Login

एक बेट मंतरलेलं (भाग -३६) #मराठी_कादंबरी

Horror island story. Horror Marathi kadambari. Ira blogging horror stories. Horror dalls island story.

एक बेट मंतरलेलं (भाग -३६) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
मयुर ची आई त्याच्या रूम मध्ये आली. ती तिथे आलेली सुद्धा या सगळ्यांना समजलं नाही! सगळे मस्ती करण्यातच दंग होते. 

"पोरांनो! काय भुका लागल्या की नाहीत? की आज फक्त मस्ती करून पोट भरणार?" त्याची आई म्हणाली. 

"नाही आई! खूप कडकडून भूक लागली आहे!" मयुर म्हणाला. 

"चला मग सगळे... स्वयंपाक तयार आहे." त्याची आई म्हणाली आणि सगळे तिच्या मागे हॉल मध्ये आले. 

Investigator टीम आणि मुलं आधी जेवायला बसले. बटाट्याची काचऱ्याची भाजी, पोळी, भात आणि आमटी असा साधाच बेत होता. चवीला भाजलेले पापड आणि लोणचं! सगळे मस्त पोटभर जेवले. 

"Thanks for lunch." शॉन म्हणाला. 

"त्यात thanks काय? तुम्ही खास आमच्या साठी इथवर आलात आणि आमची मदत करताय तर तेवढं आदरातिथ्य तर आम्ही करूच शकतो ना!" मयुर ची आई म्हणाली. 

"आदर what?" शॉन ने विचारलं. 

"आदरातिथ्य! म्हणजे पाहुणचार! Guest ची काळजी घेणे." त्याची आई म्हणाली. 

"ओके... आमच्या टीम ने हे फक्त इंडिया मध्येच experience केलं आहे. जेव्हा पण आम्ही इथे येतो आम्हाला आमच्याच होम मध्ये असल्याचं feel होतं." डीन म्हणाला. 

"आहेच ती इंडिया ची खासियत..." प्रवीण ची आई म्हणाली. 

"बरं! आता कोणाच्या घरी जायचं?" प्रवीण च्या बाबांनी विचारलं. 

"समृध्दी! Because प्रवीण and नम्रता च्या घरी टाईम लागेल." Meldon म्हणाला. 

"ओके! चला मग..." समृध्दी चे बाबा म्हणाले. 

"No.. first take your lunch.. we will wait here..." शॉन म्हणाला. 

सगळे पालक जेवायला बसले. त्यांचं जेवण होईपर्यंत investigator टीम मुलांसोबत गप्पा मारून अजून ओळख आणि केस बद्दल माहिती जमा करत होती. त्यांच्या बोलण्यातून त्यांना अजून माहिती मिळत होती शिवाय ओळख सुद्धा अजून चांगली झाल्याने त्यांच्या कामात त्याचा नक्कीच वापर होणार होता. या वेळात त्यांनी तिथे बेटावर प्रत्येक मिनिटाला काय घडत गेलं होतं याची पूर्ण माहिती घेतली. त्यांची टीम त्यातले काही पॉइंट्स लिहून सुद्धा ठेवत होते. मुलांच्या बोलण्यात जी काही नावं, बाहुल्यांचे रूप अश्या खास गोष्टी येत होत्या त्या सगळ्या यांनी लिहून घेतल्या. तोवर मुलांच्या पालकांचं जेवण झालं! आता सगळ्यांचा मोर्चा वळला समृध्दी च्या घरी. तिच्या घरी पोहोचल्यावर टीम ने जसा सेटअप मयुर च्या घरी लावला होता तसाच इथे सुद्धा लावला आणि त्यांच्या तपासाला सुरुवात झाली! 

"हॅलो! इथे आहे का कोणी?" शॉन ने बोलायला सुरुवात केली. 

त्याच्या हातात रीडिंग साठी k2 मीटर होता आणि sound recording divice, थर्मल कॅमेरा, स्पेशल बोलण्यासाठी, ऐकण्यासाठी चे मशीन आणि असे बरेच मशीन टीम कडे होते. डीन लॅपटॉप घेऊन बसला होता आणि बाकीचे सगळे त्यांचं काम करत होते. शॉन बोलत होता पण काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांनी सगळ्या खोल्या तपासल्या पण काहीही हाती लागलं नाही! आता फक्त समृध्दी ची खोली बघायची बाकी होती. सगळे तिथे गेले! त्यांच्या डिव्हाईस वर काहीतरी रीडिंग मिळतायत असं त्यांच्या टीम ला वाटत होतं. 

"We know.. जे कोणी आहे ते इथेच आहे.. आम्ही तुम्हाला hurt करणार नाही... Just talk with us..." Meldon K 2 मीटर च रीडिंग बघून म्हणाला. 

तरीही काहीही हालचाली जाणवत नव्हत्या! टीम कडे असणाऱ्या थर्मामीटर मध्ये खोलीच्या एका कोपऱ्यात खूप कमी तापमान दाखवत होतं! त्यामुळे नक्कीच तिथे आत्मा आहे हे टीम ला समजलं. 

"हॅलो! Who are you? We can help you.. आम्ही तुमची इथून सुटका करू... Plz आमच्या समोर या.." शॉन म्हणाला. 

"श्राद्ध!" एकदम कमी आवाज त्यांच्या टीम ला ऐकू आला. 

त्यांचं हे सगळं काम बाकी सगळे खोली बाहेर उभं राहून बघत होते. कोणालाही काहीही समजत नव्हतं. अचानक शॉन त्यांच्या जवळ आला.

"श्राध means?" त्याने विचारलं. 

"श्राद्ध! श्राद्ध म्हणजे माणूस गेला की त्याचे क्रियाकर्म करतात त्याला श्राद्ध म्हणतात." नम्रता च्या बाबांनी सांगितलं. 

"ओके.." शॉन म्हणाला आणि तो पुन्हा खोलीत गेला. 

"Listen! First tell us who are you?" शॉन ने विचारलं. 

बराच वेळ काहीही प्रतिसाद आला नाही म्हणून सगळ्यांनी त्यांच्या मशीन चा वापर करून तिथली तपासणी केली पण काहीही हाती आलं नाही. आता तिथे सगळे रीडिंग सुद्धा नॉर्मल येत होते. बहुदा जो आत्मा तिथे होता तो निघून गेला आहे असं टीम ला वाटलं आणि ते बाहेर आले. 

"सर! तुम्ही अचानक श्राद्ध वैगरे का विचारत होतात?" समृध्दी च्या बाबांनी काळजीने विचारलं. 

"Because इथे आम्हाला काही evidence मिळाले! But we don't think that this is serious!" शॉन म्हणाला. 

"म्हणजे?" समृद्धीच्या आईने गोंधळून विचारलं. 

"Listen it carefully..." डीन त्याचा लॅपटॉप स्पीकर ला जोडून म्हणाला. 

आता काय झालं आहे हे जाणून घेण्यासाठी सगळ्यांचे कान टवकारले गेले. डीन ने ती ऑडियो क्लिप आवाज वाढवून आणि थोडी slow करून प्ले केली. त्यात त्या आत्म्याने बोललेला "श्राद्ध" शब्द सगळ्यांना स्पष्ट ऐकू आला. 

"आई.... आ.. आपल्या घरात...." समृध्दी आईला बिलगून घाबरून म्हणाली. 

"Plz.. don't be अफ्रेड!" Raymond तिला समजावत म्हणाला. 

"येस... Just do that pooja.. तुम्हाला आधी इथे काही hurt झालं नाही तर आता पण होणार नाही..." शॉन ने समजावलं. 

"ओके.. आम्ही इथे राहायला यायच्या आधी म्हणे एक मुलगी इथे राहायची! पण, तिच्या घरच्यांनी तिची काहीही क्रिया कर्म केली नाहीयेत... बहुदा तीच असेल ती... आम्ही तिच्यासाठी आता लवकरात लवकर करू सगळं." समृध्दी चे बाबा म्हणाले. 

त्यांचं हे बोलणं झालं आणि एक मंद हवेची झुळूक तिथून गेली. टीम ने समजावून सांगितल्या मुळे आणि बाकीच्यांच्या आधाराने समृध्दी सुद्धा आता सावरली होती. त्यांच्या घरात ज्या मुलीचा आत्मा आहे तिचा या केसशी काहीही संबंध नव्हता पण, या शोधात एका आत्म्याला मुक्ती नक्कीच मिळणार होती. समृद्धीच्या बाबांनी लगेच चौकशी करून त्या मुलीच्या घरचा नंबर मिळवून त्यांना याबद्दल कल्पना दिली! आता तिची शेवटची इच्छा, तिच्या मुक्तिचा मार्ग मोकळा होता. तोवर हे सगळे नम्रता च्या घरी आले. 

"Waw! इथे एकदम peaceful feel होतं." शॉन ने घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या सांगितलं. 

सगळ्या घरात छान धूप, उदबत्तीचा सुवास पसरला होता! बाप्पाची तेजस्वी मूर्ती निरांजनाच्या प्रकशात अजूनच उजळून दिसत होती आणि संपूर्ण घरात अगदी भक्तीमय आणि सकारात्मक स्पंदने जाणवत होती. तेच शॉन आणि त्यांच्या टीम ला जाणवलं! 

"Thanks... या ना तुम्ही आत.." नम्रता ची आई म्हणाली. 

सगळे हॉल मध्ये बसले. Investigator टीम ने त्यांचा सेटअप केला. सगळी तयारी एकदा बघून झाल्यावर शॉन बोलू लागला; "where is that डॉल?" 

"दीपा ना! एक मिनिट हा घेऊन येते... माझ्या रूम मध्ये आहे.." नम्रता म्हणाली आणि तिने रूम मधून दीपा ला आणलं. 

दीपा ला बाहेर आणल्या बरोबर त्यांच्याकडे असलेल्या K 2 मीटर चे रीडिंग high वर पोहोचले. नक्कीच मुलं म्हणतात तसा दीपा मध्ये आत्मा आहे हे आता वैज्ञानिक दृष्ट्या समोर आले. Meldon ने नम्रता च्या हातून दीपा ला घेतलं आणि समोर असलेल्या टी पॉय वर ठेवलं. 

