दुसरी मुलगीच..भाग २

Struggle Of Mother And Father While Growing Up Second Girl Child
मागच्या भागात आपण आनंद आणि रजनी यांच्या दुसऱ्या मुलीच्या जन्मापर्यंत ची कथा वाचली...आता पाहू या पुढे...
नातेवाईकांकडून येणाऱ्या सहानभुती च्या शब्दांना कंटाळून आनंद ने काही वेळ फोन बंद च करून ठेवला... इकडे डिलिव्हरी झाल्यानंतर डॉक्टर ने जेव्हा रजनी चे अभिनंदन केले तेव्हा काही क्षण तिच्या मनात विचारांचे वादळ उठले....तिला जेव्हा ऑपरेशन थिएटर मधून रूम मधे आणण्यात आले तेव्हा तिने सर्व प्रथम आनंद चा चेहरा पाहिला,तो तिला मनापासून समाधानी वाटला...हे पाहून तिला थोडे हायसे वाटले पण ज्या अर्थी तिला सासूबाई बराच वेळ आसपास दिसल्या नाहीत तेव्हा मात्र तिला सगळी परिस्थिती लक्षात आली...पण ती काहीच करू शकत नव्हती...या नाजूक स्थितीत जर आपण ताण घेतला तर बाळाला मिळणाऱ्या दुधावर त्याचा परिणाम होणार हे तिला माहीत होत म्हणून ती स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न करत होती.
आनंद ने फोन बंद करून ठेवल्यामुळे आता त्यांच्या भविष्याची ज्यांना चिंता वाटायला लागली होती त्यांनी आता प्रत्यक्षात भेटून सहानभूती दाखवण्याकडे मोर्चा वळवला... प्रत्येक जण येऊन सांत्वन केल्यासारखे बोलत होते,हे पाहून नुकत्याच बाळंतपणाची परीक्षा पार पाडलेल्या रजनी वर याचा मानसिक आघात झाला.दुसऱ्या मुलीला जन्म देऊन आपण खूप मोठा काही अपराध केला आहे ,आपण खूप मोठे गुन्हेगार आहोत असे तिला वाटू लागले...कानात फक्त लोकांचे सहानभुती चे शब्द ऐकू येऊ लागले.त्या रात्री तिचा बीपी एवढा लो झाला की ती जगेल की नाही याची डॉक्टरांना शंका वाटू लागली.तिची ही अवस्था बघून मात्र आनंद च्या पायाखालची जमीन सरकली...मध्यरात्री रजनी खूप अस्वस्थ झाली तेव्हा आनंद ने तिचा हात हातात घट्ट पकडला आणि " कोणी काही ही बोलल तरी मी आणि तू दोघांना ही आपल्या या मुलीच्या येण्याचा खूप आनंद झाला आहे,आणि आज आपल्या वर हसणाऱ्या या सगळ्या लोकांना आपल्या ला सडेतोड उत्तर द्यायचं आहे आणि त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे,देशील ना मला साथ????" असे रजनी ला विचारताच तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले...आनंद च्या या बोलण्याने तिच्यात जगण्याची एक प्रबळ इच्छा जागृत झाली.त्यांचा हा लढा वाचण्यासाठी पुढचा भाग नक्की वाचा...