Login

एक बेट मंतरलेलं (भाग -३९) #मराठी_कादंबरी

Horror island story. Marathi horror kadambari. Ira blogging horror stories. Ira free stories.

एक बेट मंतरलेलं (भाग -३९)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
आधीच रात्रीचे १:३० वाजून गेले होते! यात आत्मा जरा जास्त प्रमाणात त्याची शक्ती वापरतो म्हणून सगळे काळजीत होते. शॉन ला टीम ने मिळून सगळ्या घरात शोधलं! तर तो प्रवीण च्या बेडरूम मध्ये पडला होता.

"Shawn! Are you all right? What happened here?" Meldon ने त्याला उठवत विचारलं.

"Yaa! I'm fine now...." शॉन उठून बसत म्हणाला.

तोवर डीन ने त्याला पाणी दिलं!

"What happened here?" Raymond ने विचारलं.

"That doll! She is more powerful now!" Shawn ने सांगितलं.

"Exactly what happened?" Meldon ने विचारलं.

"She tried to attack" शॉन म्हणाला आणि  तिथे जे जे घडत होतं ते सगळं सांगितलं. ती बाहुली चिडून फक्त निघून जा असं सांगत होती तरीही तो तिथे थांबून तिच्याकडून माहिती काढून घ्यायच्या प्रयत्नात होता ते त्या बाहुलीला रूचलं नाही आणि जेव्हा शॉन ने दुसरे कॅमेरे काढले तेव्हा त्यात असणाऱ्या electro Magnetic energy मुळे त्या बाहुली ला शक्ती मिळाली आणि तिने शॉन वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण, आधीच बंधनात असल्यामुळे जास्त प्रभाव शॉन वर पडला नाही! तिने केलेल्या हल्ल्यामुळे थोडावेळ त्याने त्याचं भान हरपलं होतं आणि म्हणूनच तो प्रवीण च्या बेडरूम मध्ये कसा येऊन पडला हे त्यालाच माहीत नव्हतं!

"I have one device! This can help us to reduce the excess power of that doll" Dean म्हणाला.

लगेचच त्याने त्याच्याकडे असणारं एक मशीन काढलं आणि बाहेर हॉल मध्ये येऊन त्या बाहुलीच्या बाजूला ठेवलं. त्या मशीन ला दोन वायर होत्या! एका बाजूला चिमट्या सारखा भाग तर दुसऱ्या बाजूला USB! डीन ही सगळी तयारी करे पर्यंत Meldon, Raymond आणि शॉन सुद्धा बाहेर आले. शॉन जसा तिथे आला तसे त्या बाहुली चे डोळे त्यालाच बघत आहेत असं त्याला वाटू लागलं.

"Guys! Look at this doll.... She is looking at me..." तो म्हणाला.

बाकी सगळ्यांना पण तिथे खूपच अस्वस्थ वाटत होतं. या सगळ्यात सव्वा दोन होऊन गेले होते. कधी एकदा या बाहुलीच्या शक्ती कमी करता येतील आणि सकाळ होते असं टीम ला वाटत होतं! हे तिघे बाहुली समोर उभे होते... डीन ने त्यांना तिकडून काहीतरी खूण केली.

"बोल.... काय हवं आहे तुला?" शॉन ने मुद्दाम विचारलं.

"निघून जा...." ती बाहुली पुन्हा म्हणाली.

पण, यावेळी डीन ने त्या बाहुली ला ते मशीन जोडल्या मुळे ती वरवर काहीही म्हणाली तरी तिच्यावर कोणत्या तिसऱ्या शक्तीचा प्रभाव आहे का हे कळणार होतं! डीन तिथेच लॅपटॉप घेऊन बसला होता आणि त्या मशीन ला connect असलेल्या अजून एका डिव्हाईस मुळे त्या बाहुलीच्या डोक्यात जे काही आहे ते समोर येणार होतं!

