Login

एक करार ! भाग -9

"रिना, मीट माय वाईफ भक्ती अँन्ड भक्ती ही रिना मेहता माझी मैत्रीण." "हिच आहे का ती भटकभवानी." भक्त??

भाग -9

       

मागील भागात - विश्वा बाथ घेऊन टॉवेलवर बाहेर आला तर भक्ती त्याच्याकडेच पाहत राहिली होती. विश्वाने जवळ ओढून तिला जवळून बघायला सांगितले. ती लाजून बाथरूममध्ये पळाली. आवरून बाहेर आल्यावर विश्वा तिला कुठेच दिसला नाही.

आता पुढे -

  बाप्पाला निरोप द्यायची वेळ आली तर तिचा जीव जड झाला होता. डोळ्यांत सारखे पाणी येत होते. लहानपणापासून बाप्पा तिचा फ्रेंड होता. सुख दुःखच काय तर रोज त्याच्याशी बोलल्याशिवाय तिला राहवत नव्हते. आरतीची वेळ झाली, तिने संजूला फोन केला.

"कुठं आहेस?" भक्ती.

"…." पलीकडून व्यक्ती बोलत होती.

"ये लवकर." भक्ती.

   एक बाईक तिच्या बंगल्यासमोर येऊन उभी राहिली. बाईकवरुन ती आत आली आणि तिला पाहताच एकजण क्लीन बोल्ड झाला. कोण काय हो, आपले सत्यन बाबू तिला पाहून सत्यन पूर्ण तिच्यात हरवले. ती आत आली आणि भक्तीने तिला मिठी मारली. भक्ती आणि संजनाने सारखाच लुक केला होता. व्हाईट पंजाबी ड्रेस आणि डोक्यावर फेटा नाकात नथ , कपाळावर चंद्रकोर. तिने अंजलीशी ओळख करुन दिली. संजना त्यांच्या पाया पडली आणि संजू विश्वाकडे गेली.

"काय म्हणता ओ जिजू, मी आहे संजना, हिची संजू ,काय राव तुम्ही मला समजून संज्याचा हात मोडला ना. बिचाऱ्याला बँडेज बांधावा लागला." संजना हसत म्हणाली. तोही हसला.

"सॉरी मला वाटल की संजू .." तो पुढे बोलतच होता की संजना म्हणाली, "मी मुलगा आहेस? बरोबर ना, काय आहे ना जिजू आपण अजून तरी कुणाला भक्तीच्या जवळ फिरकू दिलं नाही. तो भावासारखा आहे आमचा म्हणून, नाहीतर बकलून काढला असता."

"भक्ती आपल्याला आवडले जिजू." 

" एकदम कडक." हे ती भक्तीच्या कानात म्हणाली.

"अरे वा! मला माझी साली साहिबा आवडली एकदम वंटास आहे." तोही तिच्याच अंदाजात म्हणाला.

"जिजू मी काय म्हणते, भक्तीचा हा अवतार तुम्ही कधी पाहिला नसणार." तोपर्यंत ढोल ताशा पथकांनी वादय काढले आणि त्याच्या समोर भक्ती हातात मोठे ढोल घेऊन उभी होती. भक्तीने वाजवायला सुरवात केली. विश्वासाठी तिचे हे रुप नवीनच होते. वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक काढली. जवळच्या पार्कमध्ये विसर्जनासाठी पाण्याच्या टाकीची व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जनाच्यावेळी भक्तीचे डोळे पाणावले होते. संजूने तिच्या पाठीवर हलके थोपाटले. विश्वाने फोन करुन संजयची माफी मागितली. संजू सगळ्यांचा निरोप घेऊन घरी गेली पण जातांना सत्यनच हृदयही सोबत घेऊन गेली.

**********

"भक्ती आपल्याला उद्या पार्टीला जायचे आहे. हे तुझ्यासाठी आणलयं. होप सो तुला आवडेल." विश्वा तिच्या हातात मोठा बॉक्स देत म्हणाला. तिने उघडून पाहीला, तर त्यात एक पार्टी वेअर गाऊन होता.

"खूप सुंदर आहे. थॅक्य यू." ती खुश होत म्हणाली.

"वेलकम जान." तो मिठीत घेत म्हणाला.

"ये सारखा सारखा जवळ नको येत जाऊ, मला कसतरीचं होतं." ती मिठीतून दूर जात म्हणाली.

"म्हणजे कसं होतं?" विश्वाने विचारले.

"अंगावर मोरपिस …" ती बोलता बोलता थांबली त्याच्याकडे पाहिले तर तो तिच्याकडे खट्याळ नजरेने बघत होता. तिला ते समजले आणि ती बोलायचं थांबली.

" मला नाही माहीत." अस म्हणून ती रुमच्या बाहेर निघाली.

विश्वा बाहेर तयार होऊन भक्तीची वाट पाहत होता. थोड्याच वेळात ती त्याने आणलेला ड्रेस घालून ती बाहेर आली आणि तो पाहतच राहिला. रेड कलरचा गाऊन, साजेसा मेकअप, रेड डायमंड कलरचे एयरिंग आणि तसाच नेकलेस त्याला अनुसरुन केसांची केलेली हेयर स्टाईल अप्सराच दिसत होती. तो तर तिला पाहण्यात इतका हरवला की, ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली, तरी त्याला त्याचे भान नव्हते.

"गॉर्जीअस." तो म्हणाला आणि ती खाली नजर झुकवून लाजली. तिच सुंदर दिसणे त्यात तिचे लाजणे बस्स ! त्याचा जीव जायचा बाकी होता.

"आज तो कयामत हो गई, 

इतना हसीन चेहरा।

उपरसे ये शरमाना, 

कही कर ना दे हमे दिवाना।"

 तिने जीभ बाहेर करुन वेडावून दाखवले. तसा तो खळखळून हसायला लागला. त्याचे हसणे पाहून भक्ती त्याच्याकडे एकटक बघतच राहिली. तोही ब्लॅक सुटमध्ये जबरदस्त हॅण्डसम दिसत होता. दोघांना हसताना पाहून अंजलीने त्यांच्या दोघांच्या कपाळावरुन बोट मोडली. अंजलीने तिला काळजाची तीट लावली. तिने आईला मिठी मारली आणि गाडीत बसून निघाले. गाडीत गाणे प्ले केले. मध्येच ती चोरुन त्याला बघत होती .. तिचं पहिलं प्रेम, आज तिच्याजवळच आहे पण मनाला खोट बोलण्याने अस्वस्थ होत आहे. तिने तिची खरी ओळख लपवून ठेवलीय.

पहला पहला प्यार है

पहली पहली बार है

जान के भी अन्जाना

कैसा मेरा यार है ...

उसकी नज़र, पलकों की चिलमन से मुझे देखती, उसकी नज़र

उसकी हया, अपनी ही चाहत का राज़ खोलती, उसकी हया

छुप के करे जो वफ़ा, ऐसा मेरा यार है

पहला पहला प्यार है …

   भक्ती डोळे बंद करुन गाण्यात रममाण झाली होती. तर तो तिच्याकडे बघण्यात. पार्टी एका लॉनमध्ये होती. आजुबाजुला रंगबेरंगी लाईट झगमगत होते. विश्वाने गाडीतून उतरुन भक्तीच्या साईडने गाडीचे दार उघडून त्याचा हात समोर केला. तिने ही त्याच्या हातात तिचा हात दिला आणि दोघं आत गेले. पार्टीच्या ओनरने त्यांना हसून ग्रिट केले. विश्वा भक्तीची ओळख करुन देत होता. सर्व तिचे कौतुक करत होते. तिला मिसेस भक्ती विश्वराज अभ्यंकर नाव ऐकून सुखावत होती. विश्वा त्यांच्या बिझनेस वर्ल्ड मधल्या लोकांसोबत बोलायला बाजूला गेला. भक्ती खूर्चीवर बसून त्याला न्याहाळत होती. तितक्यात एक शॉर्ट ड्रेस परिधान केलेली मादक तरुणी आली आणि विश्वाला मिठी मारुन, गालावर किस करत होती, हे भक्तीने पाहिले. आपल्या भक्तीचा भेजाच सटकला नं पण सगळ्यांसमोर तमाशा नको, म्हणून कसाबसा राग गिळून घेतला. विश्वाच्या बाजूला उभी राहून त्याच्या हातात हात घेऊन पकडला. विश्वा गालात हसला. तिचं स्वतःहून पुढाकार घेणे आवडले त्याला. ती तरुणी भक्तीकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती.

"रिना, मीट माय वाईफ भक्ती अँन्ड भक्ती ही रिना मेहता माझी मैत्रीण."

"हिच आहे का ती भटकभवानी." भक्ती म्हणाली.

"व्हाँट डीड शी से?" रिना न कळून म्हणाली.

"शी सेड यू आर लूकींग व्हेरी प्रिटी." विश्वाने सांगितले. रिनाने विश्वाला बाजूला नेले.

"विश्वा तुमने ऐसे कैसे शादी करली. जब तुम्हे पता था की मैं तुमसे प्यार करती हूँ, वो तुम्हारे टाईप की नही है. आय लव यू विश. तुम मेरे हो." ती विश्वाला चिपकत होती.

"रिना मैने तुम्हे दोस्त के सिवा कुछ नही समझा, मैं सिर्फ भक्ती से प्यार करता हूँ. वो मेरी जान है. सॉरी रिना." असा बोलून तो निघत असतो तर रिना त्याला मिठी मारते, त्याला जवळ ओढते आणि त्याच्या या गालावर त्या गालावर किस करते. त्याला भयंकर राग आला, त्याने रागावर कंट्रोल केले. त्याने तिला स्वतःपासून दूर केले. ती दोन पाऊले मागे जाते आणि पुन्हा त्याच्याजवळ यायचा प्रयत्न करत होती तितक्यात तिच्या गालावर सनकन भक्तीचा हात बसतो. विश्वाला आणि रिनाला काही कळायच्या आधी भक्ती तिथे येऊन गालावर वाजवून दिली.

"How can you do this to my husband. Stay away from him. हॉऊ कॅन यू डू धिस टू माय हसबंड. स्टे अवे फ्रॉम हिम." भक्ती विश्वाचा हात पकडून तिकडून निघून जाते. रागाने ती लाल झाली होती. विश्वा तर तिच्याकडे बघतच राहिला. त्याला हे अनपेक्षित होत. इकडे रिना गालावर हात ठेवून ते गेलेल्या दिशेने बघत होती.

"छोडूंगी नही भक्ती तुम्हे." ती छद्मी हसत म्हणाली.

 विश्वा भक्तीला मोकळ्या जागेत घेऊन गेला. तिला बसायला खुर्ची दिली.

"समजते कोण ती स्वतःला माझ्या नवऱ्याला अशी पप्पी देत होती आणि काय म्हणाली ती फटाकडी, तूम मेरे हो." भक्ती संतापाने बोलत होती. तिचा राग सातव्या आसमानावर गेला होता.

"आणि तू, तुला माहिती होतं न ती पोरगी कशी आहे? तरी तू तिला किस का बरं करु दिलं? लक्षात ठेवायचं तू फक्त माझा आहेस." भक्ती त्याची कॉलर पकडून त्याच्या जवळ जात म्हणाली.

"अरे मला बोलू तर दे." भक्ती विश्वाला बोलू देत नव्हती.

"काय बोलायचं तुला? आधी तिला किस करु दिल गालावर आणि नंतर .." पुढे भक्ती बोलूच शकली नाही. विश्वाने तिची बोलतीच बंद केली. त्याने तिच्या चेहऱ्याला दोन्ही बाजूने हातांमध्ये पकडून तिच्या ओठांवर ओठ टेकवून लॉक केले. मग काय आता कशी बोलणार? त्याच्या या कृतीने तिचे तर डोळे बाहेर यायचे बाकी होते. ती त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत होती, पण तिची ताकद त्याच्या शक्तीपुढे कमी पडत होती. तर तो तिच्या ओठांमध्ये हरवला होता. दोघांचे श्वास जड झाले,तेव्हा त्याने तिला दूर केले आणि मिठीत घेतले. तिने त्याच्या ब्लेझरमध्ये तोंड लपवले. दोघेही एकमेकांच्या हृदयाचे संगीत ऐकण्यात मग्न झाले.   

क्रमश ..

©® धनदिपा

टिम अहमदनगर