शिर्षक : प्रत्येक दिवस हा एक भेट आणि एक शिकवण . . लेखक सुनिल जाधव पुणे TM 9 3 5 9 8 5 0 0 6 5
ज़िंदगी खरंच सरप्राइज़ने भरलेली असते . कधी सकाळी उठतानाच मन प्रसन्न असतं , सगळं काही आपल्या बाजूने चाललेलं असतं, तर कधी कोणताही इशारा न देता अडचणी दार ठोठावतात. हाच तर जीवनाचा खरा स्वभाव आहे, तो आपल्याला आधी सांगून काहीच देत नाही, पण प्रत्येक क्षणात काहीतरी शिकवतो .
ज्या दिवशी आपला दिवस छान जातो, कामात यश मिळतं, लोक प्रेमाने बोलतात, मन आनंदाने भरून जातं, त्या दिवशी क्षणभरही तक्रार करू नये. तो दिवस मनापासून एन्जॉय करायला हवा. कारण आनंद साठवून ठेवता येत नाही, तो अनुभवावा लागतो. आनंदी क्षण हे आयुष्याने दिलेलं बक्षीस असतं; त्याला स्वीकारणं ही आपली जबाबदारी असते .
आणि जेव्हा दिवस कठीण असतो, मनावर ओझं असतं, प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत, तेव्हा तक्रारीपेक्षा ताकद दाखवायची वेळ असते . कारण प्रत्येक अडचण आपल्याला मोडायला येत नाही, तर घडवायला येते. त्या काळात आपण मजबूत राहिलो, तर पुढे येणारा आनंद अधिक मोलाचा वाटतो.
खरं तर आपल्या पैकी कुणालाही माहीत नसतं की आपल्या वाट्याला अजून किती दिवस आहेत. हीच अनिश्चितता आयुष्याला किंमत देते. उद्याचा दिवस आपला असेलच याची खात्री नसताना, आजचा दिवस वाया घालवणं म्हणजे आयुष्याशीच अन्याय करणं होय.
म्हणूनच प्रत्येक सकाळ कृतज्ञतेने सुरू व्हायला हवी. श्वास चालू आहे, माणसं आपल्या आजूबाजूला आहेत, अनुभव मिळत आहेत, हे सगळं गृहीत धरू नये. प्रत्येक दिवस ही एक नवीन संधी आहे, स्वतःला अधिक समजून घेण्याची, इतरांशी चांगलं वागण्याची, आणि आयुष्याला मनापासून जगण्याची.
आयुष्य हे आपल्या ला हमी देत नाही , पण संधी मात्र रोज देते. त्या संधीचं स्वागत कृतज्ञ मनाने केलं , तरच जगणं अर्थपूर्ण ठरतं .
लेखक सुनिल जाधव पुणे TM 93 59 85 00 65, topsunil@gmail.com
म्हणूनच परत सांगतो आयुष्य हे आपल्याला हमी देत नाही, पण संधी मात्र रोज देते. त्या संधी चं स्वागत कृतज्ञ मनाने केलं, तरच जगणं अर्थ पर्ण ठरतं.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा