एक बेट मंतरलेलं (भाग -४१)
© प्रतिक्षा माजगावकर
(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
नम्रता ने दीपा ला घट्ट धरून ठेवलं होतं! तर पॅरा नॉर्मल टीम ने प्रवीण ला त्याच्या घरात असलेली बाहुली जशीच्या तशी उचलून बॉक्स मध्ये टाकून आणायला सांगितली होती ती Meldon कडे होती. देवळातून घेतलेल्या धाग्याने ते बॉक्स बांधून ठेवलं होतं. सगळे चालत होते...
"इथून सगळ्या बाहुल्या असतात... पण, आत्ता इथे एकही बाहुली कशी नाही!" नम्रता म्हणाली.
"May be पुढे असेल.. तुला लक्षात नसेल." डीन म्हणाला.
"नाही सर! इथूनच सुरू होतं...." नम्रता ठामपणे म्हणाली.
"हो... इथूनच सुरुवात होते..." दीपा बोलली.
त्या प्रांतात आल्या बरोबर दीपा पुन्हा बोलू लागली. आता तीच सगळं व्यवस्थित सांगेल आणि काम सोपं होईल म्हणून सगळे खुश झाले.
"दीपा! ठीक आहेस ना? आम्ही सगळं बरोबर करतोय ना?" नम्रता ने तिला अधिरतेने विचारलं.
"हो... तुम्हाला खूप काही सांगायचं आहे.. इथून थोडं पुढे चला..." दीपा म्हणाली.
आता ती बोलू शकत होती तशीच चालत सुद्धा होती. सगळे दिपाच्या मागे जाऊ लागले.
***************************
अमन, श्वेता ने त्यांच्या पूर्ण शक्ती गमावल्या होत्या. पण, तांत्रिक बाबा ने त्यांच्या डोक्यात जो शंकेचा किडा सोडला होता त्यासाठी त्यांनी त्यांची सगळी शक्ती एकवटून आत डोकावून पाहिले होते. त्या बाबाने खरंच सांगितलं होतं! रक्त पिशाच्च आणि सैतान त्यांच्याशी खोटं वागून फक्त त्या दोघांचा उपयोग करून घेत होते हे दोघांच्याही लक्षात आलं. दोघांच्या तळपायाची आग मस्तकात जात होती पण, शक्ती अभावी दोघं काहीच करू शकत नव्हते. रक्त पिशाचाला आपल्याला हे समजलं आहे हे त्यांना कळू द्यायचं नव्हतं म्हणून दोघं बाहेरून लपून ती अर्ध मूर्ती आता काय करतेय हे बघत होते.
"हा... हा... हा.... आता सगळीकडे फक्त माझं राज्य! दोघं मूर्ख माझ्या जाळ्यात बरोबर अडकले!" ती अर्ध मूर्ती स्वतःशीच हसत बडबडत होती.
अमन, श्वेता ला तर हे समजलं होतं पण तिथून काहीही आवाज न करता ते दोघं पुन्हा बाहेर येऊन बसले. आपण यांच्या जाळ्यात अडकलो आणि सगळ्या शक्ती गमावून बसलो आहोत तर आता काय करायचं याच मनःस्थितीत ते दोघं होते! राग तर पार शिगेला पोहोचला होता पण, कोणा तिसऱ्याचा मदती शिवाय आता हे दोघं काहीच करू शकत नव्हते. रक्त पिशाच्च इतके दिवस बळी मिळणार, बळी मिळणार म्हणत होतं त्याचा अर्थ दोघांना आत्ता लागला होता! बळी आणण्या साठी यांच्या सगळ्या शक्ती घालवून त्यांना कमकुवत करायचं आणि नंतर आपणच शक्तिशाली व्हायचं! पौर्णिमेची रात्र झाली की, या दोघांचं रूपांतर मूर्तीत होणं निश्चित होतं! हे सगळं टाळण्यासाठी आता शांत बसून दोघं विचार करत होते.
****************************
इथे सगळी टीम दीपा बरोबर आली. त्यांनी जिथे कॅम्प लावला होता त्याच ठिकाणी सगळे आले. तसंही सगळे चालून दमले होते. तिथे असणाऱ्या दगडावर सगळे बसले. आपापल्या बॅगेतून पाणी काढून पाणी पिवून थोडा खाऊ सुद्धा खाल्ला!
"इथे असणाऱ्या सगळ्या बाहुल्या कुठे असतील दीपा?" नम्रता ने विचारलं.
"पुढे पडक्या घरा सारखं आहे ते त्या पिशाचांचं देऊळ आहे... तिथेच असतील... पण, आपण सावध राहायला हवं! त्यांना आपण इथे आलो आहोत याची चाहूल लागलेच... आपण पूर्ण तयार असलं पाहिजे..." दीपा म्हणाली.
"Yes! We are ready... But इथे exactly काय काय होतं आणि तू इथे कशी अडकली हे सांग.... त्यानुसार आपला ट्रॅप लागेल.." शॉन ने दीपा ला सांगितलं.
ती काहीतरी बोलणार एवढ्यात कसला तरी आवाज झाला म्हणून सगळे सावध झाले... कुठून आवाज येतोय हे सगळे शोधू लागले तर लक्षात आलं की, Meldon कडे जे बॉक्स आहे त्यातून आवाज येतोय.. त्यात असणारी वाईट बाहुली त्या बॉक्सच्या बाहेर यायला बघत होती! पण, गुरुजींनी दिलेल्या धाग्याने ते बॉक्स बांधलं होतं म्हणून त्याचा काहीही उपयोग होत नव्हता.
"ही बाहुली आत्ता कमकुवत असली तरी पौर्णिमा लागल्यावर तिच्या शक्ती वाढतील.. आपल्याला त्याआधी काहीतरी करावं लागेल." दीपा ने सगळ्यांना सावध केलं.
"हो! सगळं काही ठरल्या प्रमाणे होईल.. आता तू फक्त सगळं डिटेल मध्ये सांग..." नम्रता म्हणाली.
लगेचच दीपा ने बोलायला सुरुवात केली; "मी जिवंत असताना युद्धाचा काळ होता! युद्धात माझा मृत्यू झाला पण, माझं बाळ लहान होतं त्यात माझा जीव अडकला होता म्हणून मला मुक्ती मिळू शकली नाही. नंतर कोणा एका मांत्रिकाने माझ्या सारखे बरेच आत्मे कैद केले आणि बाहुली मध्ये टाकले. त्या दिवसा पासून आम्ही सगळे इथे कैद आहोत! यातल्या काही जणांनी हा वाईट मार्ग स्विकारला, लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. अमन, श्वेता म्हणून तुम्ही ज्या पिशाच्यांना ओळखता ते दोघं पण याच मार्गावर पार पराकोटीला गेले! सैतान आणि रक्त पिशाच्च त्या दोघांवर खुश झाले आणि म्हणूनच त्यांना विशेष शक्ती मिळाल्या! रक्त पिशाच्च एका मूर्तीच्या स्वरूपात आहे... त्याला मुक्त करायचं असेल तर बळी लागणार आहेत आणि त्या बरोबर अमन, श्वेता सुद्धा सर्व शक्तिशाली होऊन सगळ्या जगावर अंधाराचं साम्राज्य निर्माण करणार हे त्यांचं उदिष्ट आहे." हे बोलताना दीपा चा कंठ दाटून आला होता. तिला यात असणारे भयानक सत्य किती वाईट ठरणार आहे याची पूर्ण कल्पना होती.
नम्रता, समृध्दी, मयुर आणि प्रवीण सगळ्यांनी मिळून तिला धीर दिला. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. पॅरा नॉर्मल investigators नी सुद्धा याआधी अशी केस हाताळली नव्हती! थोडा वेळ शांततेत गेला आणि मग दीपा पुन्हा बोलू लागली; "या सगळ्याला काही आत्म्यांनी विरोध केला होता, काहींनी इथून निसटून जाण्याचा प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ! आम्हाला बाहुली मध्ये टाकलं त्या दिवसापासून बाहुली आमचं शरीर झाली! तुम्ही डोळा फुटलेल्या, हात पाय मोडलेल्या बाहुल्या बघितल्या होत्या त्यांना या अमन, श्वेता नेच त्रास दिला आहे. शेवटी हा त्रास न सहन होऊन त्या वाईट मार्गाला लागल्या! तिथे असणारी रक्त पिशाचाची मूर्ती एकदा भंग केली की, सगळे मुक्त होतील यातून! वर्षानुवर्ष हा जाच सहन केला आहे... आता नाही सहन होत! सगळं आता तुमच्या हातात आहे." दीपा दुःखी सुरात बोलत होती.
