एक अबोली भाग 3

त्रिशाचा मृत्यू नक्की कशाने झाला?उलगडणार एक नवीन पैलू.


राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
कथामालिका फेरी
विषय :रहस्य व सामाजिक
एक अबोली भाग 3

मागील भागात आपण पाहिले,निशा आणि अनिताने भेटून एकमेकींना मनातले सांगितले.त्याच वेळी त्रिशा नावाच्या मुलीने आत्महत्या केल्याची केस आली.ह्या केसमधून सुनिताच्या मृत्यचे धागेदोरे उलगडतील का?एका अबोल मृत्युला वाचा फुटेल का?


अनिता घरी आली,बिछान्यावर पडल्या पडल्या तिला त्रिशा आठवली आणि पाठोपाठ तिची ताई.विचाराच्या ग्लानीत झोप कधी लागली समजलेच नाही.

सकाळी सहा वाजताच निशाचा फोन आला,"अनिता, त्रिशा वॉज प्रेग्नेंट!"

अनिताची झोप खाडकन उडाली,"काय?थांब म्हणजे रिपोर्ट आले तर."

निशा हसली,"हो आणि तुझ्याकडे जायच्या आधी मला दर्शन देऊन गेले रिपोर्ट."

अनिता म्हणाली,"मी आज तिच्या शाळेत जातेय चौकशीला.येऊ शकते का?"


निशा म्हणाली,"आज नाही.आज तुझेच एक दुसरे काम करायला घेते.चल भेटू."


अनिताने फोन ठेवला आणि मग विचारचक्र सुरू झाले,नुकतीच वयात आलेली दहावीत शिकणारी ही मुलगी.नक्की काय झाले असेल?

अनिताने विचारातच सगळे आटोपले.तेवढ्यात आई म्हणाली,"आने,म्या आणि बापू जाऊन येतो.तिकड भावाक तुझ्या.नीट रहाय."

अनिता हसली,"आई,मी पोलीस आहे."

बापू मात्र हळवे होत म्हणाले,"पोरी,जपून."

दोघेही तिच्याबरोबर बाहेर पडले.इकडे अनिताने साळुंकेना फोनवरून सूचना दिल्या,"गाडी इथेच घेऊन या आपण शाळेपासून सुरू करू."


गावात नव्याने उदयास आलेल्या एका नामांकित इंग्लिश माध्यम शाळेच्या प्रांगणात गाडी थांबली.अनिता आणि तिचा बरोबर असलेल्या महिला कॉन्स्टेबल आत गेल्या.साळुंकेला बाहेर थांबवून अनिता आत गेली.प्राचार्य मॅडम तिला पाहून जरा थोड्या घाबरल्या.

अनिताने शांतपणे सुरुवात केली,"त्रिशा,तुमची विद्यार्थिनी.तिच्या वर्गशिक्षक आणि मैत्रिणींना बोलवा."

मॅडमनी निरोप पाठवला आणि बोलू लागल्या,"हा असा प्रकार घडल्याने सगळेच जरा घाबरले आहेत.यापूर्वी असे काही घडले नाहीय."

अनिता हसली,"मॅडम,मुले संवेदनशील असतात.आपण शोधू नक्की काय झाले असेल?"


तेवढ्यात तिच्या वर्गशिक्षक सोनाली मॅडम आणि तिच्या खास मैत्रिणी नेहा,आर्या आणि पालवी तिघींना घेऊन शिपाई आत आला.

अनिता म्हणाली,"घडलेल्या घटनेने तुम्ही गांगरून गेल्या असाल.परंतु तरीही शांतपणे आम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्या."

सोनाली मॅडम म्हणाल्या,"पण अभ्यासात एवढी हुशार असणारी मुलगी असे का करेल मॅडम?"

अनिता त्रिशाच्या मैत्रिणीकडे पहात म्हणाली,"काही वेगळे कारण पण असू शकते.म्हणजे बॉयफ्रेंड वगैरे?"

तसे पालवी रडत म्हणाली,"शक्य नाही मॅडम.तसे असते तर आम्हाला माहीत झाले असते."

त्यानंतर जुजबी प्रश्न विचारून अनिता निघाली.

अनिताला कळेना की शाळेत हुशार असलेली एक आज्ञाधारक मुलगी असे का करेल?शेवटी तिने घरी चौकशी करायचे ठरवले.अनिताने तिच्या घरी गेल्यावर आधी तिच्या आजी व आईशी बोलायचे ठरवले.

तिने त्रिशाच्या वडिलांना तसे म्हंटल्यावर ते लगेच म्हणाले,"काय विचारायचे ते मला विचारा?त्यांना काय विचारायचे त्यात?"

तशी अनिता शांतपणे म्हणाली,"हे पहा मिस्टर जाधव,मला तुमच्या सगळ्यांशी आणि तेही वेगवेगळे बोलायचे आहे.तुम्ही सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे."

पोलिसी उत्तर देताच तो नरमला.अनिताने त्रिशाच्या आई आणि आजीला बोलावले.दोघींची अवस्था खूप वाईट झालेली होती.

अनिता बोलू लागली,"मला कल्पना आहे, तुम्हाला काय वाटतं असेल?पण चौकशी करणे माझ्या कामाचा भाग आहे. त्रिशा मागील काही दिवसांपासून वेगळे वागत होती का?"


तिची आई म्हणाली,"ती अभ्यास वगैरे करायची.नीट शाळेत जायची.पण गेल्या दोन महिन्यांपासून ती जास्त बोलत नसे.काही विचारले तर अभ्यास असतो जास्त असे म्हणायची."

आजी म्हणाली,"मॅडम,का केले असेल तिने असे?तिच्या बाबांची शिस्त कडक.त्यामुळे पोरी एकदम गुणी आणि नियमात वागायच्या हो."

अनिता हळूच म्हणाली,"तिला कोणी मित्र वगैरे?"

तिची आई पटकन म्हणाली,"छे,मित्र वगैरे शक्यच नाही.तिच्या बाबांना आवडत नाही."


तेवढ्यात त्रिशाची लहान बहीण आणि भाऊ आईला बिलगून असलेले तिला दिसले.अनिताने दोन चॉकलेट काढून त्यांना दिली.

त्यांच्याशी थोडी मैत्री केल्यावर लहानगा प्रियांश म्हणाला,"दिदी तिकडे पार्टीला गेलेली ना तेव्हापासून आजारी पडलेली."

तेवढ्यात जाधव आत येत म्हणाले,"प्रियांश काय सांगतोस रे?


अनिता आता चिडली,"मिस्टर जाधव,तुम्ही मला आता भाग पाडताय.ऐका मग,पी.एम रिपोर्ट नुसार त्रिशा गरोदर होती."


जाधवचा आवाज वाढला,"शक्य नाही.आणि मुळात मला काहीही चौकशी नकोच आहे.झाली तेवढी शोभा पुरे."


अनिता ओरडली,"इनफ.इनफ मिस्टर जाधव.तुमची मुलगी गेलीय.तुम्ही बाहेर व्हा.मला बोलायचे आहे यांच्याशी."



अनिता आता जरा कठोर आवाजात म्हणाली,"हे बघा त्रिशाच्या आई,मी सगळे शोधून काढेलच.पण मुलीला न्याय मिळावा म्हणून तुम्ही सुद्धा साथ द्या."


तरीही तिची आई गप्प बसलेली पाहून मात्र तिची आजी म्हणाली,"मी सांगते.दोन महिन्यांपूर्वी सर्जेरावच्या बंगल्यावर आम्ही कार्यक्रमाला गेलो."

अनिता म्हणाली,"सर्जेराव म्हणजे? नगरसेवक आहेत ते?"


आजी पुढे म्हणाली,"हो,माझा मुलगा त्यांच्या फॅक्टरीमध्ये मॅनेजर आहे.तिथे जाऊन आल्यावर चार दिवसांनी सर्जेराव जाधव यांच्या मुलाचा वाढदिवस आहे.असे एक निमंत्रण आले.आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो.तिथे खूप मोठा समारंभ चालू होता.त्यात अचानक त्रिशा गायब झाली.आम्ही वेड्यासारखे तिला शोधत होतो.दोन तासांनी ती सापडली.जरा भेदरली होती.त्यानंतर तिचे वागणे बदलले.कितीदा विचारले पण काहीच सांगायची नाही."


एवढे बोलून आजी रडू लागली.अनिता शांत झाली.तिने त्रिशाच्या वडिलांना आत बोलावले,"मिस्टर जाधव,तुम्ही सर्जेरावच्या मुलाच्या वाढदिसानिमित्त पार्टीला मुलींना नेले होते."

जाधव चमकून म्हणाला,"मग,काय झाले?सर्जेराव बॉस आहेत माझे."


अनिता म्हणाली,"मुलींना एरव्ही बाहेर कधीच जाऊ देत नसणारे तुम्ही?"

जाधव जरा गोंधळला आणि परत म्हणाला,"मॅडम,तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे.माझी कोणाविरुद्ध काही तक्रार नाही.तुम्ही चौकशी थांबवा."


अनिता परत गरज लागली तर चौकशीला येईल असे सांगून बाहेर पडली.

तिकडे निशा आणि तिची आई निताला शोधत निघाल्या.गावाबाहेरच्या देवळात एका ठिकाणी त्यांना निता सापडली. निशाने तिकडे बोट दाखवले.अश्विनी मॅडम आपल्या मैत्रिणीची अशी अवस्था पाहून रडू लागल्या.

निशाने त्यांना सावरल्यावर त्या जवळ जाऊन निताला म्हणाल्या,"निता देशमुख ना तू?"

ती खिन्न नजरेने वर न पाहता म्हणाली,"मेली निता देशमुख जेव्हा त्या नालयकाचा हात धरून पळाली."


अश्विनी मॅडम परत म्हणाल्या,"पण आमची निता अशी सहज मरणारी नव्हतीच मुळी."


मग मात्र निताने वर पाहिले.आपली जुनी मैत्रीण पाहताच ती रडू लागली.परंतु निशा सावध होती.तिने आईला खुणावले आणि निताला घरी घेऊन आल्या.


काय असेल निताची गोष्ट?तिची अशी अवस्था का झाली? सर्जेरावच्या पार्टीत काय घडले ज्यामुळे त्रिशा संपूर्ण बदलली.
वाचत.रहा
एक अबोली.

🎭 Series Post

View all