Login

इ गेमिंग चे मायाजाल

निरंजन च् पाहून सुदर्शन ला ही वाटू लागले कि आपल्या जवळ ही आपला असा मोबाईल फोन हवा.
ई गेमिंग चे मायाजाल

सुदर्शन च्या ताई चे लग्न आठ दिवसावर आले. घरात खूपच लगबग चालू होती, आई- बाबा दोघंही ऑफिस, घर आणि लग्नाच्या तयारीत होते, आजी आणि आबा दोघं इतर कामात.

“सुदू जास्तीचा अभ्यास करून ठेव, एकदा पाहुणे यायला लागले की मग वेळ आणि जागा दोन्हीही मिळणार नाही! आधीच सांगून ठेवते!” आईने त्याला आठवण करून दिली.

“ हो आई”--- म्हणत सुदर्शन बॅग भरायला लागला .

सुदर्शनच्या ताई चे लग्न, घरातलं हे पहिल कार्य त्यात कुठे कमतरता नको म्हणून घरदार कामात व्यस्त होते. पाहुणे यायला सुरुवात झाली.

सुदर्शन चे मोठे काका सुभाष, काकू सुनीता व चुलत भाऊ निरंजन आधी आले! निरंजन बारावीत,तर सुदर्शन दहावीत होता.
निरंजन आल्यापासून सुदर्शन त्याच्याबरोबर राहू लागला. प्रत्येकाच्या झोपायच्या जागा ठरल्या सुदर्शन ने निरंजनला आपल्या खोलीत जागा केली.

निरंजन पुण्यासारख्या मोठ्या शहरात राहणारा त्याच सगळं वागणच पॉश. त्याच्याजवळ त्याचा असा मोबाईल होता, सकाळी उठल्यावर, रात्री झोपताना सतत फोन त्यांच्या जवळ असे.

सुदर्शन ला ही तो कुठले कुठले गेम दाखवे,. आता सुदर्शन लाही त्याचा चाळा लागला आपल्याजवळ ही स्वतःचा असा स्वतंत्र मोबाईल हवा असे त्याला प्रकर्षाने जाणवू लागले.
आई बाबा, आजोबा आजी सर्वांजवळ त्यांचा त्यांचा असा फोन .त्यातून आजीचा फोन तो कधीकधी घेत असे पण फारच कमी वेळा मिळे. अगदी कधीतरी मित्रांशीबोलायला, अभ्यासासाठी, क्लास वर जाण्याकरता फोन घेत असे .आणि तो त्याला पुरत असे.

पण जेव्हापासून निरंजन येऊन गेला सुदर्शन ला आपला स्वतःचा असा फोन हवा असे वाटू लागले .तो सारखा आईच्या मागे भुणभुण करू लागला.
“ लग्न होऊन जाऊ दे मग पाहू” म्हणून आईने तो विषय तिथे टाळला


लग्न दणक्यात पार पडले लग्न होताच काका ,काकू, निरंजन पुण्याला जायला निघाले त्यांच्याबरोबरआजी-आजोबा ही काही महिन्याकरता राह्यला गेले.


“बाबा आम्हाला क्लासमध्ये नोट्स, व्हाट्सअप वर मागवावे लागतात, बरेचदा सर देतात मग मला ते सारखे उतरवत बसायला लागतात. आणि आता आजी पण गावाला गेली आहे.

“हो खरंय तुलाही एक फोन हवा आहे, ठीक आहे आपण रविवारी पाहू तुला कुठला फोन घ्यायचा ते .“
ताईच्या लग्नामध्ये सुदर्शन ला ही आहेरात काही पैसे मिळाले होते ते त्यांनी बाबांना फोन मध्ये कमी पडल्यास घालायला म्हणून दिले.
सुदर्शन खूप खुश होता त्याला हवा असलेला मोबाईल त्यांनी पसंत केला व ॲमेझॉन वर ऑर्डर करून बाबांनी घेऊन दिला.