"दीपा! आम्ही तुला आझाद करायला आलो. Tell us तू या डॉल मध्ये कशी अडकली?" शॉन ने विचारलं. 

तरी काहीही आवाज आला नाही की काही संकेत मिळाले नाहीत. बहुदा दीपा ची शक्ती कमी पडत असावी असा निष्कर्ष investigator टीम ने काढला. 

"सर! काय झालं? दीपा काही रिस्पॉन्स देतेय का? काय करावं लागेल तिच्या मुक्तीसाठी? आम्ही सगळं करू.. पण, दीपा ला मुक्ती ही मिळालीच पाहिजे..." नम्रता त्यांच्याकडे आशेने बघत म्हणाली. 

"Wait! No response... We will try our best.." डीन ने सांगितलं. 

टीम मध्ये काहीतरी चर्चा सुरू झाली. सगळे तिथेच आता हे काय करतील म्हणजे दीपा बोलू लागेल याची वाट बघत होते. नम्रता च्या चेहऱ्यावर जरा काळजी दिसत होती! तिला काहीही करून दीपा ला मुक्ती मिळवून द्यायचीच होती. थोडावेळ त्यांची चर्चा झाली आणि मग काहीतरी प्लॅन ठरला. 

"We are making one device to provide some strength to Deepa!" शॉन ने सांगितलं. 

"म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? ते डिव्हाईस बनवायला किती वेळ लागेल?" नम्रता च्या आईने विचारलं. 

"Once we bring all material then within half hour Dean will make that." Meldon ने सांगितलं. 

"ओके... तुम्हाला काय काय सामान लागेल?" नम्रता च्या बाबांनी विचारलं. 

"ते आम्ही शॉपिंग करून घेऊन येऊ.. डोन्ट वरी.." Raymond ने सांगितलं. 

"पण नक्की त्या मशीन ने दीपा बोलेल का?" नम्रता ने काळजीने विचारलं. 

"We hope... ते डिव्हाईस दीपा ला strength देईल... Mostly सोल ला अशी strength provide केली की ते communicate करतात! We need to supply them Electro Magnetic energy. Then only she will be able to communicate" Dean ने थोडं फार समजावून सांगितलं. 

"ओके.. जे करायचं ते करा.. पण, प्लीज दीपा ला मुक्ती मिळवून द्या... तिला काही त्रास होत असेल तर आपण तिला त्यातून सोडवलं पाहिजे..." नम्रता एकदम भावूक होऊन म्हणाली. 

तिला प्रवीण आणि तिच्या आईने सावरलं आणि टीम ने सुद्धा आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय म्हणून आश्र्वस्थ केलं. डीन आणि शॉन त्यांच्या डिव्हाईस साठी काय सामान लागेल ते आणायला गेले. बाकी सगळे तिथेच होते. नम्रता दीपा ला घेऊन बसली होती. तिच्या मनाची सतत चलबिचल होत होती. 

"नमु! अगं नको एवढी काळजी करुस.... दीपा बोलेल. आता ही पॅरा नॉर्मल investigator टीम करतेय ना सगळं? अगं उलट तूच यांना जे जे आठवतंय दीपा बद्दल ते सांग... कदाचित त्यांना यातून पण मदत होईल..." तिच्या आईने तिच्या बाजूला बसून तिला जवळ घेऊन समजावलं. 

"हम्म!" नम्रता ने डोळे पुसले आणि थोडं पाणी पिलं. 

नम्रता ने थोडावेळ विचार केला आणि तिला दीपा ने जे स्वप्नात येऊन सैतान, सावध हे शब्द सांगितले होते ते आठवले. लगेचच तिने याबद्दल त्यांना सांगितलं. 

"Ohh.. means that day she use all her energy..." Raymond म्हणाला. 

"म्हणजे आता तिला शक्ती???" नम्रता बोलता बोलता थांबली. 

"डोन्ट वरी.. आपण high power डिव्हाईस बनवू... So, we can get some clues.." Meldon म्हणाला. 

आणि लगेचच त्याने डीन ला फोन करून आपल्याला high power डिव्हाईस बनवावं लागेल याबद्दल कल्पना दिली. त्यानंतर गुरुजींनी त्यांना ज्या काही सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या सुद्धा सांगितल्या. त्या दिवशी जे काही त्या वाईट बाहुली मुळे दीपा सोबत झालं ते अगदी बारकाव्या सकट पूर्ण जसाच्या तसा प्रसंग आठवून नम्रता ने सांगितलं. Meldon आणि Raymond ते सगळं नोट डाऊन केलं. 

क्रमशः....
**************************
Investigator टीम कोणतं डिव्हाईस बनवणार असेल? त्यातून नक्की दीपा ला ताकद मिळेल का? ती तिच्या मुक्ती बद्दल सांगू शकेल की अजूनही अंशतः तिच्यावर सैतानाचा प्रभाव असेल का? पाहूया पुढच्या भागात.. तोवर आजचा हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. 

🎭 Series Post

View all