एक बेट मंतरलेलं (भाग -३८)
© प्रतिक्षा माजगावकर
(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
टीम ने त्यांच्या बॅगेतून पुन्हा सामना काढले आणि यावेळी वाईट आत्म्याशी संवाद साधायचा आहे म्हणून एक बॉक्स सुद्धा काढलं. डीन ने ते बॉक्स आणि त्याचा लॅपटॉप जोडले. त्यांच्यात काहीतरी चर्चा सुरू होती! बाहुली च बंधन न तोडता तिला त्या बॉक्स मध्ये कसं ठेवायचं आणि जर तिच्या शक्ती जास्तच वाढल्या तर त्यांना आटोक्यात कसं आणायचं या बद्दल ते बोलत होते. त्यांच्या चर्चेवरून आणि आधी आलेल्या अनुभवावरून किती वाईट शक्ती त्या बाहुली मध्ये आहेत याची सगळ्यांनाच कल्पना होती.
"ओके... Let's start the work..." शॉन ने एकदा सगळं बघून टीम ला सांगितलं.
लगेचच डीन लॅपटॉप समोर बसला. त्या बॉक्स ला थर्मामीटर, communication डिव्हाईस आणि K 2 मीटर जोडले.
"Who are you?" Meldon ने बोलायला सुरुवात केली.
त्यांच्या डिव्हाईस च्या रीडिंग नुसार तिथे अतृप्त शक्ती आहे हे स्पष्ट होत होतं पण, ती शक्ती जणू काहीही कळू द्यायचं नाही हे ठरवून काहीही क्लू देत नव्हती.
"हॅलो! आम्हाला माहीत आहे इथे कोणीतरी आहे. We can help you...." शॉन म्हणाला.
थोडावेळ शांत गेला.
"नो रिस्पॉन्स...." डीन ने सगळ्या मशीन चेक करून सांगितलं.
"असं का होतंय?" प्रवीण च्या बाबांनी काळजीने विचारलं.
"हा स्पिरीट bad आहे. We have to change our way of working." Meldon म्हणाला.
त्यांच्या टीम च्या चर्चेनंतर जरा धाडसी निर्णय त्यांनी सगळ्यांनी घेतला.
"आम्ही इथे सोलो सेशन करणार after 12 o'clock!" Raymond ने त्यांच्या चर्चेत जे ठरलं ते अगदी थोडक्यात सांगितलं.
"म्हणजे नक्की काय?" प्रवीण च्या आईने विचारलं.
"आमच्या टीम मधून एक जण इथे एकटा येऊन त्या स्पिरीट सोबत communicate करणार! आजची नाईट तुम्हाला दुसरीकडे जावं लागेल." शॉन ने नीट समजावून सांगितलं.
"आम्हाला जायला काही नाही... पण, यात काही धोका असेल तर? तो आत्मा वाईट आहे त्याच्या मुळे तुमच्या टीम मेंबर ला काही झालं तर?" प्रवीण चे बाबा म्हणाले.
"डोन्ट वरी.... That's the part of our work! या situation मध्ये काय करायचं हे आम्हाला माहीत आहे." शॉन म्हणाला.
"ओके... मी हॉटेल रूम बुक करतो.." प्रवीण चे बाबा त्यांचा मोबाईल काढत म्हणाले.
"हॉटेल कशाला? आमच्या घरी चला... आजच्या रात्रीचा तर प्रश्न आहे!" नम्रता ची आई म्हणाली.
"हो पण तुम्हाला उगाच त्रास कशाला? आम्ही हॉटेल मध्ये जाऊ..." प्रवीण ची आई म्हणाली.
"त्यात त्रास काय? आपण सगळे एका family सारखे आहोत... शिवाय आता पुढे जाऊन आपली सोयरिक सुद्धा होणार आहेच ना!" नम्रता ची आई नम्रता कडे तिरकस बघत तिला चिडवण्याच्या सुरात म्हणाली.
तिने फक्त प्रवीण कडे आणि एकदा आई कडे बघितलं आणि नंतर इकडे तिकडे बघत उभी राहिली. एव्हाना संध्याकाळ चे सात वाजून गेले होते. टीम ला सोलो सेशन करण्यासाठी सुद्धा काही तयारी करावी लागणार होती आणि म्हणून सगळे आपापल्या घरी जायला निघाले.
"सगळं ठीक होऊ दे बाबा आता एकदा! वैताग आला आहे...." समृध्दी ची आई म्हणाली.
"हो ना! कोणती चक्र मागे लागली आहेत देव जाणे. पोरांच्या पार जीवावर आलं हे संकट!" मयुर ची आई म्हणाली.
"काकू! नका काळजी करू.... होईल आता सगळं ठीक.... आता फक्त त्या वाईट बाहुली कडून काही माहिती मिळाली की मग हे सगळं संपेल. बाप्पा आहे ना मग आपण नको काळजी करायला..." नम्रता म्हणाली.
"हो ग! पण, ते म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चींती असं काहीतरी होतंय...." समृध्दी ची आई म्हणाली.
"मग त्याच मनाला सांगायचं; हे संकट आलं तसं जाईल... आमचा बाप्पा आमच्या सोबत आहे! त्याच्या पेक्षा तर नक्कीच हे संकट मोठं नाही..." नम्रता म्हणाली.
"किती गुणी आहे नम्रता! एवढ्या लहान वयात सुद्धा खंबीर!" प्रवीण ची आई तिच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाली.
"बाप्पा आहे ना... हा विश्वास एकदा मनात बसला की सगळेच खंबीर होऊ शकतात." नम्रता म्हणाली.
बोलता बोलता सगळे घराजवळ पोहोचत होते. समृध्दी आणि मयुर चे कुटुंबं त्यांच्या त्यांच्या घराकडे वळले आणि नम्रता, प्रवीण पुढे चालत होते.
"नमु! किती सॉलिड आहेस यार तू.... जे म्हणतेस ते करतेस सुद्धा!" प्रवीण तिला म्हणाला.
"आता मी काय केलं?" नम्रता ने विचारलं.
"काय केलं? अगं दीपा ला दिलेलं वचन कसोशीने निभावून नेण्यासाठी प्रयत्न करतेस, सगळ्यांना धीर देतेस..." प्रवीण म्हणाला.
"त्यात विशेष असं काहीच नाही... जाऊदे तो विषय.... सारखं सारखं तेच बोलून, विचार करून नंतर डोकं फिरायची वेळ येईल... आता सगळं छान होणार आहे... मग बोलू ना दुसऱ्या छान छान विषयांवर..." नम्रता उत्साहात म्हणाली.
"तुझा हाच तर स्वभाव मला प्रेमात पाडतो..." प्रवीण म्हणाला.
नेमकं त्याचं हे बोलणं त्याच्या मागून चालत असणाऱ्या त्याच्या आईने ऐकलं! ती घसा खाकरून म्हणाली; "आम्ही आहोत म्हणलं मागे!"
तिच्या आवाजाने दोघांनी एकदम मागे वळून बघितलं आणि पुन्हा समोर बघत मान खाली घातली. बोलता बोलता सगळे घरी पोहोचले.
"चला! सगळ्यांनी हात पाय धुवून घ्या... मी स्वयंपाकाचं बघते...." नम्रता ची आई म्हणाली.
"नको वहिनी! आजचा स्वयंपाक मी करतो...." प्रवीण चे बाबा म्हणाले.
"नको.. तुम्ही हॉटेल मध्ये करत असताच की!" नम्रता ची आई म्हणाली.
"नाही नाही! मी काही ऐकणार नाही... तुम्ही बायका ऑफिस सांभाळून रोज एवढं करता ना! आज मी आणि नम्रता चे बाबा करू सगळं!" प्रवीण चे बाबा म्हणाले.
त्यांच्या या बोलण्याला नम्रता च्या बाबांनी सुद्धा सहमती दर्शवली आणि दोघं आत गेले. प्रवीण सुद्धा फ्रेश आला.
"प्रवीण! तू जा थोडावेळ आराम कर.. आत्ताच एवढ्या मोठ्या अपघातातून बरा होत आहेस... नम्रता ला पाठवते तुझ्याशी गप्पा मारायला.. जा आतल्या खोलीत बस..." नम्रता ची आई त्याला म्हणाली.
त्याच्या आईने पण याला सहमती दर्शवली आणि प्रवीण आत गेला.
आज या महिला मंडळाला आराम होता! नम्रता ने सवई प्रमाणे बाप्पा जवळ दिवा लावला, शुभंकरोती म्हणलं, संध्याकाळची पूजा केली आणि सगळ्यांना प्रसाद देऊन ती प्रवीण ला प्रसाद द्यायला गेली.