"We got information....." डीन म्हणाला.

"ओके! पॅकअप..." शॉन म्हणाला.

लगेचच सगळ्यांनी पॅकअप केलं आणि तिथून जायला निघाले. सगळे निघून चालले म्हणल्या वर त्या बाहुली च्या चेहऱ्यावर असूरी आनंद पसरला होता! पण, तिला हे माहीत नव्हतं की टीम अशीच निघून जाणार नाही... त्यांनी त्यांचं काम चोख केलं होतं. एव्हाना रात्रीचे २:४५ वाजले होते. सगळे तिथून निघाले आणि ज्या हॉटेल वर थांबले होते तिथे गेले. आता काही तासांचा आराम करून पुन्हा त्यांना सगळ्यांना याबद्दल सांगायला यायचं होतं.
***************************
इथे नम्रता च्या घरी छान भक्तीमय वातावरण निर्माण झालं होतं! सगळे अगदी तल्लीन होऊन पारायण करत होते. रात्रभर एकही मिनिट न झोपता सुद्धा त्यांचा चेहरा एकदम टवटवीत आणि प्रसन्न होता. मनावर असलेलं खूप मोठं ओझं हलकं वाटत होतं! आपल्या घरात ती वाईट शक्ती आहे, ती बाहुली काही त्रास देईल का हे सगळे विचार केव्हाच दूर गेले होते आणि आता सगळं पूर्ववत होणार याची खात्री त्यांना पटत होती. साधारण ब्रह्म मुहूर्तावर त्यांचं पारायण करून झालं आणि बाप्पाला मनोभावे नमस्कार करून त्याच्या चरणी आजचं हे पारायण अर्पण करून सगळे उठले.

"किती प्रसन्न वाटतंय....." प्रवीण म्हणाला.

"हो! एरवी इतका वेळ जागरण जमत सुद्धा नाही आणि नंतर त्रास होतो.... पण, आज खूप छान वाटतंय... असं वाटतंय जणू अंगात एक नवीन शक्ती संचारली आहे..." प्रवीण ची आई म्हणाली.

"बघा आता सगळ्यांना असंच प्रसन्न वाटेल... आपलं पारायण झालं आहे... आता एव्हाना ३:३० होऊन गेले आहेत आणि एवढं छान भक्तीमय वातावरण तयार झालं आहे तर झोपायला नको... आपण इथेच बसून भक्तिरसात न्हाऊन घेऊ...."  प्रवीण चे बाबा म्हणाले.

"चालेल.... मी सगळ्यांसाठी मस्त कडक चहा करून आणते.." तिची आई म्हणाली आणि ती किचन कडे वळली.

सगळे तिथेच बाप्पाच्या मूर्ती जवळ आराधना, भजन करत त्याच्या भक्तीत भिजत होते. यात कधी सात वाजून गेले समजलं सुद्धा नाही.

"चला... आता रोजच्या रूटीन ला सुरुवात केली पाहिजे...." नम्रता ची आई म्हणाली.

"हो.... म्हणा; गणपती sss बाप्पा sss....." नम्रता म्हणाली.

सगळे एका सुरात "मोरया sss" म्हणाले.

आणि नमस्कार करून उठले. त्यांची रोजच्या कामाला सुरुवात झाली. सगळं होई पर्यंत दहा वाजून गेले आणि एवढ्यात प्रवीण च्या बाबांचा फोन वाजला. शॉन चा फोन होता. त्यांनी फोन घेतला.

"हॅलो! Good morning" ते म्हणाले.

"Good morning! आम्ही 11 o'clock पर्यंत तुमच्या घरी येतो.... Inform everyone to come here... Yesterday night we got   lot of information about doll." शॉन म्हणाला.

"ओके.." प्रवीण चे बाबा म्हणाले आणि त्यांनी फोन ठेवला.

