दुसरी बाजू — भाग ४
स्पर्धा
जेव्हा नियंत्रणाला प्रश्न विचारला जातो, तेव्हा सत्य धोकादायक ठरतं.”
“पुरावे कपाटात सापडत नाहीत, ते माणसाच्या शांतपणामागे लपलेले असतात.”
“नाही,” स्वप्नाली म्हणाली. खोटं बोलणं तिला नवीन नव्हतं. पण आज खोटं तिच्या संरक्षणासाठी होतं—हे नवं होतं.
राहुल तिला काही क्षण पाहत राहिला. मग तो अचानक शांत झाला. “ठीक,” तो म्हणाला. “हवा घ्यायची असेल तर घे. मी येतोच.”
“नको,” स्वप्नालीने पटकन म्हटलं. “मी… मी एकटीच जाते.”
राहुलने हलकं हसून विचारलं, “एकटी?”
तो हसला, पण त्या हसण्याने तिला अजूनच अस्वस्थ केलं.

“मी तुझी काळजी घेतो. तुला का त्रास होतो?”
स्वप्नालीच्या मनात एक वाक्य ठसठसून वर आलं—काळजी ! ही काळजी म्हणजे कैद, हे त्याला कधीच कळणार नाही.
पण ती बोलली नाही. ती फक्त म्हणाली, “थोडं चालून येते. जवळच.”
राहुलने चावी उचलली. “चल मग. मी सोडतो.”
स्वप्नालीची छाती दडपली. तो माझ्या बरोबर आला तर?

कॅफेवर सात वाजता भेट… आणि राहुल सोबत असेल तर सगळं संपेल.
ती पटकन म्हणाली, “मी आधी शाल घेते.”
राहुलने मान डोलावली. तो दरवाज्याजवळ उभा राहिला.

ती आत गेली. शाल उचलली… आणि झटक्यात तिचा हात कपाटाजवळ गेला.
कव्हर?
पेनड्राइव्ह?
कागद?
तिच्या मनात धक्का बसला—कव्हर आता तिथे नव्हतं.
तिने कपडे उलथापालथ केली. नाही. कव्हर गायब.
राहुलने मागून आवाज दिला, “काय शोधतेस?”
स्वप्नाली थांबली. हळूहळू मागे वळली. “काही नाही… शाल सापडत नाहीये.”
राहुल आत आला. त्याने कपाटाकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हता. जणू त्याला आधीच माहित आहे.
“शाल इथेच आहे,” तो म्हणाला आणि एका बाजूला ठेवलेली शाल उचलून तिच्या हातात दिली.

मग हळूच म्हणाला, “काही गोष्टी घरात ठेवल्या की घर बिघडतं. म्हणून मी साफसफाई करतो.”
स्वप्नालीला कळलं—त्याला कव्हर सापडलं आहे. म्हणजे… त्याला सगळं कळलं आहे.
मग तो तिला बाहेर कसला सोडतोय?
ते दोघं बाहेर पडले. राहुल तिच्या बाजूला चालत होता. आजूबाजूला शेजारी, दुकानं, रस्त्यावरचा नेहमीचा आवाज. पण स्वप्नालीच्या कानात फक्त एकच आवाज—धोक्याचा.
“तू स्टेशनजवळ जाणार नाहीस,” राहुल अचानक म्हणाला.
स्वप्नाली थांबली. “का?”
राहुलने तिच्याकडे पाहिलं. “कारण तिथे गर्दी असते. आणि…”
तो थोडा थांबला.
“आणि तिथे तू कोणाला भेटू शकतेस.”
स्वप्नालीच्या चेहऱ्यावर रक्त उतरलं.
तो तिच्या मनातला विचार बोलत होता.
“तुला माहित आहे?” ती नकळत म्हणाली.
“मला बऱ्याच गोष्टी माहित असतात,” राहुल म्हणाला. “तू विसरतेस—मी तुला ओळखतो.”
स्वप्नालीला त्या क्षणी समजलं—कॅफेची भेट… कोणीतरी लावलेला सापळा असू शकतो. आणि राहुल तिला तिथे न जाऊ देण्यामागे नियंत्रण असेलच; पण दुसरी शक्यता…
कदाचित तो तिथे आधीच काहीतरी ठरवून बसला असेल.
ती मनात म्हणाली—माझ्याकडे एकच संधी आहे… आणि ती संधी मी हातातून जाऊ देऊ शकत नाही.
तिने अचानक दिशा बदलली. राहुल गोंधळला. “कुठे चाललीस?”
स्वप्नाली म्हणाली, “मला मंदिरात जायचं आहे.”
राहुलने डोळे बारीक केले. “मंदिर?”
तो हसला. “ आता तुला देव आठवला?”
स्वप्नालीच्या डोळ्यांत पाणी आलं, पण ती रडली नाही.
ती फक्त चालत राहिली… कारण तिच्या डोक्यात एकच ठरलं होतं—
आज मी पुरावा मिळवणार. काहीही झालं तरी.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा