एक जाणीव पुरेशी भाग ५ (अंतिम)

भविष्याचा वेध घेण्या एक जाणीव ही पुरेशी असते
भाग ५


"मी नोकरीसाठी प्रयत्न करतेय." तिने आशयला स्पष्ट च सांगितलं.


"प्रयत्न केल्याशिवाय का नोकरी मिळणार मला. असेच दिवस निघून गेले की, मग कठीण होऊन जाईल सगळं" माहेरी गेले तेव्हा, एक दोन जागी इंटरव्ह्यू दिल्याचं तिने. काहीच झालं नाही. तिने आशयला सांगून टाकलं. 


"प्रायव्हेट नोकरी करून जी हुजुरी करण्यापेक्षा, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न कर. अभ्यास कर त्याने समजावलं. तुला बाहेर ही जावं लागणार नाही. आशयने त्याच मत मांडलं..


"सरकारी नोकरी म्हणजे खूप अभ्यास करावा लागेल. घरातली कामं, आले गेले पै पाहुणे या सगळ्यात, मला देता येइल का वेळ अभ्यासासाठी?" तिने स्पष्टच विचारलं.


"घरी कामचं काय असतात आणि काम आटोपली की अभ्यास करूच शकतेस तू." आशय ने त्याच मत मांडलं होतं.


"तिने प्रयत्न सुरू केले.. मिळेल त्या वेळात ती जोमाने अभ्यासाला लागली."


"सकाळी सगळं आवरलं की सुधाताई शाळेत निघून गेल्या की ती अभ्यासाला बसायची. काम करून थकलेली असल्याने जेवण झाल्यानंतर तिला छोटीशी डुलकी लागायची. पुस्तक हाती घेते न घेते तोच, सासऱ्यांसाठी दुपारच्या चहाची वेळ. पियूष आला की, त्याला हवं नको ते बघ, अभ्यास घे, वाळलेले कपडे त्यांच्या घड्या, घासलेल्या भांड्यांची मांडणी, हे सगळं करण्यात अख्ख्या दिवस आणि संध्याकाळ तर रात्रीचा स्वयंपाक करण्यात निघुन जात होती. रात्री सर्वांची जेवणं आटोपली की रात्री झोपायला रूममध्ये गेल्यावर दिवसभराचा शीण आशयच्या कुशीत शिरली की कुठल्या कूठे पळून जात होता. पण तरीही या सगळ्यात तिला समाधान मिळेल तेवढा अभ्यासासाठी वेळ तिला काढताच येत नव्हता. 


ठरवल्याप्रमाणे काहीच होत नव्हतं, "रांधा वाढा उष्टी काढा" आपण यातच गुरफटत चाललोय. आजकाल तिचं मन अभ्यासातच नाही तर कामात ही लागत नव्हतं.


"होईल तेवढं कर.. उगाच अभ्यासाचं दडपण घेऊ नको." सगळे दिलासा देत पण यामुळे साध्य काहीच होत नव्हतं.


आपल्या दिवसभराच्या दिनचर्येत जोवर बदल होत नाही तोवर माझं मन अभ्यासात एकाग्र होणार नाही अखेर तिला कळून चुकलं.


ताई जवळ याचा नक्की च तोडगा असेल.. तिला वाटलं. तिने तिच्या मोठ्या प्राचीताईला फोन केला. "ताई अगं तू इतक्या वर्षापासून सासरी नांदते आहेस, तुला मी नव्याने काय सांगू.. घरात सगळेच चांगले आहे अगं, खूप काळजी घेतात. हाताशी पैसा पाणी सगळच आहे पण.. तरी काहीतरी सुटतयं असं वाटतं राहतं. 


"सुटलेलं कधीच मिळालं नाही तर. आणि मला हवं ते न मिळाल्याने माझं आयुष्य, माझा स्वाभिमान त्याच काय? मी आजवर बघितलेल्या स्वप्नांचं काय? ती अशीच अपुरी राहणार का? घरदार, नवरा, संसार हेच म्हणजे आयुष्य का ग? मला माझं माझं काय?" 


"हाती सगळं असून देखील माझी ओंजळ रिकामी च ना ग" मनातली खदखद तिने ताईपाशी बोलून दाखवली. 


लाडक्या छोट्या बहिणीला काय सल्ला द्यावा? प्राचीला सुद्धा ही प्रश्न पडला.. 


स्पष्टपणे बोलूनच यावर तोडगा काढता येईल.. तूझ्या सासरची सगळी माणसं चांगली आहेत समजून घेतील तुला. तू स्पष्टपणे बोल या विषयावर,  प्राचीने समिधाला विश्वास दिला. 


'आयुष्याला आकार द्यायचा असेल तर गप्प बसून चालणार नाही. पाऊल उचलावंच लागेल' तिने ठरवलं. 


"मी नोकरीसाठी प्रयत्न करतेय, परीक्षा देतेय पण मला पाहिजे तसं यश मिळत नाहीये. कारण माझे प्रयत्नच समाधान कारक नाहीत. तिने आशयला स्पष्टच सांगितलं.


"अगं घरीच असतेस दिवसभर.. मग अभ्यास का करत नाही" आशय चिडला होता.


"कारण घरकाम करून ही थकवा येतो." दोन वेळच्या स्वयंपाकाचं ही दडपण असतं. आता काय काय सांगू." 

मला परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी क्लासेस आणि निवांत अभ्यास करता यावा म्हणून लायब्ररी लावायची आहे. तिने स्पष्टच सांगितलं.


"आणि मग... पियूषचा अभ्यास. तो कोण घेणार?" सासूबाई पटकन बोलल्या.


"आई मी जवळपासची चार मुलं अजून घेऊन त्यांची सुद्धा शिकवणी पियूष बरोबर घेईल.. या सगळ्यात माझे एक दिड तास जातील पण माझ्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील. त्याचा फायदा मला बरोबरच पियूष ला ही होईल."


आरतीला हे मुळीच पटलं नव्हतं.. या सगळ्यात पियूषच नुकसान होईल वगैरे तिने समिधाला सुनावलं.


"ताई मग तुम्ही, पियूष ची शिकवणी बाहेर लावा. माझ्याकडून  शक्य तेवढं मी सगळं करेन पण माझ्या स्वप्नांना बाजूला सारून नाही" समिधा यावेळी स्पष्टच बोलली.


थोडा मनमिटाव झाला पण समिधाचा हेतू स्वच्छ आहे हे समजून, आशय आणि सुधा ताईंना समिधाच म्हणणं अखेर पटलं.


घरातलं सगळं पटापट आवरून, मिळालेल्या वेळात आता समिधा लायब्ररीत जावून अभ्यास करू लागली. तिने स्वतःला अभ्यासात पूर्णपणे गुंतवून घेतलं. 


आता ती मनापासून खूश होती.. कारण एकत्र कुटुंबात राहून तिला तिच्या स्वप्नांच्या दिशेने भरारी मारण्यासाठी बळ देणार सगळं कुटूंब आता तिच्याबरोबर होतं.


समिधाच्या घरचे सगळेच, स्वभावाने चांगलेच होते. पण स्वप्नांना दिशा देण्यासाठी. आकाशात उंच भरारी मारण्यासाठी मी सज्ज आहे पण तुमच्या आधाराशिवाय ते शक्य नाही.. ही जाणीव तिने सर्वांना करून दिली होती.


एकीकडे "तुला सगळे सुख आहे मग गप्प बस... पदरी पडलेलं सुख अनुभव... पंख छाटण्याबाबत आईने सांगितलं होतं.  तर दुसरीकडे, स्वतःच अस्तित्व जपण्यासाठी, उज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल आपला हक्क या गोष्टीची जाणीव करून देणारी प्रतिभा.. आपल्या आयुष्याची खूप महत्वाची वर्ष वाया जावू नये, यासाठी फक्त आपल्या एकटीचे प्रयत्न पुरेसे नाही तर त्यासाठी घरातल्या लोकांची बहुमोल साथ महत्वाची या गोष्टीची जाणीव समिधाने करून दिली.. आणि अखेर समिधाच्या प्रयत्नांना यश आलं. ती परीक्षा पास झाली होती मोठ्या पदावर तिची नियुक्ती झाली होती..

"आपलं अस्तित्व आपली जबाबदारी" आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी प्रतिभा वहिनी वाईट नाही या गोष्टीची जाणीव आता घरातल्या प्रत्येकाला सुमेधा करून देणार होती.
वेळ लागेल पण यश मिळेलच.. तिला पूर्ण विश्वास होता.

ही जाणीव करून देणारी व्यक्ती खूप महत्वाची असते आयुष्यात
काय वाटतं तुम्हाला...

-©®शुभांगी मस्के...


🎭 Series Post

View all