्वा जाव की नाही याचा विचार करत तिथेच उभी होती...कारण आता ती जिथे उभी होती तिथेही वाऱ्याच्या अनियंत्रित वाहण्याचे पावसाच्या सरी येऊन तिला भिजवून जातच होत्या.... अर्धी ती आधीच भिजली होती...पण व्हाईट ड्रेस घातला होता तिने ....भिजन्याची रिस्क घेऊ शकत न्हवती ती....
पण ऑटो वगैरे पण दिसत न्हवत्या आजुबाजूला...बस च लास्ट ऑप्शन होता ... ही बस चुकली तर खूप मोठ प्रॉब्लेम होईल ती अडकून पडेल...असा विचार करून ती बस स्टॉप पर्यंत जाण्याचा निर्णय घेते...तेवढ्यात एक पांढरी कार तिच्यासमोर येऊन थांबते ....अनोळखी कार बघून ती घाबरून थोडी पाठीमागे सरकते...काच खाली होते आणि आतून एक फिमिलियर आवाज ऐकू येतो......
" मिस कुलकर्णी....पाऊस खूप मोठा आहे...if you don't mind.... मी तुम्हाला सोडू शकतो घरापर्यंत....? " कार ची काच खाली करून अभयने तिला विचारलं.....
दुर्वा क्षणभर अडखळली. ऑफिसचा पहिलाच दिवस आणि बॉसची लिफ्ट..? त्यात तिचा ड्रेस ओला होता ...त्यांची चकचकीत कार खराब करू आपण असा विचार करून तिने नम्रपणे नकार दिला,
"नको सर, बस येईलच...मी जाईन बसणे..."
अभयने जास्त आग्रह केला नाही.... त्यांनी खांदे उडवत फक्त मान हलवली आणि कार पुढे काढली....
दुर्वा त्यांच्या कारकडे बघते... थोडा वेळ झाला तरी बस अजून आली न्हवती... तिचा ड्रेस अजूनच ओला झाला होता...तिला रिग्रेट होत होतं ..
" जायला पाहिजे होत का सरांबरोबर.....? पण त्या अकड्ड ने एकदा विचारलं आणि नाही म्हणाले की लगेच गेले पण....पण त्याचं तरी काय चुकलं मी पण नकार देण्याआधी विचार करायला हवा होता..." ती स्वतःशीच बोलत होती तेवढ्यात बस येताना तिला दिसते... तशी ती पर्स डोक्यावर धरून रस्ता क्रॉस करते...
पावसाने त्याच काम केलं होत....दुर्वाच्या आयुष्यात सध्या तिचं स्वावलंबी होण्याचं स्वप्न महत्वाचं होत पण तिला कुठे ठाऊक होतं की , याच ऑफिसच्या फाईल्समध्ये कुठेतरी तिच्या आयुष्याचा अध्याय लिहिली गेला होता...
क्रमशः...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा