संबंधित कथा व कथेतील पात्र हे काल्पनिक आहेत, त्यांचा कोणत्याही जीवित आणि मृत व्यक्तीशी संबंध नाही, आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.
साहेबांना वाढदिवसाच्या शुभेछ्या देऊन तो कृतकृत्य झाला, केवढा तो जोश आणि उत्साह ओसंडून वाहत होता, स्वतःच्या कमाईचे आणलेले बुफे साहेबांना देताना डोळ्यात एक वेगळीच चमक.या सर्व धामधुमीत तो दिवसभरात घडलेला सर्व प्रकार तो विसमरणात जात होता, साहेबांची कौतुकाची थाप आणि त्याचवेळी टिपलेला क्षण त्याला हवा होता ,कशाला? कशाला म्हणजे काय तो फोटो स्टेटस ला फेसबुक ला ठेवून लाइक्स आणि कमेंट्स मिळवण्याचा खटाटोप.
त्याचे हे नित्यनियमाचे झाले होते, तसा तो अगदीच रिकामटेकडा न्हवता,त्याचा स्वतःचा व्यवसाय होता.त्यातुन त्याला मिळकत होती. पण त्याचे ध्येय काही वेगळेच होते आणि तो त्यासाठी कसोशीने प्रयत्न करत होता सोशल मीडियाचा पुरेपूर फायदा घेत होता.
शिस्तीच्या वातावरणात लाडात वाढलेला राज्यशास्त्रात पदवीधर एकंदरीत सर्व सुरळीत चाललेला साहेबांचा ही तेवढाच लाडका एक दिवस आपण आपल्या गावात प्रमुख होऊ हे स्वप्न उरी बाळगून होता.
त्यासाठी त्याला सोशल मीडिया चा पूरेपूर फायदा कसा घ्यायचा हे माहीत होते,घरच्या वाढदिवसाला गरिबांना मदत करे, पण त्याचेही छायाचित्रे काढीत आणि प्रसिद्ध करे, त्यांच्या गरिबीची चेष्टा होऊ नये याची तो पुरेपूर काळजी घेत असे, त्यांचा चेहरा अंधुक करून.
नक्की हेतू काय असायचा तेच कळायचं नाही, त्यांना मदत ? की अजून काही
असा तो साहेबांच्या वाढदिवशी भरपूर उत्साह आनंदी त्यांच्या वाढ दिवसाची पूर्ण तयारी करण्यात मश्गुल होता,
तेवढ्यात एक सामाजिक संघटनेच्या वॉट्स अँप ग्रुपवर एक बातमी आली, त्याच्याने त्याचे मन विषण्ण झाले. त्यांच्याच पंचक्रोशीतील एका तरुणीची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली होती, एरवी त्याने ही बातमी लगेच स्टेटस ला ठेवून बाकी ठिकाणी पन पोस्ट केली असती, पण आज तर करताना मन धजावत न्हवते, कारण आज त्याचे स्टेटस वर फक्त साहेबांच्या छायाचित्रांचा हक्क आहे,
साहेबांच्या वाढ दिवसाचे आनंद की त्या बातमी मूळे खिन्न झालेले मन यात तो अडकला होता. त्याच्या मनात द्वंद्व चालु झाले, एकीकडे आनंद आणि एकीकडे दुःख, काहीच कळत न्हवते ती बातमी स्टेटस ला ठेऊन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावी की अजून काही ग्रुपवर का मेसेज फोरवर्ड करून त्यांच्या पैकी कोणी तरी पूढाकार घेऊन तिला मदत मिळवून द्यायचा प्रयत्न करेल.
त्याला काहीच उमगत न्हवते, काय करावे ते? शेवटी या द्वंद्वात आनंदाचा विजय झाला
हाच मेसेज दहा एक ग्रुपवर फारवर्ड करून त्याने साहेबांची राखीव जागा स्टेटस ला ठेवली आणि हे द्वंद्व संपवले,
ती फक्त एक बातमी आहे जी उद्या शिळी होईल लोक विसरतील.
मी नाही तर दुसरा कोणीतरी नक्कीच मदत करेल असे विचार करून त्याने त्याच्या सामाजिक भान (भास) याला तिलांजली दिली.
आणि आनंद की दुःख यामद्ये आनंदी राहणे के केव्हाही फायद्याचे. आज स्वार्थाच्या आनंदाचा विजय झाला होता
आपले सामाजिक भान हे भान नसून एक भास आहे, तो तेवढाच क्षणिक असतो जेवढा वॉट्स अँप स्टेटस राहण्याची वेळ.
आज कौतुकाची थाप मिळाली आणि जो आनंद मिळाला त्याने त्या दुःखाची तीव्रता कमी झाली आणि तेवढेच स्टेटस ला लाइक्स आणि कॅमेन्ट भेटल्या,त्याच्या पुढच्या वाटचालीचा पाया भक्कम रचला
पण त्या बातमीला साधी चौकशी नाही.
""आनंदाने आनंद जोडू ,मिळो असा स्वार्थ बातम्या तर रोज खोडू""
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा