Login

एक भेट भाग ३

भेटणं गरजेच आहे, नात्याला वेळ देणं गरजेचं आहे..
मुक्ता थोडी जास्त वैतागली होती.... उगीचच संजय आणि तिच्यात वाद झाला.. संजय ने तर तास ही काही म्हटलं नाही..

मुक्ता जे काही बोलत आहे, थोड्या अंशी हा प्रकार सगळ्यांच्याच घरात आहे .आपण स्वतःला कामामध्ये इतकं बुडवून घेतो की, स्वतःसाठी वेळ काढत नाही .काम सगळ्यांचीच आहेत .आपण नाही केली तर ती नाही होणार आणि आपण केली तरी ती नाही संपणार ..

थोडीशी ताणतण करत टीव्ही बघत तिचा दिवस संपला .तिने तो विचार तिथे सोडला…बघू शुक्रवारी ठरवू.
दुसऱ्या दिवशी नित्यक्रमाने तिचं काम, तिचे मुलं हे सगळं व्यवस्थित चालू होतं आणि अशाच रोजनिशी प्रमाणे शुक्रवार येऊन ठेपला…. कॉलेज मध्ये ब्रेक मध्ये कॉफी घेत असताना तिच्या फोन मध्ये मेसेज पॉपअप झाला,” काय मग रेडी ना उद्या भेटायचं ना….?”
तशी मुक्ताच्या डोक्यात ट्यूब पेटली की ,”अरे बापरे आता उद्या भेटायचं आहे. माघार घेता येणार नाही आणि आता जावंच लागेल….”
“काय करू, काय करू? या विचारांमध्ये असतानाच.. संजय चा तिला फोन आला. संजय तिला काही फॉर्म भरण्यासाठी सांगत होता. ते सगळं सांगून झाल्यावर मुक्ताने विचारलं, “ संजय, उद्या काय करू ?”

“काय करू म्हणजे? कशाबद्दल विचारते आहेस ?”संजय
“अरे मी तुला सांगितलं होतं ना संजय.. तुझ्या ना काही लक्षातच राहत नाही माझ्या बाबतीत ,उद्या मला भेटायला जायचं नाहीये का आर्याला ..”मुक्ता

“ओ अच्छा, अग मी तुला त्याच दिवशी म्हणालो, तुझं जमत असेल तर तु जा ..आम्ही बघू काय करायचं ते घरी.. आमच्यासाठी म्हणून तू थांबू नकोस ऐक माझं एकदा जाऊन ये ..”संजय
“ठीक आहे बघते ..”मुक्ता
मुक्ता अजूनही विचार करत होती ,पण संजय ने ही तिला सांगितलं होतं आणि कुठेतरी आता तिला मागे फिरता येणार नव्हतं ,त्यामुळे तिने आर्याला होकार कळवला…भेटण्याचा दिवस उजाडला. आजची सुट्टी होती आणि संजय आणि मुलं आरामात उशिरा उठणार होते. मुक्ता मात्र रोजच्या प्रमाणे उठली. सकाळचा चहा नाश्ता आणि जेवण बनवत होती…थोडीशी चिडचिड चालू होती. कारण तिला बाहेर जायचं होतं आणि घरातला आवरायचं होतं.
सगळं आवरून करून दुपारी ती निघाली आणि जिथे भेट होणार आहे तिथे पोहोचली.
बघितले तर आर्या मस्त तयार होऊन आली होती. फोटो आणि रील साठी अगदी सज्ज ..मुक्ताला भेटल्याबरोबर तिने खूप चांगल्या पद्धतीने ग्रीट केल.
“काय मुक्ता कशी आहेस? किती दिवसानंतर भेटतेस यार ..एका शहरात असून पण आपली भेट होत नाही ..”आर्या
“हो ग काम खूप असतात…”मुक्ता जमतच नाही वेळ काढायला.. तू बोल काय म्हणतेस ?एकदम मस्त रेडी होऊन आली आहेस ..”मुक्ता
“अरे मग काय आलेली मोमेंट्स असे सोडणार नाही काय माहिती पुन्हा कधी भेटू ?”आर्या
दोघी बऱ्याच गप्पा मारतात ,बऱ्याच विषयांवर ती चर्चा होते आणि मग आर्या आणि मुक्ता मस्तपैकी फोटोज काढतात. तिथून बाहेर पडून पार्क मध्ये छोटासा वॉक करायचा त्यांचा प्लॅन असतो
.
क्रमशः
झाली बाबा एक भेट ह्या दोघींची...