"प्रवीण! हा घे प्रसाद!" ती त्याच्या हातात प्रसाद देत म्हणाली.
प्रवीण ने नमस्कार करून प्रसाद खाल्ला आणि थोडा वेळ शांत गेला. काय आणि कुठून बोलावं हे दोघांनाही कळत नव्हतं.
"नमु! मी ती बाहुली त्या साईट वरून घ्यायला नको होती ना... सगळेच आपण अडकलो यात." तो थोड्या अपराधी पणाने म्हणाला.
"चूप! आपण तो विषय नको काढायला.. सारखं हे केलं असतं तर आणि हे नसतं केलं तर हे बोलून काय होणार आहे?" नम्रता ने त्याला समजावलं.
"बरं बाई सॉरी!" तो कान धरून म्हणाला.
"हो! हो बास!" ती त्याचे हात खाली घेत म्हणाली.
पुन्हा थोडावेळ शांततेत गेला. दोघं फक्त एकमेकांकडे बघत होते....
"नमु....." प्रवीण म्हणाला आणि त्याने मोठा पॉज घेतला.
आता हा काय बोलणार आहे या विचाराने नम्रता च हृदय धडधडत होतं! तिने नजर खाली केली होती आणि फक्त त्याचं बोलणं ऐकत होती...
"नमु!.... मला ना खूप भूक लागली आहे आता.." तो म्हणाला.
त्याच्या या वाक्याने नम्रता ने फक्त त्याच्याकडे बघितलं आणि ती काहीही react झाली नाही. प्रवीण ला आपण काहीतरी माती खाल्ली हे जाणवलं आणि त्याचं तोंड बघण्यासारखं झालं होतं.... हे बघून नम्रता एकदम खळखळून हसली.
"हो रे मला पण भूक लागली आहे...." ती हसत हसत म्हणाली.
काही वेळातच तिच्या आईने त्या दोघांना जेवायला हाक मारली. स्वयंपाक घरातून मस्त पुलावाचा सुगंध येत होता त्यामुळे अजूनच सगळ्यांची भूक वाढत होती. या सगळ्यात साडे आठ होऊन गेले आणि मस्त गरमा गरम पुलाव त्यावर तुपाची धार, लोणचं आणि पापड ताटात पाहून सगळ्यांनी मस्त पैकी त्यावर ताव मारला.
"बेत तर एकदम मस्तच झाला! किती दिवसांनी असं घरचं, आयतं खाल्लं! बरं, चला आता आम्ही सगळं आवरून घेतो... नमु! चल मदतीला..." तिची आई म्हणाली आणि बाकी सगळं आवरू लागली.
नम्रता आणि तिची आई आवरू लागले. प्रवीण ची आई सुद्धा मदतीला होतीच! बघता बघता दहा वाजत आले.
"दोन तासात घरी सोलो सेशन सुरू होईल... देवा! काही अघटीत नको व्हायला... एकदा या सगळ्यातून सोडव!" प्रवीण ची आई म्हणाली.
"नका काळजी करू! होईल सगळं ठीक... हवं तर आपण आज रात्रभर जागून ग्रंथाचं पारायण करायचं का?" नम्रता ची आई म्हणाली.
"हो आई! मस्त कल्पना आहे. म्हणजे, डोक्यात नको नको ते विचार पण येणार नाहीत आणि मन सुद्धा शांत राहिल... तसंही आज कोणाला झोप लागणार नाही..." नम्रता ने सुद्धा सहमती दर्शवली.
सगळे याला तयार झाले आणि तशी तयारी सुरू झाली.
***************************
प्रवीण च्या घरी आता सोलो सेशन ची तयारी सुरू होती. एव्हाना १२ वाजून गेले होते. या वेळात अतृप्त शक्ती जरा जास्त प्रमाणात प्रतिसाद देतात म्हणून आत्ता तरी काहीतरी हाती लागेल याची टीम ला खात्री होती. सगळी तयारी करून झाल्यावर त्यांच्या प्लॅन नुसार शॉन ते सेशन करणार होता तर बाकीचे सगळे प्रवीण च्या बिल्डिंग खाली त्याच्यावर कॅमेरा ने नजर ठेवणार होते.
"All the best! We are watching you... Don't worry... And don't lock the door... Just closed it." Meldon म्हणाला.
