Login

एक करार ! भाग - 11

" तू फक्त माझा आहे माकडा." ती हळू आवाजात म्हणाली. तसे त्याच्या चेहर्‍यावर हसू आले."उठ ना माझी माकडीण, मी फक्त तुझा आहे शेवटच्या श्वासापर्यंत." त्याने तिच्या नजरेला नजर देत म्हणाला. त्यांच्या डोळ्यांत अश्रू आणि ओठांवर हसू होते. त्याने हलकाच तिच्या ओठांना ओठ ठेवून स्पर्श केला.तेवढ्यात डॉक्टर आले.

एक करार !

भाग - 11 



मागील भागात -

रिना मेहता पार्टीतून भक्तीचे अपहरण करते. विश्वा,सत्यन संजू , इन्स्पेक्टर कदम रिना आणि भक्तीचे लोकेशन ट्रेस केले आणि त्याच्या मागे निघाले.

आता पुढे -

    जीपीएस लोकशन बंद झाले आणि विश्वाने रागातच स्टेअरिंगवर पंच मारला.

"विश्वा, काय करतोय तू ?" सत्यन.

"मला राग येतोय. लोकेशन दाखवत नाहिये."

"रिना मेहताचं ट्रेस होतोय. जवळच आहे ती." इन्स्पेक्टर कदम.

"इकडे का बरं घेऊन गेलीय ही." विश्वा गाडी चालवताना इकडे तिकडे पाहत म्हणाला. 
 ------------------------------------------------------  
 रिना एका सुनसान कमी वर्दळीच्या ठिकाणी आली. नदी पुलावर गाडी थांबवून तिने भक्तीला बाहेर काढले. भक्ती बेशुद्ध झाली होती. तिला ओढून ताणून पुलाच्या कठड्यावर नेले.

"विश्वा सिर्फ मेरा है." असं म्हणत तिने भक्तीला खाली लोटले आणि भक्ती पाण्यात पडली. ती जोरजोरात वेड्यासारखी हसत होती. ती मागे फिरली तर तिच्यासमोर संजू उभी होती. विश्वा, सत्यन , कदमसाहेब आले. संजूने तिच्या सणसणीत कानाखाली मारली.

"भक्ती कुठेय?" संजूच्या आवाजात जरब होती. रिना फक्त पाण्याकडे पाहून स्मित करत होती.

"रिना माझी भक्ती कुठेय?" विश्वा रिनाचे खांदे पकडून हलवत म्हणाला.

"वो तो चली गई." ती पाण्याकडे पाहत होती, तर मध्येच वरती हात करुन दाखवत होती. विश्वा ती पाहत होती तिकडे पाहिले आणि त्याचे प्राण कंठाशी आले. विश्वानेही ताडकन तिला एक लगावून दिली.

"विश्वा तिला स्विमींग येत नाही,पाण्याचा फोबिया आहे तिला ."

"काय ?"

"हो."

विश्वाने वेळ न घालवता पाण्यात उडी मारली. तो एक स्विमर होता. खोल पाणी होते. संजूने पटापट फोन करुन डॉक्टरांना बोलावून घेतले . तिथे मोठमोठे इमर्जन्सी लाईट लावले गेले. विश्वा तिला पाण्यात शोधत होता. डायवर टीमही भक्तीला पाण्यात शोधत होते. खोल पाणी असल्यामुळे ती लवकर सापडत नव्हती. त्याने पाण्यातून चेहरा वर काढला. आता त्याच्या डोळ्यांत आसवे जमा झाले होते. रिनाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

"बाप्पा भक्ती सुखरुप मिळू दे ." त्याने बाप्पाला मनापासून विनवणी केली. विश्वा पुन्हा पाण्यात आणखी पुढे गेला आणि त्याला भक्ती दिसली. एका मोठ्या दगडाच्या आड निपचित पडलेली होती. विश्वा तिच्याजवळ गेला डोक्यातून रक्त येत होतं. हात बांधलेले होते. त्याने तिच्या गालावर हलकेच टॅप केलं पण तिने काहीही रिस्पॉस दिला नाही. त्याने पटकन तिला वर काढली आणि तिला घ्यायला आणखी दोन तीन जण आले. तो तिला घेऊन काठावर पोहचला. सत्यन, संजू त्यांच्याकडे धावले. डॉक्टरांची पूर्ण फौज बाहेर तयार होती. तिला बाहेर काढून तिच्या पोटावर दाब देऊन पाणी काढले. पाणी काढून सुद्धा ती शुद्धीवर आली नव्हती. तो तिला हलवत होता, पण ती काहीच रिस्पॉस करत नव्हती. सत्यनने त्याला तिला ॲम्बुलन्स मध्ये आणायला सांगितले. विश्वाची खूप वाईट अवस्था झाली होती. तोही आत आला. डॉक्टरांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले, तो नाही म्हणाला. विश्वा तिचा हात हातात घेऊन होता. डॉक्टरांनी पटपट तिला चेक केले. श्वास मंद झाले होते. पटपट ऑक्सिजन लावले. डोक्याची जखम साफ करत होते. तिथेच गाडी सुसाट धावत होती. थोड्याच वेळात ते मोठ्या 'आर्कीट हॉस्टिपल 'समोर येऊन थांबली. तिला आत आणले. तिला बाहेर काढून डॉक्टरांनी ट्रिटमेंट सुरु केली.





"प्लिज, मिस्टर अभ्यंकर तुम्ही बाहेर जा, त्यांचे कपडे चेंज करायचे आहेत." सिस्टर म्हणाली.

"त्यांचे हजबंड आहेत ते." दुसरी सिस्टर म्हणाली.

"ओके, मग राहू देत." पहिली सिस्टर.

"नको तुम्ही तिचे कपडे चेंज करा मी बाहेर आहे." सिस्टरने तिचे कपडे चेंज केले आणि डॉक्टरांनी पुढील उपचार सुरु केले. संजू सत्यन त्याला धीर देत होते.तिच्या शरीराची पूर्ण तपासणी सुरु करण्यात आली. बाहेर विश्वा संजू सत्यन तिच्यासाठी प्रार्थना करत होते. तितक्यात हॉस्पिटल समोर गाड्यांचा ताफा आला. त्यातून एक भारदस्त व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती बाहेर आले आणि त्यांना पाहून विश्वा चाट पडला. राजकारणात मुरलेले, प्रामाणिकपणे निर्भिडपणे काम करणारे,असे महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री.रावसाहेब रणदिवे यांची एकलुती एक कन्या भक्ती.

"सत्तू, मिठठू कशी आहे? कसं झाले हे सर्व." रावसाहेब.

"काका, ती …" तो बोलतच होता की डॉक्टर बाहेर आले. विश्वा त्यांच्याजवळ गेला.

"डॉक्टर भक्ती?" विश्वा, सत्यन, संजू सर्व एकत्रच म्हणाले.

"त्या ठीक आहेत पण अजून शुद्धीवर आल्या नाहीत. चोवीस तासाच्या आत शुद्धीवर यायला पाहिजे नाहीतर त्या कोमात जातील. हे चोवीस तास खूप महत्वाचे आहे. रावसाहेब तुम्ही इथे, त्या कोण आहेत तुमच्या?" डॉक्टर. 

"लेक आहे माझी."रावसाहेब. डॉक्टर रावसाहेबांना बाजूला घेऊन तिच्या तब्येती विषयी सांगत होते.


आतापर्यंत आवरलेल्या भावना अनावर झाल्या तो रडत होता.

"सत्या, माझा श्वास आहे रे ती,तिला काही झालं तर मी जगू शकणार नाही. माझ्या निर्जन आयुष्यात ती ऋतू बनून आली. कधी चिडणं हसणं, खोड्या काढणं, भांडण करणं, तर कधी तिचं हक्कं गाजवणं हे मला आवडलं. मी तर एका मशीनप्रमाणे जगत होतो पण तिने मला माणूस बनवलं. सत्या मी अपूर्ण आहे तिच्याशिवाय !" विश्वराज सत्याला बिलगून रडत होता. विश्वाला खांद्यावर हात जाणवला त्याने वळून पाहिले.

"जावईबापूऽऽ." रावसाहेब.

" ब .. बाबा." विश्वाला काय बोलावे सुचत नव्हते.

"घाबरु नका जावईबापू मला सर्व माहिती आहे. मला मिठठूने आणि तुमच्या आईने सर्व सांगितले आहे."

"आईऽ, तुम्ही दोघं ओळखता एकमेकांना." विश्वाने आश्चर्यकारक होऊन विचारले. 


"तुम्हाला प्रश्न पडलेत ना सांगतो मी, आधी मिठ्ठूला बघून घेऊ? डॉक्टरांनी सांगितले आहे." त्याने मान डोलावली.

"आधी तुम्ही जा, मग मी." रावसाहेब. सत्यन त्याच्या खांद्यावर हात ठेवून नजरेनेच आत जायला सांगतो. विश्वा लगेच आत गेला. भक्तीच्या डोक्याला पट्टी बांधलेली जागोजागी खरचटलेलं, दोन्ही पायाला प्लास्टर लावलेले. चेहरा मलूल पडला होता .त्याने तिचा हात हातात घेतला. तिच्या कपाळावर ओठ ठेकवले.

"उठ न पिल्लू, तुझा हा अबोला सहन होत नाहीये मला. तू म्हणशील तर मी रोज तुझ्याहातचे कारले खायला तयार आहे. तू भांडलीस तरी मी तुला काहीही म्हणणार नाही. आता कुठे आपण आपल्या प्रेमाची कबूली दिली. बघ ना आईचे किती फोन आलेत. कुठेय माझं बाळ किती वेळची विचारत आहे. काय सांगू मी तिला की तिचं बाळ असं बेडवर पडून आहे. हा धक्का तिला सहन होणार नाही. जान उठ ना. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत गं." तो रडत रडत म्हणत होता. तिला हळूहळू जाग येत होता.

"हे बघ जर तू उठली नाही ना तर ती रिना आताही माझ्याशी लग्न करायला तयार आहे." तिने हात हलवला आणि ताकदीने त्याची कॉलर पकडून त्याला जवळ ओढले. त्याने पटकन तिथले बटण दाबले. 

"तू फक्त माझा आहे माकडा." ती हळू आवाजात म्हणाली. तसे त्याच्या चेहर्‍यावर हसू आले.

"उठ ना माझी माकडीण, मी फक्त तुझा आहे शेवटच्या श्वासापर्यंत." त्याने तिच्या नजरेला नजर देत म्हणाला. त्यांच्या डोळ्यांत अश्रू आणि ओठांवर हसू होते. त्याने हलकाच तिच्या ओठांना ओठ ठेवून स्पर्श केला.तेवढ्यात डॉक्टर आले.

"गाढवा, तुला काही अक्कल आहे का?" भक्ती विश्वाला रागवत म्हणाली.

"बघा डॉक्टर, तुम्हाला ही गाढव बोलतेय." तो हसत म्हणाला.

"डॉक्टर तुम्हाला नाही या गाढवालाच बोलतेय." भक्ती डॉक्टरांना म्हणाली आणि त्याला एक फटका बसला.

"आई गंऽ, डॉक्टर तुम्ही प्लास्टर जरा चुकीच्या ठिकाणी लावले असं नाही का वाटत. पायांच्या ऐवजी हातांना लावायला पाहिजे होतं." तो खांदा चोळत म्हणाला. संजू, सत्यन आणि रावसाहेब आत आले. भक्तीला हसताना बघून त्यांना आनंद झाला.

" मिठ्ठू, कशी आहेस बाळा?" रावसाहेब.

"बाबा तुम्ही कधी आलात. मी आता ठीक आहे." ती हसत म्हणाली. डॉक्टरांनी तिला तपासले आणि ती ठीक आहे असे सांगितले. डॉक्टर सिस्टरला सुचना देऊन निघून गेले.

"बाबा, तुम्हाला कसं कळलं?" भक्ती .

"संजूने सांगितले मला." रावसाहेब.

"ये डोळे फाडून बघू नको माझ्याकडे? मग काय करणार किती घाबरवल तूऽऽ. आमची अवस्था किती वाईट झाली होती. जिजूंची तर सांगूच नको, त्यात काकूंचे फोन भक्तीशी बोलायचं आहे, त्यांना कसंतरी समजावलं." बोलतांना तिच्या डोळ्यांत पाणी आले होते.