सुदर्शन ने निरंजनला सगळ्यात पहिले फोन करून आपण फोन घेतल्याची बातमी दिली.
. आता आपण आपल्या मनाप्रमाणे फोनमध्ये गेम घालू शकतो तेव्हा मला काही गेम पाठव असे सांगितले त्याप्रमाणे निरंजन ने त्याला एक दोन गेमची माहिती दिली.


हळूहळू आई-बाबा आपल्या ऑफिस व सुदर्शन आपल्या शाळा कोचिंग मध्ये व्यस्त झाला. कोचिंग मध्ये तो आता मोबाईल घेऊन जाऊ लागला मित्रांबरोबर व्हाट्सअप ही घालून घेतले आता वेळ मिळाला कि त्याच्या हातात फोन असे, सुरुवातीला तो बाबांना फोन मधल्या ॲप बद्दल विचारत असे पण हळूहळू तोआता मनाने हवे ते ॲप डाऊनलोड करू लागला. आजोबा आजी नसल्याने तो घरात बराचवेळ एकटा असे तेव्हा तो फोनवर गेम खेळत बसे.

एक दिवस सुदर्शन ची आई त्याला म्हणाली ‘अरे जराबाहेर खेळायला मित्रांमध्ये जात नाही कां? जेव्हा पाहते ना तुझ्या हातात फोन असतो,’पण सुदर्शन ने आईच्या बोलण्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
हळूहळू त्याला गेम खेळायचे वेड लागले.
एकदा निरंजन ला फोन करून नवीन गेम कुठले व ते ऍप कोणते हे विचारायला फोन केला.

निरंजन ची नुकतीच परीक्षा संपली होती त्यामुळे त्याच्याजवळ भरपूर वेळ होता . बोलता बोलता त्याने सांगितले ‘आता एक नवीन गेमिंग एप त्यांनी डाउनलोड केला आहे त्यामध्ये पैसेही भरपूर कमावता येतील ‘आणि तो त्या गेम बद्दल सुदर्शन ला सांगू लागला.
सुदर्शन ची परीक्षा अजून व्हायची होती त्यामुळे त्याने सध्या मला काही वेळ नाही पुढे पाहू म्हणून विषय तिथेच संपवला.

सुदर्शन ची परीक्षा संपल्यावर पुढच्या कोर्स करता त्याला फीस भरायची होती बाबांनी त्याला पैसे दिले. सध्या सुट्ट्या असल्याने ते पैसे त्यांनी आपल्याजवळच ठेवले ,आणि त्याला आठवले निरंजन ने त्याला एक गेम सांगितला होता त्यात पैसे डबल करून मिळतील असे सांगितले तेव्हा आता आपणही असा एखादा गेम डाउनलोड करावा असे त्याला वाटू लागले .

त्याच्या क्लासच्या एक दोन मित्रांनी पण ह्या गेम बद्दल त्याला सांगितले सुरवातीला दोन हजार डिपाझिट केले नी सुदर्शन ला दीड हजार मिळाले . पण पाचशे गमावून बसलो ह्याची हुरहूर लागली.
आणि एक दिवस त्याच्या मित्रानी विचारले “सुदर्शन मला काही पैसे उधार मिळतिल कां?आठ दहा दिवसांत नक्की परत करेन .”

सुदर्शन जवळ फीस चे पैसे होते ते त्याने मित्राला दिले
थोड्याच दिवसात क्लासची फीस भरायची वेळ आली पण सुदर्शन जवळ पैसेच नव्हते .आता त्याला काळजी व मनात भीती वाटू लागली तो आईजवळ बोलला “आई मी फी चे पैसे मित्राला दिले आणि आता माझ्याजवळ फीस भरायला पैसे नाही काय करू?

काय? पैसे देऊन टाकले! केव्हा देणार तो?

अग तो म्हणाला की आठ दहा दिवसात देईन.

बरं, मी तुला अत्ता देते, पण त्याच्याकडून नक्की मागून घे.
‘हो आई ‘असे म्हणत सुदर्शन ने आईजवळून पैसे घेऊन क्लासच्या फी चे पैसे भरले.

संध्याकाळी सुदर्शन चे बाबा घरी आले ते घाबरलेले, म्हणाले” दादाचा फोन आला आहे निरंजन ला काहीतरी झाले आहे आणि दवाखान्यात ऍडमिट आहे मला पाहायला जावे लागेल!” असे म्हणून बाबा लागलिच बसने पुणे रवाना झाले .

बाबांचा दुसरे दिवशी फोन आला तेव्हा खूप टेंस होते,निरंजन ने सुसाईड करायचा प्रयत्न केला होता कारण नेमकं असं कळलं नाही पण काहीतरी पैशाची गडबड केली आहे..
हे ऐकून सुदर्शन खूप घाबरला त्याला आठवले थोड्या दिवसापूर्वी निरंजन ने त्याला एक नवीन गेम डाउनलोड केला आहे म्हणून सांगितले होते आणि भरपूर पैसे कमवता येतील असे म्हणाला होता.
इकडे सुदर्शन चा मित्रही बरेच दिवस झाले भेटला नाही ,फोन करूनही पाहिले पण काहीच उत्तर देत नव्हता इतर मुलं ही त्याला शोधत होते शेवटी सुदर्शन त्याच्या घरी गेला तेव्हा कळले गेम मध्ये तो पैसे हरला आणि बरेच मित्रांचे त्यांनी असेच उधार घेतलेले पैसे आहेत ते आता परत करणे शक्य नाही म्हणून कुठेतरी लपून बसला आहे हे आणि त्यांच्या घरच्यांना हा काय प्रकार आहे हे काहिच माहित नाही.
सर्व ऐकून सुदर्शन चे कशात मान लागे ना आता आईबाबा नी फीस चे विचारलं तर?

दोन दिवसांनी सुदर्शन चे बाबा पुण्याहून परत आले.
रात्री जेवताना बाबांनी सांगितले मी पुण्याला पोचलो तेव्हा निरंजन वर उपचार सुरू होते, दादा व वहिनी सुन्न होऊन बसले होते आई ने देव पाण्यात ठेवलै होते.
मी बाबांना विचारले तेव्हा त्यांनीच सर्व घडलेला प्रकार सांगितला.
बाबा म्हणाले मी सुभाष ला बरेच दा म्हणत असे कि अरे हा फोन वर, कंप्युटर वर काय करतो दिवसभर थोडे पहात जा, तर त्यानी मलाच निरुत्तर केले “बाबा आजकाल नवीन कोर्स ची माहिती असते ऑन लाईन ती पहात असेल पण अति विश्वास काय कामाचा? मुलं अडनेड्या वयात नको नको ते पहातात त्यांच्या वर थोडे लक्ष ठेवायला हवे. तुलाही सांगतोय “ बाबांचा स्वर गहिवरला .

“हो पण नेमकं काय घडलं”

बाबा डोळे पुसत सांगु लागले
निरंजन ची परिक्षा संपली होती आणि रिझल्ट यायला उशीर होता तो बरेचदा रात्री उशिरापर्यंत जागा असे त्यामुळे सकाळी उशीरा उठत असे ..त्या दिवशी ही तो उठला नव्हता त्याचे आईवडील कामावर जायला निघाले तरीही हा झोपलेलाच तुझीआई म्हणाली तर सुनबाई म्हणाली “तो आता काय लहान आहे कां? उठला कि करेल त्याच त्याच तुम्ही नका काळजी करु “
पण अकरा वाजले तरी निरु उठल्या नाही म्हणून ही पहायला त्यांच्या खोलीत गेली हलवून ही उठत नाही पाहून ही घाबरली, मला बोलावलं मी ही उठवून पाहिलं काहितरी वेगळ जाणवल म्हणून आफिस मधे फोन करून सांगितले, दोघ लगेच आले निरु ने झोपेच्या गोळ्या घेतल्या असाव्यात खोलीत बाटली होती.
मला कधी कधी झोप येत नसे म्हणून डाॅ नी दिल्या होत्या त्या माझ्या खोलीतून चुपचाप घेतल्या असाव्यात .लगेच दवाखान्यात नेल,नशीब बलवत्तर होते म्हणून नीरु वाचला.
त्यांच्या मोबाईलवर मैसेज पाहिले त्यावरून सर्व समजल.
दोन दिवसांनी घरी आणलं डॉ म्हणाले अत्ता त्याला काही विचारू नका आणि त्यांच्यावर लक्ष ठेवा कधी कधी असे पेशंट परत प्रयत्न करतात.