सगळ्या टीम ने सुद्धा त्याला शुभेच्छा दिल्या आणि पुन्हा प्रेयर घेऊन ते खाली गेले.
शॉन ने सगळा सेटअप पुन्हा बघितला. बाकी टीम मेंबर जसे गेले तसे त्या बाहुली चे अस्तित्व शॉन ला अजूनच प्रखरपणे जाणवू लागले. त्याने घराचे दार बंद केले. आता खोलीत आधी पेक्षा बराच गारवा जाणवत होता. थर्मामीटर मध्ये तापमान साधारण वीस डिग्री ने कमी झाल्याची नोंद येत होती. शॉन त्या बाहुली समोर खुर्ची घेऊन बसला.
"I know you are in that डॉल! तुला माहित आहे का? तू आता alive नाही..." शॉन ने बोलायला सुरुवात केली.
"निघून जा..." अचानक एकदम रागीट आवाज आला.
"Who are you? कोण आहेस तू? का त्या मुलांना त्रास देतोय?" शॉन ने पुढे विचारलं.
"निघून जा...." अजूनच रागाच्या सुरात आवाज आला.
शॉन काही तिथून जात नाही हे बघून तो बाहुली मधला आत्मा खूपच चवताळला होता! पण, शॉन वर हल्ला करायला त्याला जमत नव्हतं! गुरुजींनी जे बंधन घालून दिलं होतं ते त्याला अडवत होतं!
"मला माहित आहे तू माझं काहीच वाईट करू शकणार नाही... Just tell me who are you?" शॉन ने विचारलं.
थोडा वेळ गेला तरी काहीही रिस्पॉन्स आला नाही. तो आत्मा त्या बंधनातून निसटला तर नाही ना म्हणून शॉन ने त्याच्या कडे असणारे दुसरे मशीन काढले आणि तिथे ठेवले. त्यात तिथे पॅरा नॉर्मल activity आहे याचे संकेत मिळत होते पण काहीही हालचाल जाणवत नव्हती. त्याने ती बाहुली थर्मल कॅमेरा मधून बघू असं ठरवून कॅमेरा त्या बाहुलीच्या दिशेने नेला आणि अचानक तो कॅमेरा बंदच पडला!
"I know तूच हे केलं... दीपा ला पण तूच त्रास दिला ना?" शॉन ने विचारलं.
"हो...." त्या बाहुली मधून आवाज आला.
"का? तुला कोणी सांगतंय का हे करायला?" शॉन ने पुन्हा विचारलं.
"मारून टाकेन... निघून जा...." आधी पेक्षा एकदम रागाच्या सुरात एक आवाज आला.
शॉन हे सगळं रेकॉर्डर मध्ये रेकॉर्ड करत होता आणि त्याच्या टीम ला पण हे दिसत होतं. आता तर आत्मा खूपच जास्त चिडला आहे असं जाणवत होतं! घरात असणाऱ्या लाईट आता बंद चालू होत होत्या आणि शॉन च्या कॅमेरा ची फुल केलेली बॅटरी सुद्धा पूर्ण डाऊन झाली. त्याबरोबर तिथे लावलेले जे कॅमेरे होते ते सुद्धा एक एक करून बंद झाले आणि टीम ला आता काहीच दिसत नव्हतं! लगेचच परिस्थिती ची जाणीव होऊन सगळ्या टीम ने त्याच्या घराकडे धाव घेतली.
"डीन! Are you sure you charge all camera batteries?" Meldon ने पायऱ्या चढता चढता विचारलं.
"येस... I think that spirit take all that energy..." डीन म्हणाला.
तोवर ते सगळे प्रवीण च्या घरी पोहोचले. घरात अजून सुद्धा लाईट चालू बंद होत होतेच...
"शॉन! Are you all right?" डीन ने पटकन आत जाऊन बघितलं आणि विचारलं.
शॉन त्या खोलीत कुठेच दिसत नव्हता! त्यामुळे त्यांच्या चिंतेत भर पडली होती.
क्रमशः.....
****************************
हे सोलो सेशन कितपत कामी आलं असेल? टीम ला काही समजेल का? की आता ती बाहुली टीम ला त्रास देईल? शॉन कुठे गेला असेल? दीपा ला मुक्ती द्यायची म्हणजे आता पुन्हा बेटावर जावं लागेल? पाहूया पुढच्या भागात...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा