भाग १
"ताई अगं, कंटाळा येतो मला घरात बसून बसून, तिचं काम, तिचं साफसफाई, आले गेले पै पाहुणे, सगळं तेच. काय स्वप्न घेऊन आले होते मी आणि.... लग्नानंतर सगळंच बदललं ग, हीच का मी! प्रश्न पडतो मला कधीकधी"
"नोकरी करायची म्हटलं तर, नोकरीची एवढी घाई कशाला असे म्हणतात. आशयला तर काय? मी त्यांच्या जवळच हवी असते सदानकदा."
"म्हणतात... मी ऑफिसला जाताना, तू मला सोडायला आणि येतो तेव्हा माझी वाट बघत दारात उभी असायला हवी... आणि सध्या तेच करते ग मी." सुमेधा बोलतं होती.
"अगं मग छान चाललयं की सगळं. आणि एक सांग ऑफिसला जाताना फ्लॅग किस आणि येऊन गालावर ओठ टेकवतात की नाही"... प्राची सुमेधाची मोठी बहीण, तिच्या बोलण्याने सुमेधा लाजेने गोरी मोरी झाली होती...
"लाजली लाजली..."
"ताई... काही काय ग तुझं? ताई अगं काय हे.. मी कॉल कशाला केला आणि तुझं आपलं वेगळंच.... ठेवते मी फोन!" सुमेधाने फोन कट केला.
कॉम्प्युटर सायन्स झालेली सुमेधा. चांगल्या नोकरीच्या शोधात होती तोच लग्नासाठी निरोप हि यायला लागले होते.
"नोकरीच्या दृष्टिने अनुभव महत्वाचा आणि अनुभव मिळवण्यासाठी नोकरीला शंभर टक्के न्याय द्यावा लागेल, म्हणून सध्या तरी नोकरी आवश्यक." लग्न वगैरे नंतर समिधाने सर्वांना सांगून टाकलं. पण योग जुळून आले की कुणाचं काही चालत नाही तेच खरं.
"एकदा मुलाला बघून तर घ्या, पसंतीचं नंतर बघू" मध्यस्थांनी गळ घातली आणि मध्यस्थ्यांच्या मध्यस्तीने निरोप आणि कांदेपोह्यांचा कार्यक्रम ठरला.
"ही, मुलाची आई सुधाताई, मुलाचे वडील, मोठा भाऊ अजय, वहिनी प्रतिभा, मुलाची बहीण आरती, एव्हढच काय पण ननंदेचा नवरा आणि तिच्या मुलांची पियूष, पराग आणि पल्लवी" सर्वांची मध्यसस्थ्यांनी ओळख करून दिली.
बघता क्षणी, पसंत पडावा अशी शरीरयष्टी, उंचपुरा, भरभक्कम बांध्याचा, दिसायला राजबिंडाच होता आशय. सडपातळ बांध्याची, नाकी डोळी रेखीव, दिसायला सुंदर जोड्याला जोड शोभेल अगदी साजेशी होती समिधा.
इंजिनिअर असलेला आशय एका मोठ्या प्रायव्हेट फर्म मध्ये नोकरीला होता. सगळ कुटुंब शिकल सवरलं त्यामुळे नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. होकाराचा निरोप आला आणि समिधा आणि आशयच लग्न ठरलं.
घरच्या सर्वांची पसंती एकीकडे पण समिधाला ही आशय मनापासून आवडला होता. आशयसोबत सुखी संसाराची स्वप्न विणण्यात आता ती हि गुंतून गेली होती.
दोघे ही आज पहिल्यांदाच बाहेर भेटणार होते. फोन करून आशयने समिधाला बोलावलं होतं. आल्याआल्या त्याने खुर्ची मागे करून तिला बसायला जागा दिली आणि तिथेच त्याने समिधाचं मन जिंकलं.
"काय करणार आहेस पुढे?" आशयने विचारलं.
"सुखाने संसार करायचा आहे." सुमेधाने हसत उत्तर दिलं.
"वाव ग्रेट!"आशयच्या चेहऱ्यावर समाधानच हसू उमटलं होतं.
"फक्त तेवढंच नाही, करियरकडे हि लक्ष द्यायचं आहे. नोकरी करायचीय. खूप काही करायचं होतं.. पण मध्येच हे लग्न आणि आता हे सगळं थोड.... थोड बाजूला ठेवलंय." समिधा बोलताना गोड हसली.
"ओके... छानच.. पण घरी आल्याआल्या अगदी घाईने नोकरी तू करू नयेस. नवीन घर, नवीन माणसं, अर्थात तुझ्यासाठी मी आणि माझ्यासाठी तू असणार आहोतच. घरचे हि तसे सुप्पोर्टिव आहेत. पण नवीन लग्न झालेल्या मुलींचा बराच वेळ सुरवातीला नात्यांना वेळ देण्यात जातो. तुला वाटेल तेव्हा, निवांत, शांततेत होऊ देत सगळं. आशयने तिचा हात घट्ट पकडला.
"आणि तसाही वेळ कुठे असणार तुला. एकदा का मी तुला मिठीत घेतलं की सोडतोय होय. आता फक्त हा हात धरलाय तेव्हा तर अधिकाराने तुला मिठीत घट्ट पकडुन ठेवेन."
"दिवस एकमेकांच्या आठवणीत आणि रात्र एकमेकांच्या कुशीत... आशय रोमँटिक होऊन बोलत होता. समिधा लाजेने गोरीमोरी झाली होती.
"घरी आई नोकरी करणारी, मोठ्या वहिनी पण नोकरी करतात. घर सांभाळून, आईची धावपळ बघत मोठा झालोय त्यामुळे आपलं दोघांचं आयुष्य एक झाल्यावर थोडा शांत निवांत वेळ हवाय मला.. तूझ्या सहवासात. देशील!"
"हो...!" म्हणत सुमेधाने ही आश्वस्त केलं.
समिधाच शिक्षण झाल्याझाल्या लगेच लग्न ठरलं तिला नोकरी करण्याची तशी संधी मिळालीच नव्हती. नोकरी करून अनुभव गाठीशी राहावा तिला मनापासून वाटत असलं तरी आशयच्या बोलण्याने ती हुरळून गेली. आजवर जपलेल्या स्वप्नांना बाजूला सारून, आशयसोबत नवीन संसाराच्या स्वप्नांना विणण्यात ती गुंतून गेली.
देवा ब्राम्हणाच्या साक्षीने, थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने समिधा आणि आशय दोघेही लग्न बंधनात बांधले गेले. उंबरठा ओलांडून समिधा सासरी आली.
मिठीत सखे एकरूप व्हावं
कणाकणाने विरघळून जावं.
थरथरत्या अधरांचे चुंबन
तूझ्या नी माझ्या नात्याची गुंफण...
"ही घ्या तिकीट..." अजय आणि प्रतिभाने दोघांसाठी छान शिमला कुल्लू मनालीच पॅकेज बुक केलं होतं.
दोघेही पंधरा दिवसांसाठी हनिमूनला निघुन गेले. एक एक क्षण एकमेकांच्या सहवासात जात होता. तन मनाने एकमेकांचे होऊन जगण्यातला आनंद दोघे मनापासून अनुभवत होते. आशय आणि समिधा खऱ्या अर्थाने एकरूप झाले होते. नव्या आयुष्याची खूप गोड सुरुवातच तर होती ही.
-©®शुभांगी मस्के...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा