इकडे निनादच्या घरी. आई ने उत्साहानं निनाद चे आवडते पदार्थ बनवले होते…जेवण करून तिघा गप्पा मारत बसले होते..आपले यु के चा गमती सांगत होता…पण जास्ती करून प्रितीच्या गोष्टी सांगत होता..बाबा उठून आत गेले झोपायला ..त्यांना असे जाताना बघून तो म्हणाला …बाबा थकेलेल वाटतात ना..
अरे वय झाले आता….आई पण काही तरणी नाही राहिली आत्ता…झेपत नाही रे….
मग कामवाली बघ ना…(त्याने मुदाम म्हटले…माहिती होते लग्नाचा विषय निघणार आहे ते)
हो का..शाहणा आहेस फार… एवढा काही बावळट नाहीस हा तू…आईने कान पकडत म्हटले….
मग हळूच विषय काढला…तुझे काही नाही न??? मग आता इथे आहेस तर एक दोन मुली बघून जा..आत्याने तुझ्या साठी एक स्थळ पाठवले आहे…बघून घे एकदा…आम्हाला पसंत पडले आहे…
नाही बघायचे आहे मला.. आई , मला प्रीती आवडते…त्याने हळूच म्हटले…
मग विचार तिला…आमची काहीच हरकत नाही…उलट आम्हाला पसंत आहे प्रीती….
विचारलं…घरी विचारून सांगते म्हणाली….
समजदार आहे मुलगी….म्हणूनच आम्हाला पसंत आहे…उद्या पर्यंत वाट बघू नाहीतर मागणी घालू तिला…कोणाची बिशाद आहे माझ्या लाडक्या लेकाला नाही म्हणायची…..
?️?️?️?️?️?️?️?️?️?️?️?️?️?️?️?️?️?️?️?️?️?️?️?️?️?️?️?️?️?️?️?️
इकडे प्रीतीला रात्री झोप येईना…तिने मोबाईल हातात घेतला…निनाद चा मेसेज होता…मी घरी सांगितले …आई बाबा खूप खुश आहेत…वेलकम टू देशमुख फॅमिली … प्रिन्सेस…जास्ती विचार करू नकोस….सगळे ठीक होईल. गुड नाईट
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️♥️♥️♥️♥️♥️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
दुसऱ्या दिवशी सकाळी आईबाबा आणि ती नष्ट करायला बसले होते..खरे तर ती अवघडली होती…आई ने नक्कीच बाबा सांगितले असणार. काय बोलतील बाबा…किती कठीण आहे हे सगळे…तरी सगळे निनाद ला लहानपणा पासून ओळखतात…घरचे माहीत आहे….तरी आपल्याला तेवढी भीती वाटत आहे…हेच मंदार बदल बोलायचे असते तर …काय केले असते आपण….कुठून हिम्मत आणली असती…!!!!
शेवटीं बाबांनीच विषयाला वाचा फोडली. निनाद ने तुला लग्न साठी विचारले आहे म्हणे..मित्र असणे वेगळे आणि आयुष्या चा जोडीदार असणे वेगळे प्रीती. तुला तो नक्की आवडतो का आपल्या आयुष्या जोडीदार म्हणून? तो आपल्या जातीचा ही नाही … तू ब्राह्मण तो मराठा नॉन वेज खातो तुला चालेल का? घरच्या पद्धती वेगळ्या.. झेपेल का तुला.बाकी तुम्ही एकमेकांना खूप चांगलं ओळखता…मुला बदल प्रश्न नाही पण ह्या सगळ्यांचा विचार नक्की कर……
प्रीती ने शांत पणे म्हटले सॉरी बाबा…पण मला निनाद माझ्या बेस्ट फ्रेंड आहे आणि मला जन्मभर सुखी ठेवेल ह्याची खात्री आहे…कोणी अनोळखी माणसाबरोबर ज्याला मी १ /२ भेटले त्याच्या बरोबर लग्न करण्या पेक्षा मी निनादला जास्त पसंत करेन. जाती चे म्हणाल तर बाबा ..थोडा बदल आहे..पण लंडन मध्ये मी ज्या मुलाला भेटले ना..बाबा त्याची ही अपेक्षा होती की मी नॉन वेज बनवावे…मग त्यासाठी ब्राह्मण झाला म्हणून काय झाले… पद्धती म्हणाल तर…थोडी फार समजून घेता येईल ते कोणाच्याही घरी गेले तरी असेलच ना….मग निनाद चे घर तर कित्ती ओळखीचे आहे मला आणि काका काकीच खूप प्रेम आहे माझ्यावर..
माझी संगीताची आवड जपणार..मला मुली सारखे प्रेम करणार घर आहे ते बाबा ….
अगं हो कित्ती बोलशील….!!!! मी असाच गम्मत करत होतो तुझी…म्हटले बघू तरी काय बघितले ते..छान निवड आहे हा तुझी..खरंच आमच्या का नाही लक्षात आले काय माहीत…!!!
बाबा..काय हो हे….असे म्हणत प्रीती बिलगली…
बघ तर आता मस्का मारते आहे ..आणि मगाशी त्याची बाजू घेवून वकिली करत होती…शाहणी कुठली…बाबा ने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले…
त्याला फोन करून सांग ..आम्ही येतोय संध्याकाळी म्हणून..ठीक आहे..!!!! थांबाल ना संध्याकाळ पर्यंत की आताच जाऊ….बाबा ने हसत विचारले.
????????????????
संध्याकाळी प्रितचे आई बाबा , निनाद चा घरी गेले…थोड्या गप्पा मारून सरळ विषयाला हात घातला…प्रीती साठी निनाद चा हात मागितला…
दोघांचे लग्न ठरले…
जा तिला घेऊन ये .. वाट बघते आहे तुझी घरी आणि हो सरळ इकडेच या…प्रितीच्या आईने निनाद ला सांगितले….
तसा तो धावतच निघाला. प्रीती तयार होऊन देवाजवळ बसली होती… आयुष्याचा खूप मोठा निर्णय घेतला होता आज…देवा मला शक्ती दे सगळ निभावून नेण्याची..आज अश्रूंना खळ नव्हता… तेवढ्यात बेल वाजली…
तिने डोळे पुसले…आणि हलकेच चेहरा धुतला.. आपल्या नवीन आयुष्याला ती हसत समोर जाणार होती….
दारात तो उभा होता ..मस्त मनापासून हसत तिच्याकडे बघत होता…आज नव्याने तिला बघत आहे असं वाटतं होत…ती झेपावली त्याच्या मिठीत पहिल्यांदा….त्याने तिला घट्ट धरून ठेवले…
एक प्रॉमिस माझ्याकडून …..
जेवढे सुख तुला माझ्याकडुन देता येईल …तेवढे देईन…
काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ
मात्र तुलाच देईन…
हॅपी Mr. Deshmukh…!!!! तिने हळूच विचारले…
येस प्रिन्सेस ….सॉरी सॉरी Mrs Deshmukh…!!!!.
❤️♥️❤️♥️❤️♥️❤️❤️❤️❤️❤️♥️♥️❤️❤️❤️❤️❤️❤️♥️❤️❤️❤️❤️❤️♥️♥️❤️❤️♥️♥️❤️
तुम्हाला हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.कृपया लाइक करा शेअर करा फॉलो करा वाचत रहा कॉलेज वाली लव स्टोरी…..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा