दुसरी मुलगीच..भाग १

Story is About Struggle Of Mother Father In Growing Second Girl Child
आपल्या दुसऱ्या लेकीचा ' यशस्वी उद्योजिका ' म्हणून होणारा सत्कार पहाताना आनंद ची छाती अभिमानाने भरून आली होती..." हो,हीच ती माझी दुसरी मुलगी,जिच्या जन्मानंतर सगळ्यांनी मला दुसरी ही मुलगी च झाली म्हणून कुत्सितपणे सहानुभूती दाखवली होती" असं जगाला ओरडून सांगावे अस त्याला वाटत होत.आपल्या लेकीच कौतुक तो डोळे भरून पहात होता पण रजनी,त्याची बायको मात्र मनाने केव्हाच ३० वर्षांपूर्वी च्या त्या दवाखान्यात जाऊन पोहचली होती जिथे या त्यांच्या छोट्या परी चा जन्म झाला होता.
आनंद आणि रजनी एकमेकांना अगदी अनुरूप असे जोडपे...लग्नानंतर वर्षभरातच त्यांना पहिली मुलगी झाली...खर तर त्याच वेळी सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या पण आनंद आणि रजनी ला झालेला आनंद पाहून ' पहिली बेटी धनाची पेटी ' अस म्हणत त्यांच्या पहिल्या चिमुकलीच स्वागत केलं...पहिली मुलगी ५ वर्षांची झाल्या नंतर मात्र रजनी च्या सासूबाईंनी दुसऱ्या बाळासाठी पाठपुरावा करायला सुरुवात केली...खर तर त्या दोघांनी दुसऱ्या बाळाचा विचार कधी केलाच नव्हता पण ' आपल्या नंतर आपल्या मोठ्या मुलीला ही कोणी तरी रक्ताच नातं असावं ' या हेतूने त्यांनी दुसर मूल होऊ देण्याचा निर्णय घेतला...रजनी ची सासू सतत आडून आडून " या वेळी मुलगाच व्हायला हवा " अस सुचवायचे प्रयत्न करत होती आणि त्यासाठी गर्भलिंग निदान करून घ्या असं ही सुचवत होती...पण आनंद आणि रजनी या दोघांनी ही या गोष्टीला साफ नकार दिला...
पहाता पहाता ९ महिने संपले आणि रजनी ला दवाखान्यात ऍडमिट केले गेले...नातू व्हावा म्हणून रजनी च्या सासूबाई देवाकडे विनवण्या करत होत्या...त्यांची ही अवस्था पाहून एका क्षणासाठी रजनी ला ही ' मुलगा झाला तर बर होईल ' अस वाटून गेलं पण पुढच्या च क्षणी तिने स्वतःला सावरलं आणि ' देवा मुलगा किंवा मुलगी कोणी ही होऊ दे पण एक सुदृढ बाळ जन्माला येऊ दे.' अशी प्रार्थना केली.
सकाळी ९ वाजता तिला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेले आणि १५ च मिनिटात सगळ्यांच्या कानावर बाळाच्या रडण्याचा आवाज पडला...सगळे जण मुलगा झाला की मुलगी हे ऐकण्यासाठी उत्सुक होते...तेवढ्यात नर्स बाळाला घेऊन आली आणि ' अभिनंदन तुम्हाला मुलगी झाली आहे.' अस म्हणताच सासूबाई बाळाचं तोंड ही न पहाता तडक घरी निघून गेल्या...त्यांचं हे वागणं आनंद आणि रजनी ला अनपेक्षित होतं...आनंद मात्र आपल्या या दुसऱ्या लेकीच्या येण्याने खुश होता.तो आनंद सगळ्यांसोबत वाटावा म्हणून त्याने सर्व नातेवाईकांना ही बातमी सांगण्यासाठी फोन करायला सुरुवात केली मात्र प्रत्येक फोन वर त्याला ' दुसरी मुलगी झाली म्हणून नाराज झालास का?काही काळजी करू नकोस...' असे सांत्वन पर शब्दच ऐकायला भेटले,त्यामुळे त्याने इतर राहिलेल्या नातेवाईकांना फोन करायचा विचार च सोडून दिला पण त्याचा ही वेगळाच अर्थ काढण्यात आला की ' दुसरी मुलगी झाली म्हणून नाराज असेल बिचारा ,म्हणून केला नसेल फोन..'
ही तर फक्त दुसऱ्या मुलीच्या जन्माच्या वेळे पर्यंत ची कथा आहे...तिला मोठं करे पर्यंत अशा अनेक मानसिक लढाया त्यांना लढाव्या लागल्या..त्या कोणत्या हे वाचण्यासाठी दुसरा भाग नक्की वाचा....