एक दिवस जेवताना “अरे सुदर्शन कुठे आहेत तुझे लक्ष कालपासून मी सारखी पाहते आहे तुझं जेवणात लक्ष नाहीये काय झालं नेमकं ?निरंजन ची काळजी वाटते कां ?”
हे ऐकताच सुदर्शन एकदम जोरात रडू लागला “आई-बाबा मला माफ करा मी खूप चूक करत होतो पण वाचलो ,निरंजन नी मलाही एक गेम डाउनलोड करून दिला होता आणि सांगितले होते या गेम वर पैसे लावले की डबल करून मिळतात पण माझ्याजवळ तितके पैसे नसल्याने मी लावू शकलो नाही .निरंजन त्या गेम मध्ये पैसे लावून हरला परत परत पैसे लावून परत परत हरत गेला आणि निराशेच्या भरात त्याने सुसाईड —असे म्हणून सुदर्शन जोराजोरात रडू लागला.
हे ऐकून आई-बाबाच अवाक झाले ,”अरे आम्हाला नाही का सांगायचं ?हे काय नवीन खुळ डोक्यात ?वाचलास तू थोडक्यात.असे पैसे जर भराभर कमवता येत असतिल तर कोणी मेहनत कशाला करेल? देवाची कृपा म्हणून तू यात पडला नाहीस. आता निमूटपणे नीट अभ्यास कर चांगला पास हो तू खूप पैसे कमवू शकशील पण या अशा मार्गाने पैसे कमावण्याबद्दल विचारही करू नकोस…पैसे कमवायचा हा शाॅर्टकट बरोबर नाही हे “एक मायाजाल “आहे त्यात गुरफटून अनेक तरुण वाया गेले ,

“हो बाबा आई, मला कळलं मी आता पुन्हा अशी चूक कधीही करणार नाही”

.” मला वचन दे कुठल्याही आडवाटेने पैसे कमावण्याचा मार्ग तू अवलंबणार नाही! ह्या झटपट पैसे कमावण्याचा मार्ग तुमच्या सारख्या तरुणांची दिशाभूल करून आपल गाठोड भरतात, त्यांना पकडण्याचा मार्ग ही ठाऊक नाही.” बाबा पोटतिडकीने बोलत होते.

“हो बाबा आई आता मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगुन विचारुन करेन”
.
“शाब्बास, like a good boy.”

दोन दिवसांनी सुदर्शन चा दहावीचा निकाल लागला. अपेक्षेप्रमाणे त्याला चांगले मार्क मिळाले होते त्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण होते. तिकडे काकाकडे निरंजनही चांगल्या मार्का ने पास झाला व आता त्याची तब्येत ही बरीच सुधारली होती .

निरंजन ला पाह्यला म्हणून आई-बाबांबरोबर सुदर्शन ही पुण्याला पोहोचला.

निरंजन आता बराच सावरला होता, त्याने सर्वांना आश्वासन दिले कि आता तो फक्त आणि फक्त अभ्यासावरच आपल लक्ष केंद्रित करेल व अशा मोहमयी खेळापासून दूर राहिल.आपल्या घरच्यांना त्रास होईल असे वागणार नाही.

आलेले संकट टळले म्हणून आजी-आजोबांनी सत्यनारायणाची पूजा करायचे ठरवले.

संध्याकाळी दोघं नातवंडे चांगले पास झाली म्हणून आजोबांनी पार्टी द्यायचे ठरवले.

आजोबांनी विचारले काय काय हवे पार्टीला आता इतका छान रिझल्ट लागलाय तर “?

काहीतरी ठंडा ठंडा कूल कूल हवं आहे हं !

मला बटर स्काय,मला,मेंगो,मला पिस्ता,मला चाॅकलेट असे सर्व जण हल्ला करू लागले…
—--------------------------------------------
लेखिका– सौ प्रतिभा परांजपे