Login

एक भेट भाग २

मैत्री फक्त सांगून होत नाही.वेळ द्यावा लागतो नात बहरायला

मुक्ता आणि आर्या चा फोन झाल्यावर मुक्ता ने अजून निर्णय घेतला नाही... बघूया पुढे


दोघी ही नोकरी पेशा मुली होत्या पण गंमत अशी की एकीला थोडं तरी ताण सहन व्हायचा आणि एकीला बिलकुलच नाही. एकीला वेळ काढायला जमत होता, तर दुसरी ला बिलकुल नाही. अशाच गप्पांमधून या दोघींच्या काही कॉमन गोष्टी समोर आल्या आणि आज तब्बल तीन-चार महिने मुक्ताने जेव्हा आर्या ला फोन केलाच नाही, भेट झालीच नाही, तेव्हा आर्याने पुढाकार घेऊन तिला एक कॉल केला आणि भेटण्यासाठी वेळ ठरवली ..
“मुक्ता च नुकतच काम बऱ्यापैकी आवरलं होतं आणि आता ती टीव्ही समोर बसली तेव्हा संजय(मुक्ताच्या नवरा)ने तिला विचारलं, “काय ग कोणाचा फोन होता?”संजय “अरे आर्याच्या फोन होता. ती नाही का माझी मैत्रीण मी तुला बोलले होते बघ.”मुक्ता “काय म्हणते तुमची मैत्रीण”? काही खास”. संजय “काही नाही रे भेटायला बोलावत होती.. मला एक कळत नाही या मुलीला एवढा वेळ मिळतोच कसा ? मला मुलांकडे बघायचंय, घरातली कामे आवरायची आहेत रोज किती गोष्टी असतात करण्याच्या आणि आता  चुकून एक शनिवार मिळतो तर ते मी तिला भेटायला जाऊ…? किती धावपळ होईल माझी.. एक पण दिवस मला विश्रांती मिळणार नाही.”मुक्ता “अगं मग तिला नाही म्हणून सांग ना”..संजू“सांगितलं रे पण ती ऐकायलाच तयार नाही तिचं म्हणणं आहे की काय आहे ना खूप दिवस झाले भेटलो नाही, बोललो नाही ..”मुक्ता “अगं पण तू विचार करून बघ.. तुला जायचं असेल तर तु जा … इतक  म्हणत आहे तर भेटून ये एकदा” .. संजय “तुला काहीही खूप सोप्प वाटतं..मला घरातलं सगळं करून जावं लागतं आणि पुन्हा येऊन सगळं करायचं असतं आणि ह्या पोरींचा काय.. हे बाहेरून मागवतात खातात त्यांचं काम फार सोपं असतं बघा ..आपल्यासारखा आहे का ?”मुक्ता “का त्यांच्यात आणि आपल्यात काय वेगळं आहे?” संजय “आता तू सुद्धा पुढे रेघा ओढणार आहेस का संजय? मी तुला सांगते काय आहे की ,मला वेळ मिळत नाही मला खूप काम असतात रे …”मुक्ता “ठीक आहे. मी तुला हे विचारत होतो फक्त की, तुला काम असतात तशी सगळ्यांनाही असतात थोडंसं वेळ मॅनेज करायला शिका..”संजय “तुला कंटाळा येत नाही का रे ,मला बोलून बोलून… तुला काय वाटतं मला काहीच कळत नाही का? इथे इतकी काम आहेत ना की, त्यामुळे वेळ कसा जातो हेच कळत नाही. काय नाही मॅनेज केलं  मी?, काय एक मॅनेज करत नाही सगळ तर तुम्हाला घरीच्या घरी आयता देते तरी तुम्ही बोलता मला सगळे ..”मुक्ता 
“हे बघ मुक्ता, मी काही तुला बोललेलो नाहीये. मी तुला फक्त एवढे सांगत होतो की, काम सगळ्यांना असतात आपल्याला वेळ काढावा लागतो. तुला वेळ काढायचा असेल ,मैत्रिणीला भेटायचं असेल तर तू मॅनेज कर आणि राहता राहिला प्रश्न सगळं करून जाण्याचा तर मी आणि मुल  संध्याकाळी बाहेर जाऊ”..संजयबघ तुझं तू ठरव आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाहीये ..”
“हो ना प्रॉब्लेम फक्त मलाच आहेत.”. मुक्ता वैतागून 

क्रमशः
काय मग तुम्ही जर मुक्ता या जागी असाल तर काय निवड कराल? भेटायला जाणार का घरात एक सुट्टी घालवणार...
अवघड आहे आज वेळ. काढणं..नक्की प्रतिक्रिया द्या..

🎭 Series Post

View all