Login

दुसरी माळ: देवी ब्रम्हचारिणी

Devi Bramhacharini Is Known For Devotee Nature. Same Like, Our Paralympics Player Avani Lekhara
दुसरी माळ: देवी ब्रम्हचारिणी

“या देवी सर्वभूतेषु महा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।“

शारदीय नवरात्राची दुसरी माळ म्हणजे दुर्गा देवीचे द्वितीय स्वरुप ब्रम्हचारिणी देवीला समर्पित आहे.

ब्रम्हचारिणी म्हणजे तपाचे आचरण व विचार जपणारी. देवी ब्रम्हचारिणीच्या एका हातात जपमाळ आणि दुसर्या हातात कमंडलू आहे.

देवी ब्रह्मचारिणीची प्रतीक असणारी पॅरिसमधल्या पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णाक्षराने इतिहास लिहिणारी दुसरी तिसरी कोणी नसून ती म्हणजे रायफल नेमबाजपटू अवनी लेखरा.

अवनीच्या एका हातात सुवर्ण पदक मिळवण्याची ध्यास असलेली जपमाळ आणि दुसर्या हातामध्ये अत्यंत कठीण असलेली तपश्चर्या पार करून मिळवलेले यश आहे.

“मूर्ती लहान, पण कीर्ती महान” या उक्तीला अनुसरून २०२४ सालच्या पॅरालंपिकची सुरुवात , अवनीने अत्यंत सुवर्णमयी व शानदारपणे केली.
२०१२ साली, वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी अपघाताने अवनीला जरी शारीरिक आव्हान दिलं असलं तरी तिच्यामधल्या कौशल्य व मेहनतीला कोणीच अडवू शकत नाही हे तिने वेळोवेळी सिद्ध करून दिलं.

रायफल नेमबाजपटू अवनी लेखराने कर्तुत्वाने नेमबाजीला उच्च स्थानी नेऊन ठेवले. अशा ह्या प्रतिभावंत अवनी लेखराला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप खूप शुभेच्छा.

“ ध्यास व जिद्दीने तपश्चर्या केली
सुवर्ण व कांस्य पदांची माळ माळली ,
शारीरिक कमतरतेला हुलकावणी देऊन,
२०२४ च्या पॅरालिम्पिकमधे सुवर्ण मेडलची सुरुवात करून दिली.”

धन्यवाद .

प्राजक्ता जोशी सुपेकर
०४|१०|२०२४

🎭 Series Post

View all