लगेचच त्यांनी याबद्दल घरी सगळ्यांना सांगितलं. नम्रता च्या बाबांनी लगेच बाकीच्यांना याबद्दल सांगितलं आणि तासाभरात निघायचं आहे म्हणून सगळे आवरू लागले. बरोबर ११ वाजता सगळे तिथे पोहोचले. Investigator टीम तिथे आधीच येऊन थांबली होती.

"सर! काही काळजी करण्यासारखं नाहीये ना?" प्रवीण च्या बाबांनी विचारलं.

"Actually yes! But, we find the way to get rid" शॉन म्हणाला.

"म्हणजे? नक्की काय झालं आहे?" प्रवीण च्या आईने काळजीने विचारलं.

लगेचच टीम ने कालचे सगळे रेकॉर्डिंग त्यांना दाखवायला सुरुवात केली. त्यात शॉन चे सोलो सेशन, मध्येच सगळे लाईट चालू बंद होणे, कॅमेरा बंद होणे हे सगळं दिसत होतं! त्यावरून काल इथे काय हाहाकार झाला असेल याची त्यांना कल्पना आली.

"सर! इथे तर त्या बाहुली च्या शक्ती जास्त आहेत.... तुमच्या टीम पैकी कोणाला काही झालं नाही ना?" मयुर च्या बाबांनी विचारलं.

"नो.... ती डॉल आधीच कॅच केली होती so, ती जास्त energy माझ्यावर नाही वापरू शकली... After that we did one more session and we got some information.... Listen carefully..." शॉन म्हणाला.

लगेचच डीन ने ऑडियो एम्पलिफाय करून आणि background voice थोडा लो करून सगळं सेटअप केलं आणि तो ऑडियो चालू केला.

"सैतान, रक्त पिशाच्च!" हे आवाज त्यात ऐकू येत होते.

"हेच तर दीपा सुद्धा म्हणत होती.... ही बाहुली सुद्धा तेच म्हणतेय... याचा अर्थ काय?" नम्रता ने विचारलं.

"सांगतो..." शॉन म्हणाला.

आणि त्याने लगेच काल दुसरं डिव्हाईस लावून जी काही माहिती मिळाली ती सांगायला सुरुवात केली; "काल आम्ही या डॉल मधून एक्सेस पॉवर remove केली आहे. ही डॉल तिच्या पॉवर use करून other bad spirit सोबत communicate करायला try करत होती. तिच्या excess power remove केल्यामुळे आता ती त्यांच्याशी काहीच communicate करू शकत नाही."

"चला बरं झालं... म्हणजे आता दीपा ला मुक्ती देणं सोपं झालं..." समृध्दी म्हणाली.

"Not at all! आपण ज्या काही action घेत होतो त्याची information या डॉल ने दुसऱ्या स्पिरीट ना आधीच दिली असेल तर आपलं काम आता difficult आहे. That day Deepa told to break some idol.. so, we decided to go to that island as soon as possible..." Raymond ने सगळं सांगितलं.

"नाही... आता पुन्हा त्या बेटावर नाही जायचं..." मयुर ची आई म्हणाली.

"Don't worry.... This time we are prepare... कोणाला काही नाही होणार... जर तिथे जाऊन ती आयडॉल distroy नाही केली तर या मुलांना त्रास देईल तो evil..." शॉन ने समजावून सांगितलं.

"हो काकू! नका काळजी करू.... या समस्येचं मुळच जर नष्ट केलं तर यापुढे कोणालाच त्रास होणार नाही...." नम्रता म्हणाली.

"येस! She is right.... By the way, काल या डॉल च्या thinking मध्ये पौर्णिमा काहीतरी होतं.... That means?" Dean ने विचारलं.

"पौर्णिमा! अरे हो! आई आपण विसरलो... गुरुजींनी सुद्धा सांगितलं होतं पौर्णिमा होई पर्यंत विशेष काळजी घ्यावी लागेल.... मला वाटतंय अमन, श्वेता ची आमावस्या चुकली म्हणून पौर्णिमेला बळी द्यायचे असतील....." नम्रता म्हणाली.