पुन्हा त्या बॉक्स चा आवाज यायला लागला. यावेळी मात्र जरा जास्त जोरात आवाज येत होता. ती बाहुली जणू तिच्या सगळ्या शक्ती एकवटून बाहेर पडायचा प्रयत्न करत होती.
"तिच्यात दैवी बंधन तोडून बाहेर पडायची ताकद नाही..." दीपा तो आवाज ऐकुन म्हणाली.
"ओके! तू पुढे बोल... त्या सगळ्या doll's ऑनलाईन साईट वर कश्या आल्या?" डीन ने विचारलं.
"त्या दोघांनी त्यांची शक्ती वापरून एका माणसाला वश करून आणलं होतं! त्यांच्या प्रभावाखाली तो होता आणि म्हणून तो सगळं निमूटपणे करत होता! ही सगळी मुलं ज्या दिवशी इथे आली तेव्हा सुद्धा त्याला तिथे त्या घराच्या मागे दडवून ठेवलं होतं. त्याच्यावरचा प्रभाव कमी होत गेला आणि त्याला सत्य समजू लागलं तेव्हा त्याला मारून टाकलं!" दीपा ने सांगितलं.
"अरे देवा! म्हणजे आम्ही वाचलो पण तो बिच्चारा वाचू शकला नाही." मयुर म्हणाला.
एवढ्यात टीम कडे असणारे डिव्हाईस सिग्नल देऊ लागले. तिथे दीपा आणि त्या दुसऱ्या बाहुली व्यतिरिक्त तिसरी कोणती तरी शक्ती आहे याचे ते सिग्नल होते. लगेच सगळे सावध झाले.
"कोण आहेस तू?" शॉन ने विचारलं.
"सुटका..." थोडा हळू आवाज आला.
"तुला सुटका हवी आहे का? देऊ नक्की! त्यासाठी तुला आमची मदत करावी लागेल.." शॉन म्हणाला.
"हो..." पुन्हा आवाज आला.
त्यांचं बोलणं इतका वेळ त्या बेटावर काय काय घडत होतं, त्या बाहुल्या ऑनलाईन साईट वर कश्या गेल्या याबद्दल सुरू होतं आणि मध्येच अश्या शक्तीची जाणीव होणं म्हणजे नक्कीच हा त्या कॉम्प्युटर इंजिनियर चा आत्मा असणार अशी टीम ला शंका आली होती.
"तुलाच त्या डॉल ऑनलाईन सेल करायला इथे आणलं होतं?" डीन ने विचारलं.
"हो..." पुन्हा आवाज आला.
आता याच्याकडून बरीच माहिती गोळा होऊ शकते म्हणून टीम ने त्यांचं टेक्निकल काम करून बरीचशी माहिती मिळवली. त्यातून आता रक्त पिशाच्च अर्ध मूर्तीत आहे हे सुद्धा समोर आलं आणि आता आपल्याला वेगाने हालचाली केल्या पाहिजेत हे त्यांच्या लक्षात आलं. दीपा ने सांगितल्या प्रमाणे जोवर मूर्ती नष्ट करत नाही तोवर तिथल्या कोणालाच मुक्ती मिळणार नाही म्हणून सगळे आता त्या दिशेने वाटचाल करू लागले. एव्हाना दुपार होऊन गेली होती. थोडा आराम केल्यामुळे आत्ता जरा सगळ्यांनाच तरतरी आली होती. थोड्याच वेळात सगळे त्या पडीक घराच्या जवळ पोहोचले.
"Wait wait!" Meldon हाताने सगळ्यांना थांबवत हळू आवाजात म्हणाला.
"What happened?" Raymond ने विचारलं.
"तिथे काहीतरी आहे... Give me थर्मल कॅमेरा..." तो म्हणाला.
त्याने त्या कॅमेरा मधून बघितलं तर तिथे दोन सावल्या आहेत ज्या त्यांच्याच कडे बघतायत असं वाटत होतं.
"ते अमन, श्वेता आहेत! रक्त पिशाच्च आणि सैतानामुळे त्यांचं रूपांतर सावलीत झालं असावं." दीपा म्हणाली.
"अरे पण, हे दोघं त्यांच्यासाठीच तर काम करत होते... मग ही अशी अवस्था?" समृध्दी ने विचारलं.
"हो! पण, या वाईट विश्वात सगळे स्वार्थी असतात... रक्त पिशाच्च आणि सैतानाने मिळून काहीतरी डाव आखला असणार..." दीपा म्हणाली.
"चांगलं झालं! आता हे दोघं आपल्या साईड ने येऊन आपल्याला कशी हेल्प करतील बघूया..." शॉन काहीतरी ठरवून म्हणाला.
पुन्हा त्या बाहुलीचा बॉक्स जोर जोरात वाजू लागला. अमन, श्वेता च्या सावली ने ते ऐकलं आणि आपल्या जवळ कोणीतरी आलं आहे याची जाणीव सगळ्यांना होऊ लागली. मुलांनी एकमेकांचे हात घट्ट धरले होते आणि टीम त्यांना प्रोटेक्ट सुद्धा करत होती.
"आम्हाला माहीत आहे तुम्ही दोघं अमन, श्वेता आहात." शॉन म्हणाला.
त्याने हे बोलल्या नंतर लगेच तिथे जास्त हालचाली जाणवल्या. टीम कडे असणारे मीटर रेड सिग्नल पर्यंत गेले होते.
"तुमच्या दोघांच्या शक्ती कमी झाल्या आहेत आणि तुमच्या दोघांचा just use करून घेतला आहे... We can help you...." शॉन म्हणाला.
त्याच्या या वाक्याने श्वेता चिडली.
"मूर्ख..." हलकासा आवाज आला.
"See... आम्ही इथे तुमची हेल्प करायला आलो आहे... किती टाईम अजून असंच राहणार? We can help you!" शॉन म्हणाला.
"सर्व शक्तिशाली.... सैतान..." पुन्हा आवाज आला.
"काय होणार नुसतं शक्तिशाली होऊन? तुमचा trust ब्रेक केला आहे... Move on..." शॉन पुन्हा म्हणाला.
श्वेता आता खूपच चिडली होती. तिथे जोरजोरात वारे वाहू लागले आणि अचानक तापमानात खूपच जास्त घट होऊ लागली. अचानक दीपा हवेत उचलली गेली!
"दीपा!" नम्रता ओरडली आणि तिने दीपा ला धरलं.
नम्रता चा हात दीपा ला लागताच श्वेता ला जोरात धक्का बसला आणि ती मागे ढकलली गेली. थोडावेळ तिथे काहीच हालचाली जाणवल्या नाहीत. असं वाटत होतं जसं दोघं कुठेतरी लांब गेले आहेत आणि काहीतरी ठरवतायत किंवा घाबरून पळाले आहेत. सगळी कडे तपासून सुद्धा टीम च्या काहीही हाती लागलं नाही. म्हणून सगळे पुढे त्या पडक्या घराच्या दिशेने चालू लागले!
"दीपा! तुला सैतान कुठे असेल आणि तो अचानक आला तर काय करायचं हे माहीत आहे का?" समृध्दी ने विचारलं.
"आत्ता नाही येणार तो! उद्या येईल... पौर्णिमा लागायच्या काही तास आधी! त्या आधीच जर आपण इथलं काम केलं असेल तर त्याला यायला मिळणारच नाही.... पण, जर आपलं काम झालं नसेल आणि सैतान आला तर मग त्यांच्या शक्तित वाढ होईल..." दीपा ने सांगितलं.
क्रमशः.....
****************************
अमन, श्वेता चा काय नवीन डाव असेल? ती बॉक्स मध्ये असलेली बाहुली बाहेर आली आणि या वाईट शक्तिंमध्ये वाढ झाली तर काय होईल?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा