संध्याकाळ पण झालेली असते आणि तळ्यामध्ये मावळत्या सूर्याचे किरण पडलेली असतात ,.
“चल बेंचवर बसुयात”मुक्ता
“हो बसूया चल..”आर्या
कुठेतरी मुक्ताला हा वेळ खूप छान गेला असं वाटत होता आणि अजून हा दिवस संपूच नये असे वाटत होता .. बऱ्याच वेळ मुक्त शांत होते .
“काय ग? काय झालं अचानक एवढी शांत झालीस ?”मुक्त एक विचारू का तुला ?”आर्या
“विचार ना ..”मुक्ता
“काही प्रॉब्लेम आहे का ? तु एकदम एवढी शांत झालीस, कमी बोलतेस म्हणजे मला माहित आहे की, मी तुला खूप आग्रह केला येण्यासाठी पण यार हे बघ कधीतरी मित्र-मैत्रिणींमध्ये भेटलं की बरं वाटतं .तुला काम सोडून यावं लागलं आणि एकच शनिवार आहे फॅमिली टाईम पण असेल पण तरीही तू आली त्यासाठी खरंच थँक्यू. मला ना एका चेंज ची गरज होती आणि मग आता तो चेंज मला माझ्या मैत्रिणी सोबत मिळणार होता म्हणून मी तुला आग्रह केला .सॉरी ग ..”आर्या
“खरं म्हणजे चेंज ची गरज मला पण होती ..सॉरी काय त्यात.. पण मला हे कळतच नव्हतं की आपल्याला थोडासा बदल करणे गरजेचे आहे .सकाळपासून संध्याकाळपर्यंत तीच तीच कामे आणि तीच तीच रुटीन फॉलो करायचा कंटाळा येतो आणि खरं आहे तुझं इतर दिवशी आपण काम करतो ना त्याच्यापेक्षा जास्त काम सुट्टीच्या दिवशी करतो कारण आपल्याला उरकायचं असतं…पण आज इथे येऊन इथे निवांत बसून खूप शांत आणि छान वाटत आहे आणि त्यासाठी खरं तर मी तुला थँक्यू म्हणायला पाहिजे .”मुक्ता
“मी जेवढे तुला ओळखते ना मुक्ता तेवढे मी तुला हे सांगेल की हे बघ काम सगळ्यांनाच असतात मला माहिती आहे की हे तुला माहित आहे पण थोडासा वेळ काढावा लागतो नाही तर मग आपल्याकडं ती रोजची काम सुद्धा नीट होत नाही आणि आपली घरात उगीचच तंतन होते चिडचिड होते मुलांवरती, घरच्यांवरती …”आर्या
“हो ग खर आहे. मी आता तोच विचार करत होते .आज दिवसभर मी तुझ्याशी गप्पा मारल्या, मी थोडास फ्रेश झाले .आता निवांत इथे बसतोय एक नवीन ऊर्जा आल्यासारखे वाटते खरं म्हणजे मित्र-मैत्रिणींसोबत भेटणं ही एक थेरपी आहे .तू म्हणते ते बरोबर आहे काम खरच सगळ्यांना आहेत आणि कितीही संपवायची घ्या घरातली काम आणि जबाबदारी काही संपत नाही .वेळ मात्र निघून जातो आणि पुन्हा येत नाही .”मुक्ता
“तेच तर सांगते ना मी तुला, बोलत जा, भेटत जा आणि हक्काने कधीही मला कॉल कर मी असेन…”आर्या
“थँक्यू यू “मुक्ता .
दोघी बराच वेळ निवांत बसतात. गप्पा मारतात. मुक्त बऱ्यापैकी खुलली होती आणि मग घरी जातात .एक भेट आणि सगळं ताण नाहीसा होतो.गाणं गुणगुणात मुक्ता घरी आली , ती हसत खेळत होती. तिने मस्तपैकी मुलांची चौकशी केली .आजचा दिवस कसा होता तेही विचारलं.. मुलांनी आणि नवऱ्याने पिझ्झा l खाल्ला होता आज किचनमध्ये काहीही काम नव्हतं…
ह्या दोघींची एक भेट खूपच छान होती.
मुक्ता खूप फ्रेश झाली होती.."एक भेट"आपल्या मैत्रिणी सोबत किंवा मित्रासोबत गरजेची असते. आजकाल धावपळीत आपल्याला वेळ मिळत नाही किंवा अस म्हणावं लागेल की ते आपण काढत नाही.. स्वतःला प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे...
त्यामुळे तुम्ही नक्की आपल्या मित्र मैत्रिणी ना भेटत राहा..
ही कथा कशी वाटली नक्की कळवा...
अनुराधा पुष्कर..