"येस येस... She is trying to communicate like that only! One minute I'll show you...." Dean काहीतरी आठवून म्हणाला.

लगेचच त्याने लॅपटॉप वरून काहीतरी शोधलं आणि सगळ्यांना दाखवू लागला. त्यात ती बाहुली रक्त पिशाच्च आणि सैतानाशी जे बोलू पाहत होती ते सगळं तिथे लिहून आलं होतं. डीन ने जोडलेल्या मशीन मुळे तिची शक्ती कमी होऊन ते फक्त यांच्याकडे आलं होतं.

"चार ऐवजी आता आठ बळी आहेत... पौर्णिमा लागेल तेव्हा शक्तित वाढ सुरू होईल... मग या कोणाचं काही खरं नाही...." नम्रता ने लिहिलेलं वाचलं.

"अरे देवा! म्हणजे पौर्णिमा सुरू व्हायच्या आत काहीतरी करावं लागेल..." समृध्दी ची आई म्हणाली.

लगेच प्रवीण च्या आईने जाऊन पौर्णिमा कधी आहे बघितलं.

"पौर्णिमा परवा आहे.... एवढ्या कमी वेळात आता काय करायचं?" ती म्हणाली.

टीम ला सुद्धा ते काय लिहिलं आहे आणि बळी त्यांना आधी पासूनच हवे होते याबद्दल नम्रता ने सांगितलं.

"ओके... Don't worry... Let us think..." Shawn म्हणाला.

"सर! आपण आत्ता हे सगळं या बाहुली समोर बोललो आहे... तिला जर आपल्या पुढच्या हालचाली समजल्या तर ती काही अडथळे निर्माण करू शकते का?" नम्रता ने विचारलं.

तिच्या या प्रश्नाने सगळ्यांना काळजीत टाकलं. त्यांना असं काळजीत बघून Meldon ने बोलायला सुरुवात केली; "नाही.. तिच्या पॉवर remove केल्या आहेत... ती सध्या नॉर्मल डॉल आहे... जोवर तिला पॉवर मिळणार नाहीत ती काहीच action करू शकणार नाही..."

त्याच्या या बोलण्याने जरा सगळ्यांना धीर आला पण, आता परवा पौर्णिमा आहे आणि त्या आधी काहीतरी करावं लागेल या विचारात सगळे होते!

"सर! त्या बेटावर आम्ही गेलो होतो तेव्हा अमन, श्वेता ला एका पडक्या घरासारखं काहीतरी आहे ना तिथे बघितलं होतं... ती जागा खूप भयाण वाटत होती I guess तिथेच मूर्ती असेल जी आपल्याला नष्ट करायची आहे." नम्रता ने आठवून सांगितलं.

सगळे खेळत असताना नम्रता अमन, श्वेता च्या मागे गेली होती तेव्हा तिने ते घर पाहिलं होतं तेच तिला आठवलं आणि तिने आत्ता सांगितलं. आता ती मूर्ती कुठे असेल हे जरी माहीत असलं तरी स्वतःला प्रोटेक्ट करून तिथे कसं जायचं या विचारात सगळे होते.... मुलांच्या पालकांना तर पुन्हा सगळे बेटावर जायला निघाले तर या विचारानेच अंगावर काटा आला होता. एवढ्यात दारावरची बेल वाजली....

क्रमशः.......
**************************
आता या टेंशन च्या वेळी अचानक कोण आलं असेल? त्या बाहुली च्या शक्ती वाढून तिने रक्त पिशाच्च आणि सैतानाला काही सांगितलं असेल का? आता या आठही जणांचे बळी जाणार की बेटावर न जाताच काहीतरी मार्ग निघेल? पाहूया पुढच्या भागात...

🎭 Series